ती मॉडर्न सावित्री होती
वडा च्या फांदीची पूजा तिला मान्य नव्हती
-
तीन वडा च बोन्साय विकत आणलं व यथासांग पूजा केली
-
दारावर टकटक झालं तीन दार उघडलं
-
दरवाज्यात एक तीन फुटी माणूस उभा होता
-
अरे तू कोण ?
-
सावित्री मी सत्यवान तुझा पती
-
अर्रे तू तर चागला पाच फूट आकरा इंच उंच होता तुज असं कस झालं ?
-
तू वडा च बोन्साय पूजला वडा न मला बोन्साय केलं
-
तिच्या डोळ्या समोर पारंब्या लोम्बु लागल्या व ती बेशुद्ध पडली
प्रतिक्रिया
18 Jun 2019 - 9:24 pm | आनन्दा
हा म्हणजे क्लायमॅक्स आहे. क ह र
18 Jun 2019 - 9:52 pm | कंजूस
नवीन संपूर्ण चातुर्मासातल्या खऱ्या कथा.
---
उतला मातला घेतला वसा टाकू नये. ज्येष्ठी पुनवेस आख्ख्या वडाची पुजा करावी, फांदी आणू नये.
18 Jun 2019 - 9:53 pm | कंजूस
नवीन संपूर्ण चातुर्मासातल्या खऱ्या कथा.
---
उतला मातला घेतला वसा टाकू नये. ज्येष्ठी पुनवेस आख्ख्या वडाची पुजा करावी, फांदी आणू नये.
21 Jun 2019 - 2:21 pm | खिलजि
जबराट लिवलंय अक्कुकाका ..
एव्हढं जबराट कि मेंदूचे बोन्साय करून टाकलेत ...
विचारांच्या पारंब्या लोम्बुन लोम्बुन
डोक्याचा पार भुगा झाला
चला आजचा वाचनाचा दिवस बोन्साय झाला..
21 Jun 2019 - 2:31 pm | डॉ सुहास म्हात्रे
=))
22 Jun 2019 - 9:23 pm | जॉनविक्क
यावर चित्रपट काढू शकतात। पोटीएनशिअल नक्की आहे ।
24 Jun 2019 - 10:14 am | Rajesh188
शीर्षक वाचून मला वाटलं होत की बोन्साय विषयी विस्तृत माहिती असेल .
म्हणून कथा वाचली तर भलतच वाचायला मिळाला .
लब्बाड आहे लेखक pkt Che cover वेगळे आणि आतमध्ये सामान वेगळेच