माझं कुमामोतो

सुबक ठेंगणी's picture
सुबक ठेंगणी in कलादालन
2 Sep 2009 - 6:41 pm

मी जिथे रहाते ते कुमामोतो शहर, माझं याबे गाव आहे तरी कसं? ते पहायचं असं कित्तीतरी दिवस वाटत होतं. पण "आज जाऊ, उद्या जाऊ" असं करता करता चक्क दोन वर्ष उलटून गेली. आणि मग ह्यावर्षी आईबाबांबरोबर त्यांची दुभाषी म्हणून जायचा योग आला. आणि मी कुमामोतोच्या प्रेमात पडले. का? त्याचं हे (प्रकाश)चित्रमय उत्तर...

माऊंट आसो...ऊर्फ आसोसान
हा अगदी माझ्या "बगल मे" म्हणावा तसा. घरापासून गाडीने फक्त चाळीस मिनिटांवर. जपानमधला सर्वात मोठा जिवंत ज्वालामुखी. खरं म्हणजे हे चार पर्वत. पण ह्यातला एकच जिवंत आहे. (नशीब!) ह्याचं सहाशे मीटर रुंदीचं मुख पाहिलं की आपलं मुख उघडं पडतं. त्यातला हिरवा लाव्हा पाहिला की जणू काही एखाद्या राक्षसाच्या हमामासाठी आताच त्या घंगाळात कोणीतरी ऊनऊन पाणी ओतून ठेवलंय की काय असं वाटतं. इथे काही फोटोत आजुबाजूचा ज्वालामुखीय पर्वतांनी बनलेला परिसरही दिसतोय.

ताकाचिहो गॉर्ज (घळई?)
ही अगदी कुमामोतोमधे नाही तर शेजारच्या मियाझाकी नावाच्या राज्यात आहे. आमातेरासु नावाची शिंतो धर्मातली देवी आपल्या भावाच्या खोड्यांना कंटाळून म्हणे इथे या घळीत लपून बसली होती. त्यामुळे ही जागा नुसतीच सुंदर नाही तर धर्मिक वलयांकित पण आहे.

त्सुजुनक्यो...अर्थात त्सुजुन पूल

हा जपानमधला कदाचित सर्वात मोठा दगडी पूल आमच्या याबे गावातच आहे. इतका की ह्याचा उल्लेख जपानी पाट्यपुस्तकात पण येतो. त्यामुळे तोक्यो वगैरे शहराकडची मंडळी "आम्हाला याबे माहित नाही" असं म्हणाली की मी त्यांना "तुमचं/तुमच्या मुलाचं/नातवाचं तिसरीचं पुस्तक उघडून पहा" असं सांगते आणि चांदण्या मिळवते. हा पूल नुसताच पूल नसून ती एक दगडी अक्वीडक्ट आहे. १८५४ मधे याबेमधे जेव्हा दुष्काळ आला तेव्हा पलिकडच्या नदीचं पाणी गावात आणण्यासाठी हा बांधला गेला. नुसताच पाहिला तर असा दिसतो.


आणि मग पाण्याच्या सहस्त्रधारा अंगाखांद्यावरून वहायला लागल्या की असा दिसतो...


आणि मग पाण्यात पडलेला एक इंद्रधनुष्याचा तुकडा टिपायचा मोह आवरला नाही.

कुमामोतो किल्ला
आपल्याकडे जसे किल्ले हे शिवशाहीशी जोडले आहेत तसेच जपानात सामुरायशाहीशी. ह्या किल्ल्याचा एक भाग आगीत जळून खाक झाला होता. पण आता मात्र तो जसाच्या तसा पुन्हा उभा करण्यात आला आहे. माझ्याकडे माझ्या जपानी मित्र मैत्रिणींना किल्ल्यांबद्द्ल सांगण्यासारखं बरंच काही असलं तरी दाखवण्यासारखं काहीच नाही ह्याची राहून राहून खंत वाटते. चेरी ब्लॉसम्सने मढवलेल्या ह्या किल्ल्याचे हे बाह्य आणि अंतरंग.

आता माझा सर्वात लाडका फोटो...देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाहो में है गुल खिले हुए!!!

साकुराचं फूल अगदी जवळून!

आणि हा पण एक्..."Beauty does to me what the spring does to these cherry trees...blossom"

कलाराहती जागाछायाचित्रण

प्रतिक्रिया

अवलिया's picture

2 Sep 2009 - 6:45 pm | अवलिया

फोटो मोठे करुन टाकलेत तर माझ्यासारख्या कमी दृष्टी असलेल्याला पहाणे सुकर होईल. !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सुबक ठेंगणी's picture

2 Sep 2009 - 6:48 pm | सुबक ठेंगणी

तुम्हीच उपाय सुचवलात तर माझ्यासारख्या मंद बुद्धी असलेलीला ते मोठे करणे सुकर होईल!

अवलिया's picture

2 Sep 2009 - 6:50 pm | अवलिया

घ्या ! एकादशीच्या घरी शिवरात्र...
माझ्या सुमार बुद्धीच्या कथा तुम्ही ऐकलेल्या दिसत नाहीत..

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सुबक ठेंगणी's picture

2 Sep 2009 - 6:45 pm | सुबक ठेंगणी

#o
हे फोटो एवढे पिटुकले का दिसत आहेत?
कोणीतरी F11...F11...

अवलिया's picture

2 Sep 2009 - 6:47 pm | अवलिया

लांबुन काढल्याने पिटुकले दिसत असावेत का ? जाणकारांनी प्रकाश टाकावा

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

प्रशांत उदय मनोहर's picture

3 Sep 2009 - 9:57 am | प्रशांत उदय मनोहर

F11 नव्हे. F1 B)
आपला,
(अचूक) प्रशांत

आणि हे घ्या.

फोटो पिटुकले दिसल्यास उपयोगी पडेल. :)
आपला,
(पर्यायसूचक) प्रशांत

---------
मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. ;)

सुबक ठेंगणी's picture

3 Sep 2009 - 10:10 am | सुबक ठेंगणी

तेच म्हणायचं होतं...पहिली प्रतिक्रिया पडायच्या आत टंकायच्या घाईत होते...भावना पोचल्याशी कारण...
भिंग पोचायला उशीर झालाय...
(पुढच्या वेळी छिद्र शोधायला तुम्हालाच होईल उपयोग त्याचा :P )

प्रशांत उदय मनोहर's picture

3 Sep 2009 - 10:23 am | प्रशांत उदय मनोहर

हे भिंग मिपाच्या मुखपृष्ठावर टाकलं तर किती बरं होईल. जेणेकरूण णवीण पिटुकल्या प्रकाशचित्रांणा पाहताणा त्रास होणार नाही.
आपला,
(टारझण-प्रभावित, दूरदर्शी मिपाकर) प्रशांत
---------
मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. ;)

मस्त कलंदर's picture

2 Sep 2009 - 6:47 pm | मस्त कलंदर

मस्तच आहे कुमामोतो शहर!!!!
फोटो जरा मोठे करून टाकता आले तर आणखी मजा येईल!!!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मदनबाण's picture

2 Sep 2009 - 7:40 pm | मदनबाण

अगं ठेंगणे जरा फोटु मोठे कर की...
हे वरचे फोटो पाहताना त्या जपान्यांसारखेच झाले माझे डोळे !!!

ताक :--- फोटु मस्त हायेत... :)

मदनबाण.....

Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html

दशानन's picture

2 Sep 2009 - 6:50 pm | दशानन

ये ठेंगणे... तुझ्या प्रमाणे तु फोटो पण ठेंगणे टाकले आहेस.... जरा मोठे टाक ना ;)

* बाकी लेखन शैली आवडली !

सुरेख आहेत फोटो !

श्रावण मोडक's picture

2 Sep 2009 - 7:07 pm | श्रावण मोडक

'नावाप्रमाणे फोटो' हे नक्की. नावामागची व्यक्ती वास्तवात तशी नाही, तसेच हे फोटोही वास्तवात तसे नाहीत. ;)
छान. हे छान लेखनासाठी आहे.
ओ, फोटो करा मोठे पटकन. नाही तर असले अवांतर प्रतिसादच नुसते पडतील इथं.

अवलिया's picture

2 Sep 2009 - 7:39 pm | अवलिया

हांगआशी ! आता कसे झक्क दिसत आहेत फोटो !
मस्त फोटो आणि लेख ! सुरेख ! :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

श्रावण मोडक's picture

2 Sep 2009 - 7:55 pm | श्रावण मोडक

फोटो सगळे सुरेख. त्यातही त्या घळीचे.. अहाहाहा... पहात रहावे असे आहेत.
बाहेरून किल्ला पाहून मात्र आपण समृद्ध आहोत हे नक्की. किल्ल्याचा अंतरंग पाहून मात्र आपण उघडेच हेही लगेचच लक्षात आलं.
बायदवे त्या ज्वालामुखीचं तोंड ६०० मीटर की फूट? फोटोवरून फूट वाटतंय.

सुबक ठेंगणी's picture

3 Sep 2009 - 12:25 pm | सुबक ठेंगणी

६०० मीटर आहे...

श्रावण मोडक's picture

3 Sep 2009 - 3:01 pm | श्रावण मोडक

छायाचित्रे खरंच लहान आहेत हे आत्ता पुन्हा वाटले... :)

चित्रा's picture

2 Sep 2009 - 7:59 pm | चित्रा

जपानात जाऊन नक्की काय बघायचे ते तुमचे आणि स्वाती (दिनेश) यांचे लेख वाचून कळू लागले आहे.

चंबा मुतनाळ's picture

2 Sep 2009 - 8:03 pm | चंबा मुतनाळ

सगळे फोटो मस्त आले आहेत्, माहिती देखिल छान. आसोसानच्या पोटात खदखदणारा हिरवा डोह सॉल्लीड दिसतो आहे. सर्व छायाचित्रे अप्रतीम

-चंबा

अप्रतिम!!!

धन्यु सु.ठें. तै

प्राजु's picture

2 Sep 2009 - 8:18 pm | प्राजु

सुरेख!!!!
खूप मस्त वाटलं!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनामिक's picture

2 Sep 2009 - 8:21 pm | अनामिक

वा वा काय सुंदर फोटू... धन्यवाद ठेंगणी!

-अनामिक

किट्टु's picture

2 Sep 2009 - 8:21 pm | किट्टु

सगळे फोटो अगदी अप्रतीम आले आहेत्, माहिती देखिल उत्तम. माऊंट आसो आणि ताकाचिहो गॉर्ज चे फोटो एकदम बेस्ट!!!!!

sujay's picture

2 Sep 2009 - 8:29 pm | sujay

सर्व फोटो आणी वर्णन झक्कास.
गॉर्ज आनि ज्वालामुखी चे फोटो विशेष आवडले !!!

सुजय

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Sep 2009 - 8:30 pm | बिपिन कार्यकर्ते

अहाहा!!! अहाहा!!! अहाहा!!! अहाहा!!! अहाहा!!!

@चित्रा : सहमत.

@सहज : देअर मे बी अ चेंज इन द प्रोग्रॅम. ;)

बिपिन कार्यकर्ते

निमीत्त मात्र's picture

2 Sep 2009 - 9:04 pm | निमीत्त मात्र

वा! तुम्ही अगदी तरबेज फोटोग्राफर दिसताय. अतीशय सुदर फोटो.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

3 Sep 2009 - 1:12 pm | भाग्यश्री कुलकर्णी

+१
खरच फोटो फारच छान आहेत."तुम्ही अगदी तरबेज फोटोग्राफर दिसताय"असेच म्हणते.

राघव's picture

4 Sep 2009 - 10:49 am | राघव

अगदी असेच म्हणतो. खूप सुंदर फोटू. :)

राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )

अश्विनीका's picture

2 Sep 2009 - 9:05 pm | अश्विनीका

सुरेख फोटोज. माहिती थोडक्यात पण छान सांगितली.
ज्वालामुखी पर्वताचा आणि न.३ हे तर खास आवडले.
- अश्विनी

क्रान्ति's picture

2 Sep 2009 - 9:08 pm | क्रान्ति

काय मस्त फोटो काढलेस! घळीचे आणि ज्वालामुखीच्या हिरव्या डोहाचे फोटो तर या जगातले वाटत नाहीत, कल्पनाचित्रं वाटावी इतके सुरेख आहेत! :)

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

आता येते तिथे मी उडत-उडत

दिपाली पाटिल's picture

2 Sep 2009 - 9:56 pm | दिपाली पाटिल

एकदम खतरी आहे तुझं गाव...आणि त्या जिवंत ज्वालामुखीची भिती नाही वाटत कां? पण बाकी फोटो छान आहेत, आता जपान मधे स्प्रिंग चालु आहे कां?

दिपाली :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Sep 2009 - 10:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकदम खतरी आहे तुझं गाव

फोटो तर खूपच सुंदर....!

लिखाळ's picture

2 Sep 2009 - 10:09 pm | लिखाळ

वा छान फोटो आहेत. खूप मस्त :)
साकूराचा फोटो विशेष आवडला. मी जिंप या प्रणालीचा वापर करून तो फोटो अजून चांगला करायचा प्रयत्न केला आहे. आवडतो आहे का पाहा..

-- लिखाळ.
आम्ही विभक्ती प्रत्यय शब्दाला जोडून लिहितो. तुम्ही कसे लिहिता?

चतुरंग's picture

3 Sep 2009 - 7:40 am | चतुरंग

सर्वच फोटू सु रे ख!!! (तुमच्या नावातलं 'सुबक'पण सर्व फोटूत दिसतंय! :) )
त्यातही पहिले तीन फारच उच्च. दुसरा तर एखाद्या कॅलेंडरला द्यावा इतका सुरेख.
वर्णनही अतिशय खेळकर शैलीत.
आता जपानला जायचा योग आला तर जिथे जाईन तिथे पहाण्यासारखं काय आहे हे सुबकसान आणी स्वातीसानला विचारुन ठरवता येईल! ;)

चतुरंग(सान)

भाग्यश्री कुलकर्णी's picture

3 Sep 2009 - 8:30 am | भाग्यश्री कुलकर्णी

फोटो फारच छान आहेत :)

विशाल कुलकर्णी's picture

3 Sep 2009 - 9:26 am | विशाल कुलकर्णी

सुरेख फोटो ! नदीचे पाणी गावात आणण्यासाठी पुल बांधण्याची कल्पना विलक्षणच !

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

सुबक ठेंगणी's picture

3 Sep 2009 - 2:36 pm | सुबक ठेंगणी

मी लेखात नमूद न केलेली गोष्ट म्हणजे..१८५४ च्या सुमारास बांधलेल्या ह्या पुलाच्या सगळ्या वास्तुशास्त्रीय नोंदी..नकाशे, मोजमापे, वापरलेले मटेरिअल जवळच्याच एका छोट्याशा घरवजा संग्रहालयात जपून ठेवलेल्या आहेत. जेणेकरून हा पूल पडलाच तर पुन्हा जसाच्या तसा बांधता येईल.
आपला शनिवारवाडा आगीत जो जळाला तो आपल्याला पुन्हा बांधता आला नाही. ह्याची प्रत्येक वेळी खंत होते. म्हणून नाही लिहिलं.

स्मिता श्रीपाद's picture

3 Sep 2009 - 11:39 am | स्मिता श्रीपाद

अप्रतिम फोटो...
दुसरा आणि तिसरा जास्त आवडला..

-स्मिता

अमोल केळकर's picture

3 Sep 2009 - 11:54 am | अमोल केळकर

वा ! खुप छान फोटो ! वर्णनही
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

स्वाती दिनेश's picture

3 Sep 2009 - 12:05 pm | स्वाती दिनेश

मस्त फोटो आणि वर्णनही..
आता लवकरच जापानकी दुनियाचा पुढचा भाग टाकायलाच हवा इतक्या आठवणी जागवल्यास,:)
स्वाती

शाल्मली's picture

3 Sep 2009 - 2:04 pm | शाल्मली

फोटो एकसे एक सुरेख आले आहेत!
मस्त.

--शाल्मली.

मस्त आहेत फोटो. आणि खरं तर बर्‍यापैकी मोठे आहेत.
भापू

लेख देखिल फोटोना साजेशाच आहे.धन्यवाद.

वेताळ

स्वाती२'s picture

3 Sep 2009 - 6:41 pm | स्वाती२

मस्त फोटो आणि वर्णन!

नंदू's picture

4 Sep 2009 - 10:31 am | नंदू

अप्रतिम.......

नंदू

अप्रतिम.......अप्रतिम.......अप्रतिम....... :)

sneharani's picture

4 Sep 2009 - 12:47 pm | sneharani

सगळे फोटो अगदी अप्रतिम आले आहेत्, माहिती देखिल उत्तम.

झकासराव's picture

4 Sep 2009 - 3:02 pm | झकासराव

मस्त आहेत सगळे फोटो. :)

बेसनलाडू's picture

5 Sep 2009 - 10:16 am | बेसनलाडू

(वाचक)बेसनलाडू

सोनम's picture

17 Sep 2009 - 6:24 pm | सोनम

सर्व फोटू उत्तम आहेत. :) :)
त्या फोटोकडे नुसते पाहावेसे वाटते...

"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"

भोचक's picture

17 Sep 2009 - 6:39 pm | भोचक

क्लास फोटो. लेखनशैलीही मस्त. तो जागृत ज्वालामुखी बघितल्यावर फाटते. तिथे आजूबाजूला रहाणार्‍यांना उष्णता आणि इतर त्रास होतात काय?

(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?
ही आहे आमची वृत्ती