आपट किबोर्ड, उठू दे अक्षरे, दाब बटणे, दीपव डोळे, कीटव कान, जाळ ती बॅन्डवीड्थ अश्या अतीप्रगत आंतरजालाच्या ऋतूमधे प्रतिभेच्या अगणीत छत्र्या (पावसाळ्यात नाही का ते एका प्रकारचे मश्रूम) न उघडतील तर नवलच. कोणी काहीही लिहले तरी ते कूठल्या न कूठल्या एका तरी साहीत्यप्रकारात फीट होतेच नाही का. साहीत्यसेवेच्या या महायज्ञातील भडकलेल्या अग्नीचे चटके बसून जसे गणपती मिरवणूकीतल्या ढोलाच्या ठेक्यावर जसा आपोआप पाय हलायला लागतो त्याप्रमाणे आमची बोटे टंकीतायला लागली.
पहीला डाव देवाला ह्या नियमाने आम्ही ठरवले की स्वतंत्र लेखाच्या किंवा लोकप्रिय लेखकांच्या पूजेच्या नादी न लागता आपल्या आंतरजालावरील आवडत्या, असामान्य प्रबोधनात्मक असे काहीसे करणारे अस्सल लेखकांना मानवंदना देवू या. (बिगबजेट लेखकांना आपल्या लेखात परवडत नाही म्हणून साइड्चे लेखक घेऊन काढताय का लेख, अशीही टीपणी ऐकू येतेय) असो जास्त वाट बघायला न लावता माझ्या आवडत्या लेखकाचे नाव.....
टिकाकार - हे कधी कधी टीकाकार-१ ह्या नावाने देखील लेखन करतात. त्यात त्यांच्या प्रतिभेला एक नवी "धार" येते. जीची तुलना झनझणीत तर्रीशीच होऊशकते. हे तसे मितभाषी असून पण खूप काही प्रकट करू शकत असल्याचा प्रत्यय त्यांच्या लेखनातून येतो. त्यांच्या लेखनातून त्यांच्या जीवनविषयक तत्वज्ञानाचे उत्तम दर्शन होते. मराठी जन तसे भिडस्त पण "संकेत स्थळ " ह्या आपल्या लेखातून नवीन लहान बाळाला सर्वांदेखत विचीत्र नावाचे म्हणून मराठीजन तोंडदेखले गोड बोलणे सोडा, मी कसे कोणाला न कचरता बोलू शकतो (तुम्हीपण करू शकता अशी) आपल्या विद्रोही साहीत्याची झलक मराठी जनतेला दिली. ह्याच संप्रदायातील जूने लेखक श्री. विनायक यांच्या सारखे दुसर्याच्या कठीण "प्रसव" वेदनांचे स्वतःच्या राजकारणाकरता वापर न करता, लिडींग फ्रॉम फ्रंट असा आर्दश घालून दिला असे मला वाटते.
भारतात व्यक्तिपुजा कधी सम्पणार? हा त्यांच्या काळजाला घोर लागलेला प्रश्र त्यांनी त्यांच्या लेखनातून देखील पूढे आणला. जेव्हा इतरजन भाइकाका, त्यांचे साहीत्य, त्यांची शैली ह्या पूजाअर्चेत अडकले असताना "पु. ल. आणि Atheism" ह्या विद्रोह लेखनमालेच्या अजुन एका साहीत्यरत्नाद्वारे महाराष्ट्रातील पूजा /भक्तीभावाच्या वाढलेल्य प्रस्थावर अत्यंत मार्मीक खडा टाकला. कन्फुयज्ड महाराष्ट्रातील रसीकांना एकदमच बिम्यूज्ड करून टाकले. अजून एक पार्टटाइम लेखक श्री. पोष्टमन ह्यांच्या साहीत्यसमीक्षण पाट्या टाक (संत तात्याबामहाराज वचनामृत - भाग १ ) लेखनचौर्यापेक्षा मला "पु. ल. आणि Atheism" मधील ओरिजीन्यालीटी भावली.
नूस्तीच साहीत्य सेवा नाही केली तर बंड केले. खोटी आणीबाणी , स्वातंत्रावर गदा आणून संपादकीय हूकूमशाहीला जी टक्कर दिली तिने तर आख्खा महाराष्ट्र चक्रावून निघाला.
गद्य, पद्य, लाज ह्या कशाचेच वावडे नसलेल्या व एकला चलो रे हे महातत्व बाळगणार्या मनस्वी तपस्वीकडे वर उल्लेख केलेल्या महायज्ञात घालायला बर्याच काड्या म्हणजे समीधा असतील ह्यात शंकाच नको.
प्रतिक्रिया
21 Sep 2007 - 4:18 pm | राज जैन (not verified)
सहज व सुंदर !
क्या बात है !
राज जैन
21 Sep 2007 - 4:32 pm | टीकाकार-१
मित्रा,
चांगले लेहितोस.
पण फुल्टाईम वेबसाईट चालवणे हा चांगला धंदा नाही.
21 Sep 2007 - 4:36 pm | सहज
>>पण फुल्टाईम वेबसाईट चालवणे हा चांगला धंदा नाही.
असे का बरे?
21 Sep 2007 - 4:36 pm | आजानुकर्ण
हा हा.. :)
चालू द्या.
21 Sep 2007 - 4:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहजराव,
काही दिवसापासून आम्ही पाहतोय आपल्या लेखनाला एक धार चढलेली आहे, ब-याचदा विनोदी शैलीने,तर कधी-कधी गंभीर प्रसंगी गंभीर प्रतिसादही पाहिले आहेत.अभ्यासाच्या वेळेस अभ्यास या पध्दतीने आपली वाटचाल चालू आहे. इतके लिहिण्याचे कारण की,आपण ज्या ''मला आवडणारे आंतरजालावरील असामान्य प्रबोधनात्मक असे काहीसे करणारे अस्सल लेखक'' या प्रतिभावंत साहित्यिकांचा योग्य शैलीत,त्यांचा आणि त्यांच्या साहित्यप्रवासाचा (गौरव) परिचय करुन दिला त्यामुळे अख्खा महाराष्ट्र गणेशोत्सव सोडून त्यांच्या जयजय कारात गुंतला आहे.त्याच बरोबर त्यांना महाराष्ट्र सारस्वतांच्या यादीत पाहून संपूर्ण संकेतस्थळवासी आज धन्य झाले !
अवांतर ;) बरे झाले आपण यांच्यावर सुंदर लेख लिहिला, नाहीतर आमच्या मनात त्यांच्याविषयीच्या आदराने एका लेखाचा आकार धारण केलाच होता :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
21 Sep 2007 - 5:09 pm | टीकाकार-१
प्रा. डॉ. साहेब,
तुमचाही लेख येऊद्या. तेवढाच टाईम पास...
तुमच्या कडेही भरपूर वेळ आहेच. ;)
बाकी तुमची डॉ. आणि प्रा. ही बिरूद निळ्या अक्षरात मिरवायची हौस कधी संपणार? :)
21 Sep 2007 - 5:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एच टी एम एल कोडींगचा इतकाच फॉर्मेट सेव्ह केलेला आहे आणि तो कोठे वापरायचा म्हणून इथे वापरतो.(तोही मित्रांनी दिलाय,निळ्या रंगासहीत)
बाकी प्रा.डॉ. चेही तसेच आहे,आहे तर कुठे वापरायचा म्हणून इथे.
आता आग्रह करता आहात तर झक्कास लेख रविवारी लिहिण्याचा प्रयत्न करतो, पण दाद द्यायची हं आवडला तर ! तोंड वाकडे करुन म्हणायचं नाही ठीक होता म्हणून ! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
21 Sep 2007 - 5:25 pm | टीकाकार-१
बरं बरं छान आहे म्हणीन हा...
नाहीतर बाकिचे आहेतच ...नेहमीप्रमाणे..:)
21 Sep 2007 - 5:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आरे त्यांचे पाठबळ आहे म्हणून तर लिहितो रे !
नाही तर वाचनमात्र राहावे लागले असते किंवा टूकाराम-टूकाराम १ नावे घेत काड्या करत फिरावे लागले असते ना ! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
21 Sep 2007 - 5:48 pm | राज जैन (not verified)
;)
मस्त नाव आहे !
पण साहेब अजून एक आहे की काड्याराम ! कसे एकदम दक्षिण भारतीय भारदस्त तेलगू अथवा तामिळ हीरोचे नाव वाटत नाही !
अजून एक टिकाकार देखील नाव एकदमच भारदस्त आहे, जेव्हा मी प्रथम हे नाव वाचले तेव्हा वाटल होतं की कोणीतरी गंभीर प्रकाराचा मानव आहे "टिकाकार" जो गंभीरपणे वाचन करुन गंभीरपणे त्याचा सविस्तर पंचनामा करत असतील !
पण काय करावे .... नाम अमीरचंद ..... पर जेब फकीरचंद असा काहीतरी प्रकार दिसतो आहे !
राज जैन
"मानसाने कमीत कमी आपल्या नावाची तरी किमंत राखावी ह्या मताचा असलेला मी"
21 Sep 2007 - 5:53 pm | टीकाकार-१
राजे साहेब..
इथल्या "कोंबडी" कडून अंड्याची आणि "प्रा.डॉ." कडून डॉक्टर्कीची तर आपेक्षा तुम्ही करत नाही आहात ना?
21 Sep 2007 - 6:35 pm | विसोबा खेचर
ह्याच संप्रदायातील जूने लेखक श्री. विनायक यांच्या सारखे दुसर्याच्या कठीण "प्रसव" वेदनांचे स्वतःच्या राजकारणाकरता वापर न करता, लिडींग फ्रॉम फ्रंट असा आर्दश घालून दिला असे मला वाटते.
अगदी खरं आहे! प्रसव इथून उडवून लावल्याच्या प्रसुतीवेदना विनायकालाच जास्त झाल्या आणि त्याच्याकडून 'अभिव्यक्ति स्वातंत्र्य' हा लेख जन्माला आला! :)
असो, च्यामारी मला शिकवतात अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या गप्पा!:)
अजून एक पार्टटाइम लेखक श्री. पोष्टमन ह्यांच्या साहीत्यसमीक्षण पाट्या टाक (संत तात्याबामहाराज वचनामृत - भाग १ ) लेखनचौर्यापेक्षा मला "पु. ल. आणि Atheism" मधील ओरिजीन्यालीटी भावली.
हा हा! 'पार्टटाईम लेखक' हा प्रकार आवडला! :)
काय पण बाकी नशीबवान मनुष्य आहे मी! लोकं हौशीहौशीने माझ्या ब्लॉगावरील उतारेच्या उतारे दुसरीकडे कॉपी पेष्ट करण्यात धन्यता मानतात! असो, या सर्वांना संत तात्याबांचा आशीर्वाद आहे! :)
नूस्तीच साहीत्य सेवा नाही केली तर बंड केले. खोटी आणीबाणी , स्वातंत्रावर गदा आणून संपादकीय हूकूमशाहीला जी टक्कर दिली तिने तर आख्खा महाराष्ट्र चक्रावून निघाला.
गद्य, पद्य, लाज ह्या कशाचेच वावडे नसलेल्या व एकला चलो रे हे महातत्व बाळगणार्या मनस्वी तपस्वीकडे वर उल्लेख केलेल्या महायज्ञात घालायला बर्याच काड्या म्हणजे समीधा असतील ह्यात शंकाच नको.
क्या बात है! सुंदर लेख..
आपला,
(एक नंबर काड्याघालू!) तात्या.
21 Sep 2007 - 11:44 pm | सर्किट (not verified)
गद्य, पद्य, लाज ह्या कशाचेच वावडे नसलेल्या
बिगबजेट लेखकांना आपल्या लेखात परवडत नाही म्हणून साइड्चे लेखक घेऊन काढताय का लेख, अशीही टीपणी ऐकू येतेय
खूपच हसलो !!
आपली शैली आवडली, ह्याविषयी पुढे कधीतरी (म्हणजे दुसर्या भागात.)
- सर्किट
21 Sep 2007 - 11:39 pm | कोलबेर
टीकाकार हा आपल्यातलाच आहे हे सर्वांनी ओळखलेच असावे. जाणून बु़जून केलेल्या टंकलेखनातल्या चूका आणि जिथे तिथे तोंड खुपसणे इत्यादी प्रकार म्हणजे, - 'लोकशाहीवाले संकेतस्थळ काढता काय? बघा कसा पीडतो' ह्या मानसिकतेतुन आलेला जळफळाट आहे हे स्पष्ट आहे. पण हा टीकोजीराव तसा आळशी माणूस असुन त्याला सहसा एका ओळीच्यावर लिहिता येत नसल्याने त्याची डाळ शिजत नाही हेच खरे! :-) ह्या प्रतिसादावर देखिल त्यांची एक ओळ येणार हे नक्की!!
बाकी लेख 'सहज' सुंदर
-कोलबेर
22 Sep 2007 - 8:34 am | आजानुकर्ण
शिवाय टीकाकारांची संकेतस्थळावर हजेरीची वेळ लक्षात घेता ते भारतातच वास्तव्यात आहेत हे लक्षात येते.
23 Sep 2007 - 9:17 pm | टिकाकार
तुमच्या चातुर्य्कथा कधी लिहिताय
टिकाकार
23 Sep 2007 - 11:47 pm | कोलबेर
टिकाकारा तू इतका प्रेडीक्टेबल असशील असे वाटले नव्हते.. माझ्या चातुर्यकथांआधी तुजे आयपी पत्ते प्रसिद्ध होणार नाहीत ह्याची काळजी घे हो!! :-)
24 Sep 2007 - 12:04 am | विसोबा खेचर
हो रे बाबा टिकाकारा, इथे गावकीचं राजकारण आहे हो!
कोणत्या गोष्टी उजेडात आणल्या जातील आणि कोणत्या रातोरात दाबून टाकल्या जातील याचा काही पत्त्या लागायचा नाही! :)
तेव्हा नावाने 'टिकाकार' आहेस ते चांगलेच आहे. टीका करायचं लायसन तुझ्या नावातच आहे. परंतु केवळ करायची म्हणून टीका करू नकोस, तर अभ्यासपूर्ण टीका कर. टीका करणार्याचा मूळ लेखनावर/लेखनप्रकारावर जबरदस्त अधिकार असला पाहिजे एवढं लक्षात घे. तुझ्या टीकेची दखल सगळ्यांना घ्यावी लागेल असा आदर्श निर्माण कर. केवळ नाव टिकाकार आहे म्हणून जिथेतिथे पिंका टाकत हिंडू नकोस. नाहीतर काही दिवसानी लोक तुझ्या प्रतिसादांकडे लक्ष देईनासे होतील आणि अधिकच फ्रस्ट्रेट होशील. आणि तसं सध्याही तुझ्या सोकॉल्ड टीकेच्या निरर्थक पिचकार्या पाहिल्यावर तू ऑलरेडी फ्रस्ट्रेट असावास असं वाटतं!
बाकी मिसळपाव सुरू झाल्यापासून काही मंडळींनी फ्रस्ट्रेट होऊन संतुलन गमावल्याचे माझ्या पाहण्यात आहे! तसेच अनेकांना अचानक पोटदुखीचे विकारही सुरू झाल्याचं माझ्या पाहण्यात आहे! अरे मिसळ आवडते म्हणून ती प्रमाणात खाणे हे ठीकच आहे पण तिच्या जास्त नादी लागू नका, नाहीतर पचायची नाही :)
असो, काळजी घे...
तात्या.
24 Sep 2007 - 1:17 pm | गुंडोपंत
व आवडले लेखन...
मस्तच हाणलाय हो!
"नूस्तीच साहीत्य सेवा नाही केली तर बंड केले. खोटी आणीबाणी , स्वातंत्रावर गदा आणून संपादकीय हूकूमशाहीला जी टक्कर दिली तिने तर आख्खा महाराष्ट्र चक्रावून निघाला."
सही! मजा आ गया!
आपला
गुंडोपंत
22 Jul 2010 - 10:50 pm | क्रेमर
या लेखमालेतील प्रत्येक पूष्प वाचनीय आहे.
-क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क))
_________________
सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.