Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by स्वीट टॉकर on Fri, 07/08/2016 - 17:00
लेखनविषय (Tags)
कथा
kathaa
प्रवास
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
अनुभव
विरंगुळा
साधारण पंचाऐंशी सालच्या आसपासची गोष्ट. सुट्टी संपवून मी बोटीवर निघालो होतो. बोट हॉन्गकॉन्गला होती. मुंबई विमानतळावर मी चेक-इन करताना माझ्या सामानाचं स्कॅनिंग झाल्यावर मला बाजूला बोलावून घेण्यात आलं. मला हे असं बोलावणं अजिबात नवीन नव्हतं. माझ्या पाठीला ऐंशी साली दुखापत झाली होती तेव्हांपासून मी रोज काही विशिष्ट व्यायाम करायचो ज्याच्यासाठी दोन्ही घोट्यांभोवती वजनाच्या पिशव्या व्हेल्क्रोच्या पट्ट्यांनी लावायचो. या पिशव्यांमध्ये पोलादाच्या अगदी छोट्या छोट्या शेकडो चकत्या होत्या. दोन तीन मि.मि. व्यासाच्या. या चकत्यांचं सिक्यूरिटीला नेहमीच कुतूहल असायचं. सिक्यूरिटीवाला सहा फूट उंच आणि सहा फूट रुंद जाट होता. मी त्याच्या तुलनेत अर्धा. मी त्या "स्पेशल व्यायामाच्या आहेत" असं सांगितल्यावर तो हसला. ‘उपहासानी’ असं मला तेव्हां वाटलं. पण बहुदा तसं काही नसणार. असो. “हमे करके दिखाओगे?” असं मला विचारल्यावर मी मानेनीच “नाही” असं दर्शवलं. वजनं दाखवायला बॅग उघडली होती तेव्हां त्यानी माझा युनिफॉर्म आणि हुद्द्याच्या ऍप्लेट्स बघितल्याच होत्या. बहुदा त्यामुळेच जास्त वाद न घालता त्यानी मला सोडलं. सहप्रवाशांप्रमाणेच डिपार्चर गेटच्या जवळपासच्या खुर्चीवर स्थानापन्न झालो. थोड्या वेळानी माझ्या नावाची घोषणा झाली. “कृपया एअरलाईन स्टाफला भेटावे.” गेटपाशीच एक सुंदरी चार्ट न्याहाळत होती. जाऊन तिला भेटलो. तिनी मला तिथेच ताटकळंत ठेवलं. मोबाइल फोन्स च्या आधीचा हा काळ. तेव्हां फक्त डुलकी लागलेल्यांच्याच माना खाली असायच्या. बाकी जवळ जवळ प्रत्येक जण नजरेनी चांभारचौकशा करायला मोकळा असायचा. एक सिक्यूरिटीचा मनुष्य आला आणि मला घेऊन गेला. डोळ्यांच्या दोनशे जोड्यांनी आम्हाला जिन्यापर्यंत पोहोचवलं. "मला का बोलावलं आहे?" असं त्याला विचारावं असा मध्यमवर्गीय विचार डोक्यात आला पण प्रयत्नानी जीभ आवरली. बहुदा त्या सहा बाय सहा शिपायानी काहीतरी काडी केली असणार. त्याचा बॉस म्हणजे एक बाई अधिकारी होत्या. त्यांच्या ऑफिसच्या दारात माझी बॅग होती. प्रश्नोत्तरं झाली. ती वजनं पायाला बांधून काय व्यायाम केले जातात ते मी त्यांना दाखवलं. त्यांनी मला ती वजनं जमिनीवर ठेवून त्यांच्यावर उभं राहायला सांगितलं. मी ते करून दाखवलं. त्यांचं समाधान झाल्यावर आता त्याची एन्ट्री एका अधिकृत रजिस्टरमध्ये करणं जरूर होतं. त्यात “या वस्तूचं नाव काय लिहू?” असं त्यांनी मलाच विचारल्यावर मी म्हटलं, “Weight for Exercise” असं लिहा. “एस्गरसाइज?” असं त्यांनी विचारल्यामुळे माझ्या मनात आलं की बहुदा ‘Exercise’ च्या स्पेलिंगचा त्या राडा करणार. म्हणून मी ‘फिटनेस’ हा शब्द सुचवला. तो त्यांना पसंत पडला आणि माझी सुटका झाली. परत गेटपाशी आलो. तासाभरानी बोर्डिंगची वेळ आली पण बोर्डिंग काही होईना. पण या उशीराचा आपल्याशी काही संबंध आहे असं मला वाटायचं काहीच कारण नव्हतं. पण संबंध होता. मला पुन्हा बोलावणं आलं. आता मी कोण हे माहीत असल्यामुळे घोषणा देण्याची जरूर नव्हती. सुंदरी जातीने माझ्याकडे आली आणि मला घेऊन एरोड्रोम मॅनेजरच्या ऑफिसकडे निघाली. आता मात्र सगळे दोनशेच्या दोनशे डोळेजोड माझ्यावर आळ घेत होते. कनेक्टिंग फ्लाइट जर का चुकली तर कोण जबाबदार हे त्यांना ठाऊक झालं होतं. पुन्हा कोपर्‍यापर्यंत डोळ्यांची सोबत होती. एकदाचं दृष्टीआड झाल्यावर मला बरं वाटलं. एरोड्रोम मॅनेजरच्या ऑफिसबाहेर पुन्हा माझी बॅग हजर असणार असा माझा कयास. पण नव्हती. जरा हायसं वाटून मी आत शिरलो. एअरलाइनचा अधिकारी आणि एरोड्रोम मॅनेजर वाद घालत होते. “मैं नही छोड सकता सर जी!” एरोड्रोम मॅनेजर. “बॅगके फिटनेसकी बात कर रही है मॅडम। हवाइ जहाजके नही। पॅसेंजर और लगेजको डीप्लेन कर देते हैं। फिर छोड दो फ्लाइटको।” एअरलाइनचा अधिकारी. मी चरकलो. मला आणि माझ्या सामानाला डीप्लेन करण्याबद्दल चाललंय की काय? “मगर मेरी जिम्मेदारी है।” एरोड्रोम मॅनेजर. “जब कुछ रोकनेका होता है तभी जिम्मेदारी होती है आपकी। कुछ करनेका होता है तो जिम्मेदारी नही लेते।” प्रत्येक मतभेदाप्रमाणे याला देखील इतिहास असणार. “लो. ये साहब आ गये।” एअरलाइनचा अधिकारी. हे शेवटचं वाक्य माझ्याकडे बघून. “इनका क्या है? इनकी बॅग तो क्लियर है। फिटनेस सर्टिफिकेट दिखाओ और ले जाओ अपना हवाई जहाज.” एरोड्रोम मॅनेजर. मला त्यांच्या बोलण्यात कसलाच संदर्भ लागत नव्हता. माझी बॅग क्लियर आहे असं जरी तो म्हणाला असला तरीपण जे काय चाललं आहे ते आपल्यासाठी चांगलं नाही याची खात्री होती. मात्र ‘फिटनेस’ हा शब्द ऐकल्यावर माझ्या डोक्यात थोडा प्रकाश पडू लागला. प्रत्येक बोटीला तसंच विमानाला सुद्धा पुनःपुन्हा चाचण्यातनं जायला लागतं. बोट seaworthy आहे ना आणि विमान airworthy आहे ना यासाठी विविध चाचण्या असतात आणि त्या सर्टिफिकेटला Certificate of Fitness असं देखील म्हटलं जातं. विमानाच्या फिटनेसची माझ्या फिटनेसशी काहीतरी गफलत झाली असणार असं मला वाटलं. म्हणून मी त्यांना सांगितलं की मी बोटीवर नोकरी करंत असल्यामुळे मला Certificate of Fitness ची काही माहिती आहे. तर काय झालंय ते मला सांगता का? एरोड्रोम मॅनेजरने माझ्याकडे तुच्छ कटाक्ष टाकून दुर्लक्ष केलं. पण बुडत्याला काडीचा आधार. एअरलाइनच्या अधिकार्याला मिळेल ती मदत पाहिजेच होती. त्यानी मला समस्या सांगितली. “यहां की जो सिक्यूरिटी-इन-चार्ज मॅडम है उन्होने सिक्यूरिटी रजिस्टरमें रिमार्क लिखा है की "फिटनेस सर्टिफिकेट के लिये रोक लो।" अब सिक्यूरिटीके लोगोंको ‘Certificate of Fitness’ मांगने का कोई हक नही है। मगर एअरपोर्ट मॅनेजर मानते ही नही। मॅडम जब तक घर नही पहुचेंगी तब तक हम उनके साथ संपर्क भी नही कर सकते।” मी रजिस्टरमधली एन्ट्री वाचली आणि हसायलाच लागलो. त्यांना चूक समजावल्यावर एक मिनिटात प्रश्न सुटला. काय होती ती एन्ट्री? Weight for Fitness ऐवजी बाईंनी लिहिलं होतं Wait for Fitness!
  • Log in or register to post comments
  • 12691 views

प्रतिक्रिया

Submitted by गंम्बा on Fri, 07/08/2016 - 17:08

Permalink

:-)

:-)
  • Log in or register to post comments

Submitted by रुस्तम on Fri, 07/08/2016 - 17:09

Permalink

हाहाहा

लै भारी किस्सा
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 07/08/2016 - 18:50

In reply to हाहाहा by रुस्तम

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by शान्तिप्रिय on Fri, 07/08/2016 - 17:10

Permalink

मस्त साहेब!

मस्त साहेब! अगदी खुसखुषीत! इंग्रजीच्या तर्कशून्य स्पेलिंग मुळे बसलेला आणखी एक फटका!
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Sat, 07/09/2016 - 08:46

In reply to मस्त साहेब! by शान्तिप्रिय

Permalink

+१

मम म्हणतो
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Fri, 07/08/2016 - 17:10

Permalink

हा, हा! लईच भारी किस्सा!

मस्त उत्कंठावर्धक लिखाण.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय माने on Fri, 07/08/2016 - 17:19

Permalink

मस्त लिहिलंय!

मस्त लिहिलंय! शेवटपर्यंत काय होतंय याबद्दल weight करत वाचलं.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Fri, 07/08/2016 - 17:22

Permalink

भारीच किस्सा

भारीच किस्सा
  • Log in or register to post comments

Submitted by सौंदाळा on Fri, 07/08/2016 - 17:28

Permalink

कहर किस्सा.

कहर किस्सा. विमानात तुमच्या शेजारी बसलेला माणुस प्रवास संपेपर्यंत सॉलिड टरकला असेल ;)
  • Log in or register to post comments

Submitted by जयन्त बा शिम्पि on Fri, 07/08/2016 - 17:37

Permalink

साहेबाचं इंग्रजी , आमच्या

साहेबाचं इंग्रजी , आमच्या कस्ं पचनी पडायचं ? भन्नाट किस्सा ! मज्जा आली वाचून !
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Fri, 07/08/2016 - 17:56

Permalink

हे हे... :) लिहीलंय पण मस्तच.

हे हे... :) लिहीलंय पण मस्तच.
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Fri, 07/08/2016 - 18:03

Permalink

मस्त

१+
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Fri, 07/08/2016 - 18:08

Permalink

जोरदारच पंच बसला...मजा आली!!

जोरदारच पंच बसला...मजा आली!!
  • Log in or register to post comments

Submitted by राजाभाउ on Fri, 07/08/2016 - 18:20

Permalink

भारीय किस्सा.

भारीय किस्सा. बरतबर तुम्ही exercise चं fitness करायला लावल, नाहीतर एरोड्रोम मॅनेजरने त्या अधिकार्याला व्यायाम करायला लावला असता.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Fri, 07/08/2016 - 18:23

Permalink

अाईशप्पथ! सही किस्सा अाहे!

अाईशप्पथ! सही किस्सा अाहे! अगदी सुरूवातीला बाहरिनला जाताना मी येड्यासारखी केबिन बॅगमध्ये भाजणी,कोंथिबीर वडीचे उंडे,मोदक पिठी असं काय काय घेतलं होतं.त्यात मी १५ आॅगस्टला निघालेले.बॅग लाल कलरची! माझं जे काही सिक्युरिटी चेकींग झालं होतं विचारू नका.निरनिराळी मशिन आणुन आणुन पिठं चेक होत होती.प्रत्येक आॅफिसर मला खाऊन दाखवायला सांगायचा.शेवटी एक बाई आली.तिला म्हंटलं आता इथेच सर्व खाऊ का थोडं नेऊ पण.ती हसायला लागली.आप ऐसे कैसे ये सब भरके लाई.आपकोभी झंझट हमकोभी.येणारे जाणारे माझ्याकडे मी ड्रग्ज घेऊन जात असल्यासारखे लुक देऊन जात होते.मला सिक्युरिटीने एकदाचे जा सांगितले आणि स्टँप द्यायला विसरले. मला तेव्हा पत्ताच नव्हता हे चेक करायचे असते.बोर्डिंगला परत अडवले.मैडम स्टैंप नहीं है आप नही एंटर कर सकते.झालं.मी परत धावत सिक्युरिटीला.परत सगळा ड्रामा.कारण ड्युटी बदलून नवे लोक आलेले.विमान माझ्यासाठी ताटकळलेले.एअरलाइनची बया येरझाऱ्या घालतेय वाॅकीटाॅकी घेऊन.आणि मला तर मेल्याहुन मेल्यासारखे वाटत होते.शेवटी एकदाचं कोणाला तरी दया येऊन, अर्ध्या तासाने विमान लेट करुन स्टँप मिळाला.मी विमानात शिरले तर आख्खे विमान डोकावून माझ्याकडेच बघतेय.मी जे काही तोंड लपवून बसले ते डायरेक्ट विमान उतरल्यावरच उठले!
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय माने on Fri, 07/08/2016 - 18:27

In reply to अाईशप्पथ! सही किस्सा अाहे! by अजया

Permalink

असा प्रकार झाला तर!

असा प्रकार झाला तर!
  • Log in or register to post comments

Submitted by पियुशा on Sun, 07/10/2016 - 16:47

In reply to अाईशप्पथ! सही किस्सा अाहे! by अजया

Permalink

महालोल किस्सा =))))

महालोल किस्सा =))))
  • Log in or register to post comments

Submitted by माम्लेदारचा पन्खा on Fri, 07/08/2016 - 18:23

Permalink

सुंदर....

तुमची लिहिण्याची हातोटी फार उत्कंठावर्धक आहे !
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Fri, 07/08/2016 - 18:31

In reply to सुंदर.... by माम्लेदारचा पन्खा

Permalink

+१११ भारी किस्सा..!!

+१११ भारी किस्सा..!!
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Fri, 07/08/2016 - 18:40

Permalink

कहर आहे हा!

English is a very funny language हे अर्जुनसिंग वल्द दशरथसिंग वल्द भीमसिंग यांनी सांगितलेल्या महान वचनाची सत्यता पटवून देणारा किस्सा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Fri, 07/08/2016 - 19:01

Permalink

मस्त किस्सा

मस्त किस्सा
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Fri, 07/08/2016 - 19:06

Permalink

झक्कस

आवडेश
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Fri, 07/08/2016 - 19:18

Permalink

मस्त हहपुवा किस्सा!

मस्त हहपुवा किस्सा!
  • Log in or register to post comments

Submitted by कविता१९७८ on Fri, 07/08/2016 - 19:29

Permalink

मस्त किस्सा

मस्त किस्सा
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Fri, 07/08/2016 - 20:23

Permalink

=))

=))
  • Log in or register to post comments

Submitted by संत घोडेकर on Fri, 07/08/2016 - 21:07

Permalink

छान !

छान !
  • Log in or register to post comments

Submitted by राघवेंद्र on Fri, 07/08/2016 - 21:29

Permalink

मस्त किस्सा!!

मस्त किस्सा!!
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 07/08/2016 - 22:00

Permalink

Lol

Lol
  • Log in or register to post comments

Submitted by चाणक्य on Fri, 07/08/2016 - 22:37

Permalink

हाहा

भारी किस्सा
  • Log in or register to post comments

Submitted by स्वीट टॉकर on Fri, 07/08/2016 - 22:56

Permalink

प्रतिसादांना प्रतिसाद

सर्वजण, धन्यवाद! अजया, मी जे काही तोंड लपवून बसले ते डायरेक्ट विमान उतरल्यावरच उठले! =))
  • Log in or register to post comments

Submitted by पिशी अबोली on Fri, 07/08/2016 - 23:07

Permalink

हा हा. मस्त!

हा हा. मस्त!
  • Log in or register to post comments

Submitted by रुपी on Sat, 07/09/2016 - 04:11

Permalink

हा हा.. एअरपोर्टच्या आठवणी

हा हा.. एअरपोर्टच्या आठवणी नंतर मजेशीर वाटतात, पण त्या प्रसंगातून जातानाची धाकधूक ती व्यक्तीच जाणे!
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sat, 07/09/2016 - 05:43

Permalink

=)) =)) =))

=)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध प्रभू on Sat, 07/09/2016 - 09:11

Permalink

मस्त किस्सा

लिहिण्याची शैलीही उत्तम आहे हो...
  • Log in or register to post comments

Submitted by झेन on Sat, 07/09/2016 - 09:53

Permalink

मस्तच

:-)
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Sat, 07/09/2016 - 10:27

Permalink

हा हा हा!

जबरी किस्सा!! =)) तुमच्या लिखाणाच्या शैलीमुळे एकदम खुसखुशीत बाकरवडी खाल्ल्यासारखं वाटलं...:)
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on Sat, 07/09/2016 - 12:03

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by बरखा on Sat, 07/09/2016 - 15:46

Permalink

:)

लेख वाचुन खुप हसले. मस्त लिहलय.
  • Log in or register to post comments

Submitted by सखी on Sat, 07/09/2016 - 17:12

Permalink

छान किस्सा. लिहण्याची

छान किस्सा. लिहण्याची हातोटीपण खुसखुशित.
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Sun, 07/10/2016 - 04:39

Permalink

भारीच किस्सा.

भारीच किस्सा. ह्या वेट मुळे माझीही एकदा फसगत झालेली होती. एकदा आर्थिक कारणाच्या केवासीच्या फॉर्मवर त्या बयेने सह्या, घरचा पत्ता, फोन नं. पॅन कार्ड नं, ईमेल आदी घेतले. ती काऊंटरच्या पलीकडे होती अन मी अलीकडे. फॉर्म मला दिला अन मी तो काऊंटरवरच भरला. नंतर तो भरलेला फॉर्म घेण्यासाठी ती उठली अन मला 'वेट' म्हणाली. मला वाटले की ती आता मला वेट म्हणजे वजन करायला लावणार कारण वजन हा विषय केवासी रीलेटड असू शकतो असे वाटले अन मी मग काउंटरच्या आत जाण्याच्या दरवाजाकडे निघालो. मी म्हटले वजनकाटा कुठाय? तेव्हा ती म्हणाली वेट म्हणजे थांबा. नशीब त्या वेळी तेथे वर्दळ नव्हती.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वीट टॉकर on Sun, 07/10/2016 - 16:45

Permalink

प्रतिसादांना प्रतिसाद

सर्वजण, धन्यवाद ! पाषाणभेद - " वजन हा विषय केवासी रीलेटड असू शकतो " -:)
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Sun, 07/10/2016 - 16:54

Permalink

कमाल किस्सा आहे स्वीटटॉकर सर!

कमाल किस्सा आहे स्वीटटॉकर सर!!!
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Sun, 07/10/2016 - 17:42

Permalink

किस्सा आवडला.

किस्सा आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by महामाया on Sun, 07/10/2016 - 22:13

Permalink

छान !

किस्सा आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by रामचंद्र on Fri, 04/12/2024 - 16:48

Permalink

त्या अधिकारी बाई उत्तर भारतीय

त्या अधिकारी बाई उत्तर भारतीय असतील का?
  • Log in or register to post comments

Submitted by नठ्यारा on Fri, 04/12/2024 - 18:53

Permalink

मस्त किस्सा

स्वीट टॉकर, किस्सा ऐकायला छान वाटतं पण सहभागींची हालत ब्येक्कार. यावरनं शशिकांत फडणीसांचा किस्सा आठवला. त्यांना प्रयोगशाळेतलं कसलंसं रसायन test करायला सांगितलं. ते त्यांनी taste केलं. तर ते महाप्रचंड गोड लागलं. त्या प्रकारच्या रासायानास सुक्रालोज असं नाव देण्यात आलं. त्यातनं पुढे स्प्लेंडा हे मिष्टकारक ( स्वीटनर ) विकसित केलं गेलं. अधिक माहिती : https://en.wikipedia.org/wiki/Sucralose#History -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com