खग्रास सूर्यग्रहण
आज (२० मार्च २०१५) खग्रास सूर्यग्रहण झाले.
जगात अनेक ठिकाणी या घटनेला बरेच बरेवाईट (जास्त करून वाईट) संदर्भ असले तरी शास्त्रज्ञांच्या दृष्टीने ही एक दुर्मिळ पर्वणी असते. खंडग्रास सूर्यग्रहणाच्या मानाने खग्रास सूर्यग्रहण कमी वेळा होते. या प्रकारात चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकून टाकत असल्याने खंडग्रास सूर्यग्रहणात शक्य नसलेले अनेक शास्त्रीय प्रयोग या काही मिनिटांच्या काळात आटपण्यासाठी त्यांची लगबग चाललेली असते. त्याशिवाय, सूर्याचे अनेक अवस्थेतली प्रकाशचित्रे काढण्यासाठी त्या विषयातल्या तज्ज्ञ आणि हौशी लोकांनाही ही पर्वणीच वाटते. म्हणून हे सर्व लोक, ती काही मिनिटे पकडण्यासाठी, अनेक महिन्यांचे व्यवस्थापन करून, अनेक सहस्र किलोमीटरचा प्रवास करून, योग्य जागा पकडून, तळ ठोकून बसलेले असतात.
आजच्या ग्रहणाचे एक विशेष म्हणजे आजचा चंद्र "महाचंद्र (सुपरमून)" होता. चंद्र त्याच्या कक्षेत फिरताना जेव्हा पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो तेव्हा अर्थातच आकाशात दिसणार्या त्याचा आकार मोठा असतो. अशी अवस्था पौर्णिमा अथवा अमावास्येला आली तर तिला महाचंद्रावस्था म्हणतात. अर्थातच, अमावास्येचा महाचंद्र (त्याच्या मोठ्या दृश्य आकारामुळे) सूर्याला जास्तीत जास्त झाकतो. अश्या अवस्थेचे महत्त्व शास्त्रज्ञ आणि हौशी लोकांना फार असले तर नवल काय ?
आजचे सूर्यग्रहण उत्तर धृवाच्या जवळील ६४.४उत्तर ६.६पश्चिम या स्थलाच्या भोवतीच्या ४६३ किमीच्या चिंचोळ्या पट्टीत खग्रास स्वरूपात २ मिनिटे आणि ४६.४७ सेकंदासाठी दिसले. त्याची सर्वोच्च अवस्था ०९:४६:४७ (UTC) वाजता होती.
हे ग्रहण खग्रास अवस्थेत उत्तर अटलांटिक समुद्र, आर्क्टिक समुद्र, ग्रीनलंड, आईसलँड, आयर्लंड, युके, फॅरो बेटे, उत्तर नॉर्वे आणि मुरमान्स्क ओब्लस्ट येथे दिसले. उत्तर-पश्चिम आफ्रिकेच्या आणि युरोपच्या विशाल भूभागावर ते लहान-मोठ्या खंडग्रास स्वरूपात दिसले.
ग्रहण पृथ्वीवर कोणत्या भूभागात कसे दिसले हे दाखवणारे मानचित्र (जालावरून साभार)...
आणि तेच दाखविणारे हे दाखवणारे चलत्मानचित्र (जालावरून साभार)...
.
अश्या या निसर्गाच्या अप्रुपाची काही तज्ज्ञ, हौशे, नवशे आणि गवश्यांनी काढलेली काही प्रकाशचित्रे (जालावरून साभार)...
आणि तेच दाखविणारे हे दाखवणारे चलत्मानचित्र (जालावरून साभार)...
.
अश्या या निसर्गाच्या अप्रुपाची काही तज्ज्ञ, हौशे, नवशे आणि गवश्यांनी काढलेली काही प्रकाशचित्रे (जालावरून साभार)...
बर्लिनमध्ये दिसलेल्या सूर्याच्या (चंद्राप्रमाणे दिसणार्या) कला
खग्रास सूर्यग्रहणाची परमोच्च अवस्था (स्लावबार्ड)
खग्रास सूर्यग्रहणाची परमोच्च अवस्था संपून ते सुटायला लागल्यावर दिसणारी "हिर्याची अंगठी" (स्लावबार्ड)
बर्फाच्छादित भूमी आणि पर्वतशिखरांच्या पार्श्वभूमीवर "दिवसा झालेली रात्र" (स्लावबार्ड)
सूर्याची कोर (उत्तर इंग्लंड)
ग्रहणाचे कलात्मक प्रकाशचित्र : १
ग्रहणाचे कलात्मक प्रकाशचित्र : २
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान माहिती.
+++१११
धन्यवाद
छान माहिती!
मस्त माहिती
छान माहिती
माहितीपुर्ण लेख. आवडला.
मिपाकर सानिकास्वप्निल
मस्त लेख ! आवडला नेहेमीसारखाच
ग्रहण आवडलं.
२०१० साली झालेले खग्रास
वॉव..
मस्त लेख.
धन्यवाद !
उत्तम माहिती
माझ्या पोरीला शाळेत दाखवले,
उत्त्म माहिती!!
कौलारू आणि शाकारलेली घरं
किती छान..
माहिती आवडली आणि सानिकाची
झकास फोटू आणि माहिती.