२०१९ टूर बद्दल थोडी माहीती
या वर्षीचा रुट
२१ स्टेजेसमध्ये एक वैयक्तिक टाईम ट्रायल, एक सांघिक टाईम ट्रायल, ८ फ्लॅट, ४ डोंगराळ आणि ७ पर्वत स्टेजेस आहेत.
२० जुलै रोजी होणारी १४ वी स्टेज Tarbes – Tourmalet ही सर्वात कमी म्हणजे ११७.५ किमी तर १२ जुलैला होणारी सातवी स्टेज Belfort – Chalon-sur-Saône ही सर्वाधिक २३० किमी अंतर पार करेल.
या ज्या ७ पर्वत अर्थात माऊंटन स्टेजेस आहेत त्या किलर आहेत.
La Planche des Belles ला १६५ किमीच्या स्टेजला शेवटचे ७ किमीचा भयानक घाट आहे. ७.८ टक्के ग्रॅडीयन्ट आणि शेवटचा एक किमी तर २० टक्के आणि ग्रॅव्हेल खडकाळ आहे. ही अक्षरश टॉर्चर टेस्ट आहे.
The Tourmalet ही १४ वी स्टेजपण भयानक आहे. त्याला शेवटी सलग १९ किमीचा घाट आहे आणि ७.४चा ग्रॅडीएन्ट
http://inrng.com/2018/10/tour-de-france-2019-route/
यंदाच्या वर्षी चार वेळा टूर जिंकलेला ख्रिस फ्रुम नाहीये. गेल्या महिन्यात स्वित्झर्लंडमध्ये टूरसाठी सराव करताना त्याला मोठा अपघात झाला आणि नशिबानेच वाचला. ३७ मैलाच्या वेगाने तो एका भिंतीवर जाऊन आदळला ज्यात त्याच्या फासळ्या, मानेजवळील हाड आणि हात आणि पायाला फ्रॅक्चर झाला . तब्बल एक महिना हॉस्पिटलमध्ये काढल्यानंतर आता तो घरी परतला आहे पण यावर्षी त्याला टूर टिव्हीवरच बघावी लागणार आहे.
फ्रुमच्या अनुपस्थितीत अनुभवी मार्क कॅव्हेंडीशला मोठी संधी होती. ३४ वर्षाच्या या ब्रिटिश सायकलीस्टने आजवर ३५ स्टेजेस जिंकल्या आहेत. आजवर इतक्या स्टेजेस जिंकणारा केवळ तो दुसरा आहे. पहिल्या क्रमांकावर बेल्जियमचा Eddy Merckx आहे. (१९६९ ते ७४ या काळात)
मार्कने टूर एकदाही जिंकली नाही आणि फ्रुम नसताना त्याला ही सुवर्णसंधी होती पण आश्चर्यकारकरित्या त्याच्या डायमेन्शन डेटा टीमने त्याला अंतिम ८ मध्ये सहभागी करूनच घेतलेले नाही.
TEAM INEOS
अन्य संघाच्या तुलनेत ही कागदावर अत्यंत स्ट्रॉंग मानली जाते. याचे कारण गेल्या वर्षीचा टूर विजेता गेरेंट थॉमस. टिम स्कायकडून तो मागची रेस जिंकला होता. इतकेच नाही तर दोन ऑलिंपिक गोल्ड आणि ३ वर्ल्ड चॅम्पियनशिप या ब्रिटनच्या ३३ वर्षीय सायकलीस्टने जिंकल्या आहेत. यामुळे इनिऑसचे प्लॅनिंग यलो जर्सीचेच आहे. यांच्याकडे आहे २२ वर्षीय कोलंबियन इगन बर्नेल. हा कोलंबियाचा २०१८ नॅशनल चॅम्पियन आहे. यालाही टूर जिंकण्याची चांगली संधी आहे. एकाच टीममध्ये दोन चँपियन ही खूप मोठी गोष्ट आहे. बर्नेल हाय अल्टीट्यूड माऊंटन स्टेजचा एक्स्पर्ट मानला जातो. आणि यावर्षीच्या ७ स्टेजमध्ये त्याचे स्पेशयाझेशन महत्वाचे ठरेल.
Bora–Hansgrohe
जर्मन टीमची मदार असेल पीटर सगानवर. जरी त्याला यलो जर्सीचा दावेदार मानले जात असले तरी प्रिव्ह्यू बघता त्याचे लक्ष सातव्यांदा ग्रीन जर्सी मिळवून नवा विक्रम प्रस्थापित करण्याचा. त्यामुळे कदाचित बोरा टीम यलो जर्सीसाठी आटापिटा न करता सगान जास्तीत जास्त स्टेजेस कशा जिंकेल याकडे फोकस राहील असे वाटत आहे.
DECEUNINCK - QUICK - STEP
ही पण एक स्ट्रॉंग टीम आहे. या बेल्जियम टीममध्ये २०१६ चा ऑलिंपिक गोल्ड मेडलिस्ट Elia Viviani आणि माऊंटन एक्सपर्ट मानला जाणारा Julian ALAPHILIPPE हे दोन प्रमुख रायडर आहेत. यांचाही फोकस यलो जर्सीपेक्षा ग्रीन जर्सीवर असेल. सागानला या दोघांकडून चांगली लढत अपेक्षित आहे. याखेरीज Kasper Asgreen, Enric Mas हे दोन तगडे सायकलिस्ट पहिल्यांदाच टूरमध्ये सहभागी होत आहेत. यांच्याकडूनही धक्कादायक निकाल मिळू शकतो.
ज्या टीमकडे स्ट्रॉंग लीडर नाहीयेत ते यलो जर्सी च्या शर्यतीत उतरत नाहीत. यलो जर्सी साठी विशेष प्लॅनिंग आणि मेहनत लागते
बारक्या टिम्स म्हणजे तुलनेने कमी असलेल्या टिम्स मग यलो जर्सी च्या नादात जीवाचा आटापिटा करून घेत नाहीत ते मग जास्तीत जास्त स्टेज विन, ग्रीन किंवा पोलका किंवा व्हाईट जर्सी मिळवण्याकरिता प्रयत्नशील राहतात. अर्थात जर अनपेक्षित रित्या कुणी चांगला परफॉर्म केला तर त्यानुसार स्ट्रॅटेजी मध्ये बदल होतो किंवा उलटही होते. एखादा यलो जर्सी चा कंटेडर जायबंदी झाला तर मग टीम सेकंड बेस्ट परफॉर्म करण्यावर फोकस करते.
जे टॉप रायडर आहेत ते सुरुवातीपासून वेअर आऊट होत नाहीत. आता ते ताज्या दमाच्या सायकलीस्टना पुढे जाऊ देतात, जिंकू देतात, यलो जर्सी घालून मिरवू देतात. स्लो अँड स्टेडी जात ते आपला स्टॅमिना टिकवून ठेवतात. सुरुवातीपासून ते ऑल आऊट जात नाहीत. आता जेव्हा अवघड हिली आणि माऊंटन स्टेजेस येतील तेव्हा खरा या सगळ्यांचा कस लागेल. तोवर हे टॉप रायडर आपली शक्ती राखून ठेवतील आणि योग्य वेळी पुढे मुसंडी मारतील. आणि एकदा मग घुसले की कुणाला ऐकणार नाहीत.
दरम्यान टूरचे काही अलिखीत नियम
१. यलो जर्सीच्या रायडरला सन्मान दिला जातो. जरी त्याला मागे टाकण्याचा, त्यावर प्रेशर आणण्याचा पूर्ण प्रयत्न बाकी टिम्स करत असल्या तरी जेव्हा त्याला टेक्निकल प्रॉब्लेम येतो म्हणजे पंक्चर किंवा अन्य तेव्हा पेलेटॉनमधला कुणीही लीड घेत नाही, उलट पेलेटॉनचा वेग मंदावतो आणि यलो जर्सीच्या रायडरला रिकव्हर होऊन पुन्हा पेलेटॉनमध्ये घुसता येते. हा अर्थातच म्युच्युल रिस्पेक्टचा भाग आहे आणि काही वेळा मोडलाही जातो पण जंटलमन सायकलीस्ट पाळतात.
२. टॉयलेट ब्रेक - काही वेळा लॉंग स्टेजमध्ये दिवसाचे कित्येक तास सायकलीस्ट रेसमध्ये असतात. अशा वेळी जेव्हा नेचर ब्रेक घेण्याची वेळ येते तेव्हा पेलेटॉनचा लीडर त्यातल्या त्यात कमी गर्दीची, मिडीया कॅमेरे नसलेली आणि झाडी वगैरे असलेली जागा बघून इशारा करतो आणि पटापट कार्यक्रम उरकून मंडळी मार्गस्थ होतात. काही सायकलपटू राईड करतानाच मोकळे होण्याची खासीयत बाळगून असतात, ते अगदी कडेला येऊन हा उद्योग करतात, अशा वेळी ते आधी मागच्यांना इशारा करतात, आणि मग बाकीचे रस्त्याच्या मधोमध येऊन चालवतात.
३. फिडिंग झोन - रेसच्या सुरुवातीला आणि मधल्या काही टप्प्यात स्टेजेसच्या अंतरानुसार राखीव फिडींग झोन असतात. त्या व्यतिरिक्त टिम कार सायकलीस्टना खाणेपिणे पुरवू शकत नाहीत. (रस्ते अरुंद असल्याने). या फिडिंग झोनमध्ये झोळीत एनर्जीबार्स, फळे, कधी तर पेस्ट्रीसुद्धा आणि पाणी घेऊन टिम मेंबर उभे असतात. तर नियमानुसार या फिडींग झोनमध्ये कुणीही अॅटॅक करत नाहीत. म्हणजे आपले खाणे घेऊन पटदिशी लीड घेण्याचा प्रयत्न. सर्वजण सर्वांना व्यवस्थित फिड होऊ देतात आणि मग पुन्हा एकदा चुरस सुरु होते
४. रेसच्या आधी एक फलक असतो त्यावर सर्वांचे जर्सी नंबर असतात, त्यावर त्यात्या खेळाडूने सही करणे अत्यावश्यक आहे. असे न केल्यास, विसरल्यास, ८५ डॉलर्सचा दंड होतो
टूरला प्रत्येक स्टेज नुसती पार करून चालत नाही तर विजेत्या खेळाडूने दिलेल्या टायमिंगच्या विशिष्ट मुदतीत पार केली तरच तो रायडर पुढच्या स्टेजसाठी पात्र ठरतो अन्यथा त्याला रेस सोडावी लागते. ही वेळ प्रत्येक स्टेजला वेगवेगळी असते. म्हणजे असे होऊ देत नाहीत की लीडर येऊन, जर्सी घालून झोपायला गेला तरी अजून शेवटचे येतच आहेत. त्यांना फार उशीर करून चालत नाही. अर्थात सगळे टॉपचेच २०० सायकलीस्ट असल्याने सहसा होत नाही असे. अगदी कोणी जखमी झाला तरी तो कव्हर करतो. आणि अगदीच मेजर झाले तर तिथूनच रिटायर होतात. मागून टीमची रेस कार येतच असते, सगळ्यात शेवटी, ते त्यांना गाडीत घालून आणतात मग
प्रतिक्रिया
10 Jul 2019 - 1:50 am | जॉनविक्क
10 Jul 2019 - 1:16 pm | उगा काहितरीच
वाचतोय ! स्पर्धा टिव्हीवर पहाणाऱ्याला खूप रटाळ वाटत असणार. १५०-२०० किमी सायकल चालवणारे लोक पाहणे म्हणजे किती रटाळवाणे काम! अर्थातच स्पर्धकांसाठी शारीरिक व मानसिक मर्यादेच्या बाहेर जावे लागत असणार !
10 Jul 2019 - 2:07 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं माहिती मिळत आहे. पुभाप्र.
11 Jul 2019 - 10:48 am | प्रशांत
+१
11 Jul 2019 - 10:49 am | प्रशांत
11 Jul 2019 - 1:32 pm | प्रसाद_१९८२
या वरच्या व्हिडीओत, सायकलिस्ट
जी सायकल चालवत आहेत, तीची साधरण किंमत काय असेल ?
11 Jul 2019 - 2:23 pm | Ashuchamp
साधारण 6-8 लाखाच्या पुढे
आणि याव्यतिरिक्त टाईम ट्रायल ची सायकल वेगळी ती 10 लाखाच्या पुढे असते
12 Jul 2019 - 1:24 pm | महासंग्राम
बाब्बो १० लाख त्यावर पेडल मारावं नाही लागत का ?
13 Jul 2019 - 12:59 pm | ज्ञानोबाचे पैजार
अलिखित नियम फार आवडले
पैजारबुवा,
17 Jul 2019 - 2:47 pm | सुधीर कांदळकर
मालिका रंगतेय. झकास. तूर चवदार बनतेय.
अलिखित नियम १ आणि ३ छानच आहेत. क ४ लिखित नसूनही दंड होतो?
दुसरीकडे कुठेतरी लिखित असेल. किंवा मग आपण म्हणता तसेच असेल.
23 Jul 2019 - 9:38 am | मुक्त विहारि
लहानपणी एक स्वप्न होते. घाटातला राजा, ह्या शर्यतीत भाग घेण्याचे. ते कधीच प्रदूषणात विरून गेले...
ह्या मालिकेच्या निमित्ताने शब्दसूख मिळत आहे.
मनापासून धन्यवाद. ...
27 Jul 2019 - 5:59 pm | जॉनविक्क
हया सायकल स्पर्धेविषयी अजून माहिती हवी होती, मुंबई- पुणे सायकल स्पर्धेत हा किताब दिला जात असे पण संपूर्ण स्पर्धा कोणती हे ही माहीत करून घ्यायला नक्कीच आवडेल
23 Jul 2019 - 5:19 pm | अजित पाटील
अलिखित नियम फार आवडले :)