प्रेमातला लाजणे हा सर्वात सुंदर भाग आहे,
नजर खाली झुकवणे, गाल आरक्त होणे, चेहरा ओंजळीत लपवणे, डोळे झाकून घेणे, ओढणीने चेहरा लपवणे किंवा तोंड वळवून पाठमोरे बसणे ..
एक ना अनेक प्रकार
प्रेमातला तो लज्जा भाव खूप रोमँटिक असतो
हे सगळं नसतं तर प्रेम अगदी शुष्क व नीरस झालं असतं ..
कवीने म्हटलंच आहे
जणू रात्र काळी तिचे केस अन् पुरा चंद्र होता तिचा चेहरा...
तिचे हासणे चांदण्याचा चुरा,तिचे लाजणे अमृताचा झरा!
भावना व्यक्त तर कराव्याश्या वाटतात पण लज्जेने डोळ्यास डोळा भिडवणे शक्य होत नाही
पापण्यांवर लाजेचा पहारा असतो -त्या वैरीण लज्जेने घातहि केलेला असतो
कशी ही लाज गडे मुलखाची
ही वैरीण ग जन्माची
अशी गोड अवस्था होते
मात्र त्याला हे सारे बहाणे वाटत असतात
तिची ती प्रेम भावना त्याला समजत असते जाणवत असते
लाजून हासणे अन हासून ते पहाणे
मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे
तिच्या कडून शब्दाने ती भावना ऐकण्यास तो आतुर असतो
सार जीवन तिने व्यापले असते
तिच्या पायात रुतलेला काटा त्याचे हृदय घायाळ करतो
तिने बेचैन होताना, कळ्यांनी श्वास टाकावे
तिने होकार देताना, जिवाचे चांदणे व्हावे
त्या होकाराने त्यांचे जीव एकमेकात गुंततात
काल पुढे सरकत असो
रोज मरो च्या धाकाधाकीच्या जीवन संघर्षात एकमेकांचे ते प्रेमात काढलेले क्षण त्यांना उमेद देत असतात
रुक्ष व्यवहारी जगात ते संवेदनशील मनाने जगत असतात
तीच जगण्याची सहजीवनाची प्रेरणा असते
प्रतिक्रिया
27 Jan 2019 - 6:17 pm | ज्योति अळवणी
एकूण प्रयोजन नाही कळले लेखाचे
29 Jan 2019 - 2:40 pm | विजुभाऊ
जाऊ दे हो. प्रयोजन पुढे यायला लाजत असावे.