तू पुन्हा

कौतुक शिरोडकर's picture
कौतुक शिरोडकर in जे न देखे रवी...
27 Oct 2009 - 10:40 am

आसमंती लाघवी गंध जेव्हा लाजले
मोगर्‍याने गे तुझे, नाव तेव्हा घेतले

पैंजणांच्या किलबिली, पाखरे नादावली
थिरकता तव पावले, सूर साती छेडले

मोकळ्या ओल्या बटा, फिरविता वार्‍यावरी
थेंब ते सारे झणी, चातकाने झेलले

भास्कराने पाहता, वळविला तू चेहरा
अन नभीचे मेघ ते, पश्चिमी झेपावले

गौर अंगाला तुझ्या, चुंबणारे ऊनही
ती झळाळी कांचनी, लेवुनी सरसावले

स्मित गाली विलसता, दशदिशा आसावल्या
हात अपुले गुंतुनी, जगपरिघ आकुंचले

शब्द ही ना बोलल्या, पाकळ्या अधरातल्या
श्वास माझा तोलती, अर्थ ते नजरेतले

शृंगारगझल

प्रतिक्रिया

नेहमी आनंदी's picture

27 Oct 2009 - 10:54 am | नेहमी आनंदी

छान आहे हो कविता. :)

विशाल कुलकर्णी's picture

27 Oct 2009 - 11:30 am | विशाल कुलकर्णी

मस्तच ! कुठे कुठे निसटलीय थोडी... पण छानच ! :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

फ्रॅक्चर बंड्या's picture

27 Oct 2009 - 1:24 pm | फ्रॅक्चर बंड्या

मस्तच आहे...

हात अपुले गुंतुनी, जगपरिघ आकुंचले

आवडले