यशस्वी ??

अनंता's picture
अनंता in जे न देखे रवी...
3 Jul 2009 - 2:12 pm

तुम्ही पाहिलंय कधी मुलांना
दुडूदुडू धावतांना?
ऐकलाय का कधी पाऊस
भुईवर टप् -टप कोसळतांना?

धावलाय कधी गिरक्या घेत
फुलपाखरांच्या संगे?
पाहिलाय सूर्य लपतांना
झाकोळत्या ढगांमागे?

सकाळपासून रात्रीपर्यंत
तुम्ही सुसाट जाता का?
'काय, कसं काय' विचारतांना
उत्तर येईपर्यंत थांबता का?

लेकराला कधी म्हणत असाल
'आपण हे उद्या करू'
गडबडीत तेव्हा पहातही नसाल
त्याच्या डोळ्यातले अश्रू

आता संपर्क राहिला नसेल
मित्र - मित्र दुरावलेला
कारण तुम्हाला वेळ नसेल
साधं 'क्षेम' पुसायला

कुठेतरी पोहोचण्यासाठी
धावता तुम्ही जोरात
हरवून बसता सगळी गंमत
वेगाने धावण्याच्या नादात

आयुष्य म्हणजे शर्यत नव्हे
अंधारात दीपस्तंभ व्हावे
गीत संपून जाण्याआधी
त्यातले संगीत ऐकायला हवे!

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

3 Jul 2009 - 2:21 pm | विजुभाऊ

साधी सोपी कविता.
त्यातले साधेपण छान वाटले.
एक शंका: ही कविता तुमची स्वतःचीच आहे ना?

दत्ता काळे's picture

3 Jul 2009 - 3:02 pm | दत्ता काळे

लेकराला कधी म्हणत असाल
'आपण हे उद्या करू'
गडबडीत तेव्हा पहातही नसाल
त्याच्या डोळ्यातले अश्रू

आता संपर्क राहिला नसेल
मित्र - मित्र दुरावलेला
कारण तुम्हाला वेळ नसेल
साधं 'क्षेम' पुसायला

. . हे अगदी खरं आहे.

पाषाणभेद's picture

3 Jul 2009 - 5:44 pm | पाषाणभेद

अंतर्मुख झालो. छान.

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

क्रान्ति's picture

3 Jul 2009 - 8:06 pm | क्रान्ति

पहिल्या तीन कडव्यांतल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर "नाही", नंतरच्या तीन कडव्यांतल्या वास्तवाशी १००% सहमत आणि शेवटच्या कडव्यासाठी "तथास्तु"! अगदी प्रत्येक व्यक्तीच्या मनातली कविता!

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

आशिष सुर्वे's picture

3 Jul 2009 - 8:50 pm | आशिष सुर्वे

काव्य सुन्दर जमून आलय..
अगदी आईच्या हातच्या वरण-भातासारखे.. साधे-सरळ, पण चवदार!

येऊदेत अजून!

पोलिसकाका_जयहिन्द's picture

5 Jul 2009 - 2:44 am | पोलिसकाका_जयहिन्द

आयुष्य म्हणजे शर्यत नव्हे
अंधारात दीपस्तंभ व्हावे
गीत संपून जाण्याआधी
त्यातले संगीत ऐकायला हवे!

केवळ अप्रतिम.....

"Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples."

My blog .... just to spread smiles...
http://ulta-pulta-jokes.blogspot.com/