थोडीशी फुल,थोडेसे मोती

पुष्कराज's picture
पुष्कराज in जे न देखे रवी...
10 Sep 2009 - 3:54 pm

सहज एक दिवस विचारल तिला
सखे मी तुला काय आणु ?
थोडीशी फुल,थोडेसे मोती
आणि चांदण आण ओंजळ्भरून

मनात म्हणालो स्वतालाच
प्रेम भलतच महाग असत
जमल तर वार्‍याची झुळुक
नाहीतर जाळणारी आग असत

ओंजळभरून फुल
एक दिवस तिला नेउन दिली
काय सांगू आनंदाने
सखी मझी हरकून गेली

आज फुल दिली
उद्या मोती देइल
ओंजळ्भरून चांदण
माझ्यासाठी घेउन येइल

शेवटी एक दिवस सांगितल तिला
चांदण तर खूप दूर आहे
मी तुला मोतीही देउ शकत नाही
तुझी एवढीशी इच्छा माझ्याकडून
पूर्ण होउ शकत नाही

क्षणभराच्या शांततेनंतर
सार आभाळ भरून आल
माझ चांदण माझ्या समोर
रीमझीम रीमझीम बरसून गेल

किती रे वेडा आहेस तू
प्रेम कधी काही मागत का?
प्रेमाला प्रेमाशिवाय
दुसर कधीकाही लागत का?

स्वतालाच विसरून स्वतालाच
प्रेम म्हणजे देण असत
आयुष्याला सुरात बांधेल
प्रेम अस गाण असत

मोती काय चांदण काय
प्रेम कधी कोणी मोजत का?
चंद्र समोर असताना
कोणी चांदण शोधत का?

शृंगारकविता

प्रतिक्रिया

दिपक's picture

10 Sep 2009 - 4:08 pm | दिपक

मस्त कविता ! :)

सुबक ठेंगणी's picture

10 Sep 2009 - 4:32 pm | सुबक ठेंगणी

चंद्र समोर असताना
कोणी चांदण शोधत का?
हे छान :)

तुम्ही कुठेच अनुस्वार का नाही वापरलाय??

सहज एक दिवस विचारल तिला
सखे मी तुला काय आणु ?
थोडीशी फुल,थोडीशी हाफ
आणि चकणा आण ओंजळ्भरून
असं पण होऊ शकतं नां

अत्र्यांचं "गांधी नेहरू दोन टोके (टोकें) हे आठवलं"

अनिल हटेला's picture

10 Sep 2009 - 8:14 pm | अनिल हटेला

चंद्र समोर असताना
कोणी चांदण शोधत का?
:-)

क्या बात है !!! मस्त रे पुष्कराज..तब्येत खुष झाली.....;-)

बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

राघव's picture

10 Sep 2009 - 4:37 pm | राघव

काय राव.. एवढी छान कविता करता, मग थोडं व्याकरण सांभाळलं तर आस्वाद द्विगुणीत होईल की.. :(
अगदीच राहवलं नाही म्हणून--

सहज एक दिवस विचारलं तिला
"सखे मी तुला काय आणु ?"
"थोडीशी फुल,थोडेसे मोती आणि
चांदणं आण ओंजळ्भरून"

मनात म्हणालो स्वत:लाच
"प्रेम भलतंच महाग असतं!"
"जमलं तर वार्‍याची झुळुक..
नाहीतर जाळणारी आग असतं"

ओंजळभरून फुलं
एक दिवस तिला नेऊन दिली!
काय सांगू..
आनंदाने सखी माझी हरखून गेली!

"आज फुलं दिली,
उद्या मोती देईल..
ओंजळभरून चांदणं..
माझ्यासाठी घेउन येईल!"

शेवटी एक दिवस सांगितलं तिला,
"चांदण तर खूप दूर आहे"
"मी तुला मोतीही देऊ शकत नाही..
तुझी एवढीशी इच्छा माझ्याकडून
पूर्ण होऊ शकत नाही.."

क्षणभराच्या शांततेनंतर
सार आभाळ भरून आलं
माझ चांदणं माझ्यासमोर
रिमझीम रिमझीम बरसून गेलं

"किती रे वेडा आहेस तू,
प्रेम कधी काही मागतं का?"
"प्रेमाला प्रेमाशिवाय,
दुसर कधीकाही लागतं का?"

"स्वत:लाच विसरून स्वत:लाच
प्रेम म्हणजे देणं असतं..
आयुष्याला सुरात बांधेल
प्रेम असं गाणं असतं!"

मोती काय चांदणं काय..
प्रेम कधी कोणी मोजतं का?
चंद्र समोर असताना,
कोणी चांदणं शोधतं का?

शेवटची ओळ खूप गोड! :) पु.ले.शु.

राघव

फ्रॅक्चर बंड्या's picture

10 Sep 2009 - 5:00 pm | फ्रॅक्चर बंड्या

मोती काय चांदणं काय..
प्रेम कधी कोणी मोजतं का?
चंद्र समोर असताना,
कोणी चांदणं शोधतं का?

छान आहेत ह्या ओळी

प्रभो's picture

10 Sep 2009 - 5:06 pm | प्रभो

क्षणभराच्या शांततेनंतर
सार आभाळ भरून आल
माझ चांदण माझ्या समोर
रीमझीम रीमझीम बरसून गेल

मोती काय चांदणं काय..
प्रेम कधी कोणी मोजतं का?
चंद्र समोर असताना,
कोणी चांदणं शोधतं का?

आईशपथ ...१ नं कविता रे...

दत्ता काळे's picture

10 Sep 2009 - 5:13 pm | दत्ता काळे

कविता आवडली.

मीनल's picture

10 Sep 2009 - 6:57 pm | मीनल

मस्त कविता. मला आवडली.
राघव यांनी कवितेचा आस्वाद खरच द्विगुणीत केला.
मीनल.

बेसनलाडू's picture

10 Sep 2009 - 11:43 pm | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

मदनबाण's picture

10 Sep 2009 - 7:04 pm | मदनबाण

सुंदर कविता... :)

मदनबाण.....

पाकडे + चीनी = भाई-भाई.

प्राजु's picture

10 Sep 2009 - 11:52 pm | प्राजु

चंद्र समोर असताना
कोणी चांदण शोधत का?

व्वा!!! क्या बात है!
राघव, आनंद द्विगुणित केलास.. ही कविता पुन्हा नीट लिहून इथे.
धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अजिंक्य's picture

11 Sep 2009 - 1:13 pm | अजिंक्य

राघव, आनंद द्विगुणित केलास.. ही कविता पुन्हा नीट लिहून इथे.
प्राजुताईंशी सहमत.

चंद्र समोर असताना
कोणी चांदणं शोधतं का?

अतिशय छान. असेच लिहीत राहावे. शुभेच्छा.
(फक्त तेवढे व्याकरण थोडे सांभाळावे - :) - बाकी कविता उत्तम.)
-अजिंक्य.

अमित बेधुन्द मनचि लहर's picture

11 Sep 2009 - 10:47 am | अमित बेधुन्द मन...

क्षणभराच्या शांततेनंतर
सार आभाळ भरून आल
माझ चांदण माझ्या समोर
रीमझीम रीमझीम बरसून गेल

मोती काय चांदण काय
प्रेम कधी कोणी मोजत का?
चंद्र समोर असताना
कोणी चांदण शोधत का?

हृषीकेश पतकी's picture

11 Sep 2009 - 2:12 pm | हृषीकेश पतकी

मस्त कविता...
=D>

आपला हृषी !!