गाभा:
इथे यूट्यूब पेटेल की नाही हे माहीत नाही . . . हे सारेगमतलं गाणं बघा: हसले मनी चांदणे.
अाता ह्याच्यात ०:४५ ते ०:४७ मध्ये त्याने जे "तोंड" केलं अाहे त्याला माझा जोरदार अाक्षेप अाहे!
मर्दासारख्या मर्दाने असल्या "मुद्रा" करू नयेत असं मला वाटतं! अाणि त्याचा अर्थ तरी काय? गाणं अावडलंय का? ही असली ठोंब्यासारखी दाद देण्याची पद्धत कोणी सुरू केली?
त्याच्याविरुद्ध मोर्चा निघाला पाहिजे.
गाणं चांगलं अाहे. अाणि (वाटलं तर क्षमा वगैरे करून टाका अाधीच) देवकी पंडित इतक्या "मारू" दिसतात हे अापल्याला माहीतच नव्हतं! हाये . . . अात्मा फरार झाला . . .
बरं ते मरुदे. हे "अाऊ" करणं अाधी बंद करा महाराष्ट्रात!
प्रतिक्रिया
21 Sep 2007 - 1:17 am | विकेड बनी
>>देवकी पंडित इतक्या "मारू" दिसतात हे अापल्याला माहीतच नव्हतं!
देवकी पंडित चांगल्याच आहेत हो आणि मेक-अप केला की कोणतीही गाढवी घोडी दिसायला लागते.
>>मर्दासारख्या मर्दाने असल्या "मुद्रा" करू नयेत असं मला वाटतं!
मर्द कशा मुद्रा करतात तर मग?
>> त्याच्याविरुद्ध मोर्चा निघाला पाहिजे. गाणं चांगलं अाहे. अाणि (वाटलं तर क्षमा वगैरे करून टाका अाधीच)
कधी काढताय बोला? बरं! "मारू" म्हणजे काय हो? बायकांसाठी असले छचोर शब्द जाहीर लिहिणार्यांबद्दलही एक मोर्चा काढून टाकू.
21 Sep 2007 - 2:30 am | जगन्नाथ
मेक-अप केला की कोणतीही गाढवी घोडी दिसायला लागते.
अमान्य! असंमत! असहमत! अाक्षेप! मतभेद! निषेध!
"मारू" म्हणजे काय हो?
मारु हा एका प्राचीन राग अाहे. तो अाजकाल शुद्ध स्वरूपात गायला जात नाही.
बायकांसाठी असले छचोर शब्द जाहीर लिहिणार्यांबद्दलही एक मोर्चा काढून टाकू.
अारेसेसचा की काय तू? म्हणजे पालोअाल्टोत अभियंत्याची नोकरी असेल . . . कसं अोळखलं?
मर्द कशा मुद्रा करतात तर मग?
यूट्यूब वरच बघा: रेशमाच्या . . .
अाणि उल्लू म्हातारे कशा मुद्रा करतात ते हिकडे बघा: तोरा मन बडा पापी . . . त्यात विशेषतः १:०६-१:०७ च्या अासपास बघा. हुबेहूब!
21 Sep 2007 - 5:15 am | विकेड बनी
>>मारु हा एका प्राचीन राग अाहे. तो अाजकाल शुद्ध स्वरूपात गायला जात नाही.
काय म्हणता? मग त्याचा बाईच्या दिसण्याशी काय संबंध? एक दिवस साटोर्या दुर्मिळ झाल्या तर बाईला साटोरी म्हणणार काय?
>>उल्लू म्हातारे कशा मुद्रा करतात ते हिकडे बघा
अच्छा! म्हणजे त्या बाप्याने लाळ गाळत त्या गायिकेकडे बघायला हवं होतं. हं.हं आता कळलं!
21 Sep 2007 - 7:38 am | वरदा
खरं आहे तेज तुमचं एवढ्या मोठ्या गायिकेसाठी ही भाषा? शी:....अरे त्या कशा दिसतात पेक्षा कशा गातात पहा की......तुमच्या मोर्चात मिही येईन....
21 Sep 2007 - 5:30 am | जगन्नाथ
>>मारु हा एका प्राचीन राग अाहे. तो अाजकाल शुद्ध स्वरूपात गायला जात नाही.
>
> काय म्हणता? मग त्याचा बाईच्या दिसण्याशी काय संबंध? एक दिवस साटोर्या दुर्मिळ झाल्या तर बाईला साटोरी म्हणणार काय?
विचाराधीन . . .
>>उल्लू म्हातारे कशा मुद्रा करतात ते हिकडे बघा
>
> अच्छा! म्हणजे त्या बाप्याने लाळ गाळत त्या गायिकेकडे बघायला हवं होतं. हं.हं आता कळलं!
१०० पैकी १०० असोत तुम्हाला . . .
21 Sep 2007 - 7:21 am | सन्जोप राव
अहो, ही व्याधीच अशी आहे की खुर्चीत फार वेळ बसलं की त्रास होतो. त्यांना आयुर्वेदात क्षारसूत्र नावाची एक चिकित्सा आहे तिचा प्रयोग करुन बघायला सांगा. नाहीतर हल्ली बिनटाक्याचे ऑपरेशन फार सोपे झाले आहे. तोवर दूध-तूप घ्यायला सांगा. सगळे सुलभ-सुखद होईल.
सन्जोप राव
21 Sep 2007 - 10:34 pm | सर्किट (not verified)
श्री. अवधूत गुप्ते यांची संगीतक्ष्हेत्रातली कामगिरी ह्या च्रचेत वाचायला आवडेल. कारण फक्त वंदना गुप्तेंचा मुलगा म्हणून अवधूत परिचित आहे. एक्कदा हे कळले, की मग त्याने सारेगम मध्ये परीक्षक म्हणून राहणे योग्य की अयोग्य, यावर चर्चा करता येईल.
- सर्किट
21 Sep 2007 - 8:28 am | सहज
जर का आता त्या २ सेकंदावरून आक्षेप घ्यायचा असेल तर नक्कीच घेऊ शकता पण बेनीफीट ऑफ डाउट / समज देउन हा विषय सोडून देता येइल.
"ऑन द रिसीव्हींग साइड असभ्यपणा कसा असतो" हे जगन्नाथा (परमेश्वराला उद्देशून) तुलाच आणी स्त्रीयांनाच माहीत. रोज जाता येता....
बाकी .."मारू" दिसतात... हे लिहताना श्री. जगन्नाथांचा निर्वीकार चेहरा बघायची उत्सूकता नक्कीच आहे!
21 Sep 2007 - 9:40 am | जगन्नाथ
जर का आता त्या २ सेकंदावरून आक्षेप घ्यायचा असेल तर नक्कीच घेऊ शकता पण बेनीफीट ऑफ डाउट / समज देउन हा विषय सोडून देता येइल.
"ऑन द रिसीव्हींग साइड असभ्यपणा कसा असतो" हे जगन्नाथा (परमेश्वराला उद्देशून) तुलाच आणी स्त्रीयांनाच माहीत. रोज जाता येता....
बाकी .."मारू" दिसतात... हे लिहताना श्री. जगन्नाथांचा निर्वीकार चेहरा बघायची उत्सूकता नक्कीच आहे!
ह्या . . . अर्थही माहीत नसलेला शब्द "असभ्य" वाटला तर साधा उपाय म्हणजे त्याचा ब्राह्मणी, अाणि वाटल्यास सानुनासिक, उच्चार करणे!
उदाहरणार्थ वरील "गाढवी", "घोडी" वगैरे शब्द कसे सुसंस्कृत वाटतात, तसेच.
21 Sep 2007 - 5:33 pm | विकेड बनी
>>उदाहरणार्थ वरील "गाढवी", "घोडी" वगैरे शब्द कसे सुसंस्कृत वाटतात, तसेच.
स्वतःची चूक झाकण्याकरता इतरांच्या चुका काढू नका साहेब.
गाढवी, घोडी, गाढव, घोडा हे शब्द सुसंस्कृतच आहेत. निदान ते कशासाठी वापरले याचा अर्थ सर्वसामान्यांना कळतो. बाई आणि पुरुष या दोहोंसाठी ते वापरले जातात. तुमच्या आईवडलांनी तुम्हाला गाढवा किंवा घोड्या म्हटले नसेल तर आश्चर्यच समजा.
27 Oct 2007 - 9:18 am | देवदत्त
जर का आता त्या २ सेकंदावरून आक्षेप घ्यायचा असेल तर नक्कीच घेऊ शकता पण बेनीफीट ऑफ डाउट / समज देउन हा विषय सोडून देता येइल.
सहमत..
ती प्रतिक्रिया का आणि केव्हा दिली ह्यावर ते अवलंबून आहे.
का: कारण, एखादी तान त्यांना आवडली असेल. त्यांनाच माहित.
केव्हा: कारण टीव्ही वर त्या प्रसंगी दाखविली ह्याचा अर्थ मी तो प्रसंग तेव्हाचाच असेल असे मी मानीत नाही. ती प्रतिक्रिया केव्हा दिली हे टीव्ही वाल्यांनाच माहित. काही वेळा काही फ्रेम्स वेगळ्याच ठिकाणी आणि काही वेळा पुन्हा पुन्हा दाखविल्या जातात.
बाकी, तुम्हाला मोर्चा काढायचा तर काढा... किती लोक तुम्हाला साथ देतात हे त्या मुद्रेच्या तीव्रतेवर अवलंबून आहे.
देवदत्त
(अर्जुनाचा शंख)
20 Mar 2008 - 6:55 am | सृष्टीलावण्या
कॅस लागल्यावर गेले २ वर्ष आम्ही सेट टॉप बॉक्स नावाचा वैताग घेतला नव्हता. गेल्या आठवड्यात (घरातल्या क्रिकेट प्रेमींसाठी) तो घेतला. पण हिंदीत क बाराखडी वाल्या आणि मराठीत चार
दिवस वासुचे, अजुन्तीका (मालिका चालू आहे?), ह्या भूतबंगल्यात इ. मालिका दाखवणार्या वाहिन्या (मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यावरून) दिसणार नाहीत याची चोख व्यवस्था केलेली आहे.
>
>
धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...
20 Mar 2008 - 9:53 am | विजुभाऊ
धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...खरे आहे स्रुष्टी ताइ....
फक्त जरा बदल करून धैर्य दे पाहण्या हे .................
एक बापुडवाणा प्रेक्षक
विजुभाऊ