वारंवार विचारले जाणारे प्रश्न.

सरपंच's picture
सरपंच in पुस्तक पान
24 Feb 2008 - 10:03 pm

नमस्कार, मिसळपाव वर नव्याने दाखल झालेल्या लोकांना काही गोष्टी
करण्यासाठी जरा अडचण जाणवते तसेच नवीन सुविधा देऊ केल्यास त्याची ओळख
सुद्धा करून देता यावी या हेतूने हे सदर सुरू करीत आहोत. संकेतस्थळावर
कुठलीही गोष्ट कशी करावी या विषयी चर्चा सुरू करण्या आधी कृपया येथे बघूनघ्यावे की तो प्रश्न आधीच कुणी विचारलेला तर नाहीये ना  ?

काही प्रश्नांचे दुवे.

१) सदस्य होण्यापूर्वी वाचलेच पाहिजे असे काही.
२) टंकलेखन साहाय्य
३) मिसळपाव वर फोटो कसा चढवावा?
४) मिपावर मोबाईलवरून फोटो कसा चढवावा
५) आपले संकेताक्षर (पासवर्ड) कसे बदलावे?
६) काही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे
७) वाचनखुणा कशा साठवाव्या?
८) दुवा (लिंक) कसा द्यावा.

प्रतिक्रिया

Secret Stranger's picture

23 Jul 2018 - 8:29 pm | Secret Stranger

सदस्य नाव कसे बदलतात येईल??

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jul 2018 - 10:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्रशांत किंवा नीलकांत या आयडीवर व्यक्तिगत निवेदन करा.

शेवटचा डाव's picture

25 Aug 2018 - 4:23 am | शेवटचा डाव

हे डाऊनलोड होत नाही

कंजूस's picture

25 Aug 2018 - 11:01 am | कंजूस

मी पाठवलेली apk file ?
1) मुळात मिपा अॅप आता स्टोरवरून काढले आहे,
२) apk extracter ची बरीच अॅप्स आहेत,
३) जी अॅप्स आता आहेत त्याचे प्रथम ट्राइअल घ्यावे लागेल.
४) settings >> apps>>security>>download from external source ON करावे लागते. एक वॅार्निंग मेसेज येतो. त्याबद्दल खात्री नाही.
५) तरी आता खटपट करू नका.
धन्यवाद.

सुमो's picture

26 Aug 2018 - 8:03 pm | सुमो

इथे टिचकी मारून डाउनलोड करू शकता. जुने व्हर्जन आहे पण चालते आहे व्यवस्थित.

हा प्रतिसाद मी अॅप वरुन दिला आहे.

कंजूस's picture

26 Aug 2018 - 9:38 pm | कंजूस

@सुमो,
१) pure apk extracter App वापरले काय?
२) माझ्या अगोदरच्या प्रतिसादातले क्र (४) करावे लागेल का?/अथवा थेट डाउनलोड होते?
३) कालच्या कट्ट्याला एका मिपाकरास हा प्रश्न विचारला तेव्हा टेम्प्लेट पद्धत सेफ आहे असं कळलं/. शक्यतो security bypass करू नये असं मत मिळालं.

सुमो's picture

27 Aug 2018 - 12:29 pm | सुमो

वरून अॅप घेतले आहे. आणि जीड्राइव लिंक दिली आहे.
तुमच्या प्रतिसादातील क्र. ४ करावे लागेल.
टेंप्लेट पद्धत अधिक सुरक्षित हे मात्र खरं .

पण ज्यांना 'खतरों से खेलने का शौक है' त्यांच्यासाठी !

कंजूस's picture

28 Aug 2018 - 9:14 am | कंजूस

धन्यवाद सुमो.
एपिके फाइलमधून डाउनलोड करताना गुगल ओएस, तुमचा मोबाइल एवढाच संबंध असतो. त्यात मिपा प्रशासनाचा काही संबंध नाही हे वाचकांनी ध्यानात घ्यायचं आहे. म्हणून लगेच सावध केले.
टेम्प्लेटातून आपण अधिकृत ब्राउजरने शोध घेतो. शोध होईल अथवा नाही परंतू धोका अजिबात नाही.

मिसळपाववर एखादा धागा कसा शोधायचा?

उदा. समजा मला श्रीलंका प्रवासाविषयी काही माहिती हवी आहे तर ह्या विषयावर मिसळपाववर आधी कुठे चर्चा झाली आहे का? असेल तर तो धागा मला कसा शोधता येईल?

'श्रीलंका प्रवास' हा कीवर्ड टाकुन सर्च करण्याची सोय मिपावर आहे का? असेल तर कुठे आहे?

कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद.

तुषार काळभोर's picture

15 Sep 2018 - 10:45 pm | तुषार काळभोर

गुगल सर्च करा.
तुमचं सर्च इंजिन नक्की गुगल आहे का एकदा कन्फर्म करा. बऱ्याचदा नको ते सॉफ्टवेअर(संगणकावर) किंवा ऍप्स(मोबाईलवर) इन्स्टॉल करताना, किंवा नको त्या साईट्सवर फेरफटका मारताना सर्च इंजिन हायजॅक होते.

तर गुगलवर असे सर्च करा-

site:misalpav.com श्रीलंका भटकंती

(मिपावर प्रवाससंबंधित धागे भटकंती कॅटेगरीमध्ये येतात म्हणून तो शब्द सुद्धा पोर्चमध्ये घेतलाय)
म्हणजे असे रिजल्ट्स मिळतील.

श्रीलंका सफरीवरील मिपावरील सर्वोत्तम लेखमालिका
सिंहलव्दीपाची सहल
श्रेय डॉ सुहास म्हात्रे

अभिजित - १'s picture

21 Sep 2018 - 5:46 pm | अभिजित - १

माझा पासवर्ड कधीच चालत नाही. अगदी browser मध्ये सेव्ह केला असला तरी. माझा तात्पुरता उपाय - कधीच logout न करणे. browser विंडो कधीच बंद ना करणे. हा उपाय १०/१५ दिवस चालतो. एक दिवस मी लॉग आऊट झालेलो असतो. मग परत forgot पासवर्ड .. ई-मेल लिंक , लॉगिन. हे सतत चालूच आहे. बाकी नेट बँकिंग , ई-मेल सर्व व्यवस्थित चालते. फक्त मिपा नाही. हे असं का होतंय ? आणि हे गेली ३/४ वर्ष चालले आहे. खरं तर माझा अकाउंट उघडल्या पासूनच.

तुषार काळभोर's picture

21 Sep 2018 - 8:27 pm | तुषार काळभोर

मला पासवर्ड कधीच टाकावा लागत नाही. नवीन फोन घेतल्यावर सुद्धा नाही. गुगलला माझा मिपाचा पासवर्ड माहिती आहे. ते काळजी घेतं.

अनिंद्य's picture

10 Oct 2018 - 3:59 pm | अनिंद्य

फोटो प्रकाशित करण्याची प्रोसेस विसरलो आहे.

ह्या मदत पानावरील कोणतीच लिंकही उघडत नाही, काय प्रॉब्लेम असावा ?

टर्मीनेटर's picture

10 Oct 2018 - 4:20 pm | टर्मीनेटर

मिपावर चित्रे टाकण्याची कृती

https://www.misalpav.com/node/35690

लिहिले ले योग्य ठिकाणी प्रकाशित करण्यात अडचन आहे

तुषार काळभोर's picture

17 Oct 2018 - 7:18 am | तुषार काळभोर

तुम्ही कॉम्पुटरवर मिपा वापरात असाल तर उजव्या बाजूला आवागमन असा एक मेनू आहे. मोबाईलवर पाहत असाल तर तळाला हा मेनू आहे. त्यात लेखन करा असा एक पर्याय आहे. त्यावर क्लिक करा.
तिकडे लेख, चर्चा, काव्य असे पर्याय आहेत.
समजा तुम्हाला काव्य या प्रकारात लेखन करायचंय, तर काव्य या लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर योग्य असा काव्यरस व लेखनविषय निवडा.

खाली पूर्वपरिक्षण लिहिलंय तिथं क्लिक करा. म्हणजे तुमचं लेखन प्रकाशित झाल्यावर कसे दिसेल, ते कळेल. अजून लेखन प्रकाशित झालेलं नाहीये. तेव्हा प्रकाशित करा वर क्लिक करा. तुमचं लेखन आता प्रकाशित झालंय.

मिपा आइडी फोटो १) टाकल्यावर थोडे दिवस झळकत राहतो पण नंतर गायब होतो. कर्म कमी पडतं काय?

सिंगापुरवाले नासिककर's picture

26 Nov 2018 - 8:18 am | सिंगापुरवाले नासिककर

मिपावर आपले स्वताचे नाव कसे बदलावे?

१) आपल्या मराठी संस्थळांबद्दल बोलायचं तर यामध्ये एक मोठा बदल हवा आहे.
संस्थळं ड्रुपल या रेडी टेम्प्लेटाचा उपयोग करतात. यावर लिहिण्यासाठी वाचकांना सभासदत्व घ्यावे लागते. फक्त वाचनमात्र लोकांसाठी कुणा एका लेखकाचं लेखन आवडलं तर ते शोधता येत नाही हा मोठा दोष आहे. त्या लेखकाचा लेख जेव्हा अनुक्रमणिकेत दिसेल तेव्हाच वाचता येतो.
"यांचे लेखन" च्या लिंकमध्ये युजर नंबर असतो तो बाहेरच्या वाचकांस मिळू शकत नाही. त्या ठिकाणी आइडीनाव कॅापीपेस्ट करून टाकल्यावरही लिंक चालायला हवी.
२) शिवाय हाच धागा वारंवार वि जा प्र उलट क्रमाने -नवीन प्रतिसाद वरती असा चालायला हवा.

अक्सेस डिनाइड येत आहे. इंग्रजी कळफलक माझ्या संगणकावर बदलला तरी मराठीच अक्षरे उमटत आहेत हे आणखी एक.

स्वामि १'s picture

8 Apr 2019 - 10:28 pm | स्वामि १

मि लिहलेली लिखाणे वगळली गेली कृपया त्याची कारणे कळतील का?

मिपावर विडीओ कसा टाकायचा?

नीलकांत's picture

2 Jul 2019 - 7:47 pm | नीलकांत

मिपावर युट्युबची एम्बीड लिंक द्या. तो व्हिडीओ येथे प्ले होईल.

रांचो's picture

2 Jul 2019 - 8:05 pm | रांचो

रांचो's picture

2 Jul 2019 - 8:34 pm | रांचो

धन्यवाद सरपंच!

प्रकाशित साहीत्य काढून(डिलीट) कसे टाकावे?

अभ्या..'s picture

30 Jul 2019 - 3:13 pm | अभ्या..

मालकांना/संपादकांना (नीलकांत) विनंती करावी लागते.
स्वतःच साहित्य अप्रकाशित करता येत नाही.

एखादा लेख शोधायचा असल्यास कसा शोधावा?
मला बायको सोबतच्या खरेदी बाबतचा एक जुना लेख हवाय,कुठे कसा शोधू?

सुमो's picture

18 Nov 2019 - 7:13 pm | सुमो

मिपावर शोध सुविधा उपलब्ध नाहीये. गूगल साईट सर्च हाच पर्याय वापरावा. पण त्यासाठी किमान लेखकाचे नाव , लेखाचं शीर्षक, किंवा एखादी प्रतिक्रिया ह्यापैकी काहीतरी कीवर्ड माहिती हवा.

तुषार काळभोर's picture

19 Nov 2019 - 6:29 am | तुषार काळभोर

site:misalpav.com बायको खरेदी समीरसूर

असं जर गुगल मध्ये सर्च केलं तर तुम्हाला समिरसूर यांचा साडीखरेदीची गोष्ट हा लेख सापडेल.

किंवा एखद्या लेखकाचे सर्व लेखन शोधाय हे असल्यास गुगल मध्ये site:misalpav.com authored रामदास असं सर्च केलं तर मिपाचे लोकप्रिय लेखक रामदास यांचे सर्व लेख एका ठिकाणी असणारी लिंक सापडेल.

मी काय रंगा-बिल्लासारखा गुंड आहे का...सुड बुध्दी ने मला ग्रुप मधून काढले ...आजुन काही नाही..सांगून टाका ना सर्वाना कि .......जातीवादी कोन आहे ते...का फक्त एकाच जाती ला आणि काही नतदृष्ट्र्या लोकांना खुश करण्यासाठी तुम्ही असे केले ते...स्क्रीन शॉट दिला का तोंड गप का झाले आणि मि विशय बन्ध केल होत ना ? मग क केले असे ?

इथे प्रत्येकाने आपली जात सांगून मते मांडणे अगत्याचे आहे क ?
मग आई बापाची पण सांगायला हवी
त्यांचा ही आंतरजातीय विवाह असू शकतो
मग आपल्या बायकोची पण जात सांगायला हवी

म्हणजे मग मला तुम्ही जे मत व्यक्त करता त्याच्यावर कशाकशाचा प्रभाव आहे
तुमचे आकलन किती आहे
तुमची समज किती आहे ते कळेल

झालेच तर
तुमचे व्यवसाय नोकरी उत्पन्न याबद्दलही माहिती दिली जायला हवी असेही मला वाटते
त्याशिवाय मला इथे व्यक्त होता येणे अशक्यच आहे ना..
बाकी वॉशिंग्टनची कुऱ्हाड हाती असणाऱ्यांनी आपली निष्पक्षता दाखवून दिलीच आहे नाही का बरोबर ना...हे बायका सारखे वागणे सोडा.. हे जे ६ लोक आहेत ना त्यांना सुधारा नाही तर काही खरं नाही..आता इथून काढले तरी चालेल ...पण हे जातीचे राजकारण सोडा केदार आता. आणि काही विशिष्ट लोकांना जवळ आणि काहि लोकांना लांब..... एक लक्षात ठेवाच ..दगा किसी का सगा नाही होता :) बाकी सुदयनास सांगणे नको...

सन्जय गन्धे's picture

8 Jan 2020 - 7:44 pm | सन्जय गन्धे

द्वारकाधीश नावाने एक कविता खूप पूर्वी येउन गेली अहे. कुणी परत शेअर कराल का?

तुषार काळभोर's picture

8 Jan 2020 - 9:54 pm | तुषार काळभोर

हा वारंवार विचारला जाणारा प्रश्न नसावा.
असा प्रश्न खरडफळ्यावर विचारणं जास्त उचित झालं असतं..
तिथं उत्तर दिलं आहे, अधून-मधून येत जा खरडफळ्यावर. बरं वाटतं लोकांशी बोलून.

श्रीरंग_जोशी's picture

9 Jan 2020 - 9:34 am | श्रीरंग_जोशी

केवळ बिंगले तरी पहिलाच दुवा थेट मिळतोय.

गणेशा's picture

10 Jan 2020 - 1:55 pm | गणेशा
गणेशा's picture

10 Jan 2020 - 2:02 pm | गणेशा

असा error मलाच येतो का?

बापू मामा's picture

20 Jan 2020 - 11:07 am | बापू मामा

मला नवीन लेखन करायचे आहे. मराठीत टंकलेखन करण्यात मी सक्षम आहे. फक्त नवीन चर्चा (काथ्याकुट ), व ईतर कसे प्रकाशित होईल? कोठून लिहावे?

साईड बार वरच्या आवागमन मधील मेनूत लेखन करा असा पर्याय आहे. त्यातल्या चर्चा प्रकारावर क्लिक करून तुम्हाला नवीन धागा काढता येईल,

कविता/लेखन प्रकाशित होताना एरर मेसेज?
लेखनातून स्मायली काढून टाकणे.

चौथा कोनाडा's picture

3 Apr 2020 - 1:36 pm | चौथा कोनाडा

फ्लिकर वरून चाचणी घेण्यासाठी चढवलेला फोटो:

FLWR0420

सुमो's picture

3 Apr 2020 - 7:06 pm | सुमो

Flickr

सचिन's picture

11 May 2020 - 5:52 pm | सचिन

प्रतिसाद एकदा प्रदर्शित केला की दुरुस्त करता येत नाही का ?जसे, शुद्धलेखन दुरुस्ती किंवा विसरलेला शब्द वगैरेसाठी ...

तुषार काळभोर's picture

11 May 2020 - 7:15 pm | तुषार काळभोर

मिपावर लेख किंवा प्रतिसादासाठी स्व संपादनाची सोय नाही.
लेखात दुरुस्ती करण्यासाठी तुम्ही साहित्य संपादकांना निरोप पाठवू शकता.
प्रतिसाद मात्र प्रकाशित झाल्यावर दुरुस्त करता येत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 May 2020 - 6:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद एकदा प्रकाशित झाला की तो दुरुस्त करता येत नाही. पण फार महत्वाचे काही बदलायचे असल्यास साहित्य संपादक आयडीला कळविल्यास मदत होते आणि प्रकाशित दुरुस्त करता येईल.

-दिलीप बिरुटे

मला काव्यस्पर्धेत भाग घेयचा आहे कृपया मला समजत नाहीये माझी कविता तिथे कशी अ पलोड करू?
कृपया मार्गदर्शन करावे

तुषार काळभोर's picture

18 May 2020 - 5:44 pm | तुषार काळभोर

मिसळपाव काव्यलेखन स्पर्धा : २०२०

या लिंकवर क्लिक केल्यास तुम्ही स्पर्धेच्या आवाहन धाग्यावर जाल.
तिथे सविस्तर माहिती आहे. काही अडचण असल्यास त्या धाग्याच्या प्रतिसादा मध्ये विचारा.