✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आरक्षणाची गरज

अ
अन्नू यांनी
Sat, 01/16/2016 - 22:36  ·  लेख
लेख
आत्तापर्यंत जितक्या पण चर्चा झाल्या किंवा आरक्षणाचा विषय निघाला तर त्यात ७५% लोक आरक्षण बंद झाले पाहीजे किंवा आर्थिक आधारावरच आरक्षण झाले पाहिजे असा सरळ-सरळ मुद्दा मांडताना दिसतात! त्यात ९९% हे उच्च जातीतले (म्हणजेच ओपन कॅटेगरीतले) असतात. तर उरलेले इतर जातीतले असतात. दुर्दैवाची गोष्ट ही कि काही सधन घरातले पण त्याच जातीत असणारे लोकही हाच मुद्दा अगदी ठामपणे मांडताना दिसतात! बरोबर आहे त्यांचे- कशाला हवे आरक्षण? काय साध्य होतं आरक्षणाने? मीही या गोष्टीवर खुप विचार केला. कशासाठी आरक्षणाचा इतका अट्टाहास केला होता आंबेडकरांनी? फक्त आर्थिक दुर्बलांना किंवा मागासलेल्या जातींना सधन करण्यासाठी? आत्ता मिपावर कित्येक कायदेतज्ञ असतील. काहींना याबाबतीतली राज्यघटनेतील काही कलमेही माहीत असतील. त्यांनाही या युक्तीमागचा अर्थ समजु नये? आश्चर्य वाटतं- पण तितक्याच वेदना होतात! जर हे आरक्षण आर्थिक दुर्बलांना सधन करण्यासाठी असतं तर मग सरकार गरीबांसाठी, आर्थिक दुर्बल घटकांसाठी किंवा दारिद्ररेषेखालील लोकांसाठी जे विविध उपाय-योजना आखत असतं ते कुठल्या नियमानं करत असतं? आणि मुळात आरक्षण हे जातीवरच भर देणारं का आहे? कोण विचार करतं याचा? कोणीच नाही! फक्त प्रश्न आला कि एकच उत्तर- आरक्षण बंद करा! बस्स. संपलं? आपण फँड्री सिनेमा बघतो, चार दिवस चुचकारतो, त्याच्याबद्दल हळहळ व्यक्त करतो आणि नंतर?... सगळं शांत! का बरं असं? का तो सिनेमा फक्त आपल्या मनोरंजनासाठीइतकाच मर्यादित असतो का? एक किस्सा सांगतो- काल्पनिक नाही कालचाच घडलेला आहे. कोणाचं नाव इथं सांगत नाही मी, फक्त चौघा मित्रांत झालेली चर्चा मी इथे देतो. कदाचित मी हा मुद्दा का सांगतोय हे अधिक स्पष्ट होईल. "अरे उसमें तो ९५ मे आडमिशन हो जाता है|" "ह्यॅ! किसने कहाँ?" "सच में, अगर तू कास्टवाला रहेगा ना तो तेरा अ‍ॅडमिश आराम से हो जाएगा.." "अच्छा- उसके लिए ना? मुझे लगा अपनी बात कर रहा है तू|" "अरे SC के लिए तो ८५% है! पता है?" "कौन वो भंगी?" "नही SC वाला" "वही- भंगी! साला यहाँ पे हमें अ‍ॅडमिशन मिलता नहीं और इन भिखारी को मुफ्त का मिल जाता है!" "कुछ भी बोल- लेकीन जो है- वो है|" "क्या फालतू में, इनको सर चढाती है गवर्नमेंट? हर जगह इनको रिझर्वेशन चाहीए होता है|" (तिसरा) "हर जगह नही होता- XXXXX कॉलेज में तो SC हो, तो भी ९० का कट ऑफ है|" "वो एक जगह हुई, लेकिन बाकीके जगह पे तो ये भिखमंगे आते ही है ना?" "देख तू कास्ट के बारें में ऐसा नही बोल सकता" "क्यु- मुझे क्या किसी का डर है क्या? मै तो कॉलेजमें और बाहर भी उनको भंगी ही बुलाता हूँ" "देख ***** तू यहीं बात किसी कास्टवाले के सामने कहेगा ना, तो वो सीधे तुम्हारे उपर केस कर देगा|" "तू क्यु इतना डर रहा है?" "डरने का सवाल नहीं- मेरे साथ ऐसा हुआ है, इसलिए मै बोल रहा हूँ|" "मुझे तो इतना गुस्सा आता है ना इनके उपर" "गुस्सा तो मुझे भी आता है- लेकीन हम कुछ नही कर सकते, लॉ ही ऐसा है| तू बाकी जगह पें उनकों कितनी भी गालियाँ दे, तुझे कोई नही रोकेगा, पर पब्लिक प्लेस में तू ऐसा नही बोल सकता|" "लेकीन इनको रिझर्वेशन देते क्यु है?" "देख- असली रिझन तो मुझे भी नही पता, लेकीन इसी वजह से वो आगे निकल जाते है|" "साला, इनका रिझर्वेशनही पुरा बंद करना चाहीए| जरुरत ही क्या है इनकों रिझर्वेशन देने कि?" "जाने दे नं, वैसे भी करेंगे क्या वो रिझर्वेशन लेके? गाँव जाके हल ही चलाऐंगे!" या वाक्यावर सगळेजळ हसायला लागले. थोड्या वेळानंतर पहिला मुलगा निघून गेला. जाताना पुन्हा त्याने तसं ओपनली बोलू नको म्हणून त्या मुलाला बजावलं. पण त्या मुलाला मात्र त्याचं बोलणं पटलं नाही. तो त्याच मुद्द्यावर आपल्या दुसर्‍या मित्राबरोबर बोलायला लागला.. "क्या डरता है रे ये? भंगी को भंगी नही बोलेंगे तो क्या बोलेंगे?" "वो बहोत डरपोक है|" "नहीं तो क्या? हमारे गाँव में तो ये लोग पहले कचरा उठाते थे, पता है? कोई भाव नहीं देता इन्हें" त्याचा मित्र नुसताच कुचेष्टेने हसला- "कभी आओगे तो देखना हमारे गाँव- वहाँ बहोत चलता है ऐसा. मै तो मुँह पर बोलता हूँ उनके! आज भी इनको हमारे सामने बैठने कि परमिशन नहीं है- हिम्मतही नहीं होती इनको सामने बैठने कि... अरे बैठना तो दूर ये लोक- यही एस सी वाले- हमारे सामने से जाते वक्त चप्पल भी पहनके नही जा सकते!" ही संपुर्ण चर्चा ऐकल्यावरही समाजातून जात हा प्रकार कायमचा नष्ट झाला आहे असं वाटतं का? आंम्हाला कॉलेजच्या फर्स्ट इअरला अभ्यासाला एक नाटक होतं त्यात एक डायलॉग होता-"जात नाही ती जात!" जात दोनच शब्द पण त्याची झळ खुद्द आंबेडकरांनी अनुभवल्याने त्यांनी घटनेत तरतुद करुन या घटकाला प्रत्येक क्षेत्रात मुद्दाम राखीव जागा करुन दिल्या- आणि त्याच आरक्षणाच्या आज आपण इतक्या प्रचंड विरोधात बोलत असतो! पण आर्थिक घटकच आंबेडकरांना आरक्षणासाठी गृहीत धरायचा असता तर त्यांना जात हा मुद्दा घटनेत नमुद करण्याची गरजच काय होती? याचा विचार कोणीही करताना दिसत नाही. एक वेळ तुंम्ही कष्ट करुन पैसा मिळवून शकता- श्रीमंत होऊ शकता, स्वतःची गरीबी दुर करु शकता- पण जात? अहं- कितीही प्रयत्न करा, ती तुंम्हाला कधीच बदलता येत नाही! आणि हीच गोष्ट आंबेडकरांना कळून चुकली होती, त्याबाबत त्यांनी एक प्रसंगही सांगितला आहे, ऑफिसात काम करत असताना ते एका चपराश्याला पाणी द्यायला सांगतात तर तो ते देण्यास नाकारतो. का? तर तो एका उच्च जातीचा असतो! यावेळी आंबेडकरांचं पद- त्यांचं शिक्षण त्याच्या दृष्टीने काहीच किंमतीचं नसतं! तो तसं स्पष्टपणे बोलूनही दाखवतो. असा एकच नाही- अनेक प्रसंग आंबेडरांच्या बाबतीत घडत गेले आणि त्यातूनच आरक्षणाची कल्पना मुळ धरत गेली. पण आज इतक्या वर्षांनी मागे वळून पाहिल्यास आंबेडकरांनी आरक्षणातून काय साध्य केलं असा प्रश्न पडतो. कारण- त्या विशिष्ट घटकाविषयी समाजाची मानसिकता आजही तिच आहे- पुर्वी होती तशीच! बदल झाला तो ती उत्कट करण्याच्या पद्धतीत! त्यांचा धर्म बदल झाला. जात मात्र प्रत्येक ठिकाणी जिवंतच राहीली....
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
लेख
अनुभव

प्रतिक्रिया द्या
72298 वाचन

💬 प्रतिसाद (374)

प्रतिक्रिया

सर्व मुद्द्यांशी +१००० सहमत.

अन्नू
Mon, 02/01/2016 - 23:55 नवीन
सर्व मुद्द्यांशी +१००० सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

+१११

अनिरुद्ध.वैद्य
Fri, 02/05/2016 - 11:12 नवीन
शेवटले २ मुद्दे अगदी आचरणात आणून ठेवलेत चिगो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

एकंदर उहापोह पाहून मला असे

सुबोध खरे
Tue, 02/02/2016 - 09:33 नवीन
एकंदर उहापोह पाहून मला असे वाटते कि खुल्या वर्गातील लोकांचा आरक्षणाला सरसकट विरोध नाही. पण भरपूर पैसे मिळवणाऱ्या बापाचा मुलगा उच्च फी असलेल्या क्लास मध्ये जातो आणि गुण कमी मिळवले तरीही राखीव जागातून त्याला प्रवेश मिळवतो हे सर्वाना खटकते. बहुसंख्य खुल्या वर्गातील लोकांचा गरीब मागासवर्गीयाला मदत देण्याबद्दल आक्षेप नाही तर सरकारी जावई केवळ जातीमुळे मिळवलेल्या फायद्याने आपल्याच जातीतील लोकांना वंचित ठेवत आहेत आणि तसे त्यांना ठेवण्यातच त्यांचा स्वार्थ आहे. कारण जोवर त्यांच्या जातीत वंचित लोक आहेत तोवरच आरक्षणाचा फायदा त्यांना उपटता येतो. जर सर्व जातींचा अन्त्यादय झाला तर आरक्षणाची गरज राहणार नाही आणि यांची दुकाने आणि मलिदा बंद होईल. यामुळेच मागासवर्गीयातील "सरकारी जावई" उच्चरवाने हाकाटी पिटताना दिसतात. उदा. जे आईबाप दोघेही आरक्षणातून डॉक्टर झाले आणि सरकारी नोकरीत उच्च पदावर आहेत त्यांच्या मुलांना क्रिमी लेयर का लावू नये? तीच जागा त्यांच्याच जातीतील एका गरीब विद्यार्थ्याला मिळावी यात काय चूक आहे असे विचारले असता हे लोक मुद्दा भरकटवतात. शेवटी स्वार्थासाठीच हे सरकारी जावई आरक्षणाची कोल्हेकुई करताना दिसतात.
  • Log in or register to post comments

+११११

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 02/02/2016 - 11:52 नवीन
couldnt agree more doctor sir, Creamy layer is the key!! आरक्षण सचोटी ने राबवता अतिशय बेस्ट सरकारी योजना आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

..

मोगा
Tue, 02/02/2016 - 12:21 नवीन
सहमत. सरकारी नोकरी १ % लोकानाही मिळत नाही. त्यात आरक्षणातील किती , दोघेही आईबाप आरक्षणातील व सरकारी नोकरीत किती , ही आकडेवारी कमीच असणार आहे. एका कुणाला तरी जास्त पगाराची नोकरी मिळाली की लगेच त्या कुटुंबाचा भाग्योदय कसा होइइल म्हणे ? घर - २५ लाख , मुले - २५ लाख व आपली म्हातारपणीची पुंजी २५ लाख .... किमान ५० लाख ते १ कोट मिळाल्याशिवाय ते कुटुंब स्थिरस्थावर होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

मोगा खान

सुबोध खरे
Tue, 02/02/2016 - 14:43 नवीन
मोगा खान सरकारी डॉक्टर ला निवृत्त होताना ४०-४५ लाख रुपये मिळतात आणि सरासरी ४५००० रुपये निवृत्तीवेतन आहे शिवाय मरेपर्यंत वैद्यकीय सेवा फुकट आहे. शिवाय आजमितीला पगार ८०००० रुपये आहे, म्हणजेच सरकारी डॉक्टर हा एल पी जी सबसिडीला पात्र नाही पण आरक्षणास पात्र आहे एकदा एकाला नोकरी लागली कि त्याच्या आयुष्याचे कल्याण होतेच शिवाय बायकोला पण तितक्याच पगाराची आणि फायद्यांची असेल तर चांदीच आहे , ज्या कुटुंबाला २० लाख रुपये वर्षाला मिळतात वर सर्व फायदे त्यांच्या मुलांना आरक्षण देणे हा आरक्षण या तत्त्वालाच हरताळ फासणारे आहे. जिथे तिथे पुराव्याशिवाय पिंक टाकण्याची तुमची जुनी सवय मात्र जात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा

.

मोगा
Tue, 02/02/2016 - 22:04 नवीन
श्रीमंत असला तरी दलित हा वंचित असु शकतो. संघाचा चश्मा काढुन माणुसकीच्या चस्म्यातुन बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मोगा जी

सुबोध खरे
Tue, 02/02/2016 - 22:15 नवीन
मोगा जी माझा संघाशी काहीही संबंध नाही. तेंव्हा संघाचा चष्मा काढा आणि माणुसकीचा लावा या म्हणण्याला काहीही अर्थ नाही. आणि मी माणुसकीचा चष्मा लावलेला नाही हा आरोप आपण कोणत्या आधारावर केला आहे? बेफाट आरोप करण्याअगोदर दोन वेळा विचार करा. आपली लायकी काढायला उतरलो तर आपल्याला कठीण जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा

.

मोगा
Tue, 02/02/2016 - 22:31 नवीन
तुम्ही संघाचे नसाल हो , चश्मा संघाचा आहे , असे म्हटले. परभाषेतही व्हा पारंगत मायमराठी विसरु नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मी माणुसकीचा चष्मा लावलेला

सुबोध खरे
Tue, 02/02/2016 - 22:37 नवीन
मी माणुसकीचा चष्मा लावलेला नाही हा आरोप आपण कोणत्या आधारावर केला आहे? हे पहिल्यांदा सिद्ध करा. फालतू गोष्टी करणे सोडा. मग माय मराठी आणी पर भाषेची गोष्ट करा. मी एम बी बी एस ला असे पर्यंत (१९८३ ते १९८८) ए एफ एम सी या अखिल भारतीय संस्थेत "मराठी" माध्यमातून शिकलेला मी एकटा मुलगा होतो.या बद्दल मला अभिमान आहे. तेंव्हा मायमराठी बद्दल "तुमच्या" कडून काही शिकावे हि "तुमची" लायकी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा

त्यांच्या मुलांना क्रिमी लेयर

अस्वस्थामा
Tue, 02/02/2016 - 15:15 नवीन
त्यांच्या मुलांना क्रिमी लेयर का लावू नये? तीच जागा त्यांच्याच जातीतील एका गरीब विद्यार्थ्याला मिळावी यात काय चूक आहे
डॉक, इथे हा तुमचा प्रतिसाद इतका समर्पक आहे की इथून पुढे आरक्षणाचा चर्चा विषय आल्यास हाच प्रतिसाद प्रथमतः वाचायला द्यावा. इतके झाले तरी सध्या जी मागास व्हायची स्पर्धा लागली आहे ती तरी जरा कमी होईल असं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

डॉक्टरसाहेब, इथे आपण एक फार

संदीप डांगे
Tue, 02/02/2016 - 17:09 नवीन
डॉक्टरसाहेब, इथे आपण एक फार महत्त्वाचा मुद्दा सरसकट विसरता आहात, आरक्षण हे गरिबी निर्मुलनासाठी नाही. सामाजिक भेदाभेद निर्मुलनासाठी, सामाजिक समतेसाठी आहे. दलित गरिब असल्यामुळे त्यांना आरक्षण दिलं जातं हा घोर/गोड गैरसमज पसरवला गेला आहे. खरंच असं आहे काय? नाही. शंभर वर्षांपूर्वी एका गावात एक गरिब ब्राह्मण (जो मंदिरातल्या पडवीत राहतो) व एक श्रीमंत महार (ज्याच्याकडे १०० गाढवं आहेत) राहत असेल तर गावपंगतीत पाटलासोबत सर्वात पहिल्या पंगतीत कोण बसेल? सामाजिक भेदभाव हे गरिबीमुळे नाही तर जातीमुळे निर्माण झाले, अजुनही आहेत. त्यामुळे गरिबी दूर करून सामाजिक अन्याय दूर होईल ह्यासाठी आरक्षण दिले गेले नाही. आरक्षण म्हणजे दलितांच्या पोटापाण्याची सोय नव्हे. ती मुख्य सामाजिक प्रवाहात जातीमुळे होणारे भेदभाव टाळून सामिल व्हायची संधी आहे. ह्यात गरिब श्रीमंत ह्याचा फरक नाही. निम्नजातीय कितीही हुशार असला तरी त्यास संधी न देण्याचे जातीय राजकारण प्रत्यक्ष पाहिले आहे. आमच्या एका चांभार जातीच्या मित्राला (जी थेरॉटिकली एससी वर्गात येते पण बौद्ध/महार या जातींपेक्षा उच्च जात मानली जाते) कलामहाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी चालून आली होती. तेही कुठलाही पैसा न देता. कारण काय तर कॉलेज एका विशिष्ट उच्चजातीच्या लोकांचे आहे व त्यांना एससीतल्याच दुसर्‍या जातीतला कोणी त्या आरक्षित जागेवर नको होता. सरकारी नियमाप्रमाणे एससी वर्गातलाच पाहिजे असल्याने त्यांनी तोच सरकारी नियम पाळून बौद्ध्/महार प्राध्यापक टाळला. नियम असून एकाची संधी डावलल्या गेली. नियम नसते तर काय झालं असतं? असं बरंच काय काय होत असतं. पण लोकांना दलित म्हणजे गरिब एवढंच दिसतं, जे श्रीमंत झाले ते दलित नाहीत असे नाही. अनेक बातम्या येत असतात. एका दलिताने गावच्या उच्चवर्गीयाच्या घरापेक्षा उंच. दुमजली घर बांधले म्हणून त्यास भयंकर त्रास दिला गेला. एकजण आपल्या लग्नाच्या वरातीत घोड्यावर बसला म्हणून त्याची नग्न धिंड काढण्यात आली. एकाने वास्तुशांतीच्या पंगतीत तूप वाढले म्हणून त्यास उच्चवर्णियांनी विष्ठा खाऊ घातली का तर त्या गावात फक्त उच्चवर्णियांनीच आपल्या पंगतीत तूप वाढावे असा रिवाज होता. ह्या सगळ्या घटना पाचशे वर्षांपुर्वीच्या नाहीत, आजकालच्याच आहेत. अजूनही कुठे कुठे घडतच असतील. वंचित म्हणजे गरिब, गरिब म्हणजे दलित, श्रीमंत झाला की त्याला मानसन्मान मिळाला असे नसते. उच्चवर्णियांच्या मानसन्मानात, सामाजिक प्रतिष्ठेत गरिबीमुळे फरक पडतो काय? यामुळेच क्रिमीलेयर चा मुद्दा कितपत योग्य आहे याबद्दल मी मत बनवू शकलेलो नाही. अर्थात त्याच्या विरोधात आहे असे नाही. पण ते कितपत प्रॅक्टीकल होईल ते समजत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आयला हा ही पॉइंट रास्त आहे!

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 02/02/2016 - 17:28 नवीन
आयला हा ही पॉइंट रास्त आहे! आता काही प्रतिसाद वचन मात्र राहून वाचन अन मनन करुन मग स्वतःपुरते काही ठरवतो म्हणे मी (नीरक्षीर क्रेजी) बाप्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

बापुसाहेब, हे खरं आहे. दोन्ही

संदीप डांगे
Tue, 02/02/2016 - 17:35 नवीन
बापुसाहेब, हे खरं आहे. दोन्ही बाजुंचे मुद्दे नेहमीच पटतात पण लागु काय करावं तेच सुचत नाही. आता मला कोणी आरक्षण विरोधात बोलायला सांगितले तर तेही मुद्देसूद मांडू शकतो. मुळात आरक्षण हा फार डायसी विषय आहे. घेऊ ती भूमिका योग्यच वाटते. दोन्हीकडच्या समस्या जवळून बघितल्या त्यामुळे दोन्हीकडच्या अन्यायग्रस्तांबद्दल सहानुभूती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

+अनेकवेळा

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 02/02/2016 - 17:54 नवीन
मी पण जातीयवादाचे भयानक रूप पाहिले आहे! ते ही खुद्द नॉर्थ इंडिया मधे! मी कदाचित आधीही सांगितला आहे हा अनुभव!! पासवान नाव असलेला माणुस घरी आला तर त्याला प्यायला पाणी सुद्धा डेजर्ट कूलरच्या टब मधील देण्यात आले होते देवा एकाने! हे भारताच्या बहुसंख्य भौगोलिक अन नागरिक भागाचे सत्य आहे! मुळात स्पेस ऐज (बेंगलुरु) ते अश्मयुग (अंडमानातले जारवा) त्यामुळे पुणे मुंबई किंवा गेला बाजार महाराष्ट्रात राहून "आम्ही नाही न जातीयवाद पाळत, मग रिजर्वेशन पॉलिसीचा रिव्यु घ्यायला हरकत नाही" म्हणणे किंवा निव्वळ आरक्षणाच्या मस्तीत स्वजातीय गरीब दलित बांधवांस वंचित ठेऊन नंतर सगळे स्वतः ओरपणे ह्या दोन्ही टोकांना अर्थ नाही म्हणून म्हणले ऑल इंडिया लेवल चं होलिस्टिक चित्र मिळेल तेव्हा बोलता येईल तोवर प्रसंगनुरूप दोन्ही बाजु पटतात तरीही माझे झुकते माप आरक्षण अबाधित अन जातीय बेसिस वर असणे ह्यालाच असेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

++१००

अन्नू
Tue, 02/02/2016 - 17:40 नवीन
अगदी-अगदी. आरक्षणाचा नेमका हाच मुद्दा लोक विसरताहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

एक प्रश्नः-

पिलीयन रायडर
Tue, 02/02/2016 - 18:09 नवीन
एक प्रश्नः- भारतात जाती व्यवस्थेमुळे सामाजिक भेदभाव होतो.. आजही अनेक जागी होतो.. त्यामुळे वंचितांना समान हक्क मिळावेत म्हणुन आरक्षणाची सोय आहे. जेणेकरुन हे लोक मुख्य प्रवाहात यावेत. जगात इतर देशात अशाच प्रकारे एका गटाने दुसर्‍या गटावर अन्याय केला आहेच. त्या देशांमध्ये आरक्षण आहे काय? असल्यास तिथे आरक्षणाबद्दल लोकांचे मत काय? त्याचे परिणाम काय?
  • Log in or register to post comments

अमेरिकेत त्यास अफर्मेटीव अ

संदीप डांगे
Tue, 02/02/2016 - 18:21 नवीन
अमेरिकेत त्यास अफर्मेटीव अ‍ॅक्शन म्हणतात. https://en.wikipedia.org/wiki/Affirmative_action_in_the_United_States Affirmative action in the United States tends to focus on issues such as education and employment, specifically granting special consideration to racial minorities, Native Americans, and women who have been historically excluded groups in America. Reports have shown that minorities and women have faced discrimination in schools and businesses for many years and this discrimination produced unfair advantages for whites and males in education and employment The impetus toward affirmative action is redressing the disadvantages associated with past and present discrimination. Further impetus is a desire to ensure public institutions, such as universities, hospitals, and police forces, are more representative of the populations they serve.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

डांगे साहेब,

सुबोध खरे
Tue, 02/02/2016 - 18:33 नवीन
डांगे साहेब, तुम्ही म्हणता हि वस्तुस्थिती अमान्य न करता मला एक म्हणावेसे वाटते कि एकाच आर्थिक सुस्थितीत असलेली दोन मुले एकाला आरक्षणामुळे जागा मिळते आणी दुसर्याला मिळत नाही यातून दुसर्या मुलाच्या(अर्थातच उच्च जातीच्या) मनात जाती बद्दल अधिकच तेढ निर्माण होते आणी त्या मुलाला मागास वर्गीयान्बद्दल तीव्र संताप निर्माण होतो आणी जातीभेदाचे निर्मुलन होण्या ऐवजी त्याला अधिकच खतपाणी मिळते हि स्थिती मी गेली कित्येक वर्षे मी पाहत आलो आहे. शिवाय आर्थिक दरी हे अनेक विषमतांचे कारण नक्कीच आहे. हि दरी सांधली गेली तर जातिभेदाची धार नक्कीच कमी होते. आज क्रिमी लेयर मधील मुले जागा बळकावून बसल्यामुळे निम्न स्तरातील मुलांचे अपरिमित नुकसान होत आहे.या मुलांना राखीव जागा दिल्यामुळे जातिभेदाचा भस्मासुर कसा नामोहरम होणार आहे हे मात्र आपण लिहित नाही. शेवटी स्वतःच्या पोळीवर तूप ओढणे क्रिमी लेयर सोडत/ सोडणार नाही हीच शोकांतिका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

डॉक्टरसाहेब,

संदीप डांगे
Tue, 02/02/2016 - 20:18 नवीन
डॉक्टरसाहेब, आरक्षणाच्या धोरणामागचा घटनात्मक उद्देश मी स्पष्ट केला. ते दलितांना श्रीमंत करण्यासाठी नाही तर उच्चवर्णियांसमकक्ष सन्मान देण्यासाठी. याच्या अंमलबजावणीत काहीच चुकत नाही असे मला म्हणायचे नाही. बाकी आरक्षणामुळे उच्चवर्गियांच्या संधींच्या उपलब्धतेवर परिणाम होत नाही असे मी आधीच लिहिले आहे. आपली संधी हुकली याचे खापर फोडण्यासाठी आरक्षणाची खोटी कारणे दिली जातात. ज्याला जे शिक्षण घ्यायचे आहे ते भारतात सर्वत्र उपलब्ध आहे. पण विशिष्ट कॉलेजात मला मिळत नाही पण ह्याला मिळाले ह्याचा ज्यांना राग येतो त्याचे काय करावे? समजा भारतात अशी कॉलेजेस नसतीच तर? किंवा सर्वत्र उत्तम शिक्षण देणारीच कॉलेजे असती तर? म्हणजे संधी न मिळण्याचे खरे कारण आरक्षण नाहीच. संधीची कमतरता हे आहे. विनाकारण आरक्षण बदनाम होते. मला माझ्या शहरात डीएडसाठी प्रवेश मिळाला नाही कारण गुण कमी पडले (बरेच झाले म्हणा) पण महाराष्ट्रात इतर ठिकाणी जसे मुंबई इत्यादी जिल्ह्यांमधे प्रवेश सहज मिळाला असता कारण तिथे डिएड ला प्रवेश घेणारे कुणीच नाही. मुंबईत कॉमर्सला मारामारी असते पण अकोल्यात कमी गुण असलेल्याला चांगल्या कॉलेजात खुल्या गटातूनही प्रवेश मिळेल. संधी म्हणजे काय हे एकदा खरेच स्पष्ट व्हायला पाहिजे. कारण महागड्या शाळा-कॉलेजांमधे गरिबांना प्रवेश घेता येत नाही तेव्हा ते संधी हुकली असे म्हणतात काय ते माहित नाही.
त्या मुलाला मागास वर्गीयान्बद्दल तीव्र संताप निर्माण होतो आणी जातीभेदाचे निर्मुलन होण्या ऐवजी त्याला अधिकच खतपाणी मिळते
तुम्ही म्हणताय ती स्थिती संधी हुकलेल्यांच्या मनस्थितीची आपण सांगताय. त्याबद्दल सहानुभूतीही ठेवू. पण सर्व संधी योग्यपणे मिळूनही जातीयवादीपणा न सोडलेले अनेक उच्चवर्णियही बघितलेत. असे उच्चवर्णिय निम्नवर्गियांना व्यवस्थेत शिरू देण्यामधे झारीतल्या शुक्राचार्याची भूमिका वठवतात. त्यामुळे आरक्षणाचा दर्भ वापरावा लागतो. तो काही उच्चवर्णिय संधी हुकलेल्यांना बोचतो पण अ‍ॅज ए व्होल सिच्युएशन लक्षात घेतली तर ती बोच जास्त राहणार नाही. शेवटी विशिष्ट जातीप्रती द्वेष ही मानसिक स्थिती व सब्जेक्टीव आहे. कारण त्या जातीत जन्मावे असे कुणी योजलेले नसते, त्यामुळे द्वेष करणारे संकुचित वृत्तीचे प्रदर्शन करतात असे वाटते.
आज क्रिमी लेयर मधील मुले जागा बळकावून बसल्यामुळे निम्न स्तरातील मुलांचे अपरिमित नुकसान होत आहे
आरक्षणाबद्दल सतत नकारात्मक व विरोधी विचार करत राहिल्याने आपल्याला त्यामुळे घडणार्‍या अनेक चांगल्या घटना व परिणाम दिसत नाहीत. क्रिमी लेयरची मुले आरक्षणात नक्की किती टक्के आहेत ह्याचा विदा मजकडे उपलब्ध नाही. पण जी काही असतील ती साहजिक शहरी, महानगरी भागात असली पाहिजेत. छोट्या शहरांमधे, गावांमधे, सरकारी नोकर्‍यांमधे, सरकारी योजनांमुळे लाभ होणार्‍या व्यवसायांमधे तुम्हाला अपेक्षित असलेल्या गरिब निम्नवर्गीयांना अपेक्षित फायदा होत आहे. ज्यांच्या गावात पोचायला दहा वीस किमी चालत जावं लागतं अशा खेड्या-पाड्यांतली अनुसूचित जमातींतली मुले आरक्षणामुळे-शिष्यवृत्तीमुळे शिक्षण घेऊन सरकारी नोकरीत चांगल्या हुद्द्यांवर काम करतांना बघितली की आरक्षणाचा उपयोग झाला असं वाटतं. आरक्षणाने वॅक्युम क्लिनर वा सक्शन पंपसारखे काम करून कुठून कुठुन मुले बाहेर काढली, त्यांना संधी उपलब्ध करुन दिली. त्यांचे आयुष्य बदलले. आता आरक्षणाच्या धोरणात काही बदल झाला तर तो सर्वच्या सर्व जागी ब्लँकेट पद्धतीने होईल व असा तळागाळातल्या लोकांना संधी मिळण्याचे तुट्पुंजे साधनही नष्ट होईल. आरक्षण धोरणात काळानुरुप बदल व्हायलाच हवेत ह्या मताचा मी आहे. पण ते बदल काय असावेत ह्याबद्दल माझा पुरेसा अभ्यास नाही. बाकी जातीभेदाचा भस्मासुर संपवायचा असेल तर 'जाती मोडा' हाच एक मार्ग आहे. कुणाही भारतीयाला विचाराल तर तो म्हणेल "तेवढं सोडून बोला". जेव्हा जाती संपुष्टात येतील, आरक्षण आपोआप संपुष्टात येईल. पण लोक मागास असल्याच्या स्पर्धेत उतरले आहेत आता तेव्हा कठीणच आहे सगळं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

संपादकांस विनंती, हा प्रतिसाद

संदीप डांगे
Tue, 02/02/2016 - 20:25 नवीन
संपादकांस विनंती, हा प्रतिसाद उडवावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

डॉक्टरसाहेब,

संदीप डांगे
Tue, 02/02/2016 - 20:22 नवीन
डॉक्टरसाहेब, आरक्षणाच्या धोरणामागचा घटनात्मक उद्देश मी स्पष्ट केला. ते दलितांना श्रीमंत करण्यासाठी नाही तर उच्चवर्णियांसमकक्ष सन्मान देण्यासाठी. याच्या अंमलबजावणीत काहीच चुकत नाही असे मला म्हणायचे नाही. बाकी आरक्षणामुळे उच्चवर्गियांच्या संधींच्या उपलब्धतेवर परिणाम होत नाही असे मी आधीच लिहिले आहे. आपली संधी हुकली याचे खापर फोडण्यासाठी आरक्षणाची खोटी कारणे दिली जातात. ज्याला जे शिक्षण घ्यायचे आहे ते भारतात सर्वत्र उपलब्ध आहे. पण विशिष्ट कॉलेजात मला मिळत नाही पण ह्याला मिळाले ह्याचा ज्यांना राग येतो त्याचे काय करावे? समजा भारतात अशी कॉलेजेस नसतीच तर? किंवा सर्वत्र उत्तम शिक्षण देणारीच कॉलेजे असती तर? म्हणजे संधी न मिळण्याचे खरे कारण आरक्षण नाहीच. संधीची कमतरता हे आहे. विनाकारण आरक्षण बदनाम होते. मला माझ्या शहरात डीएडसाठी प्रवेश मिळाला नाही कारण गुण कमी पडले (बरेच झाले म्हणा) पण महाराष्ट्रात इतर ठिकाणी जसे मुंबई इत्यादी जिल्ह्यांमधे प्रवेश सहज मिळाला असता कारण तिथे डिएड ला प्रवेश घेणारे कुणीच नाही. मुंबईत कॉमर्सला मारामारी असते पण अकोल्यात कमी गुण असलेल्याला चांगल्या कॉलेजात खुल्या गटातूनही प्रवेश मिळेल. संधी म्हणजे काय हे एकदा खरेच स्पष्ट व्हायला पाहिजे. कारण महागड्या शाळा-कॉलेजांमधे गरिबांना प्रवेश घेता येत नाही तेव्हा ते संधी हुकली असे म्हणतात काय ते माहित नाही.
त्या मुलाला मागास वर्गीयान्बद्दल तीव्र संताप निर्माण होतो आणी जातीभेदाचे निर्मुलन होण्या ऐवजी त्याला अधिकच खतपाणी मिळते
तुम्ही म्हणताय ती स्थिती संधी हुकलेल्यांच्या मनस्थितीची आपण सांगताय. त्याबद्दल सहानुभूतीही ठेवू. पण सर्व संधी योग्यपणे मिळूनही जातीयवादीपणा न सोडलेले अनेक उच्चवर्णियही बघितलेत. असे उच्चवर्णिय निम्नवर्गियांना व्यवस्थेत शिरू देण्यामधे झारीतल्या शुक्राचार्याची भूमिका वठवतात. त्यामुळे आरक्षणाचा दर्भ वापरावा लागतो. तो काही उच्चवर्णिय संधी हुकलेल्यांना बोचतो पण अ‍ॅज ए व्होल सिच्युएशन लक्षात घेतली तर ती बोच जास्त राहणार नाही. शेवटी विशिष्ट जातीप्रती द्वेष ही मानसिक स्थिती व सब्जेक्टीव आहे. कारण त्या जातीत जन्मावे असे कुणी योजलेले नसते, त्यामुळे द्वेष करणारे संकुचित वृत्तीचे प्रदर्शन करतात असे वाटते.
आज क्रिमी लेयर मधील मुले जागा बळकावून बसल्यामुळे निम्न स्तरातील मुलांचे अपरिमित नुकसान होत आहे
आरक्षणाबद्दल सतत नकारात्मक व विरोधी विचार करत राहिल्याने आपल्याला त्यामुळे घडणार्‍या अनेक चांगल्या घटना व परिणाम दिसत नाहीत. क्रिमी लेयरची मुले आरक्षणात नक्की किती टक्के आहेत ह्याचा विदा मजकडे उपलब्ध नाही. पण जी काही असतील ती साहजिक शहरी, महानगरी भागात असली पाहिजेत. छोट्या शहरांमधे, गावांमधे, सरकारी नोकर्‍यांमधे, सरकारी योजनांमुळे लाभ होणार्‍या व्यवसायांमधे तुम्हाला अपेक्षित असलेल्या गरिब निम्नवर्गीयांना अपेक्षित फायदा होत आहे. ज्यांच्या गावात पोचायला दहा वीस किमी चालत जावं लागतं अशा खेड्या-पाड्यांतली अनुसूचित जमातींतली मुले आरक्षणामुळे-शिष्यवृत्तीमुळे शिक्षण घेऊन सरकारी किंवा खाजगी नोकरीत किंवा व्यवसायात काम करतांना बघितली की आरक्षणाचा उपयोग झाला असं वाटतं. आरक्षणाने वॅक्युम क्लिनर वा सक्शन पंपसारखे काम करून कुठून कुठुन मुले बाहेर काढली, त्यांना संधी उपलब्ध करुन दिली. त्यांचे आयुष्य बदलले. आता आरक्षणाच्या धोरणात काही बदल झाला तर तो सर्वच्या सर्व जागी ब्लँकेट पद्धतीने होईल व असा तळागाळातल्या लोकांना संधी मिळण्याचे तुट्पुंजे साधनही नष्ट होईल. आरक्षण धोरणात काळानुरुप बदल व्हायलाच हवेत ह्या मताचा मी आहे. पण ते बदल काय असावेत ह्याबद्दल माझा पुरेसा अभ्यास नाही. बाकी जातीभेदाचा भस्मासुर संपवायचा असेल तर 'जाती मोडा' हाच एक मार्ग आहे. कुणाही भारतीयाला विचाराल तर तो म्हणेल "तेवढं सोडून बोला". जेव्हा जाती संपुष्टात येतील, आरक्षण आपोआप संपुष्टात येईल. पण लोक मागास असल्याच्या स्पर्धेत उतरले आहेत आता तेव्हा कठीणच आहे सगळं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आरक्षणाबद्दल सतत नकारात्मक व

सुबोध खरे
Tue, 02/02/2016 - 20:30 नवीन
आरक्षणाबद्दल सतत नकारात्मक व विरोधी विचार करत राहिल्याने आपल्याला त्यामुळे घडणार्‍या अनेक चांगल्या घटना व परिणाम दिसत नाहीत. क्रिमी लेयरची मुले आरक्षणात नक्की किती टक्के आहेत ह्याचा विदा मजकडे उपलब्ध नाही. पण जी काही असतील ती साहजिक शहरी, महानगरी भागात असली पाहिजेत. छोट्या शहरांमधे, गावांमधे, सरकारी नोकर्‍यांमधे, सरकारी योजनांमुळे लाभ होणार्‍या व्यवसायांमधे तुम्हाला अपेक्षित असलेल्या गरिब निम्नवर्गीयांना अपेक्षित फायदा होत आहे. ज्यांच्या गावात पोचायला दहा वीस किमी चालत जावं लागतं अशा खेड्या-पाड्यांतली अनुसूचित जमातींतली मुले आरक्षणामुळे-शिष्यवृत्तीमुळे शिक्षण घेऊन सरकारी नोकरीत चांगल्या हुद्द्यांवर काम करतांना बघितली की आरक्षणाचा उपयोग झाला असं वाटतं. डांगे साहेब मी जे म्हणतो आहे "त्यालाच" तुम्ही दुजोरा देत आहात. मी कधीच म्हणालेलो नाही कि आरक्षण बंद करा. वरील स्थिती हेच दाखवते कि आरक्षण अशा लोकांसाठी हवेच. बाप आय ए एस ऑफिसर किंवा आई बाप सरकारी नोकरीत डॉक्टर आणी वर्षाला २० लाखापेक्षा जास्त पगार मिळवतात हे हो कसले मागास वर्गीय.यांना करू द्या कि खुल्या वर्गात स्पर्धा. यांच्याऐवजी तीच जागा आपण म्हणता तशा खर्या मुलांना द्या हेच तर माझे म्हणणे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

तुम्ही 'मागासवर्गीय म्हणजे

संदीप डांगे
Tue, 02/02/2016 - 20:59 नवीन
तुम्ही 'मागासवर्गीय म्हणजे गरिब' हीच व्याख्या पुढे करत आहात. आरक्षण तशी करत नाही हे मी सांगतोय. असो. तुम्ही उल्लेखित परिस्थितीची नक्की टक्केवारी वा विदा नसल्याने काही भाष्य करु शकत नसल्याचे मी नमूद केले आहेच. क्रिमीलेयर मुळे नक्की काय फायदा होईल हे सांगू शकत नाही. कारण सरकारी नियम बायपास करण्याच्या पळवाटाही भरपूर आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आरक्षणाचा मूळ हेतू हा

सुबोध खरे
Tue, 02/02/2016 - 22:24 नवीन
आरक्षणाचा मूळ हेतू हा अंत्योदय आहे. मग ते मागास्वर्गासाठी असो व स्त्रियांसाठी असो. मागासवर्गातील जे लोक आरक्षणाचा फायदा घेऊन "पुढे" आले त्यांनी त्यांच्या जातीतील वंचितांच्या जागा बळकावून बसल्यामुळे मूळ अंत्योदयाच्या मुद्द्यालाच हरताळ फसला जातो. जागा मुळात कमी असल्यामुळे हे प्रश्न आहेत. OPTIMUM UTILISATION OF RESOURCES हा मूळ उद्देश आहे. खुल्या वर्गातील लोकांना क्रिमी लेयर लावा कि न लावा त्याचा काहीच फायदा नाही हि वस्तुस्थिती आपण लक्षात घ्याम्हणजे मी खुल्या वर्गाच्या समर्थनार्थ बोलतो आहे हा आपला पूर्वग्रह दूर होईल आआणी म्हणजे माझा मुद्दा आपल्या लक्षात येईल. सरकारी नियम बायपास करण्याच्या पळवाटाही भरपूर आहेत. सरकारी मदतीला गळती लागते म्हणून सरकारी मदत बंद करा असेच हे म्हणण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

..

मोगा
Tue, 02/02/2016 - 21:58 नवीन
समानता निर्माण करण्यासाठी त्यागाचा मक्ता फक्त आरक्षणातील लोकानीच घ्यायचा का ? श्रीमंत उच्चवर्णीय मुलानीही इतरांसाठी चांगल्या संधींचा त्याग करावा. चांगले कॉलेज , चांगल्या स्म्धी सोडुन वडगाव बुद्रुकला आर्ट्सला अ‍ॅडमिशन घ्यावी. त्यांच्या त्यागातून दुसर्‍या गरीबाला संधी मिळुन समाजकार्य होइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मोगाजी आपल्याला विस्मरणाचा

सुबोध खरे
Tue, 02/02/2016 - 22:11 नवीन
मोगाजी आपल्याला विस्मरणाचा विकार झाला आहे का ? कोणीही माणूस पैसे मिळवून श्रीमंत होऊ शकतो पण "कोणीही" माणूस "मागासवर्गीय" होऊ शकत नाही. आपला पैसे मिळवण्यावर इतका राग का? हि दळभद्री कम्युनिस्ट वृत्ती सोडून द्या. त्यांनी सोडलेली जागा दुसर्या गरिबाला मिळणार नाही तर त्याच्या मागच्या दुसर्या गुणवंत श्रीमंताला मिळू शकेल. तेंव्हा आपले उदाहरण गैरलागू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा

...

मोगा
Tue, 02/02/2016 - 22:28 नवीन
त्या दुसर्‍या श्रीमंत गुणवंतानेही त्याग करावा. असे करत करत अखेर गरीब गुणवंताला संधी मिळुन त्याचा भाग्योदय होइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

...

मोगा
Tue, 02/02/2016 - 22:36 नवीन
शंखपुष्पी व सारस्वतारिष्ट घेउन बघा खरेसाहेब. मेमरी , सेन्सरी स्पीच , अंडरस्तँडिंग .... तुमचे बिघडलेले हायर सेंटर सुधारतील कदाचित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा

का हो

सुबोध खरे
Tue, 02/02/2016 - 22:41 नवीन
का हो एम बी बी एस शिकून तुमची औषधांची माहिती इतकी गाळात आहे कि आयुर्वेदाची गाय पिळायला घ्यावी लागली. एक ना धड भाराभर चिंध्या असो. आपल्या तोंडाला लागण्यात काही हशील नाही कारण आपल्या पातळी पर्यंत येण्यासाठी आम्हाला फार खाली उतरावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा

मोगाजी इथे कोणीही अशी इच्छा

अन्नू
Tue, 02/02/2016 - 22:39 नवीन
मोगाजी इथे कोणीही अशी इच्छा व्यक्त करित नाही कि निम्न पण उन्नत गटात मोडणार्‍या जातीतील विद्यार्थ्यांनी शहरी कॉलेजेस सोडून शहराबाहेर कॉलेजला अ‍ॅडमिशन घ्यावे. मग असा वाद कशासाठी? कृपया गैरसमज नसावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा

पिलियन रायडर यांच्या

तर्राट जोकर
Tue, 02/02/2016 - 18:28 नवीन
पिलियन रायडर यांच्या प्रश्नासोबत माझाही एक प्रश्नः जगात त्या इतर देशात जात-धर्म आधारित वधुवरपरिचय मेळावे होतात काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

इतर ठिकाणी अरेंज म्यारेज होतात का जोकर बुवा?

अनिरुद्ध.वैद्य
Fri, 02/05/2016 - 11:22 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

सर्व दिग्गज लोकांची चर्चा

तर्राट जोकर
Tue, 02/02/2016 - 18:14 नवीन
सर्व दिग्गज लोकांची चर्चा वाचली पण धाग्यातल्या मूळ सिच्युएशनवर काही बोललेलं दिसत नाही.
  • Log in or register to post comments

अजाझ अश्रफचे काही मुद्दे

माहितगार
Tue, 02/02/2016 - 23:07 नवीन
सर्व दिग्गज लोकांची चर्चा वाचली पण धाग्यातल्या मूळ सिच्युएशनवर काही बोललेलं दिसत नाही.
१) मिपावर चर्चा कोणत्याही बाजूने होऊ देत बहुसंख्य मिपाकर जातीवादी अथवा धर्मांध नाहीत असे म्हणता येईल असे वाटते तरीही माझ्या 'सर्व'-समावेशक सण आणि उत्सवांचे महत्व या चर्चा धाग्यास अद्याप प्रतिसाद का नाहीत ते माहित नाही. २) स्क्रोल.इन वर कुणा अजाझ अश्रफने काही मुद्दे उपस्थीत केले त्यातील रोहीत वेमुलाच्या संबंधाने असलेला मजकुर बाजूला ठेवला तरी काही मुद्दे इथे चर्चा करण्या जोगे वाटतात. * .........No doubt, the stranglehold of caste on urban India has loosened over the decades. You will not have people openly refusing to share the same space with a lower caste or shaking his or her hand. But this is perhaps because our urban spaces remain socially homogeneous. If you don’t have a Dalit as your office colleague or neighbour in your residential colony, it is practically irrelevant whether or not you believe in caste or discriminate on its basis. The one shared urban space which has social diversity is the higher educational institute, where the reservation policy has ensured participation from marginalised groups. Once 50% of reservations were introduced in 2006, university campuses gradually became volatile sites of social discrimination and conflict..... .....low caste student.....Their peer group rarely comprises high caste students. * However, it is possible that in some cases the language skills of Dalit students or their ability to undertake research were genuinely found wanting. This problem testifies to the reduction of affirmative action to a mere assignment of quotas to different social groups. It is likely the proponents of affirmative action will now insist on improving the skills of Dalit students through remedial classes or a system of mentoring by senior students. The reservation policy indeed needs to be rethought, but not in order to roll it back, but to bring about a qualitative improvement in it. * .....If Dalit students require remedial classes, their higher caste counterparts and teachers need to be sensitised to caste inequalities and the philosophy of affirmative action. This exercise should preferably begin in high schools, many of which seldom have representations from marginalised social groups. Unless such a step is undertaken soon, our campuses might soon have full-blown caste wars. .... * The conflict over reservations largely springs from the paucity of quality institutes in the country. Thousands upon thousands of students compete for very few seats. In this scenario, higher caste students nurse animosity against those in the reserved category. Obviously, they forget that their privileges have given them a head-start over others. Nor have the values of social diversity and equality been inculcated in them for appreciating affirmative action. This apart, India needs a substantial increase in quality institutes to absorb the supply of students. It also requires to bridge the gap in quality between institutes in metros and other cities. Alas, the expenditure on education has remained more or less static if not declined in real terms. This is perhaps why the young, both high and low castes, are so quick to express their outrage against the system. .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

माहितगारजी, एवढं उच्च इंग्रजी

तर्राट जोकर
Wed, 02/03/2016 - 11:38 नवीन
माहितगारजी, एवढं उच्च इंग्रजी झेपत नाही हो, मी छोट्या गावातला कमी शिक्षण झालेला मनुष्य. मुद्दा थोडक्यात मराठीत सांगितला तर काही बोलतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

त जो साहेब

सुबोध खरे
Tue, 02/02/2016 - 18:39 नवीन
त जो साहेब मागासवर्गीय माणूस जर एखादा उद्योग चालू करेल तर उच्च जातीचा माणूस त्याच्या कडे नोकरीला येणार नाही असे अजून तरी होत नाहीये. जसा जसा मागास्वर्गीयाचा आर्थिक स्तर उंचावतो तशी जातीभेदाची दरी नक्कीच कमी होत जाते. उदा. लोक कितीही मुस्लीम द्वेष्टे असले तरी एखाद्या मुसलमानाकडे एखादी गोष्ट स्वस्त मिळत असेल तर बहुसंख्य लोक तेथे जातातच. किंवा धंदा करायचा असेल तर माणसे फायदा पाहतात जात/ धर्म नाही. शेवटी बहुसंख्य माणसे स्वार्थी आहेतच मग कोणत्याही जातीची किंवा धर्माची असोत.
  • Log in or register to post comments

डॉ. खरे. तुमचे प्रतिसाद वाचले

तर्राट जोकर
Wed, 02/03/2016 - 00:47 नवीन
डॉ. खरे. तुमचे प्रतिसाद वाचले. माझा रोख धाग्यातल्या मित्रांच्या चर्चेवर होता. एक उच्च्जात्वाला निचलीजातवाल्याला ज्या ष्टाइलने संबोधित करत होता ते बघितले तर तुमच्या एका प्रतिसादात तुम्ही म्हटले की 'आरक्षणामुळे संधी गमावल्याने जातीबद्दल द्वेष निर्माण होतो.' त्या धाग्यातल्या चर्चेत समजा असा भारत असता जिथे आरक्षण नाही, कुणाची ही संधी डावलली जात नाही तेव्हा त्या उच्च्जात्वाल्याला निचजातवाल्याबद्दल त्या भावना नसत्या का? हामारे गावमें कचरा उठाते थे, हमारे सामने चप्पल उढाके नहि जा सकते अशा भावना आजच्या पिढीत असण्याचे कारण आरक्षण आहे काय हा प्रश्न तुमच्यासाठी. कोण्या कंपनीसाठी माणसे भरती करण्याची जबाबदारी समजा याच उच्चवर्णियावर आहे तिथे त्याच्याच जातीचा व खालच्या 'त्या' जातीचा असे दोन उमेदवार आले आणि त्याचे स्वतःचे नुकसान होणार नसेल तर तो खरंच मेरीट बघेल याची खात्री आहे? कि आमची संधी हिरावुन घेतात म्हणून खालच्या जातवाल्यावर मेरिट असुन राग काढेल आणि घरी पाठवेल? आता बाकीच्या सदस्यांसाठी- सगळ्यांनी आरक्षणाची गरज, शिक्षण, नौकरीतली संधी, क्रिमिलेयर, अन्याय ह्यावर बोलणे केले, पण धाग्यात सांगितलेल्या सिच्यएश्न वर ब्र देखील काढला नाही. एका उच्च जातवाला दुसर्‍याबद्दल अशा भावना ठेउन आहे पण कोणीच तो विषय घेतला नाही. धाग्याचा विषय होता - खालच्या जातीतल्या लोकांबद्दल वरच्या जातीतल्या लोकांना आजही वाटणारी घृणा. ती आरक्षण देऊनही संपली नाही हेच दाखवण्याचा धागालेखकाचा प्रयत्न होता. आंबेडकरांशी पिउनचे वागणे हेही त्याच मानसिकतेचा उदाहरण देण्यासाठी होते. की आजही मानसिकता बदललेली दिसत नाही. आरक्षण नसते तर काय झाले अस्ते याची कल्पना कोणी करुन सांगेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

कंपनीत भरती करताना असलेल्या

सुबोध खरे
Wed, 02/03/2016 - 01:22 नवीन
कंपनीत भरती करताना असलेल्या अर्जात व्यक्तीची जात असते? मी मुंबईत तरी पाहिलेली नाही. शिवाय मी स्वतः व्यक्ती निवडताना जात पाहून निवडली जाते हेही पाहिलेले नाही. माझ्याच खात्यात क्षकिरण तंत्रज्ञ किंवा इतर सहाय्यक निवडताना जात किंवा धर्म कधी पाहिल्याचे/ अर्जात वाचल्याचे आठवत नाही. ( खरं तर आज मला मुंबईत रुग्णालयात माझ्या विभागात काही क्रिश्चन आणि मुसलमान होते याची जाणीव झाली आहे). धन्य झालो. बाकी वशिलेबाजी सगळीकडे असतेच त्यात जातीचा किंवा धर्माचा संबंध नाही. माझ्या सुदैवाने लष्करात भरती करताना सुद्धा अर्जात किंवा परीक्षेच्या उत्तर पत्रिकेत कुठेही जात वाचल्याचे आठवत नाही. छोट्या शहरात कदाचित असेलही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

असं काय करता साहेब? कांबळे,

तर्राट जोकर
Wed, 02/03/2016 - 02:09 नवीन
असं काय करता साहेब? कांबळे, जोशी, पाटील, देशपांडे, इंगळे, कुलकर्णी, जाधव, जोग, क्षिरसागर, शिरसाट, कुंभार, माळी, पाटील, देशमुख, पाठक यांच्यात कोण कोण आहे आडनावावरुन कळत नाही? ज्याचं कळत नाही ते आडून आडून विचारत नाही? आणि मुंबईत फक्त नोकरीचा अर्ज बघून नोकरी देतात हे माहित नव्हते. मी वशिलेबाजीबद्दल नव्हते म्हटले. तुमचा व्यक्तिगत अनुभव व प्रगल्भ विचार म्हणजे समस्त भारत नव्हे. तसे असते तर धाग्यातले संवाद, घटना भारतात घडल्या नसत्या.
कोण्या कंपनीसाठी माणसे भरती करण्याची जबाबदारी समजा याच उच्चवर्णियावर आहे तिथे त्याच्याच जातीचा व खालच्या 'त्या' जातीचा असे दोन उमेदवार आले आणि त्याचे स्वतःचे नुकसान होणार नसेल तर तो खरंच मेरीट बघेल याची खात्री आहे? कि आमची संधी हिरावुन घेतात म्हणून खालच्या जातवाल्यावर मेरिट असुन राग काढेल आणि घरी पाठवेल?
ह्या प्रश्नाचे उत्तर आपण देण्याचे टाळले आहे का? कारण 'मागास वर्गीयान्बद्दल तीव्र संताप निर्माण होतो' अशी परिस्थिती आपण पाहिल्याचे स्वतःच सांगितले आहे. त्याआधारित प्रश्न होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

त जो

नाखु
Wed, 02/03/2016 - 10:39 नवीन
साफ असहमत. कांबळे, जोशी, पाटील, देशपांडे, इंगळे, कुलकर्णी, जाधव, जोग, क्षिरसागर ठळक हे किमान ५-६ जातीत असते आपल्याला अपेक्षीत असलेल्या आणि टोमणे द्यायला अश्या आणि धाग्यातल्या सुद्धा. मग तुमच्या आणि धाग्यातील मुलांच्या विचारसरणीत काय फरक राहिला ते सांगा??? जातीवर निवड निकष न पाहिलेला पण प्रांतवार निवड निकष मात्र खात्रीने पाहिलेला (मल्याळी,बिहारी) अनुभवी चाकरमानी नाखु.
आणि हो डॉ.नी त्यांच्या इथे (मिपावर) मांडलेल्या वेळोवेळच्या अनुभवात कुठेही जातीचा-धर्माचा उल्लेख केलेला नाहीच ( अगदी त्यांना त्रास्/अडवणूक करणार्या वरिष्ठांचाही). तेव्हा अशी विखारी प्रतिक्रिया देण्यापुर्वी जरा विचार कराच ही आग्रही मागणी आपला मोगा होऊ नये म्हणून शुभेच्छा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

@नादखुळा,

तर्राट जोकर
Wed, 02/03/2016 - 11:21 नवीन
@नादखुळा, जसे डॉक्टरांचे अनुभव आहेत तसे माझेही असू शकतात. इथे मी माझी नव्हे तर जातीयवाद पाळणार्‍यांची विचारसरणी दाखवत आहे. अशी विचारसरणी ही मिपाच्या कोणत्याही सदस्यामधे आहे असे म्हटले नाही. डॉ. खरे यांनी 'मागास वर्गीयान्बद्दल तीव्र संताप निर्माण होतो' अशी परिस्थिती आपण पाहिल्याचे स्वतःच सांगितले आहे. ही त्यांची स्वतःची विचारसरणी असल्याचे कुणी म्हटले नाही. त्यांचे निरिक्षण आहे असे समजले जाते. मी माझे निरिक्षण मांडले तर ते माझी विचारसरणी म्हणून आपण समजता आहात. हा सदस्यांप्रति असलेला बायस आहे काय? डॉक्टरांचे आजवरचे लिखाण, त्यांचा व्यासंग, अभ्यास, विविध विषयावरिल त्यांचे खोलवर असलेले ज्ञान, योग्य पद्धतीने वैद्यकिय मुद्द्यावरचे समुपदेशन, लष्करी सेवेतली नोकरी, सामाजिक कार्य ह्या बाबी लक्षात घेऊन त्यांची विचारसरणी वाईट नसेल असे मानता व तुलनेने मी मिसळपाववर काहीच लिहिले नाही, कुठलेही उपयोगी ज्ञान दिले नाही. काही विशिष्ट विषयांवर माझे काही मोजके प्रक्षोभक विचार बघून माझ्याबद्दल एक विशिष्ट मत बनवून ह्या धाग्यावर माझ्याच जातीबद्दलच्या विचारसरणीवर आपण प्रश्नचिन्ह उभे करता. हे कितपत योग्य? डॉ. खरे यांना त्यांच्या निरिक्षणावर आधारित एक प्रश्न विचारला. तो त्यांच्या विचारसरणीला विचारलेला नाही. धाग्यातल्या मुलासमोर अशी परिस्थिती आली तर काय होऊ शकतं याचं उत्तर अपेक्षित आहे. ते कुणीही द्यावं. खरे यांच्या विचारसरणीपेक्षा, अनुभवापेक्षा, आरक्षणाशिवाय भारत कसा असता व मागासजातींबद्दल उच्चजातींचे वागणे कसे असते ह्याबद्दल मला जास्त कुतूहल आहे. मूळ धाग्याच्या विषयास कोणताही फायदा न पोचवणारे निष्कारण व अवांतर वाद टाळलेलेच बरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

..

मोगा
Wed, 02/03/2016 - 11:29 नवीन
मोग्याची चिंता नका करुव?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

नाखु शी सहमत

अन्नू
Wed, 02/03/2016 - 11:42 नवीन
एका विशिष्ठ धर्मावर, जातीवर, संघटनेवर किंवा व्यक्तिवर चिखलफेक होइल अशी प्रतिक्रिया कृपया कोणीही देऊ नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

त जो साहेब

सुबोध खरे
Wed, 02/03/2016 - 11:41 नवीन
त जो साहेब माझे जातिंबद्दलचे ज्ञान फारच वाईट आहे हे मी मान्य करतो पण लष्करात जायच्या अगोदर बारावी पर्यंत त्याच्याशी फारसा संबंध आला नव्हता. तसेही आडनावावरून काय सांगता येते? कित्येक लोक माझी माझी शुद्ध हिंदी ऐकून मला उत्तर प्रदेशातील कायस्थ समजत( सक्सेना, बच्चन, माथुर ई आडनावे असलेले) खरे हे आडनाव मागासवर्गीयात असते हे माझ्या आईबरोबर एक बाई बी एड ला होत्या त्यांच्याकडून आईला कळले.( त्या बाईनी आईची जात विचारली) पाटील नाव मी ब्राम्हण, लेवा पाटीदार, राजपूत( भटक्या जमातीतील) ई बर्याच जातीत पाहिलेले आहे. जोशी हे तर भारतभर सर्वत्र सर्व जातीत आढळणारे नाव आहे. बाकी बर्याच आडनावाबद्दल असेच सांगता येईल राहिली गोष्ट मी ज्या ज्या निवड प्रक्रियेत होतो तिथे मला माझ्या हाताखाली असलेले तंत्रज्ञ किंवा डॉक्टर निवडायचे होते आणि लष्करात तर जातीचा काहीच संबंध नाही). त्यामुळे थॉमस, इब्राहीम, व्हर्घीस, सुनील( हा ख्रिश्चन होता हे क्रीसमस च्या वेळेस कळले). नाही म्हणायला एक फक्त मराठी शेरेकर म्हणून होता पण त्याची जात आजही मला माहित नाही. आपल्या सहाय्यकाची जात पाहण्यापेक्षा त्याचे कौशल्य पाहणे मला जास्त महत्त्वाचे वाटते कारण तो करत असलेल्या चुका तुम्हालाच निस्तरायला लागतात इतके साधे आहे. शिवाय तुम्हीच निवडलेला असेल तर दोष कुणाला देणार? असो. या जातीच्या दौडीत मी मागासलेलाच आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

लष्करात तर जातीचा काहीच संबंध

अन्नू
Wed, 02/03/2016 - 11:54 नवीन
लष्करात तर जातीचा काहीच संबंध नाही
अगदी बरोबर! डिफेन्स निवड प्रक्रीयेमध्ये कधीच असल्या गोष्टी पाहिल्या जात नाहीत. किंबहुना एकमेकांशी बोलताना वागतानाही ते कधी जात-धर्म यावरुन भेदभाव करत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हे अगदी खरंय डॉक्टरसाहेब,

संदीप डांगे
Wed, 02/03/2016 - 12:02 नवीन
हे अगदी खरंय डॉक्टरसाहेब, माझ्या आडनावावरून व व्यक्तिमत्वावरून कसलाही अंदाज येत नसल्याने बरेच लोक त्यांच्यातलाच समजतात. एकदा कॉलेजमधे तर मला फक्त दिसण्यावरून मुस्लिम समजून मारहाण होणार होती, नशीब कुणीतरी कुठे राहतो हे विचारले आणि मारायला उठलेले सॉरी सॉरी करायला लागले कारण त्यांनी मग मला बौद्ध समजले होते. अशा गमती जमती बर्‍याच घडतात. बाकी जातीवरुन सिलेक्शन कुठे बघितले नाही. नाखुकाका म्हणतात तसे दक्षिण भारतीय लोकांचे आपल्याच लोकांना चिकटवून घेणे बघितले, ती वशिलेबाजी तुम्ही म्हटली तशी सगळीकडेच असते. खास जात पाहून लोक निवडले जात असतील असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

धाग्यातल्या मुलासमोर अशी

तर्राट जोकर
Wed, 02/03/2016 - 12:18 नवीन
धाग्यातल्या मुलासमोर अशी परिस्थिती आली तर काय होऊ शकतं याचं उत्तर अपेक्षित आहे. ते कुणीही द्यावं. खरे यांच्या विचारसरणीपेक्षा, अनुभवापेक्षा, आरक्षणाशिवाय भारत कसा असता व मागासजातींबद्दल उच्चजातींचे वागणे कसे असते ह्याबद्दल मला जास्त कुतूहल आहे.
प्रस्तुत प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी असंबंधित मुद्दे पुढे येत आहेत. डॉ. खरे, आपण त्तर देण्याचं टाळत आहात. प्रश्न आपल्याच निरिक्षणावर आधारित आहे. १. उच्च जातीच्या मुलाला संधी हुकल्याने मागासवर्गियांबद्दल तीव्र संताप असतो. २. धाग्यात उल्लेखलेला मुलगा खालच्या जातवाल्याबद्दल आरक्षण व परंपराआधारित अपमानास्पद भावना ठेवुन आहे. ३. अशा परिस्थितीत संबंधित मुलगा कोणाला निवडेल, आपल्या जातवाल्याला की खालच्या जातवाल्याला? ह्याबद्दल कुणीच काही प्रतिसाद दिलेला नाही. बाकी गरज नसलेले, अवांतर, कथित अपमानस्पद काही असेल तर माननीय संपादक निर्णय घेण्यास समर्थ आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

त जोकर साहेब

सुबोध खरे
Wed, 02/03/2016 - 12:41 नवीन
त जोकर साहेब आपण म्हणताय अशीच परिस्थिती माझी स्वतःची होती. जेंव्हा मला ८७ % गुण होते तेंव्हा माझा प्रवेश दोन गुणांनी हुकला होता. ८७. ६६ ला जे जे रुग्णालयातील शेवटचा प्रवेश खुल्या वर्गात झाला होता. त्यावेळेस अनुसूचित जमातीच्या उमेदवारास ३७ % ला प्रवेश मिळाला होता.मी काही जाज्वल्य देशभक्त वगैरे नाही कि मला ए एफ एम सी तच/ लष्करातच जायचे होते. तुम्ही किंवा कुणीही दुसरा जितका देशभक्त आहे तितकाच मीही आहे. तेथे जाऊन मी अनुभव घेतले. भारतभर फिरलो. वेगवेगळे प्रदेश पाहिले. माणसे पाहिली.माझ्या ओठाला लागलेला प्याला पोटात गेला नव्हता पण म्हणून मी मागास वर्गीयांचा द्वेष करतो असे नाही. उच्चवर्गीय मुले आपला प्रवेश हुकला म्हणून मागासवर्गीयांचा द्वेष करतात असा आपला अभिनिवेश आहे असे आपल्या एकंदर प्रतिसादावरून वाटते. पण वस्तुस्थिती तशी नाही. I DONT HATE IN PLEURALS असे वूड हाउस म्हणाला होता ते सत्य आहे. आणी मला असेही वाटत नाही कि उच्च जातीतील माणसे केवळ जातीवर आधारित नोकर्या देतील. तसा "गैरसमज" मात्र मागासवर्गीयांचे "नेते" आपल्या अनुयायांच्या मनात भरवून देताना आणी त्यांना चिथावताना मात्र नक्की आढळतात आणी राजकारणी एकगठ्ठा मतांसाठी त्यांचा पाठपुरावा करतात. यांची दुकाने प्रथम बंद करणे आवश्यक आहे. तरच खरे जातीभेदाचे निर्मुलन होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

चर्चेत आपण मांडलेला मुद्दा

तर्राट जोकर
Wed, 02/03/2016 - 13:18 नवीन
चर्चेत आपण मांडलेला मुद्दा आपणच विसरुन जायचे आणि तो मुद्दा प्रतिपक्षानेच मांडला आहे अशा अर्थाने युक्तिवाद करायचे, ते कसे हे आपला प्रतिसाद पाहून लक्षात येईल. प्रस्तुत विधान आपल्या प्रतिसादातलं आहे:
एकाच आर्थिक सुस्थितीत असलेली दोन मुले एकाला आरक्षणामुळे जागा मिळते आणी दुसर्याला मिळत नाही यातून दुसर्या मुलाच्या(अर्थातच उच्च जातीच्या) मनात जाती बद्दल अधिकच तेढ निर्माण होते आणी त्या मुलाला मागास वर्गीयान्बद्दल तीव्र संताप निर्माण होतो आणी जातीभेदाचे निर्मुलन होण्या ऐवजी त्याला अधिकच खतपाणी मिळते हि स्थिती मी गेली कित्येक वर्षे मी पाहत आलो आहे.
आणि ह्या प्रतिसादात आपण म्हणता:
उच्चवर्गीय मुले आपला प्रवेश हुकला म्हणून मागासवर्गीयांचा द्वेष करतात असा आपला अभिनिवेश आहे असे आपल्या एकंदर प्रतिसादावरून वाटते. पण वस्तुस्थिती तशी नाही.
वरची दोन्ही परस्परविरोधी विधानं आपलीच आहेत. यात माझं काहीही कॉन्ट्रीब्युशन नाही. माझ्या सर्व प्रतिसादांमधे मी हा मुद्दा स्वतः मांडलेला नाही. मी तर आरक्षण व जातींबद्दलचे माझे मतही अजून मांडलेले नाही. धाग्यातल्या प्रसंगानुरुप काय घडु शकते याचा एक अंदाज केला. फक्त तुमच्या निरिक्षणाआधारे एक प्रश्न विचारला. त्याचे उत्तर तुम्ही देत नसून फक्त चर्चेत गरज नसलेले अनुभव व मते मांडत आहात. आता तर तुम्हीच म्हटलेलं विधान तुम्ही माझ्या नावावर ढकलून ती वस्तुस्थिती नाही असेही म्हणताय. चर्चा टू द पॉइंट राहावी असं पहिल्यापासून वाटतंय त्यामुळेच पहिल्या प्रतिसादापासून माझे सर्व प्रतिसाद एकाच प्रश्नाभोवती आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा