मृत्यु, जीवन अन निसर्ग!

Nile's picture
Nile in जनातलं, मनातलं
26 Jul 2009 - 10:56 am

आपल्याला कळतं ते नैसर्गिक अन जे नही कळत ते अनैसर्गिक असं कीती सहजपणे आपण समजुन जातो ना? पण कधी कधी 'निसर्ग' अशा काही करामती करुन जातो की मग तो आपल्याकरता फक्त निसर्ग राहतं नाही!

जन्म आणि मृत्युने मानवाच्या संशोधक वृत्तीला नेहमीच आव्हान दिलं आहे, आज क्लोनींगमुळे माणुस जन्मदात्याच्या बराच जवळ जाउन पोहोचला आहे, पण अजुन मृत्यु मात्र फारच दुर आहे. पण जन्मतः साक्षात मृत्युने दिलेल्या जीवनदानाला काय म्हणाल? हा विडीओ पहा अन तुम्हाला कळेल मला काय म्हणायचे आहे ते. :)

आणि आता, मृत्युच्या अक्षरशः दाढेतुन सही सलामत परत येण्याला काय म्हणाल? याला म्हणतात द बॅटल ऑफ क्रूगर!

शक्य-अशक्यतेच्या गणितात कोणीतरी हे मांडुनही दाखवेल, पहीले उदाहरण कुठल्यातरी मानसशास्त्राच्या चमत्काराचे उदाहरणसुद्धा असेल, पण मला त्याची माहीती नसल्यामुळेच हे पाहुन तोंडात बोटे घातल्याशिवाय राहवत नाही.

यातुन काय तो संदेश ज्याचा त्याने घ्यावा, वाचकांना आवडेल म्हणुन हा प्रपंच. :)

-Nile.

छायाचित्रणविचार

प्रतिक्रिया

सहज's picture

26 Jul 2009 - 11:53 am | सहज

दोन्ही फिती अतिशय छान. अशीच एक ही देखील फीत पाहीली होती ज्यात सिहिंणीने एका हरणाच्या पिल्लाला "सांभाळले" होते.

नाईलराव अजुन येउ द्या तुमच्या पोतडीतून.

मदनबाण's picture

26 Jul 2009 - 1:18 pm | मदनबाण

नाईलराव दोन्ही इडियो जबरदस्त हायेत !!!
दुसरा इडियो = काळ आला पण वेळ नाही.
काय माहित नाही पण मला गजेंद्र हत्तीची ही गोष्ट आठवली.
http://images.exoticindiaart.com/oils/gajendra_moksha_or32.jpg

मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

एकलव्य's picture

27 Jul 2009 - 11:41 am | एकलव्य

दुसरा इडियो = काळ आला पण वेळ नाही.
काय माहित नाही पण मला गजेंद्र हत्तीची ही गोष्ट आठवली.

लक्षात राहील...

स्वाती दिनेश's picture

26 Jul 2009 - 1:24 pm | स्वाती दिनेश

दोन्ही व्हिडिओ मस्त!
स्वाती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jul 2009 - 1:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दोन्ही व्हिडियो मस्त !
'काळ आला होता पण वेळ आली नव्हती' असेच म्हणावे.

-दिलीप बिरुटे

दादा कोंडके's picture

26 Jul 2009 - 3:15 pm | दादा कोंडके

छान व्हिडिओज!
दुसरा (द बॅटल ऑफ क्रूगर!) व्हिडिओ आजतक वर पाहिला होता. त्यावर त्यांनी अर्धा तास (जाहिरातींनी भरलेली) फिल्म बनवली होती.
आणि मधे मधे आजतक स्टाईल ने "बछडे ने दिखायी हिंमत", "मगरमछ भी है रेस मै!" वगैरे दाखवत होते! :D

"I always win, except when I loose. But then I just don't count" :D

हे पाहुन तोंडात बोटे घातल्याशिवाय राहवत नाही.O:)

आयुष्य खरंच सोपं असतं,
आपणच त्याला कठीण करून ठेवतो,
स्वत:साठी आणि इतरांसाठी.

प्रदीप's picture

26 Jul 2009 - 4:49 pm | प्रदीप

एक हा
आणि दुसरा हा

छोटा डॉन's picture

26 Jul 2009 - 5:04 pm | छोटा डॉन

व्हिडिओस डायरेक्ट १ नंबर आहेत.
आवडले, येऊद्यात अशाच जबरदस्त क्लिप्स ...

------
छोटा डॉन

अमृतांजन's picture

26 Jul 2009 - 7:33 pm | अमृतांजन

जीवन म्हणजे एखादे पातळ खापरीचा तुकडा आपण पाण्यात जोरात भिरकवला जसा तो पाण्यातून बाहेर येतो, परत पाण्यात जाऊन बाहेर येतो तसा आत्म्याचा एका योनीतून दुसऱ्या योनीकडे जाणारा प्रवास वाटतो.

जीवनाकडे पाण्यातून पाहीले तर त्याचा फार थोडा संकूचित असा भाग (परीणाम) दिसतो, पण पाण्याबाहेर येऊन जर तो खापरीचा तुकडा भिरकवण्याऱ्याच्या नजरेने त्याकडे पाहीले तर जीवन हे एक क्षणिक (भंगूर) असल्याची अनुभूति मिळते.

बाकी तुम्ही ह्या चित्रफितीकडे पाहून जे ठरवायचे ते ठरवा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Jul 2009 - 5:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

झबरदस्त! नाईलशेट, धन्यवाद.

अदिती

अवलिया's picture

26 Jul 2009 - 6:27 pm | अवलिया

वा ! मस्त!!

नाईल शेट धन्यु रे !!

--अवलिया

विकास's picture

26 Jul 2009 - 6:56 pm | विकास

नाईल साहेब,

दोन्ही व्हिडीओज मस्त आहेत. पहीला बघत असताना प्राणिजगतात "माणुसकी", "ह्युमन राईट्स" वगैरे शब्द नसूनही केवळ नैसर्गिक उस्फुर्ततेने (natural instict) ज्यांना आपण रानटी म्हणू शकतो ते कसे वागू शकतात ते कळते. "बच्चे मे है भगवान" हे गाणे आठवले...नाहीतर हल्ली दहशतवादी (पॅलेस्टाईनमधील हमास, सद्दामच्या हाताखालचा इराक, इंडोनेशिया, आणि प्रभाकरन) ह्या सर्वांनी स्वतःला वाचवायला "ह्युमन शिल्ड" तयार केली आणि दुसरीकडे "चाइल्ड वॉरीयर्स"तयार केले.

दुसर्‍या व्हिडीओ मधे काय सरळ सरळ वन्य प्राण्यांकडून मेसेज आहे: "संघटन मे शक्ती है" एरव्ही नुसत्या म्हशी पण एकत्र येऊन काय करू शकतात (on lighter note, एकदम मला "दिल विल प्यार व्यार" मधे जिमी शेरगिल जेंव्हा चुकून लोकलमधल्या लेडीजच्या डब्यात चढतो तेंव्हात्याची जी अवस्था होते ती आठवली... बाकी यात दुसरे कुठले साधर्म्य दाखवायचा हेतू नाही. तेंव्हा कृपया नो ऑफेन्स!)

Nile's picture

27 Jul 2009 - 9:07 am | Nile

इंटरेस्टींग उत्तर आहे विकासराव. आता हे पहा. :)

आता ही बदल्याची भावना नक्की त्यांच्या नॅचरल इंस्टींग्ट मध्ये येते का मला शंकाच आहे! (सिंहांच्या बछड्यांन्या त्यांनी चिरडुन मारणं)

@ दादा कोंडके , वा! आजतक वाल्यांना सध्या बातम्या मिळत नाहीत की काय? (की भारतात स्वतःला जमिनीत पुरणारे साधु, किंवा जादुने दुरुन वाकडे पण जवळुन सरळ असे खांब सध्या सापडत नाही आहेत? ;) )

@ प्रदीप, भारी आहेत, अश्याच अनेक प्रसंगांचा एकत्रीत विडिओ आहे सापडला तर टाकतो इथे.

सहजराव, बाणराव, स्वातीताई, प्रा. साहेब, डॉनराव, दुर्बिटणेबाई, राजू, अमृतांजन आणि अवलियाशेट, धन्यवाद मिळाल्यास अजुन टाकतो इथे. :)

विसोबा खेचर's picture

27 Jul 2009 - 9:36 am | विसोबा खेचर

दोन्ही चित्रफिती क्लास..!

तात्या.

मस्त कलंदर's picture

27 Jul 2009 - 11:43 pm | मस्त कलंदर

दोन्ही विडिओज खुपच मस्त.. काही गोष्टी कुठल्या सुत्रात.. नियमात नि शब्दातही मांडता येत नाहीत.. हे असंच का घडलं याचं विश्लेषण होऊच शकत नाही.. त्यामुळे दोन्ही फिती केवळ शब्दातीत...!!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

नंदन's picture

28 Jul 2009 - 12:07 am | नंदन

दोन्ही दुवे मस्त, नाईलशेठ :). बॅटल ऑफ क्रुगरचा आधी पाहिला होता, पण पहिला प्रथमच पाहिला. पाहून अर्थातच आश्चर्य वाटले, पण तसे वाटणे हा आपल्या (उत्क्रांतीच्या शेवटच्या टप्प्यावर असलेल्या मनुष्यप्राण्याच्या) सुप्त अहंकाराचा भाग असू शकेल का, हा थोडा तिरपागडा विचारही डोक्यात आला.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मृदुला's picture

28 Jul 2009 - 12:09 am | मृदुला

दोन्ही फिती आवडल्या. इथे दिल्याबद्दल धन्यवाद माझेही.

Nile's picture

20 Aug 2009 - 12:10 pm | Nile

आपले कृषीमंत्री यांच्याकडुन प्रोत्साहीत तर नाही ना झाले? ;)

Nile's picture

1 Oct 2009 - 9:56 am | Nile

माझ्या समस्त 'निवासी' बांधवांना(अन त्यांच्या भगिनींनाही) भेटः http://www.thedailyshow.com/watch/tue-september-29-2009/deep-space-naan :) :)