उडत्या तबकड्यांचे गूढ आणि सैन्य दलातील भोळसटपणा

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
6 Nov 2012 - 10:48 am

चीनच्या सरहद्दीजवळ उडत्या तबकड्यांचे गूढ आणि सैन्य दलातील भोळसटपणा

उडत्या तबकड्या किंवा आकाशात (बातमी नुसार) 3 ते 5 तास तरंगत राहणाऱ्या त्या अज्ञात वस्तू वस्तुतः मानवी मनाचे खेळ असतात. अशा खोट्या वस्तूंचे अस्तित्व भारतीय लष्कराने मान्य करणाऱे रिपोर्ट्स वरिष्ठांना पाठवले ही बातमी वाचून भारतीय सैन्य दलात अजूनही किती अंधश्रद्धा आहेत याचे प्रत्यक्ष प्रमाण मिळते. बातमी नुसार संरक्षण खात्यातील वैज्ञानिक संशोधन करणाऱ्या संस्थांना देखील 'काय आहे काही सांगता येत नाही' असे म्हणावे लागणे म्हणजे विज्ञानिक दृष्टीला आव्हान आहे. 'चीन व त्याचा पित्त्या पाकिस्तान यांची ही मतलबी चाल आहे' असे म्हणायला भरपूर वाव असताना 'त्यात त्यांचा संबंध नाही' असे खंडन करून सेनादलाने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे!
'तसे काही नसते हो' असे म्हणणाऱ्या भारतातील निर्मूलनवादींच्या दृष्टीने सैन्यदलाची यथेच्छ निर्भत्सना करायची सुवर्ण संधी त्यांना आहे. जागतिक स्तरावरील त्यांच्या भाईबंदांनी वरील बातमी असत्यावर आधारित असल्याने त्याची तातडीने दखल घेऊन सर्व (विशेषतः नोबेल विजेत्या) वैज्ञानिकांनी एकत्र येऊन एक निषेध खलिता सरकारला सादर करणे अत्यंतिक गरजेचे झाले आहे.
.......
ता.क. - असे म्हणतात की
1) चिनी वर्तमानपत्रात हीच बातमी 'साम्राज्यवादी भारताचा कुटिल डाव' अशी छापून आली असून त्यावर चीनतर्फे सीमावादावरील वरिष्ठांच्या पुढील बैठकीत या अज्ञात वस्तूंच्या 'फेकाफेकी' बद्दल तीव्र निषेधाचा मसूदा तयार होत आहे.
2) 'सनसनी' किंवा तत्सम नावाने दुकान चालवणाऱ्या वाहिन्यांनी आपापले छुपे कॅमेरे सरसावत आता आर्मीतील 'त्या अज्ञात वस्तूंच्या विहरणाची टेपची लीक करून मिळवायला शोधक पथके पाठवली आहेत.

मांडणीमुक्तकप्रतिक्रियामाध्यमवेधबातमी

प्रतिक्रिया

गवि's picture

6 Nov 2012 - 11:23 am | गवि

आँ ???

लिंक बिंक कै तरी द्या की हो आँ??????

ह्म्म... आत्ताच बातमी वाचली !
मध्यंतरी भारतीय शास्त्रज्ञांची एक टिम हिमालयात गेली होती तेव्ह्या त्यांनी एक गुढ उडणारी वस्तु /व्यक्ती पाहिली होती आणि त्याचा व्हिडीयो देखील बनवला होता. (आत्ता तो दुवा मला सापडत नाहीये.)
आत्ताच्या बातमीचा दुवा :- Indian Army Photographed UFO Over Himalayas

मी_आहे_ना's picture

6 Nov 2012 - 2:41 pm | मी_आहे_ना

मला वाटलेलं फक्त पृथ्वीवरच लोकसंख्या वाढतीये
;)
(कृ.ह.घ्या)

दादा कोंडके's picture

6 Nov 2012 - 2:59 pm | दादा कोंडके

...भारतीय सैन्य दलात अजूनही किती अंधश्रद्धा आहेत याचे प्रत्यक्ष प्रमाण मिळते.

याचं प्रमाण आम्हाला आधीच मिळालय हो! :)

श्री गावसेना प्रमुख's picture

6 Nov 2012 - 3:24 pm | श्री गावसेना प्रमुख

पुरावा 1असेल तर द्या ना

वेताळ's picture

6 Nov 2012 - 7:02 pm | वेताळ

नाड्या आवळायल्या हव्यात आताच.

कवितानागेश's picture

6 Nov 2012 - 9:19 pm | कवितानागेश

तिथे पाटी लावायची, 'येथे उडण्यास अथवा तरंगण्यास सक्त मनाई आहे'. :)

सौरभ२१११'s picture

8 Nov 2012 - 7:25 pm | सौरभ२१११

उडल्यास अथवा तरंगल्यास काही कारवाई केली जानार नाही असे पण पुधे लिहिले जावे का??

आबा's picture

6 Nov 2012 - 10:01 pm | आबा

लूक हू इज टॉकिंग !

शशिकांत ओक's picture

6 Nov 2012 - 10:57 pm | शशिकांत ओक

...आता मदनबाणांनी तर लिंक ही देऊन पुरावा सादर केला. आता ही बातमी खोटी आहे, असे निषेध खलिते केंव्हा काढले जातात याची वाट पहायची...
... लुक हू इज टॉकिंग ....येस, पर्सन हू फाईट्स आऊट फीयरलेसली...
.... सैनिकांच्या की आणखी कोणाच्या आवळायला पाहिजेत....

मंदार कात्रे's picture

7 Nov 2012 - 8:41 pm | मंदार कात्रे

कदाचित त्या तरंगत्या वस्तू म्हणजे चीन ने सोडलेली मानवरहित याने /हेरगिरी करणारी उपकरणे असू शकतात/,हा महत्त्वाचा मुद्दा सगळेच कसा विसरतात ?

चीन ची सातत्याने भारतीय हद्दीलगत घुसखोरी आणि पाकिस्तानी सहाय्याने पाकव्याप्त काश्मीर मध्ये लष्करी कारवाया सुरु असतात ...त्यांच्यावर विश्वास ठेवणे / यामागे हेरगिरीची शक्यता नाही,असे म्हणणे हा निव्वळ मूर्खपणा आहे..............

शशिकांत ओक's picture

8 Nov 2012 - 7:05 pm | शशिकांत ओक

निषेध खलिते केंव्हा काढले जातात याची वाट पहायची...

आले निषेध खलिते....
मटा मधील दि. ७ नोव्हे. च्या बातमीप्रमाणे - डेव्ह वुड यांच्या दाखला देऊन फक्त भारतातील नव्हे तर सर्वच उडत्या तबकड्यांवरील शोधकार्य बासनात गुंडाळावे असा सल्ला दिला आहे. बातमीप्रमाणे लडाख मधील घटनेवर ते मत व्यक्त करत होते असे म्हटलेले नाही पण बुद्धिवाद्यांना आवडत्या मतांना ताबडतोब प्रसिद्धी देण्याची तत्परता पत्रकारिता दाखवते हे पुन्हा सिद्ध झाले.
ज्या इस्रोमुळे ४१ कि मीवरील सोडलेल्या फुग्यात बसून आलेले जिवाणूंवर शोध करायला मिळाले असे अभिमानाने डॉ नारळीकरांनी म्हटले. त्याच इस्रोचे डॉ. कुलकर्णींच्या १४ लोकांच्या संघाने (त्यातील सहा जण शास्त्रज्ञ होते) निर्वाळा दिला की त्यांनी लडाख मधील मिळालेल्या त्या पुराव्याला पाहून अनुभवले. पुढे त्याचा रिपोर्ट पीएमओच्या कार्यालयात पाठवला पुढे त्याचे काय झाले ते त्यांना माहित नाही....असे रिपोर्ट बासनात गुंडाळायचे?

चीन ने सोडलेली मानवरहित याने /हेरगिरी करणारी उपकरणे असू शकतात/

खरे आहे. पण ते चीनने सोडलेले ड्रोन किंवा लँटर्न्स नाहीत असे आर्मीचे रिपोर्ट आहेत.
सध्या इतकेच.

मदनबाण's picture

10 Nov 2012 - 12:01 pm | मदनबाण

हे मी काही वर्षांपुर्वी वाचले होतेच. चीन आणि भारतामध्ये एका प्रदेशात चीन आणि भारतातुन जाता येत नाही. दोन्ही देशातील लष्करी अधिकारी ह्यावर मौन बाळगुन असतात. तेथे अनेकदा उडत्या तबकड्या दिसतात हे तेव्हाही त्या लेखात लिहिले होते. आता ओक काकांचा धागा म्हणाल्यावर अनेक लोकं खिल्ली उडवायलाच येतील. त्याला काही करु शकत नाही. पण ही वस्तुस्थिती आहे की त्या एरियात काहीतरी गुढ आहे. पण जो पर्यंत गव्हर्मेंट काही ऑफिशिअली सांगत नाही, तो पर्यंत काही बाहेर येणार नाही हे ही तेवढेच खरे.

शशिकांत ओक's picture

10 Nov 2012 - 1:43 pm | शशिकांत ओक

जॉर्ज फर्नांडीस संरक्षण मंत्री झाले तेंव्हा ते बॉर्डरवर प्रत्यक्ष जाऊन पहाणी करणारे तडफदार रक्षामंत्री म्हणून मान्यता पावले. त्यांनी लेह-लडाखच्या बर्फाळ भागातील सेना स्थलांना भेट दिली. तेंव्हा सैनिकांना स्नो स्कूटर्सची गरज आहे, त्याची मागणी करणारे अनेक दस्तऐवज आपल्या दरबारी पाठवले गेले पण दिल्लीत फॅन खाली बसून सरकारी बाबूंनी काढलेल्या खोडसाळ शंकांमुळे ते अजूनही मंजूर होत नाहीत अशी तक्रार ऐकली. त्यांनी आपल्या खात्यातील त्या झारीतील शुक्राचार्यांना चंदिगडला बोलावले व एका हवाईदलाच्या विमानात घालून लडाखला नेले व भीषण हवामानातील सैनिकांच्या मागण्यांच्या नाडलेल्या फाईलींवर थरथरत्या हातानी मंजूरीचे शेरे द्यायला सुरवात केली. हे त्यांनी आमच्या हवाईदलातील जवानांसमोर सांगितले होते. त्यावेळी मीही हजर होतो.
"तसे काही नसते हो" असे म्हणणारे लोक देखील प्रत्यक्ष जाऊन परीक्षा करून पहायला नकार देतात असा अनुभव आहे.

अमोल खरे's picture

10 Nov 2012 - 5:03 pm | अमोल खरे

जॉर्ज फर्नांडिस स्वतः एक अतिशय साधे गृहस्थ आहेत. संरक्षण मंत्री म्हणुन पायऊतार झाल्यावर एक दोन महिन्यात मुंबईत आले होते तेव्हा काहीही सुरक्षा न घेता फिरत होते, हॉटेलात जाऊन चहापाणी वगैरे घेतलं असं मटा मध्ये आले होते. अनेक जणांनी त्यांना ओळखले देखील पण आजुबाजुला बॉडिगार्ड नाहीत म्हणजे हा माणुस जॉर्ज फर्नांडिस नाही असे वाटुन कोणी त्यांच्याशी बोलायला गेले नाहीत. कारगिल युद्धाच्या वेळीस सुद्धा शवपेट्या निकृष्ट दर्जाच्या नव्हत्या, पण त्यांना पदावरुन घालवायला मिडियाशी संधान बनवुन त्याचा खुप मोठा गाजावाजा केला गेला असेही ऐकले आहे.

दादा कोंडके's picture

11 Nov 2012 - 4:05 pm | दादा कोंडके
शशिकांत ओक's picture

11 Nov 2012 - 6:29 pm | शशिकांत ओक

वा वा असेच रिपोर्ट अपेक्षित .... फक्त उशीरा आले इतकेच...

वा वा असेच रिपोर्ट अपेक्षित .... फक्त उशीरा आले इतकेच...
आपल्या पॄथ्वीवर परग्रहावरुन यान येतात ही लपुन राहिलेली गोष्ट नसुन त्यावर अनेक पुरावे मिळालेले आहेत.
नासाच्या अनेक फुटेज तू-नळीवर आहेत, ज्यात मोठ्या संख्येने या उडणार्‍या तबकड्या दिसुन येतात.

युके सरकारने युएफओ संबंधी दस्तावेज आता उघडे करण्यास सुरुवात केली आहे व काही कागदपत्रे त्यांनी उघड देखील केली आहेत.

एक दुवा :--- http://www.thesun.co.uk/sol/homepage/news/article1160625.ece
एक व्हिडीयो:--- http://www.youtube.com/watch?v=3Z1N9s99oGE
युके सरकारने उपलब्ध करुन दिलेली कागदपत्र इथे मिळतीलः---
http://ufos.nationalarchives.gov.uk/

जाता जाता :--- सन२०१० /२०१११ रोजी सुर्याच्या वातावरणात शिरणारी काही स्पेशशिप्स आढळुन आली होती. ज्याचे फोटो
नासाच्या या http://stereo-ssc.nascom.nasa.gov/beacon/beacon_secchi.shtml संकेस्थळावर होते, जे नंतर या संकेस्थळावरुन काढुन टाकण्यात आले. त्यावेळी ज्या चर्चा मी जालावर वाचल्या होत्या त्यानुसार त्या शिप्सचा आकार हा पॄथ्वी एव्हढा होता.
याचे काही फोटो मला त्यावेळी मिळाले होते,त्यांचे दुवे मी माझ्या जवळ ठेवुन दिले होते ,त्यातले ३ फोटोंचे दुवे इथे देत आहे.
http://2.bp.blogspot.com/_OhaHEeWqYU0/S1q80pDfXbI/AAAAAAAAHZI/rXNqYHQPUW...
http://img406.imageshack.us/img406/3978/20110122104530n7eub195.jpg
http://4.bp.blogspot.com/_OhaHEeWqYU0/S14T2-YADLI/AAAAAAAAHe0/Y3u7xixR7c...
यात सुर्याच्या वातावरणाच्या जवळ जे हिरवे बिंदु दिसत आहेत,तेच स्पेसक्राफ्ट आहेत असे काही तज्ञांचे म्हणणे आहे.
तू-नळीवर या संबंधी शोधा-शोध केल्यास तुम्हाला या संबंधी व्हिडीयो मिळतील ज्यात वर दिलेल्या लिंक मधील फोटो वापरले गेलेले आहेत.
(पॄथ्वीवासी प्रेमीजीव) ;)

चिंतामणी's picture

11 Nov 2012 - 11:49 pm | चिंतामणी

इसकाळ मधे.

(उद्याच्या वर्तमानपत्रात ही बातमी दिसेल)

अक्षयकुमारच्या जोकर सिनेमाची आठवण झाली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Nov 2012 - 11:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चिनी दिवे भारतातही विक्रिला दीपावलीनिमित्त आले आहेत. मीही या दिवाळीत दोनेक विकत घेतले आणि आकाशात सोडून पाहिले, मजा येते. रात्रीच्या वेळी आकाशात शांतपणे लुकलुकणार्‍या ता-यासारखा हा दिवा आकाशात बर्राच वेळ तरंगत असतो.

पण, एबीपी माझा या वाहिनीवरील बातमीत दिसतात त्या प्रमाणे तबकड्या असतील तर मात्र प्रकरण गंभीर असावं किंवा नाही, सांगता येत नाही.

-दिलीप बिरुटे