तिचा माझा संसार, तसा 'वेल सेट' आहे
इथे 'मी', तिथे 'ती'... मध्ये 'इंटरनेट' आहे
जग कुठच्या कुठे गेलय ? म्हणून तर...
घराच्याच कोपर्यात, मांडलं युग 'जेट' आहे
कोण म्हणतो आहे इथे, फक्त 'खिडाक्यां'चे राज्य
आमच्यासाठी 'विन्डो' , आख्खं इंडीया 'गेट' आहे
माणसांचा वावर... असतोच अवती भवती
'ऑनलाईन' दोघांच, मात्र खाजगी 'बेट' आहे
दरम्यानच्या अंतराचा प्रश्न येतोच कुठे ?
नुसत्या एका 'क्लिक'वर आमची 'गाठभेट' आहे
माझ्या कवितांचे सडे तिच्या देही मोहरतात
तिचं ते फुलणं...बहरणं, वेबकॅममध्ये 'थेट' आहे
आठवणींचा तो अलबम असतो नेहमीच सोबत
तिच्या माझ्या गळा, 'पेनड्राईव्हचं लॉकेट' आहे
'वाट्टेल तेव्हा भेटणे', जरी दररोज असलं
तरी रोज नव्याने आमची 'ब्लाईंड डेट' आहे
बाफ, ब्लॉग, फेसबुक तर कधी ऑर्कुटवरही
काळ म्हणे, चालू द्या, मीही थोडा 'लेट' आहे
प्रेमाचा हा निर्झर क्षणी धबधब्याला लाजवतो
चार क्षणांच्या खेळात, सांगा कुठे 'हेट' आहे ?
किती सहज टाळल्यात संहवासातील त्रुटी
आजही आमच्या नात्यात पुर्वीइतके 'वेट' आहे
अशाश्वत या देहाला स्पर्शगंध नकोच काही
हे 'मनाचे मीलन' अन 'आत्म्यांचे प्लँचेट' आहे
प्रतिक्रिया
13 Oct 2009 - 4:39 pm | पर्नल नेने मराठे
हे बाफ काये :-?
चुचु
13 Oct 2009 - 4:47 pm | कौतुक शिरोडकर
बाफ म्हणजे बातमीफलक.
13 Oct 2009 - 5:16 pm | अमृतांजन
कौशि, मस्त रे.
13 Oct 2009 - 5:22 pm | सहज
ओहोहो रचना छान!
कौतुकसाहेब तुम्ही पुरुष नाही महापुरुष आहात ;-)
13 Oct 2009 - 5:36 pm | JAGOMOHANPYARE
:( ........... माझे सध्या असेच सुरु आहे...
मी इथे ती तिथे सागराचा अंतरपाट आहे.
दो टकियों की नोकरी से सारा श्रावण सपाट आहे
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
13 Oct 2009 - 5:41 pm | JAGOMOHANPYARE
:(
13 Oct 2009 - 6:46 pm | ज्ञानेश...
कौतुकराव असेही काही लिहितात!
छान छान.
"Great Power Comes With Great Responsibilities"
13 Oct 2009 - 6:48 pm | चिरोटा
रचना आवडली कौतुकराव.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
13 Oct 2009 - 9:38 pm | प्राजु
मस्त!!
तुझी कविता मात्र.. "ग्रेट" आहे.. :)
- प्राजक्ता पटवर्धन
http://praaju.blogspot.com/
13 Oct 2009 - 9:46 pm | लवंगी
२१व्या शतकातली नाती!! कलियुग आहे बाबा कलियुग!!
13 Oct 2009 - 10:10 pm | मिसळभोक्ता
संदीप खरेची 'लव लेटर' ही कविता आठवली.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
14 Oct 2009 - 11:30 am | विशाल कुलकर्णी
वाहवा, क्या बात है!
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
14 Oct 2009 - 12:29 pm | प्रभो
मस्त रे..
--प्रभो
14 Oct 2009 - 4:14 pm | स्वाती२
छान!
14 Oct 2009 - 7:34 pm | दशानन
छान कविता आहे... :)
आवडली... !
14 Oct 2009 - 7:53 pm | अनिल हटेला
कौतुक करण्यासारखं लिहीलत...कौतुकराव !! :-)
अभिनंदन !!!
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)