ज्या प्रमाणे एखादी लोकप्रिय व्यक्ती "लिजंड" बनते व तिच्या भोवती आख्यायिका चे वलय उभे राहते
तिच गोष्ट "रोल्स रॉयस" कार संबंधी आहे..अतिशय उच्च दर्ज्याचे तंत्रज्ञान वापरुन अमीर लोका साठी ह्या विलासी गाड्या बनवल्या जातात..
७२-७३ च्या सुमारास मी इंग्लडला थॉमस मर्सर कंपनीत एयर गेजेस चे तंत्रज्ञान शिकण्या साठी गेलो होतो.
ज्या परिवारात माझी राहण्याची सोय केली होती त्या मालकीनं बाईंचे (कै) यजमान ह्या कंपनीत काम करत असत.
गप्पा मारताना त्या म्हणाल्या ..प्रत्येक ब्रिटिश माणसाच्या २ सुप्त इच्छा / स्वप्न असतात १..दारासमोर रोल्स उभी असावी.२राणीचा महाल आतुन बघावा..
"रोल्स रॉयस" अशीच एक "लिजंड" कार आहे..
* एक माणसाने एकदा जुनी रोल्स विकत घेतली अन प्रवासात त्याची गाडी हाय वे वर बंद पडली.. त्याने लोकल डीलर ला फोन करून ते सांगितले काही वेळातच त्यांचा मेकॅनिक आला व त्याने आपली गाडी वापरायला दिली जेणे करुन त्या व्यक्तिचा खोळंबा होऊ नये व त्याने त्या बंद पडलेल्या रोल्स चा ताबा घेतला.
काही दिवसानंतर त्या व्यक्तीस रोल्स रिपेअर करून तिची डिलिव्हरी दिली..आठवड्या नंतर त्याच्या लक्षात आले की रिपेअरिंग चे बिल त्याला मिळाले नाही.व त्याने विचारले की आपण माझी रोल्स रिपेअर केली पण बिल पाठवले नाही..
त्या वर तो मॅनेजर हसून फोन वर म्हणाला “Sir, you must be mistaken,” “Everyone knows that Rolls Royce cars simply don’t break down.”
* रोल्स बद्दलचा एक किस्सा आहे की रोल्स च्या बॉनेट वर ५० पेन्स चे नाणे उभे ठेवले जाते व गाडी चालू झाली तरी नाणे पडत नाही..कारण शून्य व्हायब्रेशन असलेली ति कार आहे
* माझा एक कार्स मधे रस असलेला अभ्यासक मित्र आहे त्याने सांगितले की रोल्स चे असे एक मॉडेल बाजारात आहे ज्याचे हुड/बॉनेट बंद आहे..बाजूला २ जागा केल्या आहेत ज्यातुन कुलंट व एकातून ऑइल भरता यावे या साठी..कारच्या इंजिन ला लाईफ टाइम गॅरंटी आहे..व इंजिन उघडायचा प्रश्नच येत नाही....
* परवाच असे वाचनात आले की रोल्स आता खास भारत व भारतीय लोकासाठी एक मॉडेल आणत आहे..
कुठलेही असे "इंजिनीअरिंग मार्व्हेल्स" उच्च तंत्रज्ञान कुशल व तन मन ओतून काम करणारे कामगारा च्या टीम शिवाय शक्य नसते.
प्रतिक्रिया
17 Jul 2019 - 5:30 pm | चौथा कोनाडा
शेवटी रोल्स रॉईस आहे ती ! जन्मत: रॉयल आणि रईस !
अकु साहेब, भारी लिहिलंय, अतिशय रोचक ! नाण्याचा फोटो अन आराआर हा लोगो झकासच !