सहजच..

प्रमोद पानसे's picture
प्रमोद पानसे in जनातलं, मनातलं
24 Aug 2019 - 11:26 am

कधीतरी असं वाटतं ना की एखादं आपलं आवडत गाणं ऐकाव .आठवतं अचानक आणी ऐकायची इच्छा होते.मग लगेच एखाद्या म्युझिक ॲप मधुन ते शोधुन ऐकतोही आपण.पण तेवढी मजा नाही येत.एक फक्त इच्छा झालीये आणी ती पुर्ण करणं लगेच शक्य आहे म्हणून असेल कदाचित् पण नाही येत मजा .आणी मन कोरडंच रहातं.

मानसिक अस्वास्थ्य असेल ,विमनस्क अवस्थेत बाहेर पडतो एखाद्या चहाच्या टपरीवर सिगरेट पेटवतोय समोर चाच्याने चहा आणून ठेवलाय.आणी अचानक fm वर तेच गाणं लागलं तर ..मुड झकास होउन जातो.हे छोट्या आयुष्यातलं छोटसं सरप्राइज असतं .

एखादा चेहरा रोज आठवत असतो .कधीकाळी रोज तो बघण्याची ओढ असणारा ,आणी ठराविक वेळी रोज बघायला मिळणारा .पण त्या वेळेची जिवघेणी वाट बघणं आता जवळ जवळ नाहीसं झालेलं असतं.तरी पण आता दिसत नसल्याने अधुन मधुन आठवत असतो.बघणं गरजेचं नसतच तरीही ती आठवण गरज निर्माण करतेच.आणी एखाद्या संध्याकाळी अचानक ओझरतं दर्शन मिळतं.पुन्हा तेच छोटः सरप्राईज .

थोडं भुतकाळात जातं मन.आणी मग आपलंच वास्तव जाणिव करुन देतं आपल्याला .

जो देखा था वो एक नशिला ख्वाब था
लेकीन जो पाया है वो कइ लाजवाब है .

मुक्तकआस्वाद

प्रतिक्रिया

छान झालंय मुक्तक. थोडं छोटं वाटलं.. छोट्याशा सरप्राईझ सारखं. पुलेशु. :-)

आज काल वेब सीरीज बनवनारे याचा इतका अतिरेक करतात की ते ही आता प्रेडिक्टेबल होऊ लागले आहे :)

आणखी एक नियम आहे प्लेजर (आंनद) म्हणजे पंचेंद्रियांच्या सुखद अनुभूति होय. जसे कर्ण मधुर संगीत, लज्जतदर चव, नेत्रसुखद दृश्य, सुखद स्पर्श, आणि हवा हवासा वाटनारा गंध.

म्हणून मज्या(फन) = प्लेजर + सरप्राइज.
ही मज्या नसेल ( प्लेजर विथ सरप्राइज) तर आयुष्य एकसुरी व निरस होते.

कोणताही प्रोब्लेम आपल्या मनात अस्वस्थता निर्माण करतो (कमी जास्त तीव्रतेची) आणि या अस्वस्थतेला जेहाँ प्लेजर चे पारितोषक मिळते (रिवार्ड) तेव्हा मन समाधानाचा अनुभव करते.

ही अस्वस्थता जीतकि जास्त तेव्हड़े समाधन तात्पुरते परंतु अतिशय तीव्र. अगदी कृतकृत्य झाल्याचि (तातपुर्ति) भावनाही तयार होते.
जसे वर्षभर अभ्यास करून चांगले मार्क मिळने. खुप प्रयतना नन्तर नोकरी लागने, मांगलिक व्यक्तीचे लग्न जमने ... वगैरे वगैरे बाबी एंजायटी ला प्लेजर रिवार्ड म्हणून मिळाले की निर्माण होणाऱ्या समाधानाची उत्कृष्ट उदाहरणे होत.

आणि मानवाचा संपुर्ण जन्म जातो या खेळात पण समाधान काही मिळत नाही कारण (प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे तयार होणारा आणि) सर्वात जास्त एंजायटी निर्माण करणारा प्रश्न मी कोण आहे, काय आहे तर अनुत्तरितच राहीलेला असतो. अर्थात हा कसा सोडवसायचा हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे पण सध्या भौतिकशास्त्राचे नियम धाब्यावर बसवून जेंव्हा हिरो गुंडांची धुलाई करतो तेंव्हा शिट्ट्या का पडतात इतपत जरी प्रश्नाचे उत्तर मिळाले तरी आपण योग्य ट्रॅक वर आहात हे नक्कीच म्हणता येईल :)

पाषाणभेद's picture

25 Aug 2019 - 6:02 pm | पाषाणभेद

>>> कधीतरी असं वाटतं ना की एखादं आपलं आवडत गाणं ऐकाव .आठवतं अचानक आणी ऐकायची इच्छा होते.
>>> मानसिक अस्वास्थ्य असेल ,विमनस्क अवस्थेत बाहेर पडतो एखाद्या चहाच्या टपरीवर सिगरेट पेटवतोय समोर चाच्याने चहा आणून ठेवलाय.आणी अचानक fm वर तेच गाणं लागलं तर ..मुड झकास होउन जातो.हे छोट्या आयुष्यातलं छोटसं सरप्राइज असतं.

गेल्या महिन्यात असेच झाले होते माझ्यासवेत.
एका रस्त्याने संध्याकाळी पायी जात होतो. तेथे एक जुने पण त्या काळी भरभराट असलेले छोटेसे हॉटेल होते ते लागले. माझे मन तेथे खाल्लेल्या पदार्थांच्या जुन्या आठवणीत रमले. मग माझी काही खाण्याची इच्छा आणि भूक नसतांनादेखील मी तेथे गेलो. गरम काही नसतांनादेखील मी थंड (आणि ताजी नसलेली असावी अशी) कचोरी मागवली. ती खात असतांनाच काउंटवरच्या रेडीओवर ( आजकाल कोण रेडीओ ऐकतो?) आकाशवाणीच्या एफएम चॅनलवर अष्टविनायक चित्रपटातील "दाटून कंठ येतो" हे विरहगीत लागले. वसंतरावांच्या आवाजातले ते जुने गाणे त्या वेळेला एकदम मनाला भिडले. काउंटर थोडे दुर असल्याने मी हातात प्लेट घेवून तिकडे गेलो अन मनपुर्वक गाणे ऐकले. खुप समाधान झाले. (चहा तेथेच मागवला असता तो संपलेला होता.)

>>> थोडं भुतकाळात जातं मन.आणी मग आपलंच वास्तव जाणिव करुन देतं आपल्याला .

खरे आहे.