माझ्याच स्वप्नांना लावला मी सुरूंग
संकल्प सोडला अर्धवट पुन्हा एकदा
शर्थीचे प्रयत्न सत्यात आले नाहीत
निश्चयाचे संपले बळ पुन्हा एकदा
स्वप्नांची लचके तोडली मी स्वत:
पराभवाने दिली मात पुन्हा एकदा
कष्टाची घागर भरली पुन्हा संपूर्ण
अपयशाचे भरले रांजण पुन्हा एकदा
प्रयत्नाचा डोंगर उभारला मी स्वत:च
नियतीनेच दिला घाव पुन्हा एकदा
सुखांना जिंकण्याचा भास मला झाला
दु:खाने केले गर्वहरण पुन्हा एकदा
काळेकुट्ट ढग अन दाटलेल आभाळ
संकल्पाचा सोडला बाण पुन्हा एकदा
प्रतिक्रिया
24 Jun 2019 - 10:58 pm | चौथा कोनाडा
छान !
स्वप्नांची लचके तोडली मी स्वत: ऐवजी स्वप्नांचे लचके तोडले मी स्वत: असं चालणार नाही का ?
25 Jun 2019 - 12:07 pm | bhagwatblog
"स्वप्न" शब्दाचे अनेकवचनी लिहायचे होते त्यामुळे "स्वप्नांची लचके तोडली मी स्वत:" असे लिहिले आहे. प्रतिसादा साठी धन्यवाद!!!
25 Jun 2019 - 4:24 pm | चौथा कोनाडा
"स्वप्नांची लचके" असे बोलण्यात / ऐकण्यात / वाचण्यात आले नव्हते आता पर्यन्त. उच्चार देखिल गैरसोयीचा आणि विचित्र वाटतो आहे.
आपण नविन शब्द प्रयोग निर्माण करत असाल तर हार्दिक शुभेच्छा !
(आज काल मराठीची काळजी वाटते )
27 Jun 2019 - 12:31 pm | अभ्या..
नुसती मराठीचीच नाही तर त्यातील घासून गुळगुळीत झालेले कंटेंट, चुकीचे सादरीकरण, त्यातील चुका दाखवल्यावरही मान्य न करता मीच सांगतोय ते बरोबर, नाहीतर द्या तुम्हीच उदाहरण अशा नवलेखकी वृत्तीची जास्त काळजी वाटतेय.
ते ही एक असोच म्हणा.
26 Jun 2019 - 7:18 pm | राघव
कल्पना ठीक आहेत. पण माफ करा तांत्रिकदृष्ट्या ही गझल नाही. तसेच थोडी गेयता कमी पडते आहे. कदाचित काही शब्द बदल करून फरक पडावा. पु.ले.शु.
27 Jun 2019 - 12:25 pm | bhagwatblog
राघव,? कृपया एखादे उदाहरण द्याल का?
1 Jul 2019 - 12:11 pm | bhagwatblog
राघव,,तुम्ही सांगितल्या प्रमाणे ही तांत्रिकदृष्ट्या गझल नाही. जाणकारांचे हेच मत आहे. धन्यवाद!!!
27 Jun 2019 - 12:00 pm | bhagwatblog
प्रतिसादा साठी धन्यवाद चौथा कोनाडा, राघव... "स्वप्नांची लचके" लवकरच बदल करतो. शब्द एखादे उदाहरण द्याल का?
30 Jun 2019 - 10:56 am | मदनबाण
सुखांना जिंकण्याचा भास मला झाला
दु:खाने केले गर्वहरण पुन्हा एकदा
वा...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawant