श्रावणातला पाऊस तुझ्याचसारखा
क्षणात हसणारा, क्षणात रुसणारा
श्रावणातला पाऊस तुझ्याचसारखा
खट्याळ, खोडकर, उगाचच छेडणारा
श्रावणातला पाऊस तुझ्याचसारखा
दु:खावर हळुवार फुंकर घालणारा
श्रावणातला पाऊस तुझ्याचसारखा
अवेळी अडवून चिंब भिजवणारा
श्रावणातला पाऊस तुझ्याचसारखा
कणाकणात हिरवी स्वप्नं रुजवणारा
श्रावणातला पाऊस तुझ्याचसारखा
अवचित येणारा, अचानक जाणारा
प्रतिक्रिया
29 Jul 2009 - 12:47 am | ऋषिकेश
मस्त! कविता आवडली
क्रांतितैची कविता तिच्याचसारखी
सतत सर्वत्र आनंद वाटणारी
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
29 Jul 2009 - 8:50 am | पाषाणभेद
हेच म्हणतो.
झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड
29 Jul 2009 - 9:01 am | मदनबाण
श्रावणातला पाऊस तुझ्याचसारखा
अवचित येणारा, अचानक जाणारा
व्वा. मस्तच... :)
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa
29 Jul 2009 - 9:12 am | विसोबा खेचर
एक नंबर कविता..!
आपला,
(फ्यॅन) तात्या.