मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

जत्रा

अविनाश ओगले ·

प्राजु 04/08/2008 - 22:32
आता पुढील वर्षी पुन्हा नवीन गर्दी असले धडे कधी ना स्मरतात येथ जत्रा. अगदी खरे आहे... जत्रेला समोर उभे केलेत आणि त्याचे स्तोम माजवणालाही... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

धनंजय 04/08/2008 - 22:40
एकत्र यावे, मौज करावी, गर्दीतही फार आनंद असतो... जत्रेत गर्दीची चेंगराचेंगरी होऊ नये अशी सोय केली नाही, याबद्दल मलाही वाईट वाटते. पण मनुष्याने घाईगर्दीत रमूच नये, तशा रेलचेल जत्रांचे आयोजनच केले जाऊ नये, असे माझ्या मनाला मानवतही नाही. तरी या क्षणी वाटणारा विषाद सांगणारी तुमची गझल आवडली.

चतुरंग 04/08/2008 - 23:45
तात्कालिक अपघाती प्रसंगाबद्दल वाचून मनात आलेले विषण्ण भाव व्यक्त करणारी समर्थ गजल! (स्वगत - पुरेशी स्वयंशिस्त आणि सामाजिक जाणीव येईपर्यंत किती निष्पाप हकनाक बळी जाणार कोण जाणे?) चतुरंग

नारदाचार्य 05/08/2008 - 15:43
सुरेख (हा शब्द वापरताना आम्ही थोडे विचारातच पडलो आहोत. पण हे विशेषण रचनेला असल्याने तसेच ठेवले) रचना आहे. नेमके भाव व्यक्त झाले. आणि योग्य वेळीही आले. मागं एकदा आम्ही म्हटलं होतं तसं, संपादकीयापेक्षा सकस टिप्पणी.

अविनाश ओगले 05/08/2008 - 20:29
काही वर्षापूर्वी सातार्‍याजवळ मांढरादेवीच्या जत्रेत अशीच दुर्घटना घडली होती. तेव्हा ही गजल लिहिली होती. हा निराशावाद नाही. पण काही वेळेला हताश व्हायला होते. मजेसाठी, भक्तिने देवाच्या दारात जाणार्‍यांवर ही पाळी यावी याचे दु:ख झाले. कारणे काहीही असोत; पण या घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी सर्वानी घ्यायला हवी. आता पुढील वर्षी पुन्हा नवीन गर्दी असले धडे कधी ना स्मरतात येथ जत्रा. या ओळी पुन्हा नैनादेवी यात्रेच्या निमित्ताने खर्‍या झाल्या याचे वाईट वाटले.

ऋषिकेश 05/08/2008 - 21:14
गझल परिणामकारकपणे पोचली.. नेमके शेर! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

जत्रा निर्जीव देवतांच्या करतात येथ जत्रा जातात जीव तरीही भरतात येथ जत्रा ओझे परंपरांचे ठरतेय जीवघेणे वेठीस बापुड्यांना धरतात येथ जत्रा तो देव का दयाळू होई असा कठोर? प्रश्नांसमोर असल्या हरतात येथ जत्रा झाले ठिकाण जत्रा, चिंता आणि भयाचे चिरडून सर्व श्रद्धा सरतात येथ जत्रा आता पुढील वर्षी पुन्हा नवीन गर्दी असले धडे कधी ना स्मरतात येथ जत्रा. -अविनाश ओगले

(एक कवी संपून गेला ..)

चतुरंग ·

मानव 04/08/2008 - 21:22
राजन खान यानची एक लेखक सन्पुन गेला ही कथा वाच ! फार छान आहे काहि चुकल्यास माफि असावि !

छ्या!!! जाऊदे! जमतं नाही आज! म्हणताच विरस झाला... अजून एक कवी संपून गेला.. अरेरे! :)

सर्किट 05/08/2008 - 04:57
एकाच वेळी!! क्या बात है!!! भावनेचा आविष्कार अजून एक काव्य इतिहासाची पाने चाळल्यास भावनेच्या आविष्कारामुळे रंगाशेठ का जिभल्या चाटतात, हे सहज लक्षात येते. - (स्मरणशील) सर्किट

शितल 05/08/2008 - 08:35
विडंबन मस्त आहे. छ्या!!! जाऊदे! जमतं नाही आज! म्हणताच विरस झाला... अजून एक कवी संपून गेला..

स्वातीताईंची 'एक क्षण निसटू गेला..' ही कविता वाचून आमच्या मनातला विचारांचा कल्लोळ थांबेना!

(एक पेग संपून गेला..)

केसुरंगा ·

केशवसुमार 04/08/2008 - 20:31
केसुरंगाशेठ, वा वा क्या बात है.. चिअर्स!!! अजून एक विडंबन पाडून गेला.... (निवॄत्त)केशवसुमार

विसोबा खेचर 05/08/2008 - 00:53
हम्म! चालू द्या, छान चालली आहे विडंबने! :) च्यामारी, आता हा केसूरंगा आणखी कोण आलाय बरं नवीन? केसू आणि रंगाने काय कमी हैराण केले होते म्हणून ही नवी भर की काय?! :)

सर्किट 05/08/2008 - 05:01
सोड्यासाठी वापरलेले "पिंटभर" हे विशेषण खूप आवडले. - सर्किट

नारदाचार्य 05/08/2008 - 15:50
असे विडंबन आहे हे. पण तोचतोचपणा जाणवतोच सारखे दारू, ग्लास, सोडा, बाटली आले की (या गोष्टी कशा, प्रत्यक्षातच ठीक असतात. कल्पनेत नाही). अर्थात, प्रयत्न चांगला आहे.

In reply to by नारदाचार्य

अरुण मनोहर 06/08/2008 - 10:42
>>>(या गोष्टी कशा, प्रत्यक्षातच ठीक असतात. कल्पनेत नाही). अर्थात, प्रयत्न चांगला आहे. च्यामारी. लोक म्हनतेत दारू सोडा. आता सोडली तर खयालोंमधे प्यायला पन ह्या कळीच्या नार्दाची बंदी. जगायच कस मानसानं? (हलक्यान प्या) :O)

स्वाती फडणीस यांचा 'एक क्षण निसटू गेला..' वाचून एक निसटलेला क्षण आम्हालाही आठवला! ;) हिरव्यागार बाटलीच्या तोंडाशी.. थांबून राहिलेला थेंब, पांढर्‍या शुभ्र बर्फावर.. ओतलेल्या पिंटभर सोड्यात, टप्पकन पडला... एक लाट उंच उसळली.. ग्लासात आणि मनात! एकाच वेळी!! चिअर्स!!! डोके हलके करणारी अजून एक मैफल लगोलग आत गेलो.. वाट बघत बसलेले काजू गोंजारले.. हळूच शर्टची बटणे मोकळी केली.. आणि गेलो.. तोंड ओले करण्यापुरतं पेग आणायला.. तो पेग तो क्षण!!! येव्हड्यात पिऊन झाला.. छ्या!!! जाऊदे! मूड आहे आज! म्हणताच ग्लास मोकळा झाला... अजून एक पेग संपून गेला.. केसुरंगा

((नेहेमीच...तुझ्यामुळे))

चतुरंग ·

आनंदयात्री 04/08/2008 - 19:45
वृत्तात 'भांग' अर्थास 'टांग' नेहमीच ... तुझ्यामुळे सगळे कसे (फसले असे!) नेहमीच ... तुझ्यामुळे रंगा भाय मानले बॉ तुम्हाला .. अगदी अगदीच जमले विडंबन :) - (शिकाउ उमेदवार) आंद्याटुकार

केशवसुमार 04/08/2008 - 19:57
रंगाशेठ, एकदम पहिल्या धारेचे विडंबन..चालूदे.. वाचून झीट विडंबन धीट हा हा हा.. (निवृत्त)केशवसुमार..

In reply to by बेसनलाडू

सर्किट 05/08/2008 - 05:00
आधी वाचताना "कमरेत खूर" हे कळलेच नव्हते. आता पुन्हा वाचताना ती दुगाणी नीट बसली, आणि कळवळलो. वा रंगाशेठ ! - सर्किट

'नेहेमीच ... तुझ्यामुळे' ही बेसनलाडवाची कैफियत वाचून अगदी भरुन आले, ऊर्मी बराचवेळ दाबून ठेवली पण मळमळ थांबेना तेव्हा शेवटी इथे आलोच! आदतसे मजबूर दुसरे काय?! ;) वृत्तात 'भांग' अर्थास 'टांग' नेहमीच ... तुझ्यामुळे कवितेत घोळ घालावी खोळ नेहमीच ... तुझ्यामुळे कमरेत खूर डोळ्यात पूर नेहमीच ... तुझ्यामुळे सगळे कसे (फसले असे!) नेहमीच ... तुझ्यामुळे शब्दांची लाच शब्दांना लाच नेहमीच ... तुझ्यामुळे पहिलाच 'बार' पहिलीच 'धार' नेहमीच ... तुझ्यामुळे वाचून झीट विडंबन धीट नेहमीच ... तुझ्यामुळे कवितेची भेट 'चतुरंग' थेट नेहमीच ... तुझ्यामुळे चतुरंग

आला आला हा श्रावण...

अथांग सागर ·
आला आला हा श्रावण... आला आला हा श्रावण घन निळा घेऊन आले आकाश दाटुन आठवणीत त्या जुन्या माझे हरवले मन ऐकुनी मेघांचा कहर वारा झाला सैरभैर पडता श्रवणी मल्हार जणू नाचे मनी माझ्या ते वनातील मोर थांबता पावसाची संतत ओढा वाही खळाळत आम्हा जणू बोलावत या रे पोरांनो खेळाया ती होड्यांची शर्यत बघुनी धरा ती ओजस इंद्रधनुही क्षितीजास वाटे रुप ते लोभस पिऊनी धारा श्रावणाच्या तृप्त झाली ही तुळस

एक क्षण निसटू गेला..

स्वाती फडणीस ·

धनंजय 04/08/2008 - 22:22
संवेदनाशील मनावर पडणारे ठसे हाहा म्हणता नाहिसे होतात. मनात लाट उत्पन्न करणारे थोडेसे पाणीच, आणि ते चित्र पुसायला पुरणारा विलंब करणारे थोडेसे पाणीच, हा विरोधाभास विशेष आवडला. छिद्रान्वेष : "स्पार्टेक्स" शब्दाचा वापर खटकला. पण मला त्या कंपनीच्या उत्पादनांशी चांगली ओळख नसेल म्हणून असेल.

बेसनलाडू 04/08/2008 - 22:25
कविता आवडली.चित्रदर्शी वाटली;थेंब टपकन् पडल्याचा प्रसंग डोळ्यांपुढे तरळून गेल,क्लिक झाला :) (चित्रकार)बेसनलाडू

सर्किट 05/08/2008 - 04:56
तो थेंब तो क्षण!!! तेव्हड्यात वाहून गेला.. छ्या!!! जाऊदे! मूड नाही आज! म्हणताच कागद कोरा राहिला... एक क्षण निसटू गेला.. मूड नाही आज, ही स्वतःची घातलेली समजूत आहे का ? निसटू ऐवजी निसटून हवे का ? कविता आवडली. - सर्किट

सहज 05/08/2008 - 12:54
स्वाती ताई बरेच दिवसांनी लिहलेली कविता आवडली. शिवाय ३ विडंबनांना प्रेरणादायक क्या बात है! :-)

एक क्षण निसटू गेला.. . हिरव्यागार पानाच्या टोकाशी.. थांबून राहिलेला थेंब, पांढर्‍या शुभ्र स्पार्टेक्सवर.. साचलेल्या पसाभर पाण्यात, टप्पकन पडला... एक लाट उंच उसळली.. पाण्यात आणि मनात! एकाच वेळी!! क्लिक!!! अल्बम मध्ये लावण्याजोगी, अजून एक आठवण.. लगोलग आत गेले.. वाट बघत बसलेले रंग गोंजारले.. हळूच कुंचले मोकळे केले.. आणि गेले.. रंग ओले करण्यापुरतं पाणी आणायला.. तो थेंब तो क्षण!!! तेव्हड्यात वाहून गेला.. छ्या!!! जाऊदे! मूड नाही आज! म्हणताच कागद कोरा राहिला... एक क्षण निसटू गेला.. ====================== स्वाती फडणीस.............. २९-०७-२००८

नेहमीच ... तुझ्यामुळे

बेसनलाडू ·

चतुरंग 04/08/2008 - 16:52
एकदम शेलाट्या बांध्याची, डौलदार कविता! :) (स्वगत - रंगा, असं काही नवीन वाचलं रे वाचलं की किती त्रास होतो ना 'ऊर्मी' दाबून टाकायला? ;) ) चतुरंग

II राजे II 04/08/2008 - 18:19
मस्त !! ओठांत धूर डोळ्यांत पूर नेहमीच ... तुझ्यामुळे ओले घसे (होते हसे!) नेहमीच ... तुझ्यामुळे बेला कविता देखील करता हे माहीत नव्हतं !! * पुढील बोध कथा कधी ? राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

मनस्वी 04/08/2008 - 18:32
वेगळा प्रकार आवडला. सारेच तुकडे सुंदर! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

धनंजय 04/08/2008 - 22:33
जोरकस ठेच देणारा ठेका आणि अस्वस्थ करणारी रूपके (पांजरपोळ!) दमदार आहेत. शंका : "ओले घसे" म्हणजे घशांत मादक द्रव टाकल्यामुळे ते ओले झाले आहेत काय? अनेक म्हणजे खरेच अनेक घसे आहेत का? दारूमुळे तोल घेला म्हणून कंसात (हसे) होते आहे काय? असे असल्यास हे कवितेच्या अंतर्गत तिचेच (कंसातले) विडंबन माझ्या दृष्टीने रसभंग करते. "तू"च्यामुळे दारू प्यावी लागली, हा भाव मात्र कवितेशी सुसंगत वाटतो आहे...

In reply to by धनंजय

बेसनलाडू 04/08/2008 - 22:56
शंका : "ओले घसे" म्हणजे घशांत मादक द्रव टाकल्यामुळे ते ओले झाले आहेत काय? अनेक म्हणजे खरेच अनेक घसे आहेत का? दारूमुळे तोल घेला म्हणून कंसात (हसे) होते आहे काय? असे असल्यास हे कवितेच्या अंतर्गत तिचेच (कंसातले) विडंबन माझ्या दृष्टीने रसभंग करते. "तू"च्यामुळे दारू प्यावी लागली, हा भाव मात्र कवितेशी सुसंगत वाटतो आहे... घसेही अनेक आहेत,आणि ते ओले होण्याचे कारणही मद्यप्राशन हेच आहे. पण मूळ कारण मात्र 'तू' (तुझ्यामुळे प्यावे लागणे,हे जे तुम्ही म्हटलंय ते) जे कवितेशी सुसंगत वाटते. आता या अनेक घशांच्या ओले होण्याचे प्रत्यक्ष कारण 'तू' असेल (तुझ्यावर स्वतःला कुर्बान करणारे मल्टिपल् घसे) किंवा अप्रत्यक्ष कारण (तुझ्यामुळे कामातून गेलेला मी आणि स्वतःबरोबरच अनेक घसे बाजूला जमवून ते ओले करणे - माझ्यामार्फत/माझ्या 'थ्रू') 'तू' असेल. ती संदिग्धता ठेवायचे स्वातंत्र्य लिहिताना घेतले. तोल जाण्याने हसे होणे, हेही बरोबर पण हा गेलेला तोल तारतम्याचा,संयमाचा,विवेकबुद्धीचा आहे;मद्यप्राशनाने अक्षरशः जाणारा/सुटणारा (शारीरिक) तोल नाही. थोडक्यात 'तुझ्यामुळे' माझ्याकडून जे सहसा अपेक्षित नाही,तेही घडले आणि तेच (माझे) हसे होण्याचे (लाज जाण्याचे) कारण ठरले,असे काहीसे. विडंबन का नि कसे वाटले,हे मात्र नीटसे समजले नाही. (सविस्तर)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

धनंजय 04/08/2008 - 23:55
कविता आवडली हे पुन्हा सांगणे नलगे. "घसे" सोडले तर पूर्ण कविता "तू"मुळे "मी"मध्ये झालेल्या परिणामांबद्दल आत्मचिंतन (इन्ट्रोस्पेक्शन) आहे. त्या एकाच ठिकाणी "मी आणि माझ्यासारखे अनेक" यांचा उल्लेख आहे. या स्व-परीक्षक "मी"ने एका ओळीसाठी अन्यांचा उल्लेख करावा, यात स्व-परीक्षण-रसाचा भंग होतो आहे (माझ्यापुरता :-) ) "हसे" शब्दाला यमक जुळवण्यासाठी या बाकी आशिकांचे अनेक घसे शब्दबद्ध केलेत का? ;-) विडंबन-भाव हा पूर्णपणे (कंसांमुळे) झाला आहे. कविता पूर्णपणे रोखठोक आहे. पांजरपोळ वाटला तर थेट "पांजरपोळ वाटला" असे सांगते. "माझे हसे होत आहे" असे थेट म्हटले असते तर तोच थेट स्वपरीक्षणात्मक भाव राहिला असता. कंसातल्या गोष्टी थेट नसतात. गौण असतात, कधी स्पष्टीकरणात्मक असतात (म्हणजे तुम्हाला अर्थाचे स्पष्टीकरण गरजेचे नसले तर कंसातले वाक्य नाही वाचले तरी चालते). "(हसे)" कंसात टाकून कवी ही बाब गौण करत आहे. जणू काही स्वतःची चेष्टा करत हसे झाल्याचे सांगतो आहे. त्यामुळे (माझ्यासाठी तरी) स्व-परीक्षणाचा थेटपणा हरवतो आहे. वृत्त सांभाळून उरलेल्या कवितेतल्या थेटपणाला "पंक्चर" केले जात आहे, वेगळाच कुठलातरी विनोदी भाव सांगितला जात आहे, म्हणून त्या "(हसे)" ओळीला मी विडंबन म्हटले आहे.

In reply to by धनंजय

बेसनलाडू 05/08/2008 - 00:28
सर्वप्रथम, विडंबन का म्हटले याबाबतचा तुमचा मुद्दा नीट कळला. तो समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद. हसे होणे कंसात टाकावे की नाही,याबद्दल बराच विचार केला होता.स्वतःचेच हसे होणे ही आत्मपरीक्षणपर कबुली जाहीर न देता स्वतःलाच त्याची जाणीव करून देणे अधिक श्रेयस्कर वाटल्याने ते कंसात टाकले.मेंदूतला पांजरपोळ कबूल करण्यात काही गैर वाटले/वाटत नाही,पण स्वतःचे हसे झाले/होते हे मान्य करताना अंमळ संकोच वाटलाच/वाटतोच.त्यामुळे ती कबुली स्वतः स्वतःपाशी/मनाशी (कंसातून) दिली.मात्र यामुळे स्वपरीक्षणभावात झालेला बदल हा तुमचा मुद्दा किंवा 'थेटपणा' 'पंक्चर' झाल्याचा मुद्दा पूर्ण मान्य आहेच. पण कंस हे सामान्यपणे असतात तसे गौणत्त्वदर्शक नसून वर स्पष्ट केल्याप्रमाणे स्वगतदर्शक आहेत/असतात,हे लक्षात घेतले आणि ते पटले तर रसभंग न होता एकूण कल्पना 'अपील'च होईल असे वाटले/वाटते. अनेक आशिक हे कवितेतील एकव्यक्तीभावाशी विसंगत हे कबूल;पण तुझ्यामुळे घसा ओला करणारा मी एकटाच असेन,हे देखील पूर्ण पटत नाही ;) नेहमीच तुझ्यामुळे माझा घसा ओला करण्याची/होण्याची कारणे इतरांपेक्षा वेगळी असतील,आणि माझे हसे झाले हे बोचले/बोचते.इतरांचे काय होते याची पर्वा नाही. घसे-हसे जोडीतील यमकभाव थेट असल्याने र ला ट जुळवायचा प्रकार वाटल्यास नवल नाही.पण त्या पर्टिक्युलर ओळीत अनेकांना गोवण्याचे मूळ कारणही 'तू'च :) (सविस्तर)बेसनलाडू धनंजय,तुमच्याशी झालेला हा संवाद एक वेगळाच आनंद देऊन गेला,हे प्रामाणिकपणे सांगावेसे वाटते.अशीच साधकबाधक चर्चा येथे झडत राहिली तर कवितेच्या 'कविता' या स्वरूपामागील आणि तिच्याशी निगडीत इतर अनेक अंगांवरही प्रकाश पडेल,हा आशावाद अधिक प्रबळ होतो आहे. धन्यवाद. (आभारी)बेसनलाडू

In reply to by धनंजय

सर्किट 05/08/2008 - 04:53
जोरकस ठेच देणारा ठेका आणि अस्वस्थ करणारी रूपके (पांजरपोळ!) दमदार आहेत. हेच म्हणतो. पांजरपोळ हा शब्द खरेच हलवून गेला. वा, बेला, वा ! - सर्किट

बबलु 07/08/2008 - 00:44
जगायचा वीट जगतोय धीट नेहमीच ... तुझ्यामुळे जबराट !!! ओठांत धूर डोळ्यांत पूर नेहमीच ... तुझ्यामुळे खूपच जबराट !!!!!! मनापासून आवडली. ...बबलु-अमेरिकन

तिन्ही त्रिकाळ संध्याकाळ नेहमीच ... तुझ्यामुळे मेंदूतले घोळ पांजरपोळ नेहमीच ... तुझ्यामुळे ओठांत धूर डोळ्यांत पूर नेहमीच ... तुझ्यामुळे ओले घसे (होते हसे!) नेहमीच ... तुझ्यामुळे शब्दांचा जाच शब्दांना जाच नेहमीच ... तुझ्यामुळे ओळींना धार ओळींचे वार नेहमीच ... तुझ्यामुळे जगायचा वीट जगतोय धीट नेहमीच ... तुझ्यामुळे मरणाशी भेट कविताच थेट नेहमीच ... तुझ्यामुळे

(नूर)

चतुरंग ·

रेवती 04/08/2008 - 04:55
विडंबन चांगले झाले आहे, पण दारु व बार या शब्दांचा आता कंटाळा आला आहे. गटारिच्या निमित्तानेही हे शब्द बरेचदा वापरले गेले आहेत. वेगळ्या विडंबनच्या प्रतिक्षेत आहे. रेवती

प्राजु 04/08/2008 - 07:57
'तो भाग' शेकला पण ना बोललो कुणाला घालून शेपटी मी काढून धूर आलो हे वाचून खूप हसले.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

फटू 04/08/2008 - 10:25
'तो भाग' शेकला पण ना बोललो कुणाला घालून शेपटी मी काढून धूर आलो या ओळी तर एकदम जबराट... :P पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

बेसनलाडू 04/08/2008 - 11:00
'तो भाग' शेकला पण ना बोललो कुणाला घालून शेपटी मी काढून धूर आलो हाहाहाहाहाहाहा!!!!! रंगाशेठ,विडंबनाचा विषय 'तो'च असला,तरी आहे मात्र जबराट! (वाचक)बेसनलाडू

मदनबाण 04/08/2008 - 11:12
'तो भाग' शेकला पण ना बोललो कुणाला घालून शेपटी मी काढून धूर आलो जबराट.... मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

विसोबा खेचर 04/08/2008 - 15:24
'तो भाग' शेकला पण ना बोललो कुणाला घालून शेपटी मी काढून धूर आलो हे बाकी सह्ही लिहिलं आहेस रे रंगा! :)

कुमार जावडेकरांची 'नूर' गजल पाहून कोणे एके काळी आमचा बदललेला 'नूर' पुन्हा एकदा आमच्या आठवणीत आला! दारावरुन गेली, पाहून हूर आलो आता इथेच होती, शोधीत दूर आलो! जाऊन बारमध्ये ना घेतली कशी मी (पाहून तेथला मी आनंद-पूर आलो) ही फौज बेवड्यांची, पाहू कशास आता भेटीस 'पेजथ्रीं'च्या येथे चतूर आलो... 'तो भाग' शेकला पण ना बोललो कुणाला घालून शेपटी मी काढून धूर आलो थोडाच वेळ होतो, मी थांबलो तिथे, पण- भलताच मैफिलीचा पाहून 'नूर' आलो चतुरंग

बंधने

स्नेहश्री ·
झुगारुन टाकावीशी वाटत आहेत ही बंधने काहीतरी शोधत आहेत माझ्या मनाची स्फंदने काहीतरी बोजड घेऊन चालते आहे उगीच कोणाच्यात तरी मन गुंतवत आहे तुझ ते scapbook मला अस्वस्थ करतय आणि एकीकडे मात्र माझ मन तुझ्यासाठी झुरतय गुंतत आहे फक्त तुझ्यासाठीच पण मनात येत आहे,काय करायच त्या "scap"च माझच मला कळत नाही की नक्की आता काय करायच तुझ्या बरोबर आयुष्य काढायच का तुला विसरुन जायचा...???

खरचं तु हवी होतीस ..

पंचम ·

II राजे II 03/08/2008 - 18:58
वा ! काव्य नेहमी अनुभवातून व्यक्त होतं असे वाचून आहे.... विखुरलेले शब्द सारे, त्यांना पाश देण्या तु हवी होतीस .. अर्थ हरविलेल्या शब्दांचे काही आभास देण्या तु हवी होतीस .. उत्तम ! शब्दांनी पंख केव्हाच पसरले होते, त्या विस्फारल्या स्वप्नांना आकाश देण्या तु हवी होतीस .. मनातील बोलं ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

प्राजु 03/08/2008 - 19:17
शब्दांनी पंख केव्हाच पसरले होते, त्या विस्फारल्या स्वप्नांना आकाश देण्या तु हवी होतीस .. खूप छान. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर 04/08/2008 - 15:24
किती लाटा किना-यांवरुन, परत फिरुन उदास गेल्या.... त्या लाटांना पावलाचा, स्पर्श देण्या तु हवी होतीस .. वा! क्या केहेने...!

मनीषा 04/08/2008 - 18:12
.... कविता शब्दांनी पंख केव्हाच पसरले होते, त्या विस्फारल्या स्वप्नांना आकाश देण्या तु हवी होतीस .. खुप छान

वाळुतल्या त्या शिंपल्यांना नवे साज देण्या तु हवी होतीस .. वाळुतल्या पावलांना घुंगरांचा आवाज देण्या तु हवी होतीस .. किती लाटा किना-यांवरुन, परत फिरुन उदास गेल्या.... त्या लाटांना पावलाचा, स्पर्श देण्या तु हवी होतीस .. प्रकाशाने आस सोडली, तु परत येण्याची, अंधारल्या त्या किना-याला कवडसा देण्या तु हवी होतीस .. विखुरलेले शब्द सारे, त्यांना पाश देण्या तु हवी होतीस .. अर्थ हरविलेल्या शब्दांचे काही आभास देण्या तु