पाऊस !

मनमेघ's picture
मनमेघ in जे न देखे रवी...
21 Jul 2018 - 9:29 pm

भिजून भिजून, गात्री-
झेलून झेलून पाणी
झाडाशी बसून, गोड-
सुरात गातोय कोणी.

कातर कातरवेळी
लकेर लकेर ओठी
पालवी पालवी जशी
पानाच्या फुलते देठी.

सळसळ सळसळ पानी
चाहूल, जिवाला भूल
मोकळ्या मोकळ्या वाटा
वाटांत ओलेते सल...

गारवा, गारवा रात्री
हवेत वेगळा नाद...
दुरून, दुरून आली
कुणाची? कुणाची साद?

... झाडाशी झाडाशी खोल,
थरथर थरथर देही
डोळ्यांत, डोळ्यांत दोन
पाऊस झाला प्रवाही !

~ मनमेघ

कविताभिजून भिजून गात्री

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jul 2018 - 12:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडलीय कविता. लिहित राहा.

-दिलीप बिरुटे

Secret Stranger's picture

23 Jul 2018 - 6:53 pm | Secret Stranger

मस्त वाटली कविता..

राघव's picture

23 Jul 2018 - 6:58 pm | राघव

छान!

श्वेता२४'s picture

24 Jul 2018 - 10:53 am | श्वेता२४

भावली. आवडली

मनमेघ's picture

24 Jul 2018 - 4:53 pm | मनमेघ

प्रतिसादांबद्दल सर्वांचा आभारी आहे _/\_

खिलजि's picture

24 Jul 2018 - 8:03 pm | खिलजि

मस्त लिहिले आहे ..