Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शशिकांत ओक on Mon, 09/22/2014 - 17:52
लेखनविषय (Tags)
मांडणी
संस्कृती
भाषा
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
सद्भावना

जिव्हा शुद्धी एक राष्ट्रीय अभियान

पचा पच थुंकणे व तसेच येता जाता कशा न कशा कारणांनी शिव्या देणे हा आपला राष्ट्रीय टाईम पास आहे. माता व बहिणींवर अशा मेहरबानीयां फार होतात. `च्या यला` हे पालुपद जास्त अन् ग्राम्य शिवी कमी अशी आजची अवस्था आहे. बामणांच्या चिकन मटन खाण्यामुळे मागणी वाढून भाव चढले असे चेष्टेने म्हणतात. खरे खोटे माहिती नाही. पण शिव्यांच्या मक्तेदारीत गैरब्राह्मण समाजाच्या मुक्त संचारात ब्राह्मणी जिव्हा तितक्याच जिव्हाळ्याने चालताना ऐकून, 'लगे रहो' असा पवित्र संदेश द्यावासा वाटतो...! भाषा शुद्धीच्या चर्चा कानावर येतात. पण शिव्यांना 'चले जाव' करायला आपली जीभ का कचरावी? यावरून आठवले पूर्वी हवाईदलातील कार्यकाळात माझ्या मुखी ब्लडी,बार्टर्ड, ईडीयट,उल्लू के पठ्ठे आदी हीन अभिरुचीचे शब्द न कळत वास करून होते. मुले झाल्यावर त्यांचा अभ्यास घ्यायला सुरुवात अशा शब्दांनी नको असे पत्नीने साध्या शब्दात सुचवून जागे केले व वेळीच मी सावध झालो. असो... संस्कारक्षम बालवयातील मुलांसमोर वरिष्ठांनी मुखरस थुंकण्याच्या सवय़ीला व आपल्या ग्राम्य भाषा वैभवाला कटाक्षाने अव्हेरले तर ते योग्य ठरणार नाही काय? असे एक राष्ट्रीय अभियान सुरू करायला नमोंनी १५ ऑगस्ट च्या मुहूर्तावर लाल किल्ल्यावरील आपल्या दणकेबाज शैलीत उद्घोषणा करायला हवी काय? ते मिपाकरांनी आपल्या पासून सुरुवात केली तर नाही का चालणार?
  • Log in or register to post comments
  • 37673 views

प्रतिक्रिया

Submitted by विटेकर on Mon, 09/22/2014 - 18:09

Permalink

ह्म्म...

आहे खरा चघळण्याचा विषय ! मी पैला !
  • Log in or register to post comments

Submitted by शशिकांत ओक on Mon, 09/22/2014 - 20:49

In reply to ह्म्म... by विटेकर

Permalink

थुंकना मना है...

चघळून थुंकण्याचा नाही!
  • Log in or register to post comments

Submitted by मृगनयनी on Mon, 09/29/2014 - 11:45

In reply to थुंकना मना है... by शशिकांत ओक

Permalink

+++ १००

+++ १००
  • Log in or register to post comments

Submitted by शशिकांत ओक on Tue, 09/23/2014 - 01:31

In reply to ह्म्म... by विटेकर

Permalink

जिव्हा सफाई अभियान...

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Mon, 09/22/2014 - 19:15

Permalink

मेंदुच्या मनात या सुबोध

मेंदुच्या मनात या सुबोध जावडेकरांच्या पुस्तकात माणसे शिव्या का देतात? असे एक प्रकरण आहे.पुस्तक वाचनीय आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user काउबॉय

Submitted by काउबॉय on Mon, 09/22/2014 - 19:28

Permalink

आप जॉइन केलं काय ?

नाही थूंकने बाबत आक्षेप मान्य कारण ते आपोआप स्वच्छ होत नाही पण शिव्याही द्यायच्या नाहित म्हणजे....क्ष्क्ष्क्ष्फ़्फ़्ध्ब्द
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Mon, 09/22/2014 - 19:34

Permalink

काही पण! शिव्या द्यायला बंदी?

काही पण! शिव्या द्यायला बंदी?? ऑरवेलच्या "थॉट पोलीस"ची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 09/22/2014 - 19:37

Permalink

पण शिव्या हा किमान

पण शिव्या हा किमान गधेगाळकालीन वारसा आहे. अन तोही थेट मातृकुलाशी गर्दभाचा संबंध जोडणारा. ती पवित्र परंपरा टाकवेल तर लोकच "तेहाची माये...गाढवे...." इ.इ. उद्धार करतील =))
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 09/23/2014 - 22:38

In reply to पण शिव्या हा किमान by बॅटमॅन

Permalink

शिखर शिंगणापूर

=)) शिखर शिंगणापूर येथील महादेवाच्या देवळात १६३० सालचा एक घंटालेख आहे. घंटेवर मराठी भाषेत पुढीलप्रमाणे मजकूर कोरलेला आहे. वाग्या तुरंबेकार हे कोण घेईल तो मात्रागमनी १६३०"
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 09/23/2014 - 23:32

In reply to शिखर शिंगणापूर by प्रचेतस

Permalink

हाण तेच्या मारी

हाण तेच्या मारी =)) म्हणजे मात्रागमनी हा शब्द पेशवाईच्या अगोदरपासून लेखनप्रचारात आहे म्हणायचा!!! रोचक आहे. :) मला आपले 'मात्रागमनी नजीब' इ.इ. च माहिती होते.
  • Log in or register to post comments

Submitted by पोटे on Mon, 09/22/2014 - 20:09

Permalink

.

पुलंच्या ती फुलराणी नाटकातही शिव्यांचे मनोवैज्ञानिक विश्लेषण केले आहे. मराठी शिव्या वर्गातील आहेत... पु ..... फो..... भो... मा..... त्याचेही स्पष्टीकरण त्यात आहे. :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Mon, 09/22/2014 - 20:53

Permalink

शशीकाका ..धागा बोल्ड मध्ये

शशीकाका ..धागा बोल्ड मध्ये टाकण्याचे प्रयोजन समजले नाही ...की बोल्ड करुन पका काका ची विकेट काढायची होती ;) ( नारायण नारायण ) नारद मुनी ;)
  • Log in or register to post comments

Submitted by शशिकांत ओक on Mon, 09/22/2014 - 20:58

Permalink

नारायण नारायण...!

कळ काढतात त्यांच्या बद्दल न लिहिलेले बरे... असा पौराणिक संदर्भ आहे असे म्हणतात.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Mon, 09/22/2014 - 21:02

In reply to नारायण नारायण...! by शशिकांत ओक

Permalink

कळ काढत होतो हे मान्य !! पण

कळ काढत होतो हे मान्य !! पण प्रश्न अनुत्तरीत ठेवलात :)
  • Log in or register to post comments

Submitted by बाबा पाटील on Mon, 09/22/2014 - 21:03

Permalink

शिव्या म्हणजे....

उच्च रक्तदाब कमी करण्याचे व हिंसा टाळण्याचे अत्यंत महत्वपुर्ण साधन आहे हो,कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त भावना व्यक्त फक्त शिव्यांनेच होतात,शिव्या नाही दिल्या तर माणसे वेडी होतील नाहीतर सरळ एकमेकांवर हात उचलतील,चालेल का ?
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Tue, 09/23/2014 - 15:25

In reply to शिव्या म्हणजे.... by बाबा पाटील

Permalink

सहमत.

निदान मनातल्या मनात / किंवा तिसर्‍याच कुणासमोर तरी खच्चून शिव्या घालून सगळा वैताग vent out केलेला बरा असतो. एकदम थंड वाटतं अश्या शिव्या घातल्या की. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Mon, 09/22/2014 - 21:34

Permalink

कैच्या कै!!

ते मिपाकरांनी आपल्या पासून सुरुवात केली तर नाही का चालणार?
णाय चालनार!!!!!!!!!!! अवो श्या देता येनार नसतील तर मग मिपाकर र्‍हायाचं कशाला? सरळ नमोगतीच होऊ की!!! उलट तुमी असला कायतरी येडाखुळा इचार मांडल्याबद्दल प्रायाश्चित्त म्हणून आमाला आता पुढले सात दिवस खच्चून श्या देन्याचा संकल्प करावा लागतोय!!! (संबंधितांनी नोंद घ्यावी!!) :)
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Mon, 09/22/2014 - 21:46

Permalink

अर्थ महत्वाचा

जसे की 'गांx फाटणे' म्हणजे काही खरोखर फाटत नाही काही. रूपक आहे ते. :)) शिव्या ह्या आभूषण/अलंकार असतात. योग्य जागी वापरल्यास त्या भाषेची शोभा वाढवतात. पिलीज्य, असू देत की त्यांना.
  • Log in or register to post comments

Submitted by शशिकांत ओक on Mon, 09/22/2014 - 21:48

Permalink

धन्यवाद

प्रतिज्ञा काही मानसिकता बदल करायला केल्या जाव्यात. जे 'हम नही सुधरेंगे' असा हट्ट करून बसतात त्यांच्या साठी हा धागा नाही...
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Mon, 09/22/2014 - 22:38

Permalink

'श्या' देण्याच्या स्पेशल

'श्या' देण्याच्या स्पेशल प्लेसेस फिक्स करुन अकॉर्डिंगली त्यांना एक्झिक्युट करावं. श्या देणं अ‍ॅब्सोल्युटली बंद करणं इज इन्ज्युरस टु हेल्थ. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 09/22/2014 - 23:36

Permalink

ठीक आहे..मी ही असा संकल्प एक

ठीक आहे..मी ही असा संकल्प एक दोन वेळा केला(होता),काहि कालावधी पर्यंत पाळ्लाही(होता) पण मग मनात आलेल्या त्या अनुषंगिक भावना व्यक्त कश्या करायच्या कोणत्या भाषेत? उदा:- माझा शेजारी माझ्याकडून पैसे उसने घेतो,आणि नेहमी (स्वतःच) सांगितलेल्या वेळेच्या कित्येक दिवस पुढे नंतर देतो. ते ही जिन्यात येता जाता नजरानजर झाली..तर अश्यावेळी मी मागितले तर, "बुडवणार नाही हो तुमचे पैशे..देतो २ दिवसात" असे उर्मट उत्तर येते. मी मग त्याला, "अरे भिकारड्या ..अशी शिवी हसडून मनातला राग व्यक्त करतो. इमारतीतली आजुबाजुची लहानमुलं हे ऐकतात. आता तुमच्या म्हणण्यानुसार ,मग मी इथे काय करावं. शब्द बदलावे? की भावना बदलून शांत बोलावं??? ..ज्याचा त्या उर्मट शेजार्‍यावर अजिबातच परिणाम घडत नाही! :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Tue, 09/23/2014 - 01:14

In reply to ठीक आहे..मी ही असा संकल्प एक by अत्रुप्त आत्मा

Permalink

मनस्ताप टाळा.

>>>>माझा शेजारी माझ्याकडून पैसे उसने घेतो,आणि नेहमी (स्वतःच) सांगितलेल्या वेळेच्या कित्येक दिवस पुढे नंतर देतो. देता कशाला? देऊ नका.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 09/23/2014 - 01:23

In reply to मनस्ताप टाळा. by प्रभाकर पेठकर

Permalink

@देता कशाला? देऊ नका.>>> हां

@देता कशाला? देऊ नका.>>> हां निर्णय अमलात आला सुद्धा कधीच! पण तुम्ही दिलेलं उत्तर ही पळवाट झाली. त्याने मूळ समस्येवर तोडगा निघत नाही. कारण तुमची मांडणीच पायाहीन आणी निरर्थक आहे! :)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 09/23/2014 - 01:27

In reply to @देता कशाला? देऊ नका.>>> हां by अत्रुप्त आत्मा

Permalink

@कारण तुमची मांडणीच पायाहीन

@कारण तुमची मांडणीच पायाहीन आणी निरर्थक आहे! >>> हे वाक्य रद्दबातल समजावं , ते ढागाविष याला लागू पडणार आहे. सदर प्रतिसाद ओकांचा वाटल्यामुळे ते लिहील गेलं.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Tue, 09/23/2014 - 01:28

In reply to @देता कशाला? देऊ नका.>>> हां by अत्रुप्त आत्मा

Permalink

नाही हो....

>>> त्याने मूळ समस्येवर तोडगा निघत नाही. कारण तुमची मांडणीच पायाहीन आणी निरर्थक आहे! नाही हो. तुम्हाला मनस्ताप होऊ नये आणि कोणाला शिव्या देण्याची वेळ तुमच्यावर येऊ नये, इतका सोज्वळ विचार माझ्या प्रतिसादामागे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by शशिकांत ओक on Mon, 09/22/2014 - 23:49

Permalink

शिवी न देण्याचा..

मित्रा, आपण प्रयत्न तरी केलात, पण अपशब्द बोलले म्हणून तुम्हाला पैसे मिळाले नाहीत. पण एक मानसिक समाधान मिळाल्यासारखे वाटले. पण ज्याला उद्देशून ते बोलले गेले त्यांनी निगरगट्टपणा सोडावा व आपले देणे परत करावे हा माफक उद्देश मात्र उलट न देण्यात परिवर्तित झाला असे ही होऊ शकेल.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 09/22/2014 - 23:58

In reply to शिवी न देण्याचा.. by शशिकांत ओक

Permalink

दरवेळेसच्या शिवीप्रयोगानी

दरवेळेसच्या शिवीप्रयोगानी किंवा तत्सम कृतीनीच पैसे मिळाले आहेत. त्या आधीच्या शांत बोलण्याच्या धोरणानी निराशा आणि वैफल्य पदरी आलं होतं. औरंगजेब शांततावचनांनी बदलत नसतात हो..तिथे शिव्याच पाहिजेत!
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक.कुवेत on Tue, 09/23/2014 - 00:17

In reply to दरवेळेसच्या शिवीप्रयोगानी by अत्रुप्त आत्मा

Permalink

दरवेळेसच्या शिवीप्रयोगानी किंवा तत्सम कृतीनीच पैसे मिळाले आहेत.

आँ बुवा तुम्हि सुद्धा??
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 09/23/2014 - 01:17

In reply to दरवेळेसच्या शिवीप्रयोगानी किंवा तत्सम कृतीनीच पैसे मिळाले आहेत. by दिपक.कुवेत

Permalink

@आँ बुवा तुम्हि सुद्धा??>>>

@आँ बुवा तुम्हि सुद्धा??>>> :-D काय करणार दादा!? नाविलाज जाल्याव्? कै वेळे ला शिवी हाच मंत्र होतो,तर काही वेळे ला मंत्र ही पण शिवी होते! :-D मानवी जीवन! नाविलाज रे नाविलाज!!!
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Tue, 09/23/2014 - 10:26

In reply to @आँ बुवा तुम्हि सुद्धा??>>> by अत्रुप्त आत्मा

Permalink

एखाद्या लग्नकार्यात शिवी

एखाद्या लग्नकार्यात शिवी हासडू नका म्हणजे झालं
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 09/23/2014 - 14:31

In reply to एखाद्या लग्नकार्यात शिवी by खटपट्या

Permalink

@लग्नकार्यात शिवी हासडू नका

@लग्नकार्यात शिवी हासडू नका म्हणजे झालं >>> छ्छे!!! तिथे (असं काहि झालं की!) मंत्रच हसडायचे! =))
  • Log in or register to post comments

Submitted by शशिकांत ओक on Tue, 09/23/2014 - 00:30

In reply to दरवेळेसच्या शिवीप्रयोगानी by अत्रुप्त आत्मा

Permalink

शेजारणीला

पैसे द्या. शेजाऱ्याला टाळा.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 09/23/2014 - 12:06

In reply to शेजारणीला by शशिकांत ओक

Permalink

मग तर अजूनच कठीण. श्या

मग तर अजूनच कठीण. श्या देण्याचा पर्यायही नाही ! डोक्याची केवळ मंडई होईल =))
  • Log in or register to post comments

Submitted by विलासराव on Tue, 09/23/2014 - 12:16

In reply to मग तर अजूनच कठीण. श्या by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

मग तर अजूनच कठीण. श्या

मग तर अजूनच कठीण. श्या देण्याचा पर्यायही नाही ! डोक्याची केवळ मंडई होईल हा हा हा , अनुभव हाच गुरु. श्या देण्याचा पर्यायही नाही ! बरोबर . पन ह्याला कायतरी पर्याय असावा हेच पटते. काय म्हणतात ना एक दरवाजा बंद झाला तर दुसरा उघडतो वगैरे. आपल्याला तर श्या दिल्याशिवाय होत नाही बॉ. श्या नं देणं /देता येणं हे माझ्यासाठी विशेष कौशल्याचं काम आहे. कूठे शिकवणी वगैरे चालते का ह्या विषयाची?
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Tue, 09/23/2014 - 00:17

Permalink

सुसंस्कृत नागरी शब्द कोणते?

हल्ली अमेरिकेत पूर्वीच्या काही शब्दांऐवजी नवे जरा सभ्य शब्द वापरण्याचे फ्याड आहे म्हणे, त्याप्रमाणे धागाकर्त्याने मराठीतील ग्राम्य शब्दांऐवजी तोच अर्थ वहन करणार्‍या सुसंस्कृत नागरी शब्दांचा कोश निर्माण करावा, ही विनंती. (उदा: गणिकामध्यस्थ, भगिनीमैथुनप्रवण इ.)
  • Log in or register to post comments

Submitted by मार्क ट्वेन on Tue, 09/23/2014 - 00:26

In reply to सुसंस्कृत नागरी शब्द कोणते? by चित्रगुप्त

Permalink

:) कसला भिक्षुणीगामी

:) :) :) कसला भिक्षुणीगामी प्रतिसाद आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by शशिकांत ओक on Tue, 09/23/2014 - 00:33

In reply to :) कसला भिक्षुणीगामी by मार्क ट्वेन

Permalink

अमेरिकेत...

काळ्ळ्यांना आफ्रो अमेरिकन असे म्हटले तरी माणसे तीच... त्याच मापाने शिवी देणे सोडणार नाही फक्त फुल्या फुल्या असे म्हणून वेळ साजरी करेन....
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Tue, 09/23/2014 - 00:54

In reply to सुसंस्कृत नागरी शब्द कोणते? by चित्रगुप्त

Permalink

हो.... माझा एक मित्र प्रेमाने

हो.... माझा एक मित्र प्रेमाने दुसर्याला "यू रेंट" म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 09/23/2014 - 01:32

In reply to हो.... माझा एक मित्र प्रेमाने by आदूबाळ

Permalink

धन्य....

धन्य.... =))
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 09/23/2014 - 01:30

In reply to सुसंस्कृत नागरी शब्द कोणते? by चित्रगुप्त

Permalink

___/\___

___/\___ =))
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 09/23/2014 - 08:47

In reply to सुसंस्कृत नागरी शब्द कोणते? by चित्रगुप्त

Permalink

(उदा: गणिकामध्यस्थ,

(उदा: गणिकामध्यस्थ, भगिनीमैथुनप्रवण इ.)
=))
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 09/23/2014 - 12:58

In reply to सुसंस्कृत नागरी शब्द कोणते? by चित्रगुप्त

Permalink

हा हा हा गणिकामध्यस्थ लैच

हा हा हा =)) गणिकामध्यस्थ लैच आवडल्या गेले आहे _/\_ दुसर्‍या शब्दाला 'स्वस्रागमनी' हा एक सुटसुटीत पर्याय सुचवतो. आमच्या एका मित्राने तयार केलेला हा शब्द. झालंच तर रासभीपुत्र, गणिकासुत, गमनव्याकुल, भगनंदन, इ.इ. पर्यायही विचारात घेतल्या जावेत ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 09/23/2014 - 13:00

In reply to हा हा हा गणिकामध्यस्थ लैच by बॅटमॅन

Permalink

अश्वारोहण हा शब्द उलट्या

अश्वारोहण हा शब्द उलट्या अर्थे वापरला गेलेला आठवला.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 09/23/2014 - 14:46

In reply to अश्वारोहण हा शब्द उलट्या by प्यारे१

Permalink

वा! तोही एक मस्त शब्द आहे.

वा! तोही एक मस्त शब्द आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 09/23/2014 - 16:39

In reply to वा! तोही एक मस्त शब्द आहे. by बॅटमॅन

Permalink

शष्प !!

शष्प हाही एक सुरेख शब्द सापडलाय, आपल्याला बोलल्याचं समाधान आणि ऐकणार्‍याला शष्प चा अर्थ शष्प माहित नसल्याने त्याला सभ्य काहीतरी ऐकल्याचं समाधान!! ;) या शष्पवरुन आमच्या मित्राने 'काय रे शष्पू!!' अशी एक नवीन हाक तयार केली आहे. =))))
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 09/23/2014 - 16:53

In reply to शष्प !! by सूड

Permalink

या शष्पवरुन आमच्या मित्राने

या शष्पवरुन आमच्या मित्राने 'काय रे शष्पू!!' अशी एक नवीन हाक तयार केली आहे. *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 09/23/2014 - 17:55

In reply to शष्प !! by सूड

Permalink

शष्पू =)) =)) धन्य _/\_

शष्पू =)) =)) =)) =)) =)) धन्य _/\_ हे म्हणजे मुलाचं नाव शष्प असेल तर त्याच्या गर्लफ्रेंड किंवा बायकोने लाडात त्याला बिलगून वगैरे हाक मारल्यापैकी - "ए काऽय रे शष्पू" इ.इ.इ.
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Mon, 09/29/2014 - 11:37

In reply to शष्प !! by सूड

Permalink

यावरून मिपावर काही

यावरून मिपावर काही महिन्यांपूर्वी झालेला किस्सा आठवला. एका स्त्री आयडीने एका पुरुष आयडीला असभ्य बोलण्यावरुन झापताना हा शब्द वापरला होता. तिला बिचारीला विरोधाभास लक्षात आला नसावा. ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 09/29/2014 - 14:59

In reply to यावरून मिपावर काही by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

नाही आला ते बरंच आहे, नैतर

नाही आला ते बरंच आहे, नैतर शष्प काही उरलं नस्तं मिपावरचं बरंचसं वाङ्मय ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बालगंधर्व on Mon, 09/29/2014 - 15:20

In reply to यावरून मिपावर काही by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

शश्प हे शब्दाचा अर्थ नककि कय

शश्प हे शब्दाचा अर्थ नककि कय असतो हे कुनि मला सनगेल का? म्हनजे तो चन्गला श्बद आहे का एक शिवि अहे?अनि तो अपन कुनासन्गे वपरु शत्को?
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com