रंग मेन्दीचा

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
3 Mar 2009 - 9:41 pm

रंग मेन्दीचा
रंग मेन्दीचा हातावरती अजून खुलतो कधी कधी
शारदरात्री तोल मनाचा अजून ढळतो कधी कधी
हिरमुसलेली रातराणी ही कधी अचानक मोहरते
निशिगंधाचा धुंद ताटवा अजून फुलतो कधी कधी
खिन्न मनाच्या मैफलीत या आर्त विराणी गाताना
आनंदाचा सूर अचानक अजून जुळतो कधी कधी
वठलेल्या निष्पर्ण मनाच्या थरथरत्या फांदीवरती
आशेचा हलका हिंदोळा अजून झुलतो कधी कधी
कधी अचानक हसता हसता डोळे भरती अन झरती
फुले वेचता चुकार काटा अजून सलतो कधी कधी
तृप्त मनाच्या नभी अचानक दाटून येई मळभ कसे?
अवचित हळ्वा भास तुझा का अजून छळतो कधी कधी?
क्रान्ति

गझल

प्रतिक्रिया

प्राजु's picture

9 Mar 2009 - 9:13 pm | प्राजु

ही कविता मी वाचलीच नव्हती. कशी काय राहिली कळत नाही!!

उत्तम.
वठलेल्या निष्पर्ण मनाच्या थरथरत्या फांदीवरती
आशेचा हलका हिंदोळा अजून झुलतो कधी कधी
क्या बात है!

तृप्त मनाच्या नभी अचानक दाटून येई मळभ कसे?
अवचित हळ्वा भास तुझा का अजून छळतो कधी कधी?
मस्तच!!

या कवितेवरून दोन गाणी आठवली. एक म्हणजे पदरावर मेंदीचा अजून रंग ओला आणि दुसरं म्हणजे कभी कभी मेरे दिल में... :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

क्रान्ति's picture

9 Mar 2009 - 9:18 pm | क्रान्ति

सुरेश भट माझ्या बाबांचे जवळचे मित्र होते. त्यांनीच मला गझल कशी लिहायची याच मार्गदर्शन केल. त्यांचा एल्गार त्यांनी मला "उत्तमोत्तम गझला लिही" या आशिर्वादासह स्वाक्षरी करून भेट दिला आहे. तेच माझ मोठ सन्चित!
क्रान्ति

प्राजु's picture

9 Mar 2009 - 9:21 pm | प्राजु

:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Mar 2009 - 12:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुरेश भट माझ्या बाबांचे जवळचे मित्र होते. त्यांनीच मला गझल कशी लिहायची याच मार्गदर्शन केल. त्यांचा एल्गार त्यांनी मला "उत्तमोत्तम गझला लिही" या आशिर्वादासह स्वाक्षरी करून भेट दिला आहे. तेच माझ मोठ सन्चित!

ओ हो, क्या बात है ! तसाही रंग मेंदीचा आवडलाच होता !

-दिलीप बिरुटे

पल्लवी's picture

9 Mar 2009 - 10:08 pm | पल्लवी

अतिशय सुंदर कविता !

खिन्न मनाच्या मैफलीत या आर्त विराणी गाताना
आनंदाचा सूर अचानक अजून जुळतो कधी कधी

एक नंबर !

वठलेल्या निष्पर्ण मनाच्या थरथरत्या फांदीवरती
आशेचा हलका हिंदोळा अजून झुलतो कधी कधी

एक नंबर +!

कधी अचानक हसता हसता डोळे भरती अन झरती
फुले वेचता चुकार काटा अजून सलतो कधी कधी

एक नंबर ++ !

बेसनलाडू's picture

10 Mar 2009 - 1:54 am | बेसनलाडू

खिन्न मनाच्या मैफलीत या आर्त विराणी गाताना
आनंदाचा सूर अचानक अजून जुळतो कधी कधी
वठलेल्या निष्पर्ण मनाच्या थरथरत्या फांदीवरती
आशेचा हलका हिंदोळा अजून झुलतो कधी कधी

मस्त!
(झोपाळ्यावरचा)बेसनलाडू

घाटावरचे भट's picture

10 Mar 2009 - 6:18 am | घाटावरचे भट

बेश्ट!

पक्या's picture

10 Mar 2009 - 6:35 am | पक्या

वा. सुरेख.
खिन्न मनाच्या मैफलीत या आर्त विराणी गाताना
आनंदाचा सूर अचानक अजून जुळतो कधी कधी

हे तर मस्तच.

अनिल हटेला's picture

10 Mar 2009 - 7:50 am | अनिल हटेला

कधी अचानक हसता हसता डोळे भरती अन झरती
फुले वेचता चुकार काटा अजून सलतो कधी कधी

अप्रतीम !!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

झेल्या's picture

10 Mar 2009 - 11:39 am | झेल्या

एकदम सुंदर गझल....
खूप आवडली.

अवांतरः रंग मेंदीचा ऐवजी रंग मंदीचा असं वाचून आत आलो होतो. स्वगतः लक्ष देऊन वाचायला हवं. :)

-झेल्या

थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.

सँडी's picture

10 Mar 2009 - 8:13 am | सँडी

माझं जरा अवघडच आहे, चुकुन "रंग मंदीचा" वाचलं...

कविता अप्रतिम आहे...
- सँडी

सुमीत भातखंडे's picture

10 Mar 2009 - 11:57 am | सुमीत भातखंडे

सुरेख कविता.
आवडली.

क्रान्ति's picture

10 Mar 2009 - 4:50 pm | क्रान्ति

सगळ्या मित्र कंपनीला धन्यवाद! असेच प्रोत्साहन मिळत राहो एवढीच इच्छा!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

प्रमोद देव's picture

11 Mar 2009 - 8:43 pm | प्रमोद देव

Get this widget | Track details | eSnips Social DNA

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

चतुरंग's picture

11 Mar 2009 - 8:52 pm | चतुरंग

तुम्ही कोणत्याही साथीशिवाय हे गाणं छानच म्हटलं आहेत!
अभिनंदन आणि आम्हाला ऐकण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद!!:)

चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Mar 2009 - 8:57 pm | बिपिन कार्यकर्ते

सुरेख!!! आवडली.

बिपिन कार्यकर्ते

शितल's picture

11 Mar 2009 - 9:38 pm | शितल

:)

क्रान्ति's picture

11 Mar 2009 - 10:25 pm | क्रान्ति

माझ्या लिहिण्याच सार्थक झाल प्रमोदकाका तुमच्या चालीमुळे आणि गाण्यामुळे. माझ्या इकडच्या सगळ्या कंपनीला पण ही चाल खूप आवडली. धन्यवाद!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

लिखाळ's picture

11 Mar 2009 - 10:29 pm | लिखाळ

कविता आणि प्रमोदकाकांनी लावलेली चाल दोन्ही आवडले. :)
-- लिखाळ.

चतुरंग's picture

11 Mar 2009 - 10:35 pm | चतुरंग

चतुरंग

प्राजु's picture

11 Mar 2009 - 11:03 pm | प्राजु

+२
आवडली चाल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रमोद देव's picture

11 Mar 2009 - 10:41 pm | प्रमोद देव

'चाल आवडली' असा अभिप्राय देणार्‍या सर्वांचे मन:पूर्वक आभार!
(अरे कुणी तरी 'आवडली नाही' असे म्हणा बरं! म्हणजे अजून सुधारणा तरी होईल)

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

स्वाती राजेश's picture

11 Mar 2009 - 11:39 pm | स्वाती राजेश

गाणे खुपच छान आहे...
तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला
माझ्या मनी प्रीत तुझी घेते हिंदोळा.... या अनुराधा पौडवाल ने म्हटलेल्या गाण्याची आठवण येते.
प्रमोदकाकांनी.....
गाण्याला चाल सुद्धा उत्तम लावली आहे...