पुलावरचा न्हावी

विसुनाना's picture
विसुनाना in कलादालन
17 Mar 2009 - 1:37 pm

नमनाचे तेलः

माझी बायको ऑईल, वॉटर आणि पोस्टरकलर अशा माध्यमात चित्रे काढत असते.
तिची काही चित्रे इथे तुम्ही पाहिली होतीच.
इतकी वर्षे तिची चित्रकारी पाहता-पाहता मलाही रंगांशी खेळायची हुक्की आली.

आमच्या गावात एक आर्किटेक्ट/लेखक/कवि/नाट्यकर्मी कलाकार आहेत - प्रकाश धर्मा म्हणून.
अत्यंत हरहुन्नरी माणूस. स्वतः उत्कृष्ट चित्रकार.
त्यांनी एक प्रयोग म्हणून नवशिक्या, अर्धशिक्षित आणि अनुभवी चित्रकारांना वॉटरकलर चित्रकला
शिकवायला सुरुवात केली. दर रविवारी सकाळी उस्मानिया युनिव्हर्सिटीच्या परिसरात हा प्रयोग सुरू असतो.
(हे वाचून इथल्या कुणाला हुक्की आली तर तेही सामिल होऊ शकतात. प्रवेश विनामूल्य!)

मीही त्या प्रयोगात नवशिक्या म्हणून सामिल झालो. चुकत माकत काही कागद आणि बरेच रंग खराब केले.
अजून करतोच आहे. मी रंगवलेले एक चित्र येथे देण्याचे धाडस करतो आहे.
काही चुकलंय असं वाटलं तर सांगा.
काही बरं वाटलं तर श्रेय 'मास्टरजींना'. :)

आता चित्र :

शीर्षक : पुलावरचा न्हावी (द बार्बर ऑन द ब्रिज)
माध्यम : वॉटरकलर (जलरंग)
आकार : ६ इंच * ४ इंच अंदाजे.

चित्राबद्दल थोडेसे :
दररोज ऑफिसला जाताना मला नल्लाकुंटा नाल्यावरील पुलाच्या फुटपाथवर हा न्हावी आपले दुकान मांडून बसलेला दिसतो. हे दृष्य मला कालौघातील दोन बिंदूंना जोडणार्‍या पुलासारखं दिसतं. म्हणून चित्राचं नाव 'न्हाव्याचा पूल' किंवा 'द ब्रिज ऑफ द बार्बर' असं द्यावं काय? असाही विचार मनात डोकावतो. (स्पष्टीकरण : जागतिक नकाशावरच्या आजच्या शहरात अजूनही साठ सत्तर वर्षांपूर्वीच्या खेड्यात पिंपळाच्या पारावर हजामतीचं दुकान मांडणारे न्हावी दिसतात. )

कलासमाजजीवनमानराहणीअर्थकारणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

भाग्यश्री's picture

17 Mar 2009 - 2:04 pm | भाग्यश्री

सहीए हे!! न्हाव्याचा हात, वस्तरा, त्या शेजारच्या माणसाची दाढी वगैरे भारी जमलेय !!
कसं शिकलात हो? मलाही शिकायचेय.. जमतच नाही.. एकदा वॉटरकलर ट्राय केले, लहान मुलाने काहीतरी फासून ठेवलंय असं वाटण्याइतपत वाईट दिसत होते...

छोटा डॉन's picture

17 Mar 2009 - 3:11 pm | छोटा डॉन

हे हे भाग्यश्री, तु म्हणतेस तसेच आहे माझे.
लहानपणी चित्रकला अतिप्रिय होती, बर्‍यापैकी चांगली जमायची सुद्धा, मग काळाच्या ओघात सर्व हरवुन गेले ...

आता नोकरीला लागल्यावर आतल्या चित्रकारने पुन्हा एकदा उचल खाल्ली, मस्त फॉर्ममध्ये १५००-२००० रुपयांचे चित्रकलेचे लै भारी व ऑथेंटिक सामान आणले, पण आता काढलेल्या चित्रांकडे बघु वाटत नाही. तसे मुड येईल तसे चालुच असते ... ;)

बाकी विसुनाना, चित्र अगदीच उत्तम आहे.
रंगसंगती व ब्रशचे फटकारे एकदम उच्च आहेत.
अजुन येऊद्यात असेच, आम्हालाही प्रेरणा मिळेल कदाचित ...

------
( हौशी एम्.एफ्. हुसेन )छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

आनंदयात्री's picture

17 Mar 2009 - 3:20 pm | आनंदयात्री

>>( हौशी एम्.एफ्. हुसेन )छोटा डॉन

अच्छा !! आत्ता कळले .. म्हणुन गणपतीचे स्वेटर काढायच्या मागे लागले होते का ?

असो .. हा प्रासंगिक विनोद झाला.

बाकी चित्र छान जमले आहे, एलिमेंट्री ड्रॉइंगच्या परिक्षांची आठवण झाली. प्रकाशछटांचा बॅलॅन्स संभाळणे छान जमलेय.

प्राजु's picture

17 Mar 2009 - 9:36 pm | प्राजु

रंगछटा छान वापरल्या आहेत.
मस्तंय.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मैत्र's picture

17 Mar 2009 - 2:31 pm | मैत्र

जलरंग हे सगळ्यात तरल आणि अवघड माध्यम आहे.
आकृतींच्या नेमके पणापेक्षा सूचक गोष्टी, रंगसंगती, छायाप्रकाशाचा वापर, छटा, आणि ओले रंग एकमेकांत अर्धवट मिसळून निर्माण केलेला आभास असं वेगळंच आहे.
तुम्ही लिहिलेल्या पार्श्वभूमीप्रमाणे मस्तच जमलंय!!

अवांतरः दुर्दैवाने हैदराबाद सोडून परत आल्याने आता येता येणार नाही. नाहीतर नक्की आलो असतो शिकायला...
तुमच्या तयारीला आणि छंदाला अनेक शुभेच्छा! अशीच वेगवेगळी चित्रं करून इथे आमच्या सोबत शेअर करा ( मराठी ?)...

घाटावरचे भट's picture

17 Mar 2009 - 2:38 pm | घाटावरचे भट

वा! चित्र उत्तमच आहे.

स्वाती दिनेश's picture

17 Mar 2009 - 2:40 pm | स्वाती दिनेश

पुलावरचा न्हावी आवडला, चित्र सुरेखच आहे.
स्वाती

अनिल हटेला's picture

17 Mar 2009 - 2:44 pm | अनिल हटेला

छान प्रयत्न आहे !!!

येउ द्यात अजुनही !!! :-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

जागु's picture

17 Mar 2009 - 3:14 pm | जागु

वा खुपच छान चित्र आहे. अजुन काढत राहा.

नितिन थत्ते's picture

17 Mar 2009 - 3:26 pm | नितिन थत्ते

खूप डिटेलच्या नादी न लागता बरोबर सूचक डिटेल काढल्याने चित्र आवडले. कुंपणाची जाळी सुद्धा झकास.

खराटा
(रंग माझा वेगळा)

विसोबा खेचर's picture

17 Mar 2009 - 5:30 pm | विसोबा खेचर

खूप डिटेलच्या नादी न लागता बरोबर सूचक डिटेल काढल्याने चित्र आवडले. कुंपणाची जाळी सुद्धा झकास.

हेच बोल्तो..

तात्या.

धनंजय's picture

17 Mar 2009 - 11:33 pm | धनंजय

तपशील न देता तपशिलांचा भास घडवणे हे जलचित्रांचे खास हुन्नर.

सुंदर.

सहज's picture

17 Mar 2009 - 3:36 pm | सहज

नवशिक्यांकडून असे चित्र करवुन घेतले म्हणजे तुमचे मास्टरजी महान!

त्यांना विचारुन त्यांच्या काही कलाकृती देखील येउ दे.

यावरुन आठवले रामदास सर तुम्ही शार्दुल कदम यांना भेटुन एकदा लिहायचा आग्रह करा. व काही चित्रही दाखवा अजुन.

नरेश_'s picture

17 Mar 2009 - 4:40 pm | नरेश_

तुम्हाला व तुमच्या मास्टरजींना उभे राहून मानवंदना देतो :-)

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

विनायक प्रभू's picture

17 Mar 2009 - 5:33 pm | विनायक प्रभू

आगे बढो

अवलिया's picture

17 Mar 2009 - 6:10 pm | अवलिया

वा! :)

--अवलिया

स्वाती२'s picture

17 Mar 2009 - 6:20 pm | स्वाती२

छान जमलय. अजुन येवुद्या.

मी गौरी's picture

17 Mar 2009 - 9:05 pm | मी गौरी

चित्र खुपच छान आलय. :)

क्रान्ति's picture

17 Mar 2009 - 9:13 pm | क्रान्ति

:) सुरेख चित्र.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

लिखाळ's picture

17 Mar 2009 - 9:17 pm | लिखाळ

चित्र छान आहे.. :)
-- लिखाळ.

जलरंग वापरायला कठीण. तैलरंगावर एका ब्रशच्या फटकार्‍यावर दुसरा मारता येतो पण इथे शक्यतो एकदाच, नाहीतर पोत बिघडतो.
पांढर्‍या रंगासाठी कागदाचाच यथोचित वापर करता येणे हे जलरंगातले आणखी एक वैशिष्ठ्य तुम्ही चांगले साधले आहे.
छायाप्रकाशाचा खेळ सुंदर! अजून येऊदेत. :)

चतुरंग

प्रकाश घाटपांडे's picture

17 Mar 2009 - 9:39 pm | प्रकाश घाटपांडे

कणण्याकुमारीला गेल्तो तव्हा ज्योतिषाने आमच भवितव्य उज्वल असुन आमाला लई पैशे भेटतीन आस सांगितलय. आमी बी आता नव्या पुलाव पंचांग घेउन बसाव म्हंतो.
From समाज
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

नंदन's picture

17 Mar 2009 - 11:23 pm | नंदन

आवडले, छान आले आहे. संध्याकाळी काढले असते तर (न्हाव्याचे असल्याने) 'कातर'वेळ हे शीर्षक चालले असते :).

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

श्रावण मोडक's picture

18 Mar 2009 - 3:03 pm | श्रावण मोडक

विचार आहेत. सहमत आहे.

शितल's picture

18 Mar 2009 - 6:11 am | शितल

चित्र आवडले. :)

एकलव्य's picture

18 Mar 2009 - 7:43 am | एकलव्य

चित्र अगदी मनात घर करून राहिले आहे. - अतिसुंदर!

विसुनाना's picture

18 Mar 2009 - 10:45 am | विसुनाना

आपल्या उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल आभार.
तसेच आपल्या भावना मास्टरजींपर्यंत पोचवीन.

बबलु's picture

18 Mar 2009 - 11:25 am | बबलु

मस्तच पेंटींग.
मी माझ्या ल्यापटॉप वर desktop background म्हणून लावून पण टाकला. :) चालेल ना ?

....बबलु

शारंगरव's picture

19 Mar 2009 - 1:09 am | शारंगरव

या चित्रा सठी आपण निवडलेले माध्यम (वॉटर कलर) हे तसे अवघड माध्यम आहे.
आपले चित्र खूपच छान आहे.
- शारंगरव

चित्रा's picture

19 Mar 2009 - 8:35 am | चित्रा

चित्र आवडले. एसीसी लिहीलेली पाटी ही रंगामुळे अधिक नजरेत भरते आहे, पण ते वस्तुस्थितीप्रमाणे असावे. न्हाव्याचे दुकान मात्र एकदम खास. चित्र छानच जमले आहे.