तरल भावनेचं चित्र : मासुम

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
22 Jun 2019 - 12:07 pm

'लकडी की काठी काठी काठी का घोडा' हे गाणं न ऐकलेला माणूस विरळाच म्हणावा लागेल. लहानपणी रविवारी रंगोली मध्ये कित्येक वेळा हे गाणं ऐकलं होतं. तेव्हा त्यातलं त्यात उर्मिला मातोंडकर आणि 'घर से निकलते हि वाला' जुगल हंसराज होता इतकंच काय ते त्या गाण्याचं कौतुक होतं आणि विषय तिथेच संपत होता.

कट टू : करंट जिंदगी
गेले कित्येक दिवस 'मासुम' पहायचं डोक्यात होतं, पण कधी वेळ जमत नव्हती तर कधी अर्धवट पाहिल्या जात होता. सरतेशेवटी काल योग जुळून आला. १९८३ मध्ये आलेला मासुम 'शेखर कपूर' चा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट. आज शेखर कपूर 'बँडिट क्वीन' साठी ओळखला जात असला, तरी पहिल्याच चित्रपटात त्याने जो मास्टर स्ट्रोक मारला आहे तो अप्रतिम आहे.

नासीर आणि शबानाचा सुखी संसार, त्यात नसरुद्दीन आणि सुप्रिया पाठक यांच्या प्रेमप्रकरणातून जन्मला आलेला 'राहुल'. त्यामुळे त्यांच्या संसारात आलेलं वादळ, लहानग्या राहुलची आपले वडील शोधण्यासाठीची तडफड, आपला मुलगा समोर असूनही त्याला स्वीकारता येत नसल्याची नासिरची अगतिकता सारं सारं काही शेखर कपूर ने अत्यंत सुबकपणे रेखाटलं आहे. मासुम मध्ये शबाना आझमी ,नसरुद्दीन शहा सारखी तगडी स्टारकास्ट तर आहेच पण या बरोबर गुलजारजींचे अवीट गोड शब्द आणि आर डी चं भावपूर्ण संगीत आहे.

'तुझसे नाराज नही जिंदगी' मध्ये नासिरच्या डोळ्यांत दिसणारी व्याकुळता एखाद्या वडिलांनाच जाणवू शकेल.

'हुजूर इस कदर भी ना इतरा के चलीए' मधली भुपींदर आणि सुरेश वाडकर यांची जुगलबंदी जबरदस्त आहे. या गाण्यातले शब्द प्रभावी म्हणा अथवा गाणाऱ्या आवाजाची कमाल म्हणा, जेव्हा केव्हा हे गाणं ऐकतो तेव्हा जसच्या तसं डोळ्यसमोर उभं राहतं !

'दो नैना इक कहानी' मधला आईच्या आठवणींमध्ये तळमळणारा, अलिप्त राहणारा जुगल पाहून डोळ्यांच्या कडा ओलावतात. अंगाईच्या जवळपास जाणारं हे गाणं मला कायमच प्रचंड अस्वस्थ करतं.

मासुम वर किती जरी लिहिलं तरी तो स्वतः पाहिल्याशिवाय ते पटणं अवघड आहे. तेव्हा एकदा पहावाच असा चित्रपट.

मासूम

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

आख्खा चित्रपट खाल्ला आहे. बरे झाले आठवण करून दिलीत आता पुन्हा एकदा बघतो. लेख आवडला आहेच. अजून येउदे.

श्वेता२४'s picture

22 Jun 2019 - 3:28 pm | श्वेता२४


+१

श्वेता२४'s picture

22 Jun 2019 - 3:28 pm | श्वेता२४

तो स्वतः पाहिल्याशिवाय ते पटणं अवघड आहे.
+१

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Jun 2019 - 3:58 pm | ज्ञानोबाचे पैजार

अजून बरेच काही लिहिता आले असते...

लहानपणी मासुम आवडला तो उर्मिला आणि जुगल हंसराज आणि "लकडी की काठी" मुळे, (उर्मिलाच्या प्रेमात आम्ही तेव्हा पासूनच आहोत. आता सुध्दा ती निवडणूकीत पडली याचे फार दु:ख झाले)

काही वर्षांनंतर परत पाहिल्यावर नसिर आणि शबानाचे कामही तेवढेच आवडले.

गाण्यांबद्दल काही बोलायलाच नको. सगळीच गाणी एक से बढकर एक आहेत. विषेशतः "तुझसे नाराज नही जिंदगी"

एकंदर शेखर कपुरचा हा खरच हा एक मास्टरपीस आहे. त्याचा मिस्टर इंडीया सुध्दा तेवढाच आवडता सिनेमा. या इतक्या सर्जनशील माणसाने अजून सिनेमे का नाही बनवले याचा काही उलगडा होत नाही.

पैजारबुवा,

महासंग्राम's picture

24 Jun 2019 - 10:33 am | महासंग्राम

बुवा अजून दोन चित्रपट येतायेत शेखर कपूर चे Elizabeth: The Dark Age आणि पानी

गामा पैलवान's picture

24 Jun 2019 - 5:08 pm | गामा पैलवान

मंदार भालेराव,

केट विन्सेट आहे तो का हा? मी बघितल्यासारखा वाटतोय. तत्कालीन चित्रण खूप जमून आलंय. मात्र मला चित्रपटातलं फारसं कळंत नाही.

आ.न.,
-गा.पै.

जॉनविक्क's picture

24 Jun 2019 - 2:12 pm | जॉनविक्क

योगायोगाने तुनळी वर Bandit queen बघितला आणि मी याचा पूर्ण पंखा झालो. नंतर समजले मासुम व मिस्टर इंडियाही याचाच, बॅटमॅनच्या जोकरला(हिथ लिजर) दिग्दर्शित करणारा हा इसम एकाच वेळी हॉलीवूड, बॉलीवूड आणि कलात्मक सिनेमाची नेमकी नस पकडणारा बहुदा एकमेव कलाकार असावा.

प्रलयनाथ गेंडास्वामीं's picture

24 Jun 2019 - 1:47 pm | प्रलयनाथ गेंडास...

हा चांगला लेख.