सगळ्यनाना असतो तसा मला पण बॉस त्रास देत आहे
जास्त काम असेल त्यावेळी आजारी पडणे ,उशिरा येणे ,आळस करणे वगैरे सगळे करून झाले आहे पण पठ्या काही सुधरत नाही
मुद्दाम छोट्या चुका काढणे चालूच आहे
sr मानजमेंट काही कामाचे नाही ना HR
apprisal होणार नाही ह्याची खात्री आहे ,काढले कामावरून तरी फरक नाही पण ह्या नालायकाचे रक्त प्याचे आहे
जालीम उपाय सुचवा ,रात्री पण स्वप्नात मी दिसायला पाहिजे
प्रतिक्रिया
15 Feb 2019 - 9:22 pm | उपयोजक
आहात ना? मग एखाद्या पंटरला पाठवून घ्या खोपच्यात!!
;)
15 Feb 2019 - 9:32 pm | पाषाणभेद
एकच उपाय. खतरनाक आहे.
करुन बघा.
एच आर कडे लेखी तक्रार द्या की तुमचा बॉस सेक्स्युअली ॲरेस करतो आहे.
अधिक तीव्र धक्का द्यायचा असल्यास पोलीसात तक्रार द्या.
तुम्ही महिला असल्यास वजन पडेल. नसल्यास हि घटना गडद होईल.
दोन्हीतही तुमचाच फायदा.
16 Feb 2019 - 9:28 am | एकुलता एक डॉन
HR चे आधीच धाग्यात सांगितले आहे बुवा
मी नवीन बॉस आल्यावर १५ दिवसात त्याची कंप्लेट केली ,बहुतेक HR नेच चुगली केली
दुर्दैवाने मी पुरुष आहे
30 May 2019 - 12:51 am | एकुलता एक डॉन
HR openly गे आहे हे सांगायचे विसरलो
15 Feb 2019 - 9:51 pm | रानरेडा
आपण आणि बॉस दोघेही पुरुष आहेत असे वाटते
तरी पण नित सल्ला घेवून बॉस लैंगिक छळ करीत आहे असे सांगा .मोठी धमाल येईल .
बॉस बोम्बलला कि सांगा मी तसा नाही हो!
15 Feb 2019 - 10:52 pm | पाषाणभेद
तेच तर वर मी सांगीतले आहे की.
16 Feb 2019 - 9:30 am | एकुलता एक डॉन
शेवटच्या जालीम उपाय म्हणून बाजुला ठेवतो
15 Feb 2019 - 10:13 pm | शंकासुर
15 Feb 2019 - 10:13 pm | शंकासुर
15 Feb 2019 - 10:17 pm | शंकासुर
15 Feb 2019 - 10:18 pm | शंकासुर
वेगळा विचार ह्या अर्थाने की तुमच्या बॉसला जी गोष्ट खूप आवडत असेल तर तिची वाट कशी लावायची किंवा एखादी नावडती गोष्ट त्याला परत परत करावी लागेल अशी वेळ आणा.
15 Feb 2019 - 10:18 pm | शंकासुर
15 Feb 2019 - 10:18 pm | शंकासुर
15 Feb 2019 - 10:18 pm | शंकासुर
आणि जालीम उपाय हवा असेल तर एखाद्या बाई कडून त्याचा ऑफिसमध्ये सर्वांसमोर अपमान करवून घ्या. मेला तरी तुम्हाला विसरणार नाही तो...
16 Feb 2019 - 9:33 am | एकुलता एक डॉन
बॉस ला उशिरा येणे आवडत नाही ते तर मुद्दाम आयडी कार्ड लौकर स्वॅप करून त्याच्या समोर उशिरा येणार आहे
त्याला माझ्या कामात चुका काढायला आवडते ,काम एकदम बंद करणे झेपणार नाही
सहकारी पुरुष अथवा बाई माझी मदत नाही करणार
15 Feb 2019 - 10:28 pm | वीणा३
कुठून तरी ५-७ ढेकूण मिळवा, डबीत बंद करा (ते मरत नाहीत) आणि बॉस च्या बॅग मध्ये कार मध्ये कुठे जमेल तिथे सोडून या. तुमचं नाव लक्षात ठेवणार नाही पण सतत वैतागलेलाच असेल.
पण असे लोक नेहमीच वैतागलेले असतात त्यांच्या आयुष्यात, तुम्ही त्रास दिला तर राग दुसऱ्या अडकलेल्या माणसावर निघेल. शक्यतो नोकरी सोडा आणि आपलं डोकं शांत करा. अशा लोकांच्या नदी लागण्यात अर्थ नाही.
16 Feb 2019 - 9:36 am | एकुलता एक डॉन
नोकरी सोड्याचीच आहे पण त्याच्या नाकात मिऱ्या काढल्यावर शांत झोप येईल
तो फक्त मलाच टार्गेट करतोय कारण मी जास्त सहकाऱ्यांमध्ये मिसळत नाही ,सॉफ्ट टार्गेट
आणि डोके शांत आहे दादा ,आधीपण मॅनेजर ला शांत जुन्या ,ह्याला जास्त backing आहे
15 Feb 2019 - 10:30 pm | नाखु
कार्यालयातील अत्यंत भांडकुदळ सहकार्याशी सुमडीत भांडण लावून द्या,ती व्यक्ती स्त्री असेल तर मालिका होईल इतका मोठा मसाला पाहिजे,आणि बाप्या असेल तर त्याचा विक पॉइंट हेरुन त्यावर बॉसचे लक्ष्य आहे आणि ते काम तुम्हाला सांगीतले आहे असं भासवा.
खास मिपा सल्ला.
जादूने ढेकूण व्हा आणि बॉसचेच काय,रुचीपालट म्हणून बॉसच्या बरोबरीने तुम्हाला त्रास देणाऱ्या त्याच्या सहकारिचेपण रक्त...
पुन्हा मूळ रुपात येऊन आपला अनुभव अवश्य लिहा.
15 Feb 2019 - 10:50 pm | Chandu
वरिष्ठ (immediate boss) ला सरळ करण्याचे उपाय.
1.आपण त्याला छळू शकतो असा विचार मनातून काढून टाकणे
2.तो आपल्याला छळतो आहे ही समजूत डोक्यातून काढून टाकणे
3.आपण सर्वजण जे करत आहोत ते ऑफ़िस मधील
काम नसुन करमणूक आहे अशीठा म समजूत करू न वागणे
4.आपला बॉस खूप हुशार आणी कामसू आहे अशी त्या ची ख्याती त्याच्या वरीष्ठ बॉस पर्यनत नेणे.
5आपण आपल्या व आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी नोकरी करतो.मालकाच्या फायद्या साठी नाही.मालक individual असो की corporate,आपण आपली सेवा विकतो,वैयक्तिक भावना विकत ना ही.मान अपमान राग लोभ बाजुला ठेवणे पगारावर लक्ष ठेवणे.बॉस हा पण एक नोकरच आहे तो आणी मालक बघुन घेतील.आपल्याला काय?असा विचार करून मस्त मिसळपाव वर पडीक रहाणे
कृ ह घेणे
16 Feb 2019 - 9:37 am | एकुलता एक डॉन
4.आपला बॉस खूप हुशार आणी कामसू आहे अशी त्या ची ख्याती त्याच्या वरीष्ठ बॉस पर्यनत नेणे. ?????
16 Feb 2019 - 10:31 am | सुबोध खरे
जास्त काम असेल त्यावेळी आजारी पडणे ,उशिरा येणे ,आळस करणे वगैरे
हे सर्व करून तुम्ही उलट स्वतः बद्दल इतरांचे मत कलुषित करून ठेवले आहे.
लक्षात ठेवा -- दुसऱ्याला त्रास देण्यासाठी आपलयाला आपले डोके कायम "तिरके" चालवावे लागते.
त्यासाठी होणारी वैचारिक आणि मानसिक गुंतवणूक( emotional investment) हि अंती "आपल्याच" नुकसानीची ठरते.
या पेक्षा तुम्ही दुसरी नोकरी शोधायला सुरुवात करा आणि मधल्या काळात "बॉसच्या चमच्याना" मी बॉस विरुद्ध अगदी वरच्या अधिकाऱयांकडे तक्रार करणार आहे अशा "अफवा" पसरवा. यामुळे बऱ्याच वेळेस बॉस नरम होतो आणि फालतू कारणासाठी तुम्हाला त्रास देणे बंद करतो. परंतु तो संधीच्या शोधात असतो.
हि संधी मिळण्याच्या अगोदर दुसरी नोकरी मिळवा म्हणजे तुमचे दिवस सुखात जातील आणि बॉसची स्थिती केविलवाणी होते.
मी लष्करी नोकरी सोडण्याच्या अगोदर एका अतिशहाण्या मध्य पातळीच्या अधिकाऱ्याला ( त्याने मला धमकी दिली होती) असे सात आठ महिने वेठीस धरले होते. त्याच्या सर्व मित्रांना मी दर १० -१५ दिवसांनी सांगत असे कि मी त्याची महानिदेशकांकडे (DIRECTOR GENERAL) तक्रार करणार आहे. तक्रार मात्र शेवट्पर्यंत केली नाही.त्यामुळे सात आठ महिने त्याने फार त्रासात काढले आणि मी मात्र निःसंग होतो.
कुठेहि पार्टीत भेटला तर तो मला टाळून पुढे जात असे. त्यामुळे मी निवृत्त झाल्यावर त्याने शेवटी एकदाचा सुटकेचा निश्वास सोडला.
16 Feb 2019 - 11:44 am | सतिश पाटील
तुमच्या बॉसच्या बॅगमध्ये किंवा त्याच्या कारमध्ये ( त्याच्याकडे कार असेल असे गृहीत धरतो ) किंवा दोन्ही ठिकाणी त्याच्या बायकोच्या दृष्टीस पडेल अश्या ठिकाणी स्त्रीची अंतर्वस्त्रे कोंबा ( त्याला बायको असेल हे हि गृहीत धरतो )
परिणाम अधिक लवकर किंवा जास्त गडद हवे असल्यास त्याच्या बायकोचा नंबर मिळवून, तुम्ही स्वतः किंवा जमल्यास दुसऱ्या एखाद्या स्त्रीला हाताशी धरून तुमच्या नवऱ्याचे ऑफिसमधल्या दुसऱ्या स्त्रीशी संबंध आहेत असं अनोळखी नंबर वरून सांगून टाका.
आणि निवांत बसा....
उपाय फिल्मी वाटेल पण प्रभावी आहे.
तुमचा बॉस मिसळपाव वाचत नसेल असेही गृहीत धरतो.
(मी हि आयटीत आहे आणि माझी वरिष्ठ हि महिला आहे.)
16 Feb 2019 - 5:39 pm | एकुलता एक डॉन
माफ करा पन बालिश उपाय आहेत ,काहि पन होनार नाहि
16 Feb 2019 - 12:11 pm | कंजूस
बरेच बॅास त्याच्या वरच्या दोनतीन लोकांकडे रोज संध्याकाळी , सुटीच्या दिवशी हजेरी लावून पडेल ती वैयक्तिक कामं उचलत असतात. त्यांच्या सुखासाठी अख्खी फॅम्ली राबत असते.
हे विचारात घेता काय तो निर्णय घ्या. म्हणजे त्यांचे स्थान अढळ असते.
16 Feb 2019 - 5:38 pm | एकुलता एक डॉन
त्याचे स्थान हल्नार नाहि हे माहित आहे हो
खुर्चि मधे खिळे तोचाय्ला पाहिजे
16 Feb 2019 - 12:54 pm | पुजारी
आधी हे सांगा कि तुमचं कंपनी मधलं impression कस आहे. मॅनेजमेंट ला च जर तुम्ही नको असाल तर बोलणेच खुंटले. जर ते फार चांगलं नसेल त्रसाराल अर्थ असा कि मॅनॅजमेण्ट नेच तुमच्या बॉस ला हे असं वागायला सांगितलं आहे . त्यामुळंच बॉस असं वागत आहे .
असं नसेल तर ..
सर्वात आधी डोक्यातून राग काढून टाका . याचा त्रास फक्त तुम्हालाच . महत्वाचे म्हणजे सरकारी बाबू सारखं काम सुरु करा .
दुसरं Every Worm has a weak spot हे लक्षात असू द्या . आज नाही तर उद्या तो तुम्हाला समजेलच .
किंवा सरळ आधी दुसरी नोकरी शोधा . ती फायनल झाल्यावर कंपनी त रेसिग्नशन लेटर देऊन टाका .
माझ्या अंदाजाने एक्सिट interview होईलच. तेव्हा का र णे देताना बॉस ची लक्तर काढा. तुम्हाला वाटेल कि याने काय होणारेय पण तसं नसत. तो पण शेवटी नोकर आहे आणि कंपनी प्रत्येक नोकराचे CR ठेवतेच. उद्या डोईजड झाला तर काढायला म्हणून . त्यामुळं तेव्हा सोडताना इतकंच डोक्यात ठेवा कि , "Let the karma do his duty "
16 Feb 2019 - 5:35 pm | एकुलता एक डॉन
मॅनेजमेंट ला च जर तुम्ही नको असाल
बरोबर
आणि मला पन राहय्चे नाहिय
पण जाय्चेच आहे तर रक्त पिउन जन्यत काय हार्कत आहे ?
16 Feb 2019 - 5:42 pm | एकुलता एक डॉन
बरोबर
मला रेसिगन्तिओन किवा प्रोजेच्त मधुन बाहेर स्वतहुन यायचे नाहिये
एक वेळ माझे सगळे सामान बाहेर फेकले ,माझं ब्लॅकलिस्टेड म्हणून कंपाय बाहेर फोटो लावली तरी चालेल पण त्याची रेसिग्नशन ची इचछा पूर्ण व्हायला नाही पाहिजे
16 Feb 2019 - 4:13 pm | विजुभाऊ
मला आणि काही सहकार्याना एका एच आर ने फार उद्धट भाषेत संभाषण करून धमकी द्दिली होती.
तिच्या कर्माने ती बाई , तीच्या आईसोबत सध्या जेल मधे आहे.
16 Feb 2019 - 5:37 pm | एकुलता एक डॉन
नशिब वान आहात
माझि अक्खि एक कम्पनी पगार न देता गयब झालि
दुबैचा मालक तिक्दे जेल मधे
इकदच मत्र अरामात मोकाट फिर्तोय
11 Apr 2019 - 8:48 pm | सुमीत
विजु भाऊ , तुम्ही पण टेक महिन्द्र मधे का?
16 Feb 2019 - 5:07 pm | ज्ञानोबाचे पैजार
बॉस चे रक्त पिण्याचे अनेक प्रकार आहेत, जसे की :-
१ . जसे भिमाने (बहुतेक) किचकाचे रक्त प्यायले होते तसे तुम्ही डायरेक्ट मांडी फोडून किंवा छाती फोडून तोंड लावुन पिउ शकता.
२. ड्रायकुला सारखे त्याच्या मानेत दात खुपसुन (ते नरडीचा घोट घेणे म्हणतात तसे)
३. बॉसच्या शरीरात इंजेक्षनची सुई खुपसुन त्या इंजेक्षनच्या दुसर्या बाजुने पडणारी धार तोंडात सोडता येईल.
४. बॉस चे मनगट किंवा इतर कोणताही सोयिस्कर अवयव कापून सांडणारे रक्त ग्लास मधे किंवा भांड्यात गोळा करुन निवांत पणे चखण्या सोबत पिता येईल
५. बॉस ने केलेल्या रक्तदानाची पिशवी पळवून त्या पिशवी द्वारे आपल्याला रक्तपान करता येईल. या पिशवीला अनायसे स्ट्रॉ लावलेलाच असतो
६. बॉसचे रक्त डीप फ्रीज मधे डीप फ्रीज मधे साठवून त्याचे ब्लडक्युब मद्यात किंवा इतर कोणत्याही सरबतात मिसळून पिता येतील.
७. बॉसचे रक्त अटवून त्याच्या वड्या करुन त्या चखणा म्हणून वापरता येतील.
८. बॉसची करंगळी कापा व पुढील गाणे म्हणत म्हणत त्याच्या रक्ताचा आस्वाद घ्या
तुझिया बोटाला, बॉसा कशीरे लागली रक्ताची धार
माझ्या मंदीरी नाही एकही चिंधी, कोट पँट अपरंपार
तुझिया बोटाला
अजुनही काही प्रकार आहेत पण ते इकडे नको....
पैजारबुवा,
16 Feb 2019 - 5:37 pm | एकुलता एक डॉन
बॉस ने केलेल्या रक्तदानाची पिशवी ?
माझेच रक्त निघाय्चे
16 Feb 2019 - 7:56 pm | पुणेकर भामटा
६,७,८ आवडला
18 Nov 2019 - 5:56 pm | प्रणित
आता ओफिस मध्ये मिपा वाचताना काळजी घ्यावी लागणार.
16 Feb 2019 - 11:13 pm | नाखु
ते रक्त पिणार आहेत का रक्तदान वाटपाचा कार्यक्रम आहे?
डॉनराव तुम्ही जरा उशीराच प्रश्न विचारला आहे.
वाटलाविन दिवस अगोदर विचारला असता तर पुढील खात्रीशीर उपाय करता आला असता.
गाडीत आणि घरी एक निनावी गुलाबी शुभेच्छापत्र एका फूलाबरोबर पाठवून दिले असते तुमच्या बॉसचे रक्त त्याच्या बॉसने हप्त्या हप्त्याने सावकाश प्यायले असते
17 Feb 2019 - 4:14 am | अमित भोकरकर
वर काही उपाय त्याच्या चारित्र्य वर वार करा असे दिसत आहेत. Don आणी ईतर कोणीही असे प्रकार चुकूनही करू नका. माझ्या जवळच्या मित्राने दोन महिला कर्मचाऱ्यांना प्रॉडक्शन varun बोलला असताना complain स्वताच्या किंवा मित्राच्या मॅनेजर कडे करण्याऐवजी HR कडे केली. HRne complain योग्य जागी forword केली पण माझा मित्र विनाकारण बदनाम झाला. Floor वर सर्व जण त्याला नाना पाटेकर आणी aaloknath बोलत होते. मित्र प्रचंड depress झाला होता. त्याची अवस्था पाहून सांगतो. राग आला असेल तर भर floor वर त्याचा काना खाली द्या पण त्याच्या अब्रू cha खोबरे करू नका
17 Feb 2019 - 12:42 pm | एकुलता एक डॉन
बॉस से अक्ख्या व्हात्साप्प गृप मध्ये माझे स्क्रीनशॉट share केले आहेत
आणि मुद्दाम मलाच टार्गेट करत आहे हे उघड सत्य आहे ,त्यामुळे मला तरी वावगे वाटत नाही
17 Feb 2019 - 4:06 pm | टवाळ कार्टा
दुसरीकडे नोकरीसाठी गेलात आणि काही काळाने तिथेही हाच बॉस बनून परत नशीबात यायची शक्यतासुद्धा गृहित धरा
17 Feb 2019 - 7:43 pm | एकुलता एक डॉन
मी interview देऊन नोकरी दुसरीकडे मिळावं शकतो ,ह्याला कोण घेणार ?
17 Feb 2019 - 11:06 pm | डाम्बिस बोका
बॉस बरोबर पटत नाही म्हणून त्रास देणे हि विकृती झाली. कामावरून कडाळे तरी फरक पडत नाही असे तुम्ही म्हणता तर स्वाभिमान ठेऊन दुसरी नोकरी बघा.
इथे असे सल्ले विचाराने आणि लोकांनी तुम्हांला ideas देणे मला बरोबर वाटत नाही.
प्रामाणिक पाने काम करा. ताठ मानेने दुसरी नोकरी शोधा. हे गुण तुम्हांला आयुष्यभर उपयोगी पडतील.
Never Burn Bridges in your career, your friends, colleagues, and people around you will remember you for those qualities and it is in your hand what you want to know for.
तुमचा IT मधील एक हितचिंतक
17 Feb 2019 - 11:54 pm | एकुलता एक डॉन
त्रस बोस्स देतोय
स्वभिमान आहे म्हनुन त्यच्यपुधे झुकत नाहिये
18 Feb 2019 - 9:33 am | सुबोध खरे
@ डाम्बिस बोका
+१००
24 Feb 2019 - 4:34 pm | कानडाऊ योगेशु
+१
अजुन एक म्हणजे तुमच्या डोमेनची व्याप्ती जर मर्यादीत असेल तर तिच मंडळी पुन्हा भेटत राहतात. (पाथ्स क्रॉस मेनी अ टाईम्स.).त्यामुळे चुकुनसुध्दा कुणाच्या मनात स्वतःबद्दलचा द्वेष जाणीवपूर्वक ठेवुन जाऊ नका. करिअर मध्ये एका कालावधीनंतर तांत्रिक कौशल्यांपेक्षा पर्सनल रिलेशन ला जास्त महत्व येते हे लक्षात ठेवा.
18 Feb 2019 - 11:45 am | समीरसूर
स्वतःला जास्त मनःस्ताप करून घेऊन सूडबुद्धीने असे काहीच करू नका ज्यामुळे काहीतरी गंभीर प्रकार घडतील. त्याला त्रास देऊन तुम्हाला काहीच मिळणार नाही. सूड घेतल्याचे समाधान काही फार विशेष नसते हे नक्की लक्षात ठेवा. अगदी क्षणभंगूर असे हे समाधान असते. तुमचा बॉस तुमचा कुणीही नाही; परका आहे त्यामुळे त्याच्याकडून होणार्या त्रासाला मनावर घेऊच नका. सरळ सरळ दुर्लक्ष करा आणि आपले काम चोख आणि प्रामाणिकपणे करत रहा. मी तर म्हणेन की त्याच्याशी चांगलं वागून त्याला दाखवून द्या की त्याच्या अशा वागण्याचा तुमच्यावर कुठलाही निगेटिव्ह परिणाम होत नाहीये. नंतर ८०% शक्यता आहे की तो सरळ वागायला सुरुवात करेल. दुसरी चांगली नोकरी शोधण्याचे प्रयत्न जारी ठेवा. नक्कीच मिळेल. नोकरी सोडतांना पॉझिटिव्ह नोटवर सोडलेली केव्हाही चांगले. शक्य असेल तर त्या बॉसची निंदानालस्तीदेखील बाकीच्या कर्मचार्यांमध्ये करू नका. तो चुकीचं वागत असेल तर त्याचा त्याला योग्य धडा आपसूकच मिळेल. तुम्ही मनात कडवटपणा ठेवून काही साध्य होणार नाही. उलट तुम्हीच धुमसत रहाल आणि त्याचा तुमच्या मानसिक क्षमतेवर वाईट परिणाम होईल. सूड वगैरे घेणे ही कधीच चांगली कल्पना नसते.
गोड बोलून आणि चित्त शांत ठेवून कठीण कामेदेखील सोपी होतात; मनात कडवटपणा पोसत राहिल्यास रोज सकाळची आल्हाददायक हवादेखील जहरी वाटते.
18 Feb 2019 - 7:29 pm | एकुलता एक डॉन
चांगले वागून पण तो डूख ठेवतोय
सुधारणार नाही
आणि मानजमेंट त्याची बाजू घेत असल्याने परत ह्या कंपनी मध्ये येण्याची icccha नाहीये
18 Feb 2019 - 11:18 pm | मास्टरमाईन्ड
तुम्ही स्वतः च्या आयुष्यातला बहुमूल्य वेळ या असल्या विचारांत वाया घालवताय असं वाटतंय. किरकिर मचमच ही सगळीकडे असते. त्याला त्रास कसा द्यायचा यापेक्षा तुम्ही स्वतः ला आहे त्या पेक्षा जास्ती पगाराची position कोणती कंपनी देतेय का ते शोधण्यात वेळ खर्च केलात तर नक्कीच फायदा होईल.
आमच्या कंपनीत ठरलेल्या सुट्या आणि ठरलेल्या रजा सोडून इतर कोणतीही सवलत दिली जात नाही. कंपनी ची सहल वगैरे नाही / बिन कामाची celebrations नाहीत म्हणून ३ जणांनी खूप कीटकीट केली, ऐनवेळी Production Release आधी १५ दिवस जाहीर असताना पण आले नाहीत. त्यांना दुसर्या दिवशी termination letter हातात ठेवलं गेलं. याव्यतिरिक्त त्यातल्या दोघांना इतर ठिकाणी job लागल्यावर background check च्या कॉल ला स्पष्ट सांगण्यात आलं कि Not eligible for re hire. Bad team player वगैरे. कारण त्यांनी पण असेच त्रास देण्याचे प्रयत्न त्यापूर्वीच्या ३ महिन्यात केले होते. ते तिघंही बाहेर interview ला कंपनी आणि management बद्दल काहीही सांगत फिरत होते. त्यातल्या दोघांना जवळपास ३ महिन्यांनी job मिळाला
आता विचार करा वाट कुणाची लागली ?
GE किंवा तत्सम अमेरिकन कंपन्या मागच्या २ - ३ employers कडे चौकशी करतात तिथे यांना प्रवेश सहजा सहजी मिळणार आहे का ?
३ महिन्यांच्या गॅप चं काय उत्तर देणार interview किंवा appraisal interview ला?
माझं वैयक्तिक मत असं आहे की जर पटत नाही तर दुसरीकडे संधी शोधा. त्यात मेंदूची शक्ती खर्च केली तर आज ना उद्या नक्की फायदा होईल.
आणि वरच्या एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे जर नवीन कंपनीत जर तुमच्या bad luck नं हाच बॉस आला तर ?
बाकी निर्णय तुमचा तुम्ही घ्यालच
19 Feb 2019 - 5:04 am | ट्रेड मार्क
तुम्हाला त्रास देतोय म्हणजे नक्की काय करतोय? छोट्या चुका काढणे तर सर्वसामान्य आहे. त्यावर उपाय म्हणजे त्याने जे काम सांगितलेय ते लिखित स्वरूपात घेणे. उदा. त्याने तुम्हाला बोलावून X काम करायला सांगितले तर योग्य ते प्रश्न विचारून तो उत्तर देईल ते लिहून घ्यावे. नंतर त्याला तुमची समजूत काय काय आहे याची ई-मेल पाठवून द्यावी. त्याने उत्तर नाही दिले तरी ते रेकॉर्ड तयार झाले. नंतर तो ओरडायला लागला तर ई-मेल दाखवायला आहेच. तसेच काम पूर्ण होण्याच्या आधीच मध्ये एक-दोन वेळा काय करतोय ते, म्हणजे draft version पण दाखवायचा प्रयत्न करा.
त्यापुढेही खालील गोष्टी तुम्ही करू शकता.
१. शक्यतो त्याच्याशी तोंडी संभाषण करू नका. त्याने जरी बोलावून वा फोन करून काही सांगितले तरी त्याला ई-मेल पाठवायला सांगा अथवा तुम्ही तुम्हाला काय सांगितले आहे त्याची एक ई-मेल त्याला पाठवा.
२. तुमचे त्याच्याबरोबर जे संभाषण होईल अथवा ज्या घटना घडतील त्याचा एक तारीखवार लॉग बनवून ठेवा. तारीख, त्या विषयाशी संबंधित प्रथम तुमचे बोलणे काय झाले आणि नंतर तुम्ही काम कधी करून दिले, त्यापुढे काय झाले हे संगतवार लिहा.
३. तुमच्या आधीच्या बॉसचे आणि आधीच्या वर्षांचे फीडबॅक व रेटिंग्स गोळा करून ठेवा. तुमच्या क्लायंट कडून तुमचा फीडबॅक घेता येत असेल तर तो घ्या.
४. Skip Level Meeting: तुमच्या बॉसच्या बॉस बरोबर एक मीटिंग ठेवा. परस्पर मीटिंग न ठरवता आधी एक one-to-one ई-मेल टाका की एका सेन्सिटिव्ह विषयावर बोलण्यासाठी थोडा वेळ पाहिजे तर कधी बोलता येईल अशी विचारणा करा. त्या मीटिंग मध्ये काय बोलायचे याची आधी १० वेळा उजळणी करा. बॉसच्या बॉसची उत्तरे काय असू शकतात याचाही विचार करून त्याप्रमाणे तयारी करा.
५. प्रत्येक कंपनीत एक Compliance Department असते. त्यांच्याकडे तुम्ही अनामिक (Anonymous) किंवा तुमच्या नावासकट तक्रार करू शकता. मात्र काय बोलायचे ते नीट विचार करून बोलायला पाहिजे. शक्यतो यांच्याकडे केल्या जाणाऱ्या तक्रारी हॅरॅसमेंट, डिस्क्रिमिनेशन, अयोग्य वागणूक यासाठीच्या असतात. या ठिकाणी तुम्हाला मुद्दा १ मधील लिखित संभाषण आणि मुद्दा २ मध्ये तयार केलेले लॉग्स उपयोगी पडतील.
मी यातून गेले एक वर्ष जात असल्याने आपण एकाच बोटीत आहोत. तो काय करतोय याची हिंट मला आधीच लागल्याने पण मी बऱ्यापैकी पुरावे गोळा करून ते योग्य त्या ठिकाणी पोचवले आहेत. तसेच अजून कोणाला तो अशी वागणूक देत आहे त्यांच्याबरोबर बोलून त्या लोकांना पण तक्रार करायला उद्युक्त केले आहे. अगदी दृश्य परिणाम लगेच दिसला नसला तरी पण त्याच्या CR वर हा रिमार्क तर नक्कीच रहाणार.
त्यानंतर तुम्ही माझे या व्यक्तीशी पटत नाही म्हणून मला दुसरा प्रोजेक्ट द्या अशी मागणी करू शकता. एक लक्षात ठेवा Revenge is the best dish when served cold. तेव्हा डोके शांत ठेऊन निरीक्षण करावे आणि व्यवस्थित प्लॅन करून मग पावले उचलावीत.
बादवे, हा तुमचा बॉस तामिळ आहे का?
19 Feb 2019 - 10:14 am | एकुलता एक डॉन
१) सगळे काम ई-मेल वर होत नाही ,आणि तो मला ट्रॅप करू पाहतो ,blatantly त्याने आता हा प्रकार सुरु केला आहे
२) ते सगळे आहे ,पूर्ण मानजमेंट ला माहीत आहे
३) मी मुद्दाम अंगावर कमी काम ठेवले आहे,कलेइन्ट interaction नगण्य आहे
४) ह्या शहरातला मुख्य प्रोजेक्ट मॅनेजर ने मलाच भाषण ठोकले कि तू अड्जस्ट कर ,त्याला पुरावे पण दिले कि हा छोट्या मोट्या गोष्टीत त्रास देतो ,अगदी १५ मिन उशिरा का ,असा लौकर येऊन पण भुंकतो
५) दुसरा प्रोजेक्ट नाहीये ,कारण ह्या प्रोजेक्ट मध्ये कुत्तर ओढ करून काम होते हे जॉईन झाल्या कळले होते व hr ला तेव्हा दुसरे प्रोजेक्ट मागितले होते
महिना HR बरोबर मीटिंग असते तेव्हा अक्ख्या टीम समोर हा माणूस विनाकारण त्रास देतो हे सांगितले होते
मला दुसरीकडे नोकरी मिळेलच ,आणि हा परत बॉस बनून आला तर शिव्या देऊन बाहेर पडणे पसंद करेल ,पण जाताना ह्याची लावायची आहे
मी १२ ३० ला ऑफिस आलो फ्लोर वर १२ ४५ ,लॅपटॉप चालू करून १२ ५०
१२ ५३ ला ह्याचा msg कि तू १ वाजता का आला
19 Feb 2019 - 8:33 pm | ट्रेड मार्क
माझ्या मते तुम्ही प्रकरण थोड्या चुकीच्या पद्धतीने हाताळत आहात. आपला संताप होणे, त्रास होणे वगैरे स्वाभाविक आहे, पण जर समोरचा तुम्हाला त्रास देण्यासाठीच हे करत असेल तर तुम्ही त्याचा उद्देश साध्य का करून देताय?
तुम्ही सरळ सरळ पंगा घेतलात तर ते तुम्हालाच त्रासदायक होणार आहे कारण वरच्या लोकांच्या हातात आपल्यापेक्षा जास्त पॉवर असते. इथे तुम्हाला सबुरीने आणि पूर्ण विचाराने खेळ्या करायला लागतील. बुद्धिबळाचा पट मांडून बसायचे. पुढचा काय खेळी करेल याचा विचार आधीच करता आला पाहिजे. आता तुम्ही तुमच्या बॉसबरोबर इतके दिवस काम करताय, तर तो काय करू शकेल याचा अंदाज पण तुम्हाला बांधता येईल.
तुमच्या कामाच्या वेळा काय आहेत? शक्यतो वेळेच्या आधीच आपण ऑनलाईन असावे याचा प्रयत्न करा. मुद्दाम एखादी ई-मेल म्हणा किंवा तत्सम काहीतरी तुमच्या कामाच्या वेळेआधीच पाठवायची सवय लावून घ्या. १००% सगळे काम ई-मेल वर होत नाही हे ठीक आहे पण जे जमेल ते तर करा. शक्य तेवढे काम कुठल्या ना कुठल्या लिखित स्वरूपात ठेवायचा प्रयत्न करा उदा. कम्युनिकेटर वर काही मेसेज टाकला तर त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवणे. लगेच आपल्या लॉग मध्ये त्यांनी नोंद करणे. हे सुरुवातील जरी कंटाळवाणे आणि निरुपयोगी काम वाटले तरी जेव्हा लढायची वेळ येते तेव्हा हे पुरावे कामी येतात.
एकूण परिस्थिती बघता तुम्ही शक्य तेवढ्या लवकर जॉब बदलणे योग्य आहे. मूर्ख लोकांच्या मागे आपला वेळ आणि शक्ती खर्च करू नका. जो तो आपल्या कर्माची फळे कधी ना कधी भोगतोच. पण हा द्वेष तुम्हाला मागे खेचेल - तब्येतीवर नक्कीच परिणाम होईल तसेच नवीन जॉब मिळायला पण अडचण येऊ शकते. कारण कितीही नाही म्हणलं तरी थोडा कडवटपणा येतोच जो मुलाखतीमध्ये दिसून येतो.
जॉब सर्च साठी तुम्हाला शुभेच्छा.
20 Feb 2019 - 5:20 pm | एकुलता एक डॉन
एकूण परिस्थिती बघता तुम्ही शक्य तेवढ्या लवकर जॉब बदलणे योग्य आहे.
शोध्तोय
मूर्ख लोकांच्या मागे आपला वेळ आणि शक्ती खर्च करू नका.
प्रोजेच्त एक्षित मगित्लि
शक्य तेवढे काम कुठल्या ना कुठल्या लिखित स्वरूपात ठेवायचा प्रयत्न करा
ते दख्वुन पन नाहि होनार काहि
21 Feb 2019 - 1:22 am | डाम्बिस बोका
मित्रा
तुला जर खरंच बदला घ्यायचा असेल तर माझा हा सल्ला.
मेहनत घेऊन आहे त्यापेक्षा चांगला JOB मिळव. नोकरी सोडताना HR/Upper Management ला सविस्तर EMAIL लिहून सोडण्याची कारणे लिही. be professional in that writing.
वर्ष/सहा महिन्याने नवीन कामात यशस्वी होऊन पुन्हा ह्या कंपनी मध्ये लोकांनां भेटायला ये. जमल्यास सर्वांसमोर अथवा खाजगीत ह्या मॅनेजर चे आभार मान.
सर्वाना सांग कि ह्याच मॅनेजर मुळे मला नवीन चांगला जॉब घेण्याची प्रेरणा मिळाली. आज मी पूर्वीपेक्षा खूप चांगल्याला जॉब मद्ये आहे.
Take this challenge as opportunity to enhance your career.
Best of Luck
21 Feb 2019 - 1:35 am | डॉ सुहास म्हात्रे
+१००
21 Feb 2019 - 3:36 am | एकुलता एक डॉन
मेहनत घेऊन आहे त्यापेक्षा चांगला JOB मिळव. नोकरी सोडताना HR/Upper Management ला सविस्तर EMAIL लिहून सोडण्याची कारणे लिही. be professional in that writing.
आज केले
उद्य एक इन्तेर्विएव आहे
21 Feb 2019 - 6:03 pm | बापू नारू
तुमचा profile Technical असेल तर back-end ने दुसऱ्याच्या नावाने ई-मेल पाठवता येतो हे माहीतच असेल, तुमच्या मॅनेजर च्या बॉस च्या नावाने एक ई-मेल पाठवा त्याला मग , तुला आजपासून हाकललं म्हणून....
21 Feb 2019 - 6:55 pm | मोदक
..किंवा उलट केले तरी चालेल. =))
21 Feb 2019 - 9:46 pm | एकुलता एक डॉन
दोघाना पण करतो
23 Feb 2019 - 7:59 pm | प्रमोद देर्देकर
नको यामुळे तुम्हीच अडचणीत येणार कारण ते दोघे एकमेकांना 100% विचारणार आणि तुम्हला दोन्ही बाजूने फटका .
उगाच सूड बुद्धीने वागू नका.
त्या पेक्षा सगळं सांगून admin ला स्पष्ट तक्रार करा.
24 Feb 2019 - 3:34 pm | एकुलता एक डॉन
जोकिन्ग हो
24 Feb 2019 - 8:25 am | भीमराव
आमचं साहेब पण असंच किरकिर शिरोमणी आहे. त्यात ते काही म्हणजे काहीच काम करत नाही. एक नंबर चा रिकामटोच माणूस. सकाळी सकाळी त्याचं तोंड पाहिले की मला प्रश्न पडतो कि आमच्या गृप ने मागच्या जन्मी काय पापं केली होती जो हा घेवड्या आम्हाला गृपहेड म्हणून मिळाला. सध्या त्याच्या नाकाखाली सगळ्या गृपची मोर्चे बांधणी केली आहे. किमान स्वसंरक्षण व्हावे या हेतूने. माणूस व्यवस्थापनालाही नको झालाय कारण त्याला पाच वर्षे झाली काही बढती नाही दिली.
24 Feb 2019 - 3:39 pm | एकुलता एक डॉन
मी नुकताच ८ महिन्या आधी जॉईन झालोय आणि हा ११ वर्षांपासून त्यामुळे लाडका आहे
बाकी टीम शी माझे जास्त interaction नसते
मी मागच्या आठड्यात ४ दिवस leave मागितली होती ,क्लायंट कडून काही पण काम नसताना माझी leave अँप्रोव्ह केली नाही कारण ह्याने माझी complaint करून ठेवली होती
मी HR हेड ला सरळ प्रोजेक्ट एक्सिट आणि १ महिने leave मागितली आहे
1 Mar 2019 - 12:44 pm | पुंबा
डॉन,
हा प्रॉब्लेमचा भाग असू शकतो. लक्षात ठेवा, टीमशी इंटरॅक्शन खुप महत्वाचे आहे.
1 Mar 2019 - 3:14 pm | एकुलता एक डॉन
ते सगळे ट्रॉलिंग मध्ये एक्स्पर्ट आहेत आणि नॉट worth इट तो इंटरॅक्ट
2 Mar 2019 - 11:21 am | बाप्पू
बाकी ठीक आहे.. पण हा तुमचा विकनेस आहे हे ध्यानात घ्या.
कार्यालयात काम करताना आपल्या स्वभावावर लोकांना जिंकता आले पाहिजे. आपल्याला मदत करणारे आणि अडचणी मध्ये सपोर्ट करणारे नेटवर्क तरी उभारता आले पाहिजे..
तुम्ही नुकतेच जॉईन झालाय आणि इतर लोक खूप आधीपासून आहेत हे काही कारण होऊ शकत नाही.
27 Feb 2019 - 4:54 pm | जेडी
बाकीच्या लोकांना अशी वागणुक देतो का? प्रत्येकजण त्याचीच चापलुसी करणे शक्य नाही त्यामुळे इतर लोकांना तुमचे मत पटतय का? तुम्ही खरच चुकत नाही आहात याची खात्री तुम्हाला आहे का?
इतर लोकही तुमच्याच बाजुने असतील तर सर्वांनाच जाॅब शोधायला प्रवृत्त करा , प्रोजेक्टवर नवीन लोकांना घेवुन काम करणे अवघड असते .
28 Feb 2019 - 10:56 pm | एकुलता एक डॉन
पेपर टाकला
उद्या शेवटचा दिवस
परत हा माणूस बॉस म्हणून आला तर शिव्या घालूनच सोडेल कंपनी
५ मिन उशिरा आलो म्हणून चढणारा HR ला सांगतो मी आठवडा भर काम नाही केले पगार देऊ नका
1 Mar 2019 - 1:27 pm | अभिजीत अवलिया
उत्तम निर्णय.
Last Day च्या शुभेच्छा.
शक्यतो कोणत्याही क्षेत्रात आपल्या वरिष्ठांशी भांडण करुन आपल्याला काहीच मिळत नसते. बर्याचदा आपले कलिग्ज देखील 'तुम आगे बढो. हम तुम्हारे साथ है' असं सांगून ऐनवेळी पळून जातात. त्यामुळे पटत नसेल तर वाद न घालता काडीमोड घ्यावा आणि थयथयाट न करता निघून जावे.
जाण्यापूर्वी सर्वांना (ज्यांनी त्रास दिला त्यांनादेखील) न विसरता आभार मानणारा मेल टाकावा.
1 Mar 2019 - 3:13 pm | एकुलता एक डॉन
HR ला त्याची complaint मेल टाकलेलीच आहे ,पुढे मागे त्याच्या विरुद्ध वापरू शकतात
1 Mar 2019 - 8:10 pm | बाप्पू
डॉन..
चांगले केलेत तुम्ही पेपर टाकून.
नवीन जॉब साठी शुभेच्छा.. !!
2 Mar 2019 - 4:47 pm | चिनार
जाता जाता त्याच्या कारच्या पेट्रोल टॅंकमध्ये चमचाभर साखर टाकून जा..
तोंड गोड़ करून गेल्याच पुण्य लाभेल
30 May 2019 - 12:57 am | एकुलता एक डॉन
२२ एप्रिल ला नवीन कंपनी जॉईन केली
पहिले १० दिवस billable असून पण काम नाही ,सध्या २ ३ तास फक्त काम आहे
जुन्या कंपनीचा कहर कि ५ मिन उशिरा आलेले खपत नाही पण सेटलमेंट करायला २ महिने लावले आणि पाहिल्यान्दा रेलेइविंग लेटर पाठवले तेव्हा रिकामे पाकीट आले
6 Jun 2019 - 10:23 am | जॉनविक्क
त्याचे आपल्याकडे लक्ष गेले की त्याच्या सर्व शारिरीक हालचालींचे इमिटेशन करावे. ते सुद्धा साळसूदपणे. भले भले भडकतात आणि काही करताही येत नाही. :)
8 Nov 2019 - 9:57 am | एकुलता एक डॉन
मला हापिसा मध्ये चहा खूप प्याची सवय आहे पण मॅनेंजर भोचक ,टेबलावर चहाचा डाग जरी पडला तरी येऊन बारकाईने निरखून जातो , बर दरवेळी पॅन्टरी मधून फडका आणून साफ करणे बरे दिसत नाही ,काय करावे ?
8 Nov 2019 - 10:42 am | अनिकेत वैद्य
डेस्क ड्रॉवर मध्ये पेपर नॅपकिन आणून ठेवा. चहाचा कप शक्यतो पेपर नॅपकिन वर ठेवा. किंवा डेस्क खराब झाल्यास लगेच पेपर नॅपकिन ने स्वच्छ करता येईल.
8 Nov 2019 - 11:07 am | एकुलता एक डॉन
दर् रोज?
8 Nov 2019 - 5:55 pm | गामा पैलवान
एएडॉ,
पात्रपटल म्हणजे coaster वापरता येईल.
आ.न.,
-गा.पै.
8 Nov 2019 - 10:49 am | श्वेता२४
बॉसला भोचकपणे निरखूदे. त्यानंतर तो रक्त आटवेपर्यंत ओरडेल किंवा त्याला त्रास होईल. धाग्याचा उद्देश सफल होईल. :))
7 Aug 2020 - 8:07 pm | एकुलता एक डॉन
https://www.lokmat.com/crime/fit-anger-employee-sent-sex-toy-name-boss-f...
संताप झाला अनावर! रागाच्या भरात पठ्ठ्याने चक्क बॉसच्या नावे पाठवले सेक्स टॉय