तू

ज्ञानदा कुलकर्णी's picture
ज्ञानदा कुलकर्णी in जे न देखे रवी...
22 Jun 2009 - 9:11 am

'तू' एक कोडे
अत्यंत क्लिष्ट, अवघड असे..
'तू' एक गूढ सत्य
कधीही न समजणारे..
'तू' एक साठा
वेदनेचा, दु:खाचा, सहनशीलतेचा..
'तू' पाण्यासारखा
सर्वात मिसळणारा...
'तू' सागरासारखा
सर्वांना सामावून घेणारा..
'तू' माझा मित्र
मला समजून घेणारा..
'तू' माझा भाऊ
माझे लाड करणारा...
'तू' माझा बाबा
माझी काळजी करणारा..
मला सांभाळून घेणारा...
माझ्यासारखाच ......
'तू' माझा बाबा....

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

22 Jun 2009 - 11:00 am | विसोबा खेचर

वडिलांवरची कविता आवडली!

तात्या.

क्रान्ति's picture

22 Jun 2009 - 9:22 pm | क्रान्ति

सुरेख कविता.

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा