कार जेव्हढी लहान तेवढी तिची चर्चा जास्त मोठी !
काही वर्षांपुर्वी टाटांनी नॅनो बाजारात आणली होती तेव्हा तिच्यावर टीका करणारा आणि तिच्या प्रेमात असणारा मोठा वर्ग होता. एक वेगळा प्रयोग म्हणून तिच्याकडे देशाने उत्सुकतेने पहात होता. आता नॅनोचे उत्पादन थांबविले गेले आहे पण तेव्हाच माझ्या मनात विचार आला की टाटांनी नॅनोला कार म्हणून विकण्यापेक्षा रिक्षा म्हणून विकले असते तर ?? असो.
तर हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे बजाज ऑटो एक नवीन गाडी घेऊन येत आहे "बजाज क्युट" !
बहुधा नॅनोच्या अपयशापासून बोध घेत आताच त्यांनी स्पष्ट सांगीतले आहे की ही कार नाहीये. ही आहे "क्वाड्रासायकल". हा एक नवीन वाहनप्रकार भारतात येऊ घातला आहे ज्यासाठी कार किंवा ऑटोरिक्षा पेक्षा वेगळे नियम लागू होतात.
गाडी बद्दल काही महत्वाची माहिती
गाडीचे इंजिन २१६.६ सीसी आहे.
पाच पुढील बाजूला जाणारे आणि एक मागील बाजूसाठी ( रीव्हर्स) गिअर्स
वजन : अंदाजे ४५० किलो (पेट्रोल) / ५०० किलो (सीएनजी)
केवळ चार व्यक्ती बसू शकतील
कमाल वेगमर्यादा : ताशी ७० किमी
कितना देती है (मायलेज) - पेट्रोल अंदाजे ३५ किमी प्रति लिटर / सीएनजी - अंदाजे ४३ किमी प्रति किलो.
किंमत : अंदाजे ३ ते ३.५ लाख
हे एक केवळ शहरी वाहन आहे आणि कारकडून असलेल्या अपेक्षा पुर्ण होऊ शकणार नाहीत. सध्या केवळ व्यापारी उपयोगासाठी परवानगी मिळालेली आहे मात्र लवकरच वैयक्तीक वापरासाठी परवानगी मिळू शकेल असे वाटते.
आता
१. रिक्षावाले एखादा लाख जास्त मोजून ही नवी रिक्षाकार विकत घेतील काय ?
२. टॅक्सीवाले सध्या च्या ५-७ लाखाच्या टॅक्सीऐवजी हिला पसंती देणार काय ?
३. लाखाची मोटरसायकल घेण्यापेक्षा ही तेवढाच मायलेज देणारी गाडी घेणारे मोटारसायकलस्वार ह्या गाडीचे स्वागत करतील काय ?
४. टोल नाक्यावर हिला रिक्षा म्हणून वागवणार की चारचाकी म्हणून तेव्हढाच टोल घेणार ?
५. की हि पण नॅनोच्याच र स्त्याने जाणार ?
हे येणारा काळच सांगेल.
१८ एप्रिल २०१९ ला हिचे अधिकृतपणे बाजारात आगमन होईल. बहुतेक हिचा खप वाढावा म्हणून बजाज हळूहळू रिक्षाचे उत्पादन थांबवतील.
अधिक माहितीसाठी खालील युट्युब दुवे बघण्याची शिफारस करतो.
दुवा १
दुवा २
दुवा ३
प्रतिक्रिया
16 Apr 2019 - 7:21 pm | कंजूस
एक व्यक्ती/ प्रवासी एक मोठी सूटकेस ओटोरिक्शातून नेऊ शकत नाही. तर अशा व्यापारी वाहनाची आवश्यकता आहे. २०० सीसी म्हणजे दहा एचपी झाले.
16 Apr 2019 - 7:36 pm | प्रसाद_१९८२
बहुतेक हिचा खप वाढावा म्हणून बजाज हळूहळू रिक्षाचे उत्पादन थांबवतील.
---
टाटांच्या क्वाड्रासायकलचा खप वाढावा म्हणून बजाज त्यांच्या ऑटोरिक्षाचे उत्पादन का थांबवतील?
16 Apr 2019 - 7:42 pm | शाम भागवत
बजाजची क्वाड्रासायकल टाटा बनवणार?
16 Apr 2019 - 7:44 pm | धर्मराजमुटके
लिहिण्यात कोठे चुक झाली आहे काय ? टाटा नॅनो व बजाज क्युट ची तुलना / संदर्भ दिले आहेत.
16 Apr 2019 - 8:08 pm | प्रसाद_१९८२
माझीच वाचण्यात चूक झाली.
टाटा नॅनोचा उल्लेख तुमच्या लेखात इतक्यावेळा आलाय की मला वाटले, टाटाने नॅनोचे उत्पादन थांबवून हि नविन गाडी बाजारात आणली की काय.
16 Apr 2019 - 8:02 pm | mrcoolguynice
या गाड्या उबेर ओला साठी असतील किंवा निर्यातीसाठी (आफ्रिका खंड किंवा दक्षिणपूर्व आशिया .... इंडोनेशिया ) ...
नॅनो लोकप्रिय झाली नाही त्यामुळे ही लोकप्रिय होण्याची शक्यता कमी वाटतेय ...
16 Apr 2019 - 9:19 pm | ashok dalvi
nistich lokana aawadel.
16 Apr 2019 - 9:19 pm | ashok dalvi
nistich lokana aawadel.
16 Apr 2019 - 9:19 pm | ashok dalvi
nistich lokana aawadel.
16 Apr 2019 - 10:30 pm | अभ्या..
खरेतर हा प्रयोग महिन्द्राने आधीच जिओ नावाने केला होता. बजाजने फक्त दारे बसवलीत ह्याला.
हि डिसकंटीन्यु केली महिन्द्राने.
कारणे तुम्ही विचारलेल्या प्रश्नात आहेत.
रिक्शावल्यांसाठी बजाज आरई किंवा कोम्पॅक्ट ह्याला पसंती असते ती कमी टर्निंग रेडियस आणी चालवण्यासाठी सोपी म्हणून. स्कूटरटाईप हॅन्डल त्याना स्टेअरिंगपेक्षा सुलभ वाटते. क्युट पॉवर स्टेअरिंग देउ शकणार नाही तेंव्हा टर्निंग ह्या एका मुद्द्यावर क्युट मागे पडणार. रिक्शावाल्यांचे दुसरे कारण म्हणजे ओपन वेहिकल ही कन्सेप्ट सोपी वाटते. दार उघडून बसणे आणि डायरेक्ट बसणे हे छोट्या अंतरासाठी मॅटर करते. पॅक्ड वेहिकल लहान अंतराला योग्य नव्हेच. बजाज आरई ची पूर्ण स्टील बॉडी तशी म्हणले तरी बरीच मजबूत असते. नव्या क्युटची बॉडी आणि बरेच पार्ट तकलादू वाटतात. रिक्शावाल्यांनी अशा तकलादू पार्टच्या थ्रीव्हीलर्स नाकारायची भरपूर उदाहरणे आहेत. अतुलशक्ती, विक्रम, टीव्हिएस किंग, महिन्द्रा अशा बर्याच थ्रीव्हीलर्स बजाज आरई समोर टिकाव धरु शकल्या नाहीत.(अपवाद आपे पिआजिओचा)
नाही. एक दोन लाख कमी टाकून कुणीही स्विफ्ट डिझ्झयर, वॅगनार, अॅसेंट, झेस्ट ह्या कॅब स्पेशल गाड्यांची मजबुती, कम्फर्ट, सुविधा, डौल, वेग, स्टेटस ह्या गोष्टी टाळणार नाही. कॅबसाठी खास बनवलेल्या डिझायर टूर, अॅक्सेंट प्राईम, केयुव्ही ट्रीप आणि झेस्ट ह्या गाड्यांची किंमत ५ लाखापेक्षा कमी असलेने टॅक्सीवाले ह्याच मॉडेल्स ना प्रेफर करणार. क्युट त्यांच्यासमोर खूप ओबडधोबड आणि प्राथमिक वाटते. नॅनो निदान डिझाईन आणि लुक्स मामल्यात भारी होती. क्युटकडे तेही नाही.
कधीच नाही. नॅनोने ते सिध्द केले आहे. नॅनोयुगातच वाढलेला रॉयल एन्फिल्ड आणि जावासारख्या हेवी इंजिन बाईक्सचा आणि केटीएम, डोमिनर, यामाहा सारख्या महागड्या परफॉर्मन्स बाईक्सचा खप हेच दाखवतो की लोकॉस्ट फोरव्हीलर स्वत:कडे महाग बाईकचा ग्राहक फिरवू शकत नाही.
हे काय सांगू शकत नाही. नॅनोला कारचाच टोल आकारला जातो. क्युटला पण तेच करणार.
अर्थात आणि अर्थातच. सध्या इलेक्ट्रिक रिक्षा, सीएनजी रिक्षा, सीएनजी टमटम अशी सक्सेस उदाहरणे अन त्यांना सोयीची बाजारपेठ आहे. महिन्द्रा जिओ, आयशर पोलॅरिसची मल्टिक्स ही अल्ट्राफ्लॉप दोन उदाहरणे असताना तशीच क्युट बाजारात आणणे हे बजाजचे धाडसच म्हणावे.
17 Apr 2019 - 2:16 am | सिक्रेटसुपरस्टार
नवीन माहिती मिळाली. पण गाडीत बसायचंच तर रिक्षासारख्या दिसणाऱ्या गाडीत काय बसायचं ही शंका मनात आली. असो. आवड ज्याची त्याची.
17 Apr 2019 - 9:41 am | धर्मराजमुटके
आता साधारण ५० ते ७० वयाच्या गटातील बायका ह्या गाडीत बसतील की नाही ती पण एक शंका आहे. पुर्वी ह्या बायका एकटीने रिक्षा / टॅक्सीत बसायला घाबरायच्या. प्रत्येक रिक्षा / टॅक्सीवाला आपल्याशी वाईटच वागणार अशी ह्यांची ठाम समजूत होती. त्यातल्या त्यात वेळ पडली तर रिक्षा बरी कारण त्यातून निदान चालत्या गाडीतून उडी मारायची तरी सोय होती असे त्यांना वाटे.
17 Apr 2019 - 10:02 am | विजुभाऊ
नॅनो ही खरेच एक चांगली गाडी होती.
माध्यमांनी तीला लो कॉस्ट कार म्हनून प्रपोगेट केले. तिथेच मोठी चूक झाली.
खरेतर तीला लेडीज कार किंवा यूथ कार म्हणून पुढे आणता आले असते. पण वेळ निघून गेली.
नॅनो इलेक्ट्रीक कार हाही एक पर्याय होता. पण गरीबांची किंवा स्वस्तातली गाडी हे बिरूद कोणालाच नको असते.
वैयक्तीक मला स्वतःला नॅनो चे डिझाईन खूपच आवडले होते
नॅनो मधे मागील बाजूस बसणे हा कंफर्टेबल अनुभव नाही पण टू सीटर कार म्हनून देखील नॅनो खूप चालली असती.
बजाज क्यूट ची आणि नॅनोची कुठेच तुलना होउ शकत नाही.
क्यूट कदाचित कंपनी आम्तर्गत वाहन म्हणून चालू शकेल. पण फुल फ्लेज कार म्हणून नाही.
शिवाय ती दिसायलाही खूप ओबडधोबड बेंगरूळ आहे.
क्यूट्ला लेडीज कार ( गरीबांची चारचाकी लूना) म्हणून प्रोजेक्ट केले तर चालू शकेल
17 Apr 2019 - 11:38 am | मराठी कथालेखक
१३.२ PS (HP) चे इंजिन आहे. (मारुती ८०० देखील ३५ की ३६ HP ची होती) AC नाहीये असं दिसतंय.. अशा गाडीचा खप होणं कठीणंच दिसतंय..
17 Apr 2019 - 11:42 am | टर्मीनेटर
छान माहिती. गेली दोन तीन वर्षे ह्या गाडीच्या मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर ट्रायल सुरु असलेल्या पहिल्या होत्या, अपेक्षेपेक्षा बराच उशीर झाला बाजारात यायला.
पहिला व्हिडिओ पाहिला, त्यात म्हंटल्या प्रमाणे हि मोनो फ्युएल गाडी आहे सी.एन.जी. व्हेरीएंट मध्ये सी.एन.जी.+ पेट्रोल असा पर्याय नसल्याने थोडी गैरसोयीची वाटली. कुठल्याही कारणास्तव सी.एन.जी. मधेच संपला तर पेट्रोल प्रमाणे बाटली/कॅन मध्ये गॅस भरून आणण्याची सोय नसल्याने पंपापर्यंत गाडी ढकलत नेण्याची वेळ येऊ शकते. सद्यस्थितीत असलेली गॅस पंपांची संख्या आणि तिथे लागलेल्या लांबच लांब रांगा पहिल्या तर ह्या गाडीचा सी.एन.जी. व्हेरीएंट घेणे जिकीरीचे वाटते.
पेट्रोल मॉडेलला हौशी लोकांची पसंती मिळू शकेल पण तरुणाईला ही गाडी कितपत आकर्षित करू शकेल ह्याबद्दल शंका आहे.
वरती विजुभाऊनी लिहिल्या प्रमाणे नॅनो ही खरेच एक चांगली गाडी होती.
17 Apr 2019 - 8:42 pm | सनातनी
अभ्या जी खूप छान माहिती. नॅनो इंजिन, मागचा आकार सेम ठेवून तीन चाकी अर्धे दरवाजे असे बनवली असती तर सर्व रिक्षा बंद पडल्या असत्या.
18 Apr 2019 - 5:44 am | भंकस बाबा
थोड़ा वेगळा आहे. माझ्या माहितिप्रमाणे या गाडीला हायवेवर एंट्री नाही. मुंबई वा पुण्यातील पार्किंगची समस्या बघता ह्या गाडीला या शहरात प्रतिसाद मिळेल. सध्या या गाडीचे दोनच वेरियंट येत आहेत, जेव्हा भविष्यात इलेक्ट्रिक वेरियंट येईल तेव्हा हिची उपयुक्तता सिद्ध होईल.
18 Apr 2019 - 10:22 am | विजुभाऊ
पुणेकरांची वाहतूक शिस्त बघता या गाडीला जर ट्रॅफिक सिग्नल शी सिंक केले तर ती नक्की चालेले पुण्यात.
18 Apr 2019 - 11:05 am | चौथा कोनाडा
ही क्वाड्रीसायकल गाडी बाजारात येणार म्हणून गे ली ८ वर्षे ऐकतो आहे, येणार आहे का बाजारात नक्की ?
(नॅनो नंतर याची देखील खूप चारचा सुरु झाली होती)
सुरुवातीला ही गाडी सध्याची तीन चाकी ऑटो रिक्षा असुरक्षित म्हणून ही चार चाकी तयार करायला घेतली.
ही रिक्षाच आहे.
नंतर नॅनोला स्पर्धा अशी देखील चर्चा सुरु झाली ( ऍक्च्युअली तांत्रिक स्पेसिफिकेशन नुसार दोन्हीचा वर्ग वेगळा आहे.)
ही गाडी बऱ्याचदा मुंबई पुणे रोडला रोड-टेस्टिंगसाठी फिरताना पाहिलीय.
हे उत्पादन चालणार नाही असे वाटते. यावर सविस्तर मुद्दे मा. अभ्या यांनी खूप सुंदर रित्या मांडलेले आहेत.
18 Apr 2019 - 12:59 pm | उगा काहितरीच
नाही आवडली गाडी.
3 Apr 2020 - 5:58 pm | शाम भागवत
त्यापेक्षा प्युगाॅट कंपनीची मेट्रोपोलीस दणक्यात चालेल. दुचाकीचे सगळे फायदे व तिनचाकीचे सगळे फायदे एकत्रीत असल्याने लेडीजना खूप आवडेल. प्युगाट कंपनी विकत घेऊनही महिद्रा ही गाडी अजूनही भारतात आणत नाहीये. १४० चा कमाल वेग, अतिशय सुरक्षीत व वळताना अजिबात न वाटणारी भिती हे या गाडीचे वैशिष्ट्य असेल. शहरातले ट्रॅफिक जाम पाहता, कार चालवणाऱ्या बायका कार घरी ठेऊन मेट्रोपोलीसला पसंती देतील. पण किंमत ४ लाखापर्यंत जाईल असे वाटते.
मी नक्की घेईन. आयपीओ आला तर शेअर्सपण घेईन. :)
7 Apr 2020 - 12:24 pm | चौथा कोनाडा
हीच का ती ?
भन्नाट डिझाईन, हाय-टेक, मस्त आहे, आवडली. पण एव्हढी महाग असेल तर फक्त सधन वर्ग स्टाईल बाईक म्हणून घेऊ शकेल.
छत, विंडस्क्रीन इ नसल्यामुळे ऊन, वारा, पाऊस या पासुन संरक्षण नाही, त्यामुळे ही कारला पर्याय ठरू शकत नाही.
7 Apr 2020 - 7:18 pm | मदनबाण
अशीच अजुन एक आहे...
बाकी मला Honda Forza 300 फार आवडली आहे, पण हिंदुस्थानात अजुन लॉन्च झालेली नाही.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bumbro... :- Mission Kashmir
7 Apr 2020 - 9:40 pm | शाम भागवत
क्वाड्रोपण चांगली आहे.
पण मेट्रोपोलीस भारतीय कंपनीची आहे.!!!
म्हणून तिच्याबद्दल आपुलकी. ;)
५१% शेअर्स महिंद्रकडे आहेत.
:)
8 Apr 2020 - 4:28 pm | मदनबाण
५१% शेअर्स महिंद्रकडे आहेत.
ओह्ह, उत्तम ! :) हे माहित नव्हते मला.
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Main Vari Vari... :- Mangal Pandey: The Rising
9 Apr 2020 - 10:50 am | चौथा कोनाडा
क्वाड्रो४ खतरी दिसतेय !
पण होण्डा फोर्झा हाय एण्ड स्पोर्ट्स बाईक (नॉन-गियरड) दिसते, किंमत पण ३-४ लाख !
9 Apr 2020 - 12:04 pm | मदनबाण
पण होण्डा फोर्झा हाय एण्ड स्पोर्ट्स बाईक (नॉन-गियरड) दिसते, किंमत पण ३-४ लाख !
मॅक्सी स्कुटर अशी ही श्रेणी आहे, किंमत जास्त आहे. १६० सीसी पर्यंत चे लो एंड व्हर्जन जरी समजा आले तरी किंमत १ लाखाच्या वरतीच राहील.
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Dil De Diya Hai... :- Cover by Sampreet Dutta [ Masti ]
10 Apr 2020 - 12:51 pm | चौथा कोनाडा
या स्टायलिश बाईकची लो एंड व्हर्शन एक-दिड लाखापर्यंतची नक्कीच लोकप्रिय होईल !
10 Apr 2020 - 2:27 pm | अभ्या..
मॅक्सी स्कूटर किंवा टूरिंग बाईक्स भारतात फारश्या चालत नाहीत. आधीही कायनेटिक ब्लेझ येऊन फेल झालेली आहे. मॅक्सी स्कूटर युरोपात मोठ्या इंजिनच्या मिळतात आणि त्यातही बर्याचश्या फॅसिलिटीज आणि आराम असतो. ग्राउंड क्लिअरन्स कमी असतो. अर्थात किंमतीही तशाच असतात. भारतात अशी मॉडेल उतरवायची म्हणली कि इंजिन आणि पार्टसच्या दर्जात तडजोड करावी लागते आणि ती गाडी मग अंगापेक्षा बोंगा जास्त अशा बनतात. सुझुकीने बर्गमनला असाच प्रयोग केला. ६५० सीसीची १२ लाखाची बर्गमन भारतात १२५ सीसी करुन सव्वा लाखात दिली. निकाल काय तर मॉडेल फ्लॉप. सेम टुरिंग बाईकबाबत त्यानी १८०० सीसीची आणि २० लाखाची इन्ट्रुडर भारतात दिडशे सीसी आणि दिड लाखात दिली. निकाल काय तर मॉडेल फ्लॉप.
अशा अंगापेक्षा बोंगा गाड्या घेण्यापेक्षा भारतीय जवळपास पूर्ण मेटलची, जास्त सीसीची भारतीय वापराला योग्य अशी अॅक्टिव्हा, ज्युपिटर किंवा सुझुकी अॅक्सेस ला प्राधान्य देतात. ह्या गाड्या मॅक्सी स्कूटरपेक्षा लहान असल्या तरी शहरात वापरायला सोप्या, कमी टर्निंग रेडियसच्या आणि जास्त ग्राउंड क्लिअरन्स च्या असतात.
तात्पर्य मॅक्सी स्कूटर ही कन्सेप्ट भारतात चालेल असे वाटत नाही.
क्वाड्रो गाडीची कन्सेप्ट इनोव्हेटिव्ह असली तरी अशाच स्पोर्टस टाईप चायना मेड क्वाडबाईक्स बीचवर किंवा फार्म हाऊसेस वर आधीपासून वापरल्या जातात. त्यांचे अत्यल्प मायलेज किंवा चालवण्यातल्या सोपेपणा ही गोष्ट बघितली तरी फक्त बॅलन्ससाठी शहरात एकासाठी किंवा दोघांसाठी इतके पैसे घालून मोकळी (उन्हा पावसापासून) गाडी लोक घेणार नाहीत. त्यापेक्षा रेग्युलर बाईक्स किंवा लो कॉस्ट कार्स प्रेफर केल्या जातील. सध्या हिरो मोटो कॉर्पही अशीच तीनचाकी १२५ सीसी ची आणत आहेत.
10 Apr 2020 - 8:36 pm | मदनबाण
अभ्या तुझ्या प्रतिसादाशी सहमत आहे.
मॅक्सी स्कुटर [ मॉडिफाइड इंडियन व्हर्जन ] ची प्राइज टॅग ही तिच्या विरोधात जाते... साधारण ७० हजार ते ८५ हजारा पर्यंत बजेट असणे शिवाय जास्तीत जास्त मायलेज मिळणे या दोन महत्वाच्या गोष्टींना प्राधान्य देणारा फार मोठा ग्राहक वर्ग आपल्या इथे आहे. त्यामुळे किंमत कमी झाल्या शिवाय मॅक्सी स्कुटरचा खप वाढणार नाही.
सध्या हिरो मोटो कॉर्पही अशीच तीनचाकी १२५ सीसी ची आणत आहेत.
अरे वा... बघायला हवे ! :)
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Tu Hi Hai Aashiqui... :- Dishkiyaoon
10 Apr 2020 - 10:02 pm | शाम भागवत
मला तरी ही रिक्षाच वाटतेय.<\a>
10 Apr 2020 - 11:39 pm | अभ्या..
तुम्ही म्हणताय ती वेगळी
ही हिरोची एई -३ ई ट्राईक
हि इलेक्ट्रिक आहे. क्वार्क म्हनजे फक्त स्कूटरला फेअरिंग अॅड केलेय. आणि रिक्षाची बॉडी जोडलीय. असल्या मोटरसायकल जुगाड रिक्षा उत्तरेत बर्याच दिसतात.
11 Apr 2020 - 4:19 am | शाम भागवत
मस्तच. ही चालायला हरकत नाही.
11 Apr 2020 - 2:53 pm | शाम भागवत
मात्र पुढची दोन्ही चाके मेट्रोपोलीस सारखी असली पाहिजेत.
7 Apr 2020 - 9:37 pm | शाम भागवत
हो. हीच.
11 Apr 2020 - 7:01 am | विजुभाऊ
रिक्षा ही भारतात वैयक्तीक वापरासाठी का वापरली जात नाही
11 Apr 2020 - 8:48 pm | चौथा कोनाडा
काही लोक वापरतात. पण "पत" घसरते म्हणुन सर्रास वापरत नसावेत.
अर्थात कार सारखी आरामदायी नसते, सुरक्षितता त्यात नसतेच !
याच्या खासगी वापराच्या परवानगीला खुप फी असेल का ?
11 Apr 2020 - 11:11 am | खटपट्या
एका दुचाकी वर ५ जणांचे कुटुंब घेउन जाताना जीव धोक्यात घालण्यापेक्षा हि गाडी कितीतरी पटीने बरी वाटतेय.
11 Apr 2020 - 11:26 am | सुबोध खरे
यातली कुठलीही गाडी भारतात चालणार नाही.
कारण उन्हा पावसापासून संरक्षण नसेल तर २ लाखाची स्कुटर घेण्यापेक्षा लोक २ लाखात मारुतीची अल्टो किंवा सेकंड हॅन्ड वॅगन आर घेणे पसंत करतात.
दुचाकीपेक्षा चारचाकीचे सरळ सरळ दिसणारे फायदे असे आहेत.
मोटारीत आपले सामान सुरक्षित राहते. बायका शांतपणे सामान आत कुलूपबंद ठेवून केवळ पर्स उचलून बाहेर काम/ खरेदी करु शकतात.
धक्का लागला तर पडण्याची आणि गंभीर इजा होण्याची शक्यता नक्कीच कमी असते. कडक उन्हात आणि पावसात तुम्ही चारचाकीत नक्कीच सुरक्षित असता.
शिवाय पावसात चिखलापासून आणि पाण्यापासून संरक्षण असते. घसरलात तरी इजा होण्याची शक्यता नक्कीच कमी असते.
कडक उन्हात आपल्या जुन्या असल्या तरी गाडीच्या वातानुकूलित क्षेत्रात मिळणारा आराम हा कोणत्याही दुचाकीत कधीच येत नाही.
शिवाय धूळ धूर यापासून संरक्षण आणि बायकांचे केस विस्कटत नाहीत.
चांगले कपडे खराब होत नाहीत. चेहऱ्यावर धूळ धूर बसून चेहरा खराब होत नाही.
एवंच यातली कुठलीही गाडी भारतात चालणार नाही.
दुचाकी हि सोय आहे. त्यात सर्वात जास्त मायलेज देणारी दुचाकींच सर्वात जास्त चालते.
जेंव्हा माणसाच्या खिशात थोडा जास्त पैसे येतो तेंव्हा तो किफायती दुचाकीवरून प्रिमियम दुचाकी कडे जाण्याच्या ऐवजी चारचाकी कडेच जाईल.
प्रीमियम दुचाक्या बाजारात एवढ्या मोठ्या प्रमाणावर यशस्वी होण्याची नगण्य शक्यता आहे.
11 Apr 2020 - 2:40 pm | प्रचेतस
एकदा एनफिल्डवर बसून बघा, सुख असतं, शब्दात नाही सांगता येत ते.
12 Apr 2020 - 7:01 am | चौकस२१२
एनफिल्ड वर जवळ जवळ एकदा दिवस भर बसलो होतो( मागे चालक म्हणून नाही) ते सुद्धा एक्सप्रेस वे च्या आधी चा काळ
माझ्य मांड्यांनी आणि पृष्ठभागाने चांगलाच आनंद घेतला होता त्या सफारीचा
सुरवात केली मुंबई हुन, जायचे होते चिपळूण जवळ , ठरवले कि फिरत जाऊ.. मग आधी कर्जत ला वडा, मग पुण्यात त्याच्या घरी सकाळचा नाश्ता मग वाठार ला असलेल्या मामाच्या दवाखान्याला भेट आणि मग कोकणात उतरलो ... मध्ये रस्ता चुकलो आणि कसे बसे पोचलो गावी
अंघोळ वैगरे करून दिवाणखान्यात सगळे गप्पा मारत बसले होते तिथे आलो आणि एक बाकडयांवर छोटी गादी होती ती रिकामी मऊ जागा बघून बसलो गादी निघाली पातळ आणि दिवसभराचा एनफिल्डवर वरचा आनंद पृष्ठभागाला चांगलाच जाणवला
12 Apr 2020 - 7:44 am | प्रचेतस
कुठल्याही दुचाकीवर मागच्या सीटवर दिवसभर बसले की पार्श्वभाग हुळहुळतोच. गाडी चालवण्यातच खरं सुख असतं. टॉपला टाकायची आणि एका लयीत गाडी पळवत राहायची बास्स... जन्नत.
12 Apr 2020 - 11:30 pm | सुबोध खरे
म्हशीवर कोण बसणार?
एवढी बोजड गाडी शिवाय 70 च्या वर वेगाने नेली तर थरथराट इतका होतो की नंतर हात पायाला मुंग्या येतात. ब्रेक दाबला तर लगेच लागत नाही. ( जाऊ द्या, इथे बुलेटचे उणे दुणे काढले तर लोकांच्या शेपटावर पाय पडतो ज्यात बरेचसे आपल्या सारखे चांगले मित्र आहेत)
माझ्याकडे 400 cc ची बाजाजची डोमिनार आहे. 34 bhp. ती 120 किमी चालवली तरी हातापायाला मुंग्या येत नाहीत. ABS आणि पुढे मागे डिस्क ब्रेक आहेत. बोट लावलं की गाडी जागीच उभी राहते. रेडियल टायर आणि स्लिपर क्लच आहे. 6 व्या गिअर मध्ये 60-70 वेगाने। चालवताना कोणतीही थरथर जाणवत नाही.
हेडलाइट तर काही कार ना लाजवेल इतका सुंदर आहे.
शिवाय 13 वर्षे जुनी युनिकॉर्न आहे. बायकोची होंडा ऍक्टिव्हा आहे.
दुचाकी आयुष्यात भरपूर चालवली आहे. दुचाकी ही सोय आहे . चार चाकीचाआराम आणि सुरक्षितता मात्र दुचाकीत येत नाही मग काहीही म्हणा.
11 Apr 2020 - 3:03 pm | शाम भागवत
खरे काका,
मुंबईत तुमचं म्हणणं खर होईल. तिथे बर्याच वेळेस ७०-८० च्या पुढे वेग घेता येतो.
पण ज्या शहरात ५०-५५ पेक्षा जास्त वेगाने गाडी चालवता येत नाही व ट्रॅफिक जामचा पण त्रास असतो, तिथे वेळेत पोहोचायला दुचाकीला पर्याय नाही.
मला जर पुण्यातल्या एखाद्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचायचे असेल, (सर्व नियम पाळून व सुरक्षीत पणाला सर्वोच्च महत्व देऊन व अजिबात रॅश न चालवता) तर मी दुचाकीच पसंत करेन.
गावातले भरवस्तीतले रस्ते असतील तर दुचाकी घरात ठेऊन कारने जाणे म्हणजे वेडेपणाच होईल.
भरपूर वेळ आहे. कोणतीही वेळ गाठायची नाहीये. पार्किंग मिळेपर्यंत थांबायची तयारी आहे. मग मात्र मी धूळ, धूरळा, केस विस्कटणे वगैरेला महत्व देईन.
असो.