हागणदारीमुक्त गाव

फ्रॅक्चर बंड्या's picture
फ्रॅक्चर बंड्या in जे न देखे रवी...
25 Jul 2009 - 3:07 pm

सरकारने नवीन नियम काढला हाय,
आत उघड्यावर बसायचे नाय,
सगळ्यानी शौचालय बांधायचे ,
आण गाव हागणदारीमुक्त करायचे.

उघड्यावर गेल्यावर दोघांचे एका टमरेलात काम होतय,
कधी कधी तर एका दगडातच काम भागतय,
मग सांगा जिथ प्यायला पाणी नसतय,
तिथ आख्खी बादली कोण कशाला संडासात वततय

आता आमच्या गावाला हागणदारीमुक्त म्हणत्यात,
ही लोकं खोटा खोटाच बोर्ड लावत्यात ,
कारण गावातली हागणदारी मुक्त नाय,
तिच्याभोवती पोलिसांचा पहारा हाय.

गावातली माणसं पण लय हुशार असत्यात,
पाटच्या एवजी राच्याला परसाला जात्यात,
पोलिस बिचारे दिवसभर हागणदारीबाहेर थांबत्यात,
आण राच्याच लेंडकांची राखण करत्यात.

आता तर ग्रामपंचायतीने कमालच केली,
हागणदारीमध्ये लाइट बसवली,
आता गावकरी लख्ख प्रकाशात हागत्यात ,
आण गावाचे नाव रोशन करत्यात.

सरपंच म्हणे गावात स्वछता कमिटी येणार हाय,
पण कमिटी काय गावाची नीट तपासणी करणार नाय,
साहेब मस्त कोंबडी आण बोकड्यावर ताव मारतील,
आणि आमच्याच गावाचा पयला नंबर देतील.

कविता

प्रतिक्रिया

ज्ञानेश...'s picture

26 Jul 2009 - 1:35 pm | ज्ञानेश...

कविता चांगली आहे.
पण हा विषय थट्टामस्करी करण्याचा खचितच नाही. एक गंभीर सामाजिक प्रश्न आहे , आणि एक समाज म्हणून आपल्या सगळ्यांसाठीच लज्जास्पद गोष्ट आहे ही.

मग सांगा जिथ प्यायला पाणी नसतय,
तिथ आख्खी बादली कोण कशाला संडासात वततय

असे अनेक मुद्दे आहेत, ज्यावर पाहिजे तसा विचार होत नाही.

"Great Power Comes With Great Responsibilities"

फ्रॅक्चर बंड्या's picture

27 Jul 2009 - 10:32 am | फ्रॅक्चर बंड्या

धन्यवाद
नक्कीच हा विषय थट्टामस्करी करण्याचा नाहीये
शासनाने कोणताही नियम करताना थोडा विचार करायलाच पाहिजे
जिथे पाणी प्यायला मिळत नाही तिथे असली अभियाने काय कामाची

विशाल कुलकर्णी's picture

27 Jul 2009 - 11:13 am | विशाल कुलकर्णी

अगदी सहमत.

पण असे कायदे करताना सरकार काहीच पर्यायी सोय करत नाही. एकीकडे हागणदारीवर पहारे बसवायचे, आणि दुसरीकडे शौचालयासाठी मंजुर झालेला पैसा मधल्यामध्येच खायचा. ज्यांना दिवसभर काम केले तर संध्याकाळची भाकर मिळाते त्यांनी शौचालये बांधण्यासाठी पैसा आणायचा कोठुन?

मी मागे या समस्येवर एक स्किट लिहीले होते. ते इथे पाहा...
"हागणदारी मुक्त खेडे"

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

मराठी_माणूस's picture

27 Jul 2009 - 12:34 pm | मराठी_माणूस

एकिकडे हे आणि एकिकडे सी लिंक साठी टाळ्या

टारझन's picture

27 Jul 2009 - 2:09 pm | टारझन

वा !! छाण !! फारंच मार्मिक लिहीलंय ... झोपी गेलेल्यांना जाग येईल अशी ज्वलंत कविता !!

जियो फ्रॅक्चरचंद्र बंड्या साहेबजी !!

- टारझन
(सहि विडंबण सेवा बंद आहे)

चित्तरंजन भट's picture

27 Jul 2009 - 5:46 pm | चित्तरंजन भट

परिणामकारक कविता. अतिशय चपखल रूपक. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

अवलिया's picture

27 Jul 2009 - 6:10 pm | अवलिया

वा ! मस्त !!
सुरेख लेखन, असेच लिहित रहा !