पचा पच थुंकणे व तसेच येता जाता कशा न कशा कारणांनी शिव्या देणे हा आपला राष्ट्रीय टाईम पास आहे. माता व बहिणींवर अशा मेहरबानीयां फार होतात. `च्या यला` हे पालुपद जास्त अन् ग्राम्य शिवी कमी अशी आजची अवस्था आहे.
बामणांच्या चिकन मटन खाण्यामुळे मागणी वाढून भाव चढले असे चेष्टेने म्हणतात. खरे खोटे माहिती नाही. पण शिव्यांच्या मक्तेदारीत गैरब्राह्मण समाजाच्या मुक्त संचारात ब्राह्मणी जिव्हा तितक्याच जिव्हाळ्याने चालताना ऐकून, 'लगे रहो' असा पवित्र संदेश द्यावासा वाटतो...!
भाषा शुद्धीच्या चर्चा कानावर येतात. पण शिव्यांना 'चले जाव' करायला आपली जीभ का कचरावी?
यावरून आठवले पूर्वी हवाईदलातील कार्यकाळात माझ्या मुखी ब्लडी,बार्टर्ड, ईडीयट,उल्लू के पठ्ठे आदी हीन अभिरुचीचे शब्द न कळत वास करून होते. मुले झाल्यावर त्यांचा अभ्यास घ्यायला सुरुवात अशा शब्दांनी नको असे पत्नीने साध्या शब्दात सुचवून जागे केले व वेळीच मी सावध झालो. असो...
संस्कारक्षम बालवयातील मुलांसमोर वरिष्ठांनी मुखरस थुंकण्याच्या सवय़ीला व आपल्या ग्राम्य भाषा वैभवाला कटाक्षाने अव्हेरले तर ते योग्य ठरणार नाही काय?
असे एक राष्ट्रीय अभियान सुरू करायला नमोंनी १५ ऑगस्ट च्या मुहूर्तावर लाल किल्ल्यावरील आपल्या दणकेबाज शैलीत उद्घोषणा करायला हवी काय? ते मिपाकरांनी आपल्या पासून सुरुवात केली तर नाही का चालणार?
पण शिव्या हा किमान गधेगाळकालीन वारसा आहे. अन तोही थेट मातृकुलाशी गर्दभाचा संबंध जोडणारा. ती पवित्र परंपरा टाकवेल तर लोकच "तेहाची माये...गाढवे...." इ.इ. उद्धार करतील =))
=))
शिखर शिंगणापूर येथील महादेवाच्या देवळात १६३० सालचा एक घंटालेख आहे.
घंटेवर मराठी भाषेत पुढीलप्रमाणे मजकूर कोरलेला आहे.
वाग्या तुरंबेकार
हे कोण घेईल तो मात्रागमनी
१६३०"
हाण तेच्या मारी =))
म्हणजे मात्रागमनी हा शब्द पेशवाईच्या अगोदरपासून लेखनप्रचारात आहे म्हणायचा!!! रोचक आहे. :)
मला आपले 'मात्रागमनी नजीब' इ.इ. च माहिती होते.
पुलंच्या ती फुलराणी नाटकातही शिव्यांचे मनोवैज्ञानिक विश्लेषण केले आहे.
मराठी शिव्या वर्गातील आहेत...
पु ..... फो..... भो... मा.....
त्याचेही स्पष्टीकरण त्यात आहे.
:)
उच्च रक्तदाब कमी करण्याचे व हिंसा टाळण्याचे अत्यंत महत्वपुर्ण साधन आहे हो,कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त भावना व्यक्त फक्त शिव्यांनेच होतात,शिव्या नाही दिल्या तर माणसे वेडी होतील नाहीतर सरळ एकमेकांवर हात उचलतील,चालेल का ?
ते मिपाकरांनी आपल्या पासून सुरुवात केली तर नाही का चालणार?
णाय चालनार!!!!!!!!!!!
अवो श्या देता येनार नसतील तर मग मिपाकर र्हायाचं कशाला? सरळ नमोगतीच होऊ की!!!
उलट तुमी असला कायतरी येडाखुळा इचार मांडल्याबद्दल प्रायाश्चित्त म्हणून आमाला आता पुढले सात दिवस खच्चून श्या देन्याचा संकल्प करावा लागतोय!!!
(संबंधितांनी नोंद घ्यावी!!)
:)
जसे की 'गांx फाटणे' म्हणजे काही खरोखर फाटत नाही काही. रूपक आहे ते. :))
शिव्या ह्या आभूषण/अलंकार असतात. योग्य जागी वापरल्यास त्या भाषेची शोभा वाढवतात. पिलीज्य, असू देत की त्यांना.
ठीक आहे..मी ही असा संकल्प एक दोन वेळा केला(होता),काहि कालावधी पर्यंत पाळ्लाही(होता) पण मग मनात आलेल्या त्या अनुषंगिक भावना व्यक्त कश्या करायच्या कोणत्या भाषेत? उदा:- माझा शेजारी माझ्याकडून पैसे उसने घेतो,आणि नेहमी (स्वतःच) सांगितलेल्या वेळेच्या कित्येक दिवस पुढे नंतर देतो. ते ही जिन्यात येता जाता नजरानजर झाली..तर अश्यावेळी मी मागितले तर, "बुडवणार नाही हो तुमचे पैशे..देतो २ दिवसात" असे उर्मट उत्तर येते. मी मग त्याला, "अरे भिकारड्या ..अशी शिवी हसडून मनातला राग व्यक्त करतो. इमारतीतली आजुबाजुची लहानमुलं हे ऐकतात. आता तुमच्या म्हणण्यानुसार ,मग मी इथे काय करावं. शब्द बदलावे? की भावना बदलून शांत बोलावं??? ..ज्याचा त्या उर्मट शेजार्यावर अजिबातच परिणाम घडत नाही! :)
@देता कशाला? देऊ नका.>>> हां निर्णय अमलात आला सुद्धा कधीच!
पण तुम्ही दिलेलं उत्तर ही पळवाट झाली. त्याने मूळ समस्येवर तोडगा निघत नाही. कारण तुमची मांडणीच पायाहीन आणी निरर्थक आहे! :)
@कारण तुमची मांडणीच पायाहीन आणी निरर्थक आहे! >>> हे वाक्य रद्दबातल समजावं , ते ढागाविष याला लागू पडणार आहे. सदर प्रतिसाद ओकांचा वाटल्यामुळे ते लिहील गेलं.
>>> त्याने मूळ समस्येवर तोडगा निघत नाही. कारण तुमची मांडणीच पायाहीन आणी निरर्थक आहे!
नाही हो. तुम्हाला मनस्ताप होऊ नये आणि कोणाला शिव्या देण्याची वेळ तुमच्यावर येऊ नये, इतका सोज्वळ विचार माझ्या प्रतिसादामागे आहे.
मित्रा,
आपण प्रयत्न तरी केलात, पण अपशब्द बोलले म्हणून तुम्हाला पैसे मिळाले नाहीत. पण एक मानसिक समाधान मिळाल्यासारखे वाटले. पण ज्याला उद्देशून ते बोलले गेले त्यांनी निगरगट्टपणा सोडावा व आपले देणे परत करावे हा माफक उद्देश मात्र उलट न देण्यात परिवर्तित झाला असे ही होऊ शकेल.
@आँ बुवा तुम्हि सुद्धा??>>> :-D काय करणार दादा!? नाविलाज जाल्याव्? कै वेळे ला शिवी हाच मंत्र होतो,तर काही वेळे ला मंत्र ही पण शिवी होते! :-D
मानवी जीवन! नाविलाज रे नाविलाज!!!
मग तर अजूनच कठीण. श्या देण्याचा पर्यायही नाही ! डोक्याची केवळ मंडई होईल
हा हा हा , अनुभव हाच गुरु.
श्या देण्याचा पर्यायही नाही !
बरोबर . पन ह्याला कायतरी पर्याय असावा हेच पटते. काय म्हणतात ना एक दरवाजा बंद झाला तर दुसरा उघडतो वगैरे.
आपल्याला तर श्या दिल्याशिवाय होत नाही बॉ. श्या नं देणं /देता येणं हे माझ्यासाठी विशेष कौशल्याचं काम आहे.
कूठे शिकवणी वगैरे चालते का ह्या विषयाची?
हल्ली अमेरिकेत पूर्वीच्या काही शब्दांऐवजी नवे जरा सभ्य शब्द वापरण्याचे फ्याड आहे म्हणे, त्याप्रमाणे धागाकर्त्याने मराठीतील ग्राम्य शब्दांऐवजी तोच अर्थ वहन करणार्या सुसंस्कृत नागरी शब्दांचा कोश निर्माण करावा, ही विनंती.
(उदा: गणिकामध्यस्थ, भगिनीमैथुनप्रवण इ.)
हा हा हा =)) गणिकामध्यस्थ लैच आवडल्या गेले आहे _/\_
दुसर्या शब्दाला 'स्वस्रागमनी' हा एक सुटसुटीत पर्याय सुचवतो. आमच्या एका मित्राने तयार केलेला हा शब्द.
झालंच तर रासभीपुत्र, गणिकासुत, गमनव्याकुल, भगनंदन, इ.इ. पर्यायही विचारात घेतल्या जावेत ;)
शष्प हाही एक सुरेख शब्द सापडलाय, आपल्याला बोलल्याचं समाधान आणि ऐकणार्याला शष्प चा अर्थ शष्प माहित नसल्याने त्याला सभ्य काहीतरी ऐकल्याचं समाधान!! ;)
या शष्पवरुन आमच्या मित्राने 'काय रे शष्पू!!' अशी एक नवीन हाक तयार केली आहे. =))))
शष्पू =)) =)) =)) =)) =)) धन्य _/\_
हे म्हणजे मुलाचं नाव शष्प असेल तर त्याच्या गर्लफ्रेंड किंवा बायकोने लाडात त्याला बिलगून वगैरे हाक मारल्यापैकी -
"ए काऽय रे शष्पू" इ.इ.इ.
यावरून मिपावर काही महिन्यांपूर्वी झालेला किस्सा आठवला. एका स्त्री आयडीने एका पुरुष आयडीला असभ्य बोलण्यावरुन झापताना हा शब्द वापरला होता. तिला बिचारीला विरोधाभास लक्षात आला नसावा. ;-)
प्रतिक्रिया
ह्म्म...
थुंकना मना है...
+++ १००
जिव्हा सफाई अभियान...
मेंदुच्या मनात या सुबोध
आप जॉइन केलं काय ?
काही पण! शिव्या द्यायला बंदी?
पण शिव्या हा किमान
शिखर शिंगणापूर
हाण तेच्या मारी
.
शशीकाका ..धागा बोल्ड मध्ये
नारायण नारायण...!
कळ काढत होतो हे मान्य !! पण
शिव्या म्हणजे....
सहमत.
कैच्या कै!!
अर्थ महत्वाचा
धन्यवाद
'श्या' देण्याच्या स्पेशल
ठीक आहे..मी ही असा संकल्प एक
मनस्ताप टाळा.
@देता कशाला? देऊ नका.>>> हां
@कारण तुमची मांडणीच पायाहीन
नाही हो....
शिवी न देण्याचा..
दरवेळेसच्या शिवीप्रयोगानी
दरवेळेसच्या शिवीप्रयोगानी किंवा तत्सम कृतीनीच पैसे मिळाले आहेत.
@आँ बुवा तुम्हि सुद्धा??>>>
एखाद्या लग्नकार्यात शिवी
@लग्नकार्यात शिवी हासडू नका
शेजारणीला
मग तर अजूनच कठीण. श्या
मग तर अजूनच कठीण. श्या
सुसंस्कृत नागरी शब्द कोणते?
:) कसला भिक्षुणीगामी
अमेरिकेत...
हो.... माझा एक मित्र प्रेमाने
धन्य....
___/\___
(उदा: गणिकामध्यस्थ,
हा हा हा गणिकामध्यस्थ लैच
अश्वारोहण हा शब्द उलट्या
वा! तोही एक मस्त शब्द आहे.
शष्प !!
या शष्पवरुन आमच्या मित्राने
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!शष्पू =)) =)) धन्य _/\_
यावरून मिपावर काही
नाही आला ते बरंच आहे, नैतर
शश्प हे शब्दाचा अर्थ नककि कय
Pagination