पर्वाची गोष्ट आहे

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
14 Apr 2019 - 5:04 pm

पर्वाची गोष्ट आहे
सायंकाळचा समय होता मी व हिने चितळ्यांच्या दुकानात खरेदी केली
चितळे दुकाना समोर नूर भाई भाजीवाल्याचा ठेला आहे
नुरभाई भाजी वाल्याकडून भाजी घेतली
जवळच रिक्षा होती रिक्षा केली व घरी यायला निघालो
वेळ संध्याकाळची डेक्कन वर मरणाची गर्दी
लकडी पूल सिग्नल ला रीक्षा थांबली होती
तेव्हढ्यात मोग-याचे गजरे विकणारी मुले रिक्षा जवळ आली
मोग-याचे गजरे म्हणजे जीव कि प्राण
कसे दिले ?
१० ला एक
४० ला ६ दे -हि म्हणाली
५ देईन -गजरे वाला मुलगा
ठीक आहे दे -त्याने ५ गजरे हिच्या कडे दिले
हिने गजरे सुंगले व माझ्याकडे दिले अन पैसे देण्यासाठी पर्स मध्ये हात घातला
तेव्हढ्यात सिग्नल सुटला व रिक्षावाल्याने रिक्षा वेगाने दामटली
अहो त्या मुलाचे पैसे द्यायचे राहिले रिक्षा वळवता का ?
हि म्हणेस्तोवर रिक्षा लकडी पुलाच्या मध्यावर आली होती
रिक्षा वळवणे शक्य नसल्याने आम्ही समजून घेतले
घरी आलो हि हूश्श्स्य करत सोफ्यावर बसली
मी स्कुटर ची चावी घेतली अन स्यांडल पायात सरकवत बाहेर जायला निघालो
कुठे निघालास ?
त्या मुलाला पैसे द्यायला
एव्हढी दगदग करायची गरज नाही -उद्या पर्वा त्या बाजूला जाणार त्या वेळी दे ती मुले तिथेच असतात
तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मी ल्याच ची मूठ फीरवत असताना " तू कधी ऐकतोस का कुणाचं ? मनमानी करायची जुनी खोड आहे " असे काहीतरी पुटपुटली
वीर सावरकर पुळ्याला वळसा घालत चौकात आलो मुले शोधली अन त्याला पैसे दिले
माझं आयुष्य एम आय डी सी त गेले
सुखासीन आयुष्य जगणा-या वर्गाला "हातावरचे पोट " म्हणजे नसते
कारख्यान्या त असताना -शटर रिपेर करणारे त्याला ग्रीज ऑइल करणारे --छत गळत असेल तर वर चढून सिमेंट पत्र्यावर डामरी शिट चिकटवणारे - कार पुसणारे - खिडकीची काच बसवणारे -मशीन साफ करणारे मुले येत असत
दिवसभर एम आय डी सी हिंडत काम शोधणे मिळालेली मजुरी घेत सायंकाळी घरी जाणे -मग झोपडीत रॉकेल भाजी वाणी सामान येत असे व चूल धडधडत असे
आमचा कामगार म्हणत असे "चूल बंद की अक्कल बंद "
हे दयाघना प्रत्येक घरातली चूल पेटती ठेव हीच पार्थना

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

14 Apr 2019 - 5:23 pm | चौथा कोनाडा

हे दयाघना प्रत्येक घरातली चूल पेटती ठेव हीच पार्थना

सुंदर ! हे छोटेसे प्रकटन आवडले.
जाणीव ठेवून दुसऱ्याचे नुकसान होऊ नये ही भावना मनाला स्पर्श करून गेली.

यशोधरा's picture

14 Apr 2019 - 5:34 pm | यशोधरा

हे काम छान केलेत अकुकाका.

आनन्दा's picture

14 Apr 2019 - 6:35 pm | आनन्दा

काका आज गड्डेरी झब्बू का?

कंजूस's picture

14 Apr 2019 - 10:01 pm | कंजूस

मोगऱ्याचा गंध दरवळला.

एमी's picture

15 Apr 2019 - 5:40 am | एमी

छान.

'' सुंगले '' हा शब्द सोडला तर संपूर्ण कथा एक मानवतेचा चांगुलपणाचा संदेश देतेय .. मला वाटत सुंगले च्या ऐवजी " वासले " टाकलं असतं तर चाललं असतं .. काका , मला माफ करा पण मी तुम्हाला आपले समजूनच मस्करी करतो आहे ... कृ ह घे

अन्या बुद्धे's picture

15 Apr 2019 - 4:19 pm | अन्या बुद्धे

खरंय.. हातावर पोट..

श्वेता२४'s picture

15 Apr 2019 - 4:23 pm | श्वेता२४

हसुन हसुन पोटावर हात धरायची पाळी आली (सर्व कथा व त्यावरील प्रतिक्रीया)

सोन्या बागलाणकर's picture

16 Apr 2019 - 3:38 am | सोन्या बागलाणकर

सकाळमधील मुक्तपीठ सदरातील लेखांची (उदा. ब्रम्हेची लुना) आठवण झाली.

सिक्रेटसुपरस्टार's picture

17 Apr 2019 - 2:12 am | सिक्रेटसुपरस्टार

छान.

निशाचर's picture

17 Apr 2019 - 2:47 am | निशाचर

छान!