एक उसासा.....

JAGOMOHANPYARE's picture
JAGOMOHANPYARE in जे न देखे रवी...
29 Jul 2009 - 4:02 pm

ओरिजिनल विडम्बन :

पुष्टावलेला तो उंच ऊस
मला म्हणतो आता नको खाऊस
ओली चिंब झाली झाडे
कपडे ही ओले चिंब झाले
तुझं ते हळुवार खेचणं
माझ्य़ावर टिचकी मारून ऐकणं
आणि हळुच चीर काढणं
आणि माझा रस थेंब थेंब पडणं
नेहमीच हात चिकट चिकट होणं
प्रत्येक उसाला टक लावून बघतोस
आणि एकाला ऊचकतोस
तुझं उचकणं आणि आमचं पडणं
झालय आता संवयीचं शेताला
कधी कळणार रे मुळासकट खाऊं नये उसाला?

पाककृती : विडम्बनाचे विडम्बन

पुष्टावलेला तो उंच ऊस
म्हणतो आता तसाच नको खाऊस
ओले चिम्ब भिजव आधी
मिठाच्या पाण्यात मला..
मग हळुवार तेल सोड तव्यात
फोडणी टिचकी मारू लागली की
हळुच मिरची काढ बाहेर
आणि पिवळ्या धम्मक हळदी बरोबर
हात चिकट असतानाच तव्यात टाक
प्रत्येक गन्डेरा शिजू दे
उसासे टाकत
तुझं झारा हलवणं आणि माझं शिजणं
होईल आता संवयीचं
मग कशाला रे आठवशील मिसळपावाला ?

भयानकहास्यपाकक्रियाविडंबन

प्रतिक्रिया

सूहास's picture

29 Jul 2009 - 4:05 pm | सूहास (not verified)

कसल खतरनाक पुस्तक परीक्षण आहे.नायकाची त्रेधा-तिरपिट योग्य प्रकारे मा॑डली आहे...खुपच छान...

सुहास
(म्हाळसाका॑त विद्यालयातुन दहावीची ऐ.टी.के.टी. देण्याच्या विचारात असलेला... )

योगी९००'s picture

30 Jul 2009 - 12:55 am | योगी९००

खादाडमाऊ

पाषाणभेद's picture

30 Jul 2009 - 7:23 am | पाषाणभेद

चांगला प्रयोग आहे. दोन्हीही. म्हणजे पाक्रू अन विडंबनही.

वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.

- पाषाणभेद