प्रवासवर्णन - पहिलाच प्रयत्न

मस्तानी's picture
मस्तानी in जनातलं, मनातलं
27 Oct 2009 - 6:58 pm

नमस्कार मंडळी !

शाळेत असताना लिहावे लागलेले निबंध यापलीकडे लिखाण न केलेली मी ... पण गेले काही दिवस नियमितपणे मिपावर बागडत असते, त्यामुळे "मी सुद्धा लिहू शकेन" असा काहीसा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. तो वापरूनच आज हे धाडस करीत आहे. बघू कसं काय आणि कितपत जमतंय ते !

आम्ही सध्या आहोत अमेरिकेतल्या मिशिगन राज्यात. एकाच हिमवादळात चांगला फुट- २ फुट बर्फ आणणारा हिवाळा आणि कायम शून्याखाली तापमान अशी थंडी चालू होण्याआधी अधाशासारखे फिरून घेणारे लोक आहेत इथे ... २/३ हिवाळे पाहील्याने आम्हीही "आधीच" एखाद्या ठिकाणी जाऊ असा विचार केला. बरं, एक ठिकाण ऐकून माहित होत. Pictured Rocks National Lakeshore. ७ तास जायला न ७ तास परतीच्या प्रवासाला. तरीही शनिवार - रविवार मध्येच जाऊन यायचंच असा चंग बांधला. म्हणजे, चंग मी बांधला आणि तास-न-तास गाडी चालवण्याची जबाबदारी नवऱ्यावर सोपवून मोकळी झाले.

तर हे Pictured Rocks म्हणजे मिशिगनच्या पार वरच्या टोकाला. मिशिगनची भूमी दोन भागांत विभागली गेली आहे. मला 'peninsula' ला नेमका मराठी प्रतिशब्द माहित नाही. त्यामुळे मी 'Upper Peninsula' ला सरळ "वरचं मिशिगन" म्हणतेय. अमेरिकेच्या या दक्षिण-पूर्व भागात पाच (भले) मोठे तलाव आहेत. इतके मोठे की समुद्राचीच आठवण यावी. पण तरीही गोडं पाणी ... तर या पाच तलावांपैकी एक म्हणजे सुपेरीअर (बाकीचे चार - मिशिगन, एरी, ह्युरोन, ओंटारियो). याच सुपेरीअर तलावाच्या किनारी आहेत हे Pictured Rocks.

यापुढची "चित्तरकथा" ... चित्रांच्या सहाय्याने कथा ... म्हणतात ना एक चित्र लाख शब्दांचं काम करून जात, तसंच काहिसं !

खालचं आणि वरचं मिशिगन जोडणारा - २००७ साली पन्नाशी गाठलेला हाच तो, मॅकिनाव ब्रिज.

जवळ जवळ सव्वा पाचशे फूट उंची आहे या ब्रिजची.

हे इथलं यूपी :)

इथून साधारण तीन तासांची बोटीची सफर होती. या अशा बोटीतून ...

"ग्रॅन्ड आयलन्ड" बेटावरचे जुने लाईट हाउस ...

पाण्यात कोसळलेले कडे

इन्द्रधनुसम रंगीबेरंगी

वेगवेगळ्या खनिजांचा हजारो वर्षांपासून दडलेला खजाना

निसर्गाची किमया - वारा आणि पाणी यांचा मारा सहन करत करत या दगडांनी काय काय म्हणून रूपे धारण केली आहेत बघा

याला नाव दिलं आहे "युद्धनौका"

याला म्हणतात "इंद्रधनूची गुहा"

आणि हा म्हणे "तुटलेला फ्लावरपॉट"

एकला जीव सदाशिव

"तग धरून राहणे" याच याहून चांगला उदाहरण कधी पाहिलंय का ?
या झाडाची मुळ अक्षरशः अधांतरी आहेत कारण त्यांना आधार देणारी कमान ४०/५० वर्षांपूर्वी 'पडली' पाण्यात ...

निळशार - हिरवगार पाणी

साधारण ७०/८० फूट उंचीवरून घेतलेली छायाचित्र

अथांग पसरलेला सुपेरीअर तलाव

याच बोटीवरून सफर घडली होती आम्हाला

हे सारं नैसर्गिक सौंदर्य आठवणींचा एक अनमोल खजिना देऊन गेलं.

या सहलीत सहज जाता येता टिपलेले क्षण ...

तुम्हा सर्वांना ही छायाचित्रे आवडतील अशी अपेक्षा करते !

प्रवासभूगोलछायाचित्रणविरंगुळा

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

27 Oct 2009 - 7:03 pm | विनायक प्रभू

सर्व चित्रे चित्रेतै.

प्रभो's picture

27 Oct 2009 - 7:07 pm | प्रभो

सूंदर.....के व ळ अ प्र ति म फोटू......
सगळेच फोटो आवडले...

आपला पहिला प्रयत्न प्रवासवर्णनाचा होता का कलादालनाचा????? ?)

आमचा दौरा आहेच तिकडे अमेरिकेत पुढच्या महिन्यात...बघुया कुठे कुठे जाता येते...
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

अवांतरः आपली खव आणी व्यनी ची सुविधा चालू झाली का???

छोटा डॉन's picture

27 Oct 2009 - 7:09 pm | छोटा डॉन

एकुण एक फोटो आवडले.
आमचीही इथे बसुन मस्तच सहल झाली, धन्यवाद ...

तो वरुन ३ का ४ नंबरचा "लाल फुलाचा" फोटो तर लै भारी, अगदी एक्सपर्ट हँडने काढल्यासारखा वाटतो आहे, त्यावर वॉटरमार्क टाकुन तुमचा मालकी हक्क प्रस्थापित करा ...
आजकाल कोण काय होरुन कुठे टाकेल ह्याची गॅरेंटी नाही, तो फोटो फारच मस्त आला आहे ...

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Oct 2009 - 7:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वच फोटू सुंदर...!
तग धरून राहणारे झाड खूपच सुंदर...खूप काही बोलते ते झाड.

-दिलीप बिरुटे

नंदू's picture

27 Oct 2009 - 7:16 pm | नंदू

सर्व फोटो आवडले.
पहिल्या लेखाबद्दल अभिनंदन.

नंदू

गणपा's picture

27 Oct 2009 - 7:16 pm | गणपा

सगळेच आवडले....

परिकथेतील राजकुमार's picture

27 Oct 2009 - 7:39 pm | परिकथेतील राजकुमार

अ प्र ती म !! निव्वळ अप्रतीम.

७०/८० फुटावरुन काढलेल्या फोटुंपैकी तिसर्‍या फोटुत एकदम गणपतीचा बाप्पाचा चेहरा बघितल्याचा भास झाला :)

स्वगत :- कॅमेरा कुठला, झुम काय आन लेन्स काय असले प्रश्न विचारुन "लै कळते' फोटुग्राफीतले असे उगीचच दाखवावे काय ?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

गणपा's picture

28 Oct 2009 - 10:06 pm | गणपा

७०/८० फुटावरुन काढलेल्या फोटुंपैकी तिसर्‍या फोटुत एकदम गणपतीचा बाप्पाचा चेहरा बघितल्याचा भास झाला


नीट निरखुन पाहील्यावर मल पण बाप्पा दिसला :)

प्रसन्न केसकर's picture

27 Oct 2009 - 7:44 pm | प्रसन्न केसकर

अन फोटोपण मस्त आहेत. Pictured Rocks बद्दल ऐकलं होतं बघायला आज मिळालं.

अवलिया's picture

27 Oct 2009 - 7:44 pm | अवलिया

सुरेख !
पहिल्या लेखनाबद्दल अभिनंदन...

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

क्रान्ति's picture

27 Oct 2009 - 7:54 pm | क्रान्ति

छान लेख आणि सुंदर फोटो! :)

क्रान्ति
अग्निसखा

सुमीत भातखंडे's picture

27 Oct 2009 - 8:04 pm | सुमीत भातखंडे

मस्त आल्येत फोटो

किट्टु's picture

27 Oct 2009 - 8:12 pm | किट्टु

मस्त प्रवासवर्णन आणि अप्रतिम फोटोज.....

अशीच नविन नविन माहिती टाकत रहा... तेव्हढंच घरबसल्या US दर्शन..... :)

पर्नल नेने मराठे's picture

28 Oct 2009 - 11:59 am | पर्नल नेने मराठे

+१
चुचु

jaypal's picture

27 Oct 2009 - 8:15 pm | jaypal


"म्हणतात ना एक चित्र लाख शब्दांचं काम करून जात" हे सिद्ध करुन दाखविल्या बद्द्ल हार्दिक अभिनंदन

मिपाला अजुन एक चांगला छायाचित्रकार गवसला.

अजुन फोटो येउद्यात.

स्वाती२'s picture

27 Oct 2009 - 8:19 pm | स्वाती२

मस्तच आलेत सगळे फोटो.

मस्तानी's picture

27 Oct 2009 - 8:57 pm | मस्तानी

लेख व चित्रे दोन्हीचे कौतुक झाले ... खरच खूप बरं वाटलं ... धन्यवाद ... आणि आता तयार रहा, मी पुन्हा लिहिणार !

पाचेकशे फोटो मधून निवडक इथे टाकायचे म्हणजे जरा कठीणच होतं. तो लाल फुलाचा (मागे धुसरसा दिसणारा ब्रिज) हा फोटो मलादेखील फारच आवडतो ... त्याचं श्रेय मात्र आमच्या यांचं !

कॅमेरा SONY CyberShot 8.1 megapixels Optical Zoom 10X आहे. अहो, आमच्या छोटुकल्या बरोबर कार्टून पाहून पाहून मला तर तो आकार चक्क मिकी माउस सारखा वाटला होता प्रथमदर्शनी :)

पुन्हा एकदा सर्वाना प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद !

निमीत्त मात्र's picture

28 Oct 2009 - 6:45 am | निमीत्त मात्र

छानच चित्रे मस्तानीबाई!

त्याचं श्रेय मात्र आमच्या यांचं !

अरे वा! म्हणजे चक्क थोरल्या बाजीरावांनी काढलय की काय ते चित्र ;)

सुनील's picture

28 Oct 2009 - 5:53 am | सुनील

चित्रे छानच पण लेख कुठे दिसला नाही! थोडे लिहादेखिल!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहज's picture

28 Oct 2009 - 6:11 am | सहज

अभिनंदन! फोटो आवडले.

अजुन येउ दे!

अजय भागवत's picture

28 Oct 2009 - 7:51 am | अजय भागवत

तुटलेला फ्लॉवरपॉट व "तग धरुन राहीलेले" झाड खूप आवडले.

धनंजय's picture

28 Oct 2009 - 8:35 am | धनंजय

चित्रे छान आहेत. लाल फुलाचे चित्र विशेष आवडले.

पहिल्या लेखाबद्दल अभिनंदन. छायाचित्रं झकास आहेत!
Peninsulaला भूशिर (किंवा भूशीर) म्हणतात असे स्मरते! १००टक्के खात्री नाहीं, पण शब्द तर्कशुद्ध वाटतो! (चूभूद्याघ्या)
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें
खुदा याद आया सवेरे सवेरे!

बाकरवडी's picture

28 Oct 2009 - 9:20 am | बाकरवडी

अप्रतिम !!!!!
:)

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

विशाल कुलकर्णी's picture

28 Oct 2009 - 11:44 am | विशाल कुलकर्णी

मस्तच.... अप्रतिम फोटो !

आम्ही येतोय डिसेंबरमध्ये ! साधारण १५ दिवसाचा मुक्काम असेल. बघु, जमल्यास भेटु !

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

भोचक's picture

28 Oct 2009 - 11:50 am | भोचक

मस्त चित्रे. मजा आली.

(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव

मस्तच फोटो.....
खुपच सुरेख आहेत.
एकल्या झाडाचा अन् फूलाचा खूप आवडला.
:)

झकासराव's picture

28 Oct 2009 - 12:02 pm | झकासराव

वाह!!!!
मस्त फोटु आहेत सगळे.
तो लाल फुलाचा बेश्टच एकदम :)

भाग्यश्री कुलकर्णी's picture

28 Oct 2009 - 1:41 pm | भाग्यश्री कुलकर्णी

फारच छान आलेत ग फोटो.खरच घरबसल्या सहल घडवलीस.

अमोल केळकर's picture

28 Oct 2009 - 2:35 pm | अमोल केळकर

सुरेख
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

ऋषिकेश's picture

28 Oct 2009 - 2:48 pm | ऋषिकेश

प्रवासवर्णनचित्रे खूपच मस्त.. ते फूलावर फोकस केलेले चित्र मलाही आवडले आणि ते निळ्याशार उठू पाहणार्‍या लाटेचेही

ऋषिकेश

मस्तानी's picture

29 Oct 2009 - 2:27 am | मस्तानी

बर बाबा ... पुढील खेपेस "वर्णन" करेन ... नक्की !

मॅन्ड्रेक's picture

28 Oct 2009 - 3:39 pm | मॅन्ड्रेक

सुन्दरच हो.
at and post : janadu.

थोर्लेबजिराव's picture

28 Oct 2009 - 4:36 pm | थोर्लेबजिराव

फोटो फारच सुदर अले अहेत.