चांदण्यातले जेवण

नाना बेरके's picture
नाना बेरके in जे न देखे रवी...
25 Aug 2009 - 2:06 pm

अवांतराला ख.फ.मध्ये
मानाचे स्थान मिळाले
वाटवेगळ्या सदस्याला
स्वैंपाकघरात पान मिळाले

(तरीही जेवण जात नाही
सदस्य जातो अवघडून)

अळणी खाणे जमत नाही
कुचंबणा होते फार
रस्सा इथला गोड वाटतो
भाकरही लागते गार गार

कसे जमायचे जेवण इथले
फार मोठा प्रॉब्लेम झाला
चवीने खाण्याच्या लालसेला
मर्यादेचा लगाम लागला

तोच भात, तोच रस्सा
वाटे खावा सगळ्यांबरोबर
चांदण्यांमध्ये घ्यावे जेवण
द्यावे प्रतिसादाचे ढेकर

करुणकविता

प्रतिक्रिया

प्राजु's picture

25 Aug 2009 - 7:46 pm | प्राजु

अखंड रस्सा -भात खाता
आवांतराचे अजिर्ण झाले
कधीतरी मग मेतकूट भाता
डिलीटण्याचे पथ्य आले..

कविता आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

श्रावण मोडक's picture

31 Aug 2009 - 11:37 am | श्रावण मोडक

अखंड रस्सा -भात खाता
आवांतराचे अजिर्ण झाले
कधीतरी मग मेतकूट भाता
डिलीटण्याचे पथ्य आले..

नाना, तुमच्या भावना ठीके, पण प्राजु यांनी लिहिलेलं खरं आहे हो.
आता हे केलं कुणी आणि भोग कोणाचे वगैरे म्हणण्यात अर्थ नसतो हेही खरेच...

विसोबा खेचर's picture

31 Aug 2009 - 9:15 am | विसोबा खेचर

:)