तो : आज नक्कि ना ?
मी : हो .
तो : कसं ओळखायचं ?
मी : लाल रंगाचा कुर्ता ,पांढर्या रंगाचा पायजमा घालेन .
तो : मी ऑरेन्ज शर्ट त्यावर ब्लॅक लाइन्स ,काळी पँट.
मी : ९ वाजता . भारत कॅफे .
तो : डन .
.पहिल्यांदाच भेटणार होतो . सोशल मिडियावरची ओळख . एक्साइटेड.
सकाळची कामं आवरली . इशाचा टिफिन , शाळेची घाई आवरुन मिलिंदचा ब्रेकफास्ट .
”आज साडेआठला निघेन .कॉल आहे एक ,तो आवरुन मिटिंगलाच जाईन “ .
झाली का पंचाईत . हा निघाल्याशिवाय निघणं कठिण .
तो निघाला कि लगेचच निघु म्हणत घड्याळाकडे पाहिलं . ७ :५० .केसांना कंडीशनर मेहेंदी लावुन , चेहर्यावर फेस पॅक लावुन बेडरूम मध्ये आले तर हादरलेच .
बेडवर ऑरेन्ज कलरचा, काळ्या लाइन्स असणारा ठेवनीतला शर्ट ,ब्लॅक पँट .
“मिलिंद ?? “
प्रतिक्रिया
4 Feb 2019 - 10:36 pm | प्रचेतस
=))
4 Feb 2019 - 11:03 pm | गामा पैलवान
+१
-गा.पै.
5 Feb 2019 - 12:11 am | डॉ सुहास म्हात्रे
+१
5 Feb 2019 - 2:36 am | अंतु बर्वा
+१
5 Feb 2019 - 5:38 am | तुषार काळभोर
हा हा हा... तिला एकदम पोटात कुणीतरी बुक्की मारल्यागत वाटलं असंल!!
5 Feb 2019 - 6:50 am | एमी
:D :D अंदाज आला होता पण आवडली.
+१
5 Feb 2019 - 9:01 am | यशोधरा
एमी ह्यांच्या सारखेच म्हणते.
5 Feb 2019 - 9:08 am | शित्रेउमेश
+१
गुगली....
5 Feb 2019 - 9:21 am | ज्ञानोबाचे पैजार
ब्याडलक दोघांचेही
पैजारबुवा,
5 Feb 2019 - 10:32 am | श्वेता२४
अंदाज आला होताच तरीही आवडली.
5 Feb 2019 - 9:48 am | राजाभाउ
+१
5 Feb 2019 - 10:23 am | धनावडे
+1
5 Feb 2019 - 10:24 am | किसन शिंदे
लौटके बुद्धू घरको आए.
5 Feb 2019 - 11:14 am | नाखु
शेजारी,असता पारिजात दारी!!
+१
5 Feb 2019 - 11:22 am | समीरसूर
कोण स्त्री आहे आणि कोण पुरुष हे नीटसं कळत नाहीये.
मी : लाल रंगाचा कुर्ता ,पांढर्या रंगाचा पायजमा घालेन .
हे कपडे एक आकर्षक स्त्री घालू शकेल काय या विचारात आहे...इथे 'मी' म्हणजे स्त्री आहे असा अंदाज येतोय पण या कपड्यांनी गोंधळ होतोय...
थोडं शुद्धलेखनदेखील (नक्कि, कठिण, निघु, लावुन) व्यवस्थित हवं होतं. असो. कल्पना मात्र चांगली होती.
5 Feb 2019 - 3:22 pm | एमी
> तो : मी ऑरेन्ज शर्ट त्यावर ब्लॅक लाइन्स > असला शर्ट आकर्षक पुरुष घालू शकेल का?
5 Feb 2019 - 5:55 pm | समीरसूर
कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचं आहे ते...कृपया समजावून सांगाल का?
स्त्री-स्वातंत्र्य, स्त्री-पुरुष समानता वगैरे असा काही संदर्भ आहे का? मला माफ करा. _/\__/\__/\__/\_ माझा काहीही दुसरा उद्देश नव्हता. काय हो सारखं सारखं तेच तेच...कंटाळा नाही येत का? :-) माझा मुद्दा निराळा आहे. जरा समझा करो...
जाऊ द्या आता.... :-)
5 Feb 2019 - 7:08 pm | एमी
समजवण्यासारखं काही नाही त्यात.
तुम्ही जसा "हे कपडे एक आकर्षक स्त्री घालू शकेल काय या विचारात आहे..." विचार केला तसाच मी "ऑरेन्ज शर्ट त्यावर ब्लॅक लाइन्स असला शर्ट आकर्षक पुरुष घालू शकेल का?" असा विचार केला.
आणि तो तुम्ही लिहलेल्या प्रतिसादखाली लिहला.
5 Feb 2019 - 8:13 pm | समीरसूर
उत्तरः घालू शकेल. सहसा पुरुष (कुठलाही) शर्ट घालतात; लाल कुर्ता-पांढरा पायजमा स्त्रिया सहसा घालत नाहीत. बाकी ती पायजमाच काय, लुंगी आणि बनियन घालून आणि निळा-काळा रुमाल गळ्याभोवती गुंडाळून, तोंडात गुटख्याचा तोबरा ठेवून 'तो'ला भेटायला गेली तरी माझी हरकत नाही. 'तो' मात्र पळून जाईल एवढे नक्की. बहुतेक मिलींददेखील पळून जाईल. ती बसेल मग (अकारण) ठणाणा बोंबलत आणि पिंका टाकत!!!
5 Feb 2019 - 8:20 pm | किसन शिंदे
=))
5 Feb 2019 - 8:30 pm | जव्हेरगंज
=))))))
5 Feb 2019 - 8:29 pm | एमी
=)) विनोदी आहात.
6 Feb 2019 - 10:42 am | समीरसूर
अरे वा, चक्क स्माईली!!?? आज पार्टीच करावी लागणार मला...पायजमा घालून. :-)
कजरा रे, कजरा रे, धन्य भाग हमारे; नळी फुंकली सोनारे, खारे वारे, मतलई वारे, रे मामा रे मामा रे, हे जी रे, ते जीरे....बघा, पार्टी सुरू व्हायच्या आधीच काय झालंय...हे जीरे, ती मोहरी, दालचिनी भारी भारी, मसाल्याशिवाय खरे सांगा, होईल कशी चिकन करी?? वा वा वा...आयुष्याला चपखल बसेल अशी ओवी झालीये ही... :-):-)
6 Feb 2019 - 10:54 am | एमी
एका स्मायलीने इतका परिणाम? ही घ्या मग अजूनेक =))
6 Feb 2019 - 11:13 am | समीरसूर
धन्यवाद! :-)
5 Feb 2019 - 10:02 pm | लौंगी मिरची
=))
5 Feb 2019 - 2:45 pm | खिलजि
खत्तर्नाक
5 Feb 2019 - 4:00 pm | विनिता००२
भारीये :)
+१
5 Feb 2019 - 4:30 pm | चौथा कोनाडा
छान !
णाईट रायडर आण्ण्ड व्हाईट लिली नाटक अठवलं.
5 Feb 2019 - 8:10 pm | खिलजि
छान आहे
6 Feb 2019 - 4:19 am | स्मिता.
+1
पायजमा शब्द आल्याने लाल कुर्ता घालणारी व्यक्ती 'तो' की 'ती' हा गोंधळ माझाही झाला (पुढचे वाचेपर्यंत). चुडीदार, सलवार हे शब्द चालले असते.
यावरून ही शशक पुरूष सदस्याने लिहीलीय असं समजायला हरकत नाही ;)
6 Feb 2019 - 5:45 am | एमी
पायजमा म्हणतात बरयाच मुली बोलताना. मराठी आंजावर एकेक शब्द पकडून तो योग्य आहे का याचा काथ्या कुटला जातो हे पाहिलं आहे. पण बोलताना एवढं स्पेसिफिक कोणी (सर्वसामान्य लोक) बोलत नाहीत...
6 Feb 2019 - 11:02 am | किसन शिंदे
ही कथा बहुधा तुमची असावी ;)
6 Feb 2019 - 12:00 pm | एमी
नाय. पण इथे दोघांनी व्यक्त केलंय तसा गोंधळ मलातरी वाचताना जाणवला नाही.
उलट कुर्ती आणि सलवार हे शब्दांचे काँबो मला ऑड वाटले असते.
फक्त सलवार शब्द कोणी बोललं तरी मला कंफ्युज होतं, कमीजसोबत आला तर कळत :D
6 Feb 2019 - 12:09 pm | समीरसूर
मी कधीही कुठल्याही मुलीला स्वतःच्या सलवारीला, किंबहुना कुठल्याही प्रकारच्या कपड्याला, पायजमा म्हटलेले ऐकलेले नाहीये. कार्यालयात मुली एखाद्या दुसर्या मुलीच्या कपड्यांचं कौतुक करत असतांना "अरे वा, अबोली, छान आहे तुझा पायजमा!" किंवा "अरे वाह, समायरा, पजामें में तो कहर ढा रही हो आज. कितनों के कत्ल का इरादा हैं?" असे बोलतांना ऐकलेले नाहीये. अर्थात, माझं सगळंच चुकीचं असल्याने ही माहितीदेखील चुकीचीच असणार याबाबत मला शंका नाही.
विशेष म्हणजे एका स्त्री मिपाकरलादेखील हा गोंधळ जाणवला म्हणजे त्यात तथ्य नक्कीच आहे...
6 Feb 2019 - 12:27 pm | एमी
> "अरे वा, अबोली, छान आहे तुझा पायजमा!" किंवा "अरे वाह, समायरा, पजामें में तो कहर ढा रही हो आज. कितनों के कत्ल का इरादा हैं?" >
लेगिंग शब्द वापरतात. पण लेखकाला इंग्रजी शब्द वापरायला नको वाटला असेल.
कुर्ता-पायजमा, कुर्ती-लेगिंग, सलवार-कमीज हे असेचकॉम्बो असावेत शब्दांचे/कपड्यांचे/कपड्यांसाठीच्या शब्दाचे. ते एकदुसऱ्यासोबत वापरले तर गोंधळ उडणार...
===
बादवे
> अर्थात, माझं सगळंच चुकीचं असल्याने ही माहितीदेखील चुकीचीच असणार याबाबत मला शंका नाही.
विशेष म्हणजे एका स्त्री मिपाकरलादेखील हा गोंधळ जाणवला म्हणजे त्यात तथ्य नक्कीच आहे... >
या वाक्यरचनेत काही चुकल्यासारखे वाटतेय का?
मला वाटत 'विशेष म्हणजे' च्याऐवजी 'पण तरीही' हवं होतं :D
6 Feb 2019 - 4:14 pm | एमी
https://www.maayboli.com/node/68982?page=1#new
हे बघा. आताच तिथे 'माझे कुर्ते-पायजमे' म्हणणारी स्त्री दिसली. (तो माझा आयडी नाही :-P)
6 Feb 2019 - 4:33 pm | समीरसूर
बावळट आहे ती...तुम्ही लक्ष नका देऊ. :-):-):-)
6 Feb 2019 - 10:03 am | मोहन
+१
7 Feb 2019 - 10:11 am | संजय पाटिल
+१
7 Feb 2019 - 11:11 am | अमेयसा
+१
9 Feb 2019 - 5:28 pm | ज्योति अळवणी
आवडली
14 Feb 2019 - 9:23 am | आनन्दा
+१
14 Feb 2019 - 10:20 am | समर्पक
.
14 Feb 2019 - 6:14 pm | nanaba
.
16 Feb 2019 - 4:40 pm | भीमराव
१
16 Feb 2019 - 5:34 pm | दादा कोंडके
बरी जिरली.
18 Feb 2019 - 9:20 am | प्राची अश्विनी
+१
19 Feb 2019 - 9:52 pm | रांचो
+१
21 Feb 2019 - 4:29 am | रुपी
कथा आवडली. पण शुद्धलेखन, विरामचिन्हांच्या अतीच चुका असल्यामुळे मत नाही.