कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
29 Dec 2018 - 7:13 pm

कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
सखे काय सांगू.
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटू दिली
*
घेता मिठीत त्याने,आग अंगास लावली
अधराने अधरावर प्रेम कविता कोरली
सुटले भान पदराचे, गळून पडली चोळी
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटू दिली
*
स्पर्शिता उरोज त्याने,श्वास माझे थांबले,
धुंद मिटल्या नयनी,कामस्वप्ने तरळले
गात्र गोजिरी स्वप्ने फुलली,ग्लानी आली
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटू दिली
*
डवरला होता पारिजात,गंध भिने तनूत
शरद चांदणे जणू ,निथळत होते देहात
मोहरला गौर देह,कळ सुखाची आली
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटू दिली
*
अंगास भिडले अंग,ना दुजाभाव राहिला
कमळात जसा भ्रमर,तसा गात्रात प्रवेशला
वादळी आवेग त्याचा,तनू सुखाने भिजली
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटू दिली
*
अधरावर दंतव्रण ,वक्षावर नखक्षते कोरली
तनुत स्वर्ग सुखाची लाटे वर लाट आली
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटू दिली

शृंगारकविता

प्रतिक्रिया

अग आईगं ,, प्रसूती कळा यायला लागल्या बुवा .. असं काही टाकू नका .. आग आग होतेय बघा ..

शृंगार असल्यामुळे टेक्निकली कविता की लावणी जे काही असेल ती पोचली आणि आवडली. त्याच वेळी प्रत्येक पोषाखावर वेगळ्या रंगाची टिकली लावण्याच्या काळात कवि महोदय पन्नास वर्षे मागच्या पिढीच्या काळात कसे पोहोचले याचे कुतूहल मिश्रीत आश्चर्य वाटले.

कुंकवाचा धनी या भावनेचा आजही आदर करण्यास हरकत नाही पण माल आणि नौकर हे परवदिगार और उसके गुलाम स्वरूपाचे आहे. कुंकू आणि धनी या संबंधांची समाज सुधारणांच्या परिपेक्षात पुन्हा मांडण्याची गरज असावी मालक आणि नौकर हे परवदिगार और उसके गुलाम स्वरूपाचे आहे.. प्रेमळ फँटसीत स्वतःस अमूकचा दास म्हणवून घेणे वेगळे आणि प्रत्यक्षात दास म्हणून ट्रिट करवून घेणे वेगळे असावे. धनी किंवा मालक या नात्याची जागा भारतीय परिपेक्षात एका टिम आणि टिमलिडरच्या नात्याने घेण्याची गरज असावी. आजच्या काळात या किंवा त्या टिम लिडर सोबत खेळण्याचे आणि टिमलिडर न होवो स्वर्गवासी झाल्यास कुंकू पुसून वैधव्य जपत अशा लावणीच्या केवळ स्वप्ने बघत शेवटची घटका मोजत थांबावे लागणे आदर्श स्थिती नसावी.

एवढे असूनही कुंकवा शी हवेतर धन्याचेही नाते जपा पण काही कारणाने सध्याच्या धन्यास न होवो पण काही झाल्यास त्याची जागा मनमोकळे पणाने नव्या धन्यासही देण्यास राजी होण्याचा काळ असावा. एवढ्या शृंगार कवितेस प्रतिसाद देताना चर्चेस गंभीर वळण देण्याबद्दल क्षमस्व.

गब्रिएल's picture

29 Dec 2018 - 10:20 pm | गब्रिएल

आरारा, माहितगारसायेब, त्या दोगांची धुंदी पार उतरवलीत बगा तुमी. =))

नाही हो मुद्दाम असा काही उद्देश्य नव्हता आमच्या दुसर्‍या धाग्यावरील प्रबोधनवादी विचारांचे लेखन चालू असताना नेमके हे शीर्षकाव्य वाअनात आल्याने जसे कवि महोदयांचे काव्य स्त्रवलेच तशी आमचीही लेखणी धावलीच पण खोटे कशास बोलावे आम्हालाही काव्य भावलेच. असे भाग्याचे धनी होणे कुणास आवडणार नाही.

धनी आणि धन्य धन्य होण्यासाठी शुभेच्छा.

माहितगार's picture

29 Dec 2018 - 11:30 pm | माहितगार

* वाचनात आल्याने

पाषाणभेद's picture

2 Jan 2019 - 9:09 am | पाषाणभेद

या ताठर प्रतिसादाचा एखादा धागादेखील होवू शकतो.

जव्हेरगंज's picture

30 Dec 2018 - 7:29 pm | जव्हेरगंज

झब्रा!!!

कुंकवाच्या धन्यानं, ना डोळ्यास डोळा, रात जागवली .. आग अंगास एका सलग ग्रुपमध्ये एकसंघ शब्द समुह ... फार छान फ्लो मध्ये येतात
पण अस्स्ल मराठमोळा गावरान ट्रॅक बदलुन एकदम
म्हातारा संस्कृत मास्तर
स्पर्शिता उरोज.... अधरावर दंतव्रण....वक्षावर
थोडी मिक्सींग होतेय इतकचं म्हणायच आहे.
अर्थात कविता आवडली अजुन मजा आली असती जर एकाच फ्लो मध्ये असती तर इन्टेन्स झाली असती.