(अनुवादीत. गुलझार)
अश्रूनी भरले माझे दोन्ही नेत्र
भरावी नीज कशी कळेना मात्र
स्वपनांच्या छाया भरलेल्या नयनी
अपुल्या रात्रभर गैरांच्या होती दिनी
अश्रूनी भरले माझे दोन्ही नेत्र
भरावी नीज कशी कळेना मात्र
मिथ्या तुझ्या वचने वर्षे जाती व्यतीत
जीवन गेले सरून सरून जाईल ही रात्र
अश्रूनी भरले माझे दोन्ही नेत्र
भरावी नीज कशी कळेना मात्र
कशी सामावू नीज माझ्या नयनी
दोन्ही माझे नेत्र भरले त्या अश्रूनी
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
1 Oct 2009 - 11:19 am | मिसळभोक्ता
गुलजार, जीवेत शरदः शतम !
पण आता ही अशी भाषांतरे आली, तर मग कसे होणार ?

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
1 Oct 2009 - 11:26 am | अवलिया
सहमत आहे. त्र ला त्र आणि नी ला नी जोडुन केलेले भाषांतर पाहुन जीव गलबलुन आला.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
1 Oct 2009 - 6:26 pm | दशानन
एकदम जीवाचे कालवण झाले...
:(
त्यांना किती दुखः होत असेल..
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
1 Oct 2009 - 11:26 am | चतुरंग
(खुद के साथ बातां : रंगा, गुलजारला मराठी नीट येत असेल तर तो कविता करणं सोडून देईल हे वाचून! ;) )
चतुरंग
1 Oct 2009 - 11:27 am | अवलिया
अच्छा ! गुलजार सोडुन देईल कविता करणं पण....... :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
1 Oct 2009 - 11:34 am | मिसळभोक्ता
गुलजारची राखी, ही राखी सामंत नाही, हे कुणीतरी स्पष्ट करा रे !
(एवढ्या एका गोंधळापाई, बिचार्या गुलजारला त्रास कशाला ?)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
1 Oct 2009 - 7:43 pm | धमाल मुलगा
ओ काका...
राखी सामंत नाय हो...सावंत..सावंत आहे ते :D
का उगं केमिकल रिअॅक्शन्स करायला पाहताय? :P
=)) =)) =))
2 Oct 2009 - 12:46 am | निमीत्त मात्र
सामंत नाही रे सावंत
1 Oct 2009 - 11:29 am | विजुभाऊ
त्र त्र त्र चे यमक वाचून गलीतगात्र व्हायला होतय.
बाय द वे नक्की कोणते गाणे ते कळायला डोके चालत नाही
1 Oct 2009 - 11:36 am | चतुरंग
हे घ्या ते खुशबूदार सुमधुर गीत! :)
चतुरंग
1 Oct 2009 - 7:44 pm | विदेश
कसा वाचू मी अनुवाद माझ्या नयनानी,
दोन्ही माझे नेत्र भरले त्या वाचुनी!
2 Oct 2009 - 12:43 am | विसोबा खेचर
छान रे म्हातार्या! :)
श्रीकृष्ण गोळे यांचा विजय असो.. :)
तात्या.
2 Oct 2009 - 12:50 am | निमीत्त मात्र
तात्यासाहेब,
श्रीकृष्ण काकांना आम्ही पण 'म्हातार्या' अशी हाक मारली तर चालेल का? म्हातार्या ह्या शब्दातील माया बाकीच्या कुठल्यात संबोधनात नाही.
त्याविषयी मिपाचे धोरण काय आहे ह्याची आधी खात्री करुन घेतलेली बरी नाहीतर आमचा जाकार्ता व्हायचा! :)
आमची आगामी कविता..
जाकार्ताचा म्हातारा शेकोटीला आल.. ;)
2 Oct 2009 - 3:26 pm | गणपा
हाण्ण..... माताय