मीनाकुमारी

सहज's picture
सहज in जनातलं, मनातलं
23 Sep 2009 - 11:44 am

कपाळावरून घाम निथळत होता, मिटल्या डोळ्यांची गरगर वाढली होती. श्वासाची लय बिघडली होती. धडपडून मीना जागी झाली. कालपासून तिचे मन तसे सैरभैर होतेच पण उशाशी कोणीतरी बसून डोक्यावरुन हात फिरवत, "चल, बाळ घरी ये, सगळे जमलेत बघ" असे म्हणत आहे. आवाज ओळखीचा वाटतोय पण डोळे चिकटले आहेत व नीट काही बघताही येत नाही असा, भास व सत्याच्या मधला अनुभव तिला अतिशय संभ्रमित करुन गेला.
आता झोपणं शक्यच नव्हतं म्हणून ती ऊठली आणि खोलीच्या बाहेर आली.
हॉल मधे मालक-मालकीण टिव्ही बघत बसलेले होते. मालकीण बाईंनी घड्याळाकडे पहात विचारले, "काय ग? बरे नाही वाटत का, की अजून झोप येत नाहीये? दीड वाजलाय पहाटेचा!"

कामतांकडे नोकरीला लागून, मीनाला आज बरोबर वर्ष होत आले होते. मीनाची जन्मकहाणी कुठल्याही कथा-सिनेमातील कहाणी शोभली असती. चार भावंडात मोठी असलेली मीना १० वर्षाची असताना, मीनाचे वडील गेले. एक जमिनीचा तुकडा व त्यावरचे एक जुने पडके घर, याच्या आधारावर मीनाची आई चार पोरांचा सांभाळ कसाबसा करत असताना, भाडेकरु म्हणून ठेवलेल्या सतिशच्या प्रेमात पडून मीनाने १६व्या वर्षीच घरातून पलायन केले. मुंबईत आल्यावर एका खोलीच्या झोपडीत संसार करताना तिला वास्तवाची जाणीव येत होती. सतिशचे खरे स्वरुप हळुहळू समोर येत होते. एकदा एका घरफोडीच्या गुन्ह्यात सतिश पकडला गेला. पोलिसांनी तिला पण गुंतवले असते पण तिचे नशीब बलवत्तर म्हणून त्या झोपडपट्टीत काम करणार्‍या एका सेवाभावी संस्थेच्या मदतीने तिचे पुनर्वसन झाले. तिची सोय एका बंगल्यात कामवाली म्हणून झाली होती. घरकाम आणि एका लहान मुलीचा सांभाळ करणे यात ती स्वत:ला सावरु पहात होती. परत गावी जायला पैसे नाही व गेले तरी कुठल्या तोंडाने व तिथे तरी काय करायचे म्हणून तिने हे जगणे स्वीकारले होते.

दोन दिवसापासूनची बैचैनी व आजचा प्रसंग मालकीण बाईंना सांगताना देखील ती पार घाबरून गेली होती. मालकीण बाईंनी तिला समजावले, "आम्ही तुझी गेले वर्षभर अवस्था बघत आहोत, माझे ऐक उद्या सकाळी तुझ्या आईला फोन लाव. तुला घरातून पळून जाउन दीड वर्षाहून जास्त काळ लोटला आहे, तिच्याशी बोल तिलाही बरे वाटेल, आणि तुलाही."

दुसर्‍या दिवशी दुपारी गावातल्या एका दुकानदार मैत्रीणीच्या घरी फोन करुन जेव्हा आईला फोनवर बोलावून घेतले तेव्हा सुरुवातीला अर्धापाउण तास मायलेकींच्या डोळ्यातून फक्त अश्रुधारा वहात होत्या. शेवटी आई सांगत होती, " अग कालच मी मुलांना घेउन मामाकडे गेले होते. तू गेल्यावर आजी काही दिवसातच गेली. त्यानंतर काल परत पहिल्यांदाच मामाकडे आम्ही सगळी भाऊ-बहीण, नातवंड जमलो होतो. रात्री पार दोन वाजेपर्यंत आम्ही गप्पा मारत होतो. एकटी तुच तेवढी नव्हतीस. सगळ्यांनी तुझी आठवण काढली. आजोबा म्हणत होते, आजीचा लै जीव तुझ्यावर. तू इथे पाहीजे होतीस, आजीला फार आवडले असते. "
मीनाला परत तो रात्री दीड वाजताचा आवाज, ते डोक्यावरचे हात फिरवणे आठवून आठवून खोली आपल्याभोवती गरगर फिरते आहे असे वाटायला लागले.

[प्रेरणा = जास्त विश्लेषण करु नका, काल तात्या, परा, प्रमोदकाका यांच्या कथा वाचुन मी पण "भास-आभास" हॉरर श्टॉरी एकदम हाय काय नाय काय म्हणतं लिव्हली बघा. या कथेचा जिवंत अथवा मृत व्यक्ति किंवा कथेशी संबध नाही, आढळल्यास योगायोग समजा . ] ;-)

हे ठिकाणकथाआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

23 Sep 2009 - 11:46 am | मदनबाण

झकास्स्स्स..... :)

मदनबाण.....

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Sep 2009 - 11:54 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सहजकाका व्यनीतून बाहेर आले हे उत्तम! आता पुन्हा एक जोरदात लेखनस्पेल सुरू होऊ देत ...

कथा चांगली आहे. क्रमशः टाकून जास्त फुटेज खाता आलं असतं.

अदिती

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Sep 2009 - 12:08 pm | llपुण्याचे पेशवेll

आईशप्पथ. काय घाबरलो कथा वाचून. हिंदीत छोट्या भयकथा असतात तसाच प्रयत्न मराठीत केला गेला आहे असे जाणवले. मतकरींसारखे 'सहजराव भयकरी' हे देखील एक उदयोन्मुख भयकथाकाराचे नाव वाटू लागले आहे आहे.
छान छान! असेच लिहीत रहा.

-(घाबरलेला)भुतोबा टेरर

निखिल देशपांडे's picture

23 Sep 2009 - 12:00 pm | निखिल देशपांडे

कथा छानच आहे...
आज काल सगळेच लोक भयकथा लिहित आहेत...

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

सुबक ठेंगणी's picture

23 Sep 2009 - 12:11 pm | सुबक ठेंगणी

सुटसुटीत सहजकथा...

परिकथेतील राजकुमार's picture

23 Sep 2009 - 12:28 pm | परिकथेतील राजकुमार

येकदम शॉल्लीड !!

आपल्याला आवडली.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

अवलिया's picture

23 Sep 2009 - 12:35 pm | अवलिया

मस्त हो सहजराव... :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

समंजस's picture

23 Sep 2009 - 12:42 pm | समंजस

वा! छान!!!
सध्या मिपावर भयकथा सप्ताह सुरु आहे असे दिसतेय :SS
काहि दिवस मिपा पासुन दुर राहावे का :S :?

JAGOMOHANPYARE's picture

23 Sep 2009 - 12:49 pm | JAGOMOHANPYARE

हात फिरवणार्‍या बाईचे चित्रही टाकायला हवे होते........ आणखी लईच भारी वाटले असते..

चारोळ्या सारखा नवा लेखन प्रकार आला आहे... भुतोळ्या.. :)

श्रावण मोडक's picture

23 Sep 2009 - 12:48 pm | श्रावण मोडक

[प्रेरणा = जास्त विश्लेषण करु नका, काल तात्या, परा, प्रमोदकाका यांच्या कथा वाचुन मी पण "भास-आभास" हॉरर श्टॉरी एकदम हाय काय नाय काय म्हणतं लिव्हली बघा. या कथेचा जिवंत अथवा मृत व्यक्ति किंवा कथेशी संबध नाही, आढळल्यास योगायोग समजा . ]
पण हे सगळं सिगरेटच्या पाकिटावरच्या त्या वॉर्निंगसारखंच झालं. आधी वाचलीच कथा.

नंदन's picture

23 Sep 2009 - 12:51 pm | नंदन

ट्र्याजेडी क्वीनची ट्र्याजेडी वाचून अंमळ हळवा झालो.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

श्रावण मोडक's picture

23 Sep 2009 - 12:56 pm | श्रावण मोडक

अंमळ हळवा झालो
ऑँ? काय हे धाडस? बरा आहेस ना?

धमाल मुलगा's picture

23 Sep 2009 - 3:04 pm | धमाल मुलगा

ट्र्याजेडी क्वीनची ट्र्याजेडी वाचून अंमळ हळवा झालो.
असेच हळवा होतो...हे आपलं... झालो!

सहजराव,
बर्‍याच काळानं म्यान केलेली लेखणी उपसलीत की :)
आता येऊ द्या आणखीही जोरदार.

-(सहजश्रींचा मित्र) धम्या.

Nile's picture

24 Sep 2009 - 4:34 am | Nile

हेच म्हणतो!

-हळवोबा नेचर.

हर्षद आनंदी's picture

23 Sep 2009 - 12:57 pm | हर्षद आनंदी

शीर्षक वाचुन वेगळेच वाटले

आधी वाटले की मीनाकुमारीचे काही फोटो, तिच्या आयुष्यातील काही प्रसंग असे काहीतरी असेल, पण इथली मीना जमेना...

बाकी, कथा एकदम म्स्त

सुनील's picture

23 Sep 2009 - 2:16 pm | सुनील

सॉलीड भयकथा. असेच अजूनही लिहीत रहा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रभाकर पेठकर's picture

23 Sep 2009 - 3:15 pm | प्रभाकर पेठकर

कथेतील तपशीलात बरीच पोषणमुल्ये असूनही कथा म्हणावी तितकी सशक्त झाली नाही. भयकथेसाठीची वातावरण निर्मिती तयार न होता धक्कादायी शेवटाची रहस्यकथा होण्याच्या मार्गावर गेली.

'क्रमशः' येईल असे वाटले होते पण अनपेक्षित पणे कथाच संपली. अगदी आखुड लेंघा घालावा तशी.

आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Sep 2009 - 5:34 pm | बिपिन कार्यकर्ते

सहजकाका की जय!!! भयकथाज्वरसाथीतली ही बेष्ट कथा वाटली ब्वॉ!!! सहजकाकांनी लेखन वाढवावे ही विनंती.

आणि अदितीशी सहमत. सहजकाका व्यनितून बाहेर आले हे एक बरे झाले. ;)

बिपिन कार्यकर्ते

विनायक प्रभू's picture

23 Sep 2009 - 7:26 pm | विनायक प्रभू

ना? बरे झाले.
त्यांनी लिहावे आणि आम्ही वाचत राहावे.
पण बंद का केल होते?

लवंगी's picture

23 Sep 2009 - 5:41 pm | लवंगी

सहजकाकांनी लेखन वाढवावे ही विनंती.

दशानन's picture

23 Sep 2009 - 5:51 pm | दशानन

लै भारी !...

जाम टरकली नाय पण भारी हाय लिव्हलं !

***
राज दरबार.....

चित्रा's picture

23 Sep 2009 - 6:05 pm | चित्रा

आत्तापासून सर्वांनाच झाली आहे असे दिसते आहे.

कथा चांगली आहे, अचानक संपली.

रात्री दीडला असा कोणता कार्यक्रम ती फॅमिली बघत होती?

वेताळ

क्रान्ति's picture

23 Sep 2009 - 7:47 pm | क्रान्ति

आवडली कथा.
अवांतर :- भय इथले संपत नाही!

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

प्राजु's picture

23 Sep 2009 - 8:54 pm | प्राजु

सहज लिहिलेली.. सहजरावांची कथा.. :)
आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चतुरंग's picture

23 Sep 2009 - 9:17 pm | चतुरंग

हा सहजपणा 'जहाल आणि मादक' नंतरचा दिसतोय! ;)

(मवाळ)चतुरंग