पुरुष
***********************************
तो-होळी आहे -रंगवणार तुला
ती -नको रे -मी रंग खेळत नाही
तो-का ?
ती -नाही खेळत
तो -पण का?
ती -नाही खेळत
तो-पण कारण सांग
ती -काय सांगू ?
तो- जे असेल ते खर सांग
ती - आयुष्याचा बेरंग झाला आहे -काय सांगणार
तो- माझ्यावर विश्वास आहे ना -मग सार फोडून सांग
ती -प्रेमात झालेली फसवणूक -आईच अकाली निधन या मुळे मीपुरती खचून गेले होते -जगण्याची इच्छया संपली होती -आजारी बाबा कडे पाहात मी आयुष्य कंठत होते -आता ते पण राहिले नाहीत
तो- ओह्ह्ह सॉरी हे माहीत नव्हते -असे म्हणत त्याने तिला जवळ घेत पाठीवरून हात फिरवला
ती -मी खूप एकटी पडली आहे
तो- असं का म्हणते -मी आहे ना शेवट पर्यंत
ती -ती त्याचा आश्वासक बोलण्याने सुखावली व त्याच्या कडे बघत म्हणाली ती -थँक्स
ती -थँक्स कशाला ?हे तर माझे कर्तव्य आहे असे म्हणत तिला बाहू पाशात घेत त्याने तिला आलिंगन ले
ती आता निर्धास्त झाली बिन चेहेराच्या जगात तिला साथीदार गवसला होता
एकटीच प्रवास संपत आला होता आता सह जीवन चालू झाले होते
त्याला मनात हसू आले- किती भोळ्या असतात बायका -स्तुतीचा एक शब्द -प्रेमाचा स्पर्श केला कि पाघळतात-वितळतात -गुलाम होतात -सर्वस्व पायावर वाहतात
असे विचार मनात येताच तो आनंदित झाला व पुढचे प्ल्यान आखू लागला मनात
प्रतिक्रिया
15 Apr 2019 - 5:41 am | एमी
आवडलं.
15 Apr 2019 - 1:02 pm | सोन्या बागलाणकर
तिला मनातून हसू आलं - या बावळटाला वाटतंय मी गळाला लागले पण याला माहीत नाही याच्या पैशांवर मजा करून याला मी कशी लाथ मारणार आहे ते. पुरुष किती भोळे असतात, जरा अबलापण दाखवलं, रडका चेहरा केला कि फसतात, पाघळतात, गुलाम होतात - सर्वस्व पायावर वाहतात
असे विचार मनात येताच ती आनंदित झाला व पुढचे प्ल्यान आखू लागली मनात
15 Apr 2019 - 2:05 pm | एमी
हा हा हे पण भारी आहे :D
जमले तर अजून येऊद्यात शह-कटशह!