एका सोनालीची महालढाई

ज्ञानदा कुलकर्णी's picture
ज्ञानदा कुलकर्णी in जनातलं, मनातलं
21 Jun 2009 - 3:49 pm

सोनाली नवांगुळ

आजचा सकाळ पाहिला, पहिल्या पानावरच उजव्या कोप-यातील हे शीर्षक वाचले. बाकीचा पेपर टाकला आणि आधी सप्तरंग वाचायला घेतले. पहिल्याच पानावरचा सोनालीचा फोटो पाहीला, केवढी स्मार्टनेस आहे तिच्या चेहे-यावर. उदय कुलकर्णी लिखित ह्या लेखाचा दुवा/ लिंक येथे देत आहे.
http://beta.esakal.com/2009/06/20170710/Features-on-lifestyle-of-sonal.html
प्रत्येकाने आवर्जून वाचावा असा हा लेख. मी स्वतः सोनालीला प्रत्यक्षात पाहिले आहे, भेटले आहे. अत्यंत लाघवी, मनमिळावू. जर तुम्ही सोनालीला भेटला असाल किंवा तिच्याबद्दल ऐकले असेल किंवा अगदि आजच्याच हा लेख जरी वाचलात तरी आयुष्यात कधीही नैराश्य येणार नाही तुम्हाला.
आज जेव्हा काही तरुण मुले नैराश्याच्या नावाखाली व्यसनांच्या आहारी जात आहेत असे ऐकते तेव्हा सोनालीची आठवण येते. नैराश्य म्हणजे काय असते कदचित हेच सोनालीला महिती नसेल. इतक्या संकटांशी सामना करुनही सोनाली सतत हसतमुख असते.
सोनाली खरेच एक प्रेरणादायक व्यक्ती आहे आणि मी हे पाहिले आहे अगदि जवळून.
हा लेख वाचला आणि वाटले सोनाली काय आहे हे निदान आजच्या "YOUTH" ला तरी कळले पाहिजे आणि त्यासाठी मिपा च्या व्यतिरिक्त दुसरे कोण मदत करणार नाही का!!

राहणीविचार

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

21 Jun 2009 - 5:15 pm | बहुगुणी

सोनालीशी संपर्क कसा करता येईल ते कृपया कळवा. व्यक्तिशः तिला आणि तिच्या कार्यालाही मदत करण्याची इच्छा आहे.

एका अद्वितीय व्यक्तिमत्वाची ओळख करून दिल्याबद्दल तुम्हाला आणि उदय कुलकर्णींना लाख लाख धन्यवाद!

सोनालीसारख्या आनंदी, प्रेरणादायक आदर्शांची गरज फक्त आजच्या youth ला च आहे असं नाही; धडधाकट शरीर असूनही, सकाळी ऊठल्यावर केवळ झोप पुरेशी झाली नाही म्हणून कुरकुर करणार्‍यांपासून ते वर्षभरात फक्त एक-दोनदाच भटकायला मिळालं म्हणून तक्रार करणार्‍यांपर्यंत सर्वांनाच अशा सोनालीसारख्या अपवादात्मक व्यक्तींकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. स्वतःच्या दुखण्यात आणि विकल्पात बुडून न राहता उलट समाजासाठी काही तरी करायला, शरीराने जमत नाही तरी मनाने धडपडून उभं राहणं, याला मी आयुष्याशी झुंज मानत नाही, हे तर आयुष्यालाच जगायला शिकवणं! अशी माणसं म्हणजे समाजाला ललामभूत, त्यांना आणि त्यांच्या धडपडीला हातभार लावणं हे आपण आपलं कर्तव्यच समजलं पाहिजे.

पुन्हा एकदा तुम्हा दोघांचे आभार, सोनालीचा संपर्काचा पत्ता नक्की कळवा.

विनायक पाचलग's picture

21 Jun 2009 - 8:22 pm | विनायक पाचलग

लेख सकाळीच वाचला.उत्तम आहेच.
मिसळपाववर लिहावे म्हणून आलो तर तुझा दुवा पाहिला.
सर्व मिपावासियाना ह्या लेखाबद्दल सांगितल्याबद्दल आभार.
आणि हो
सोनाली म्हणजे फिल्म फेस्टीवलच्या शेवटच्या दिवशी सर्व दिग्दर्शकांबरोबर जो संवाद होता त्यावेळी पहिल्या रांगेत होती ती का?
ती असेल तर मी तीला प्रत्यक्ष पाहिले आहे.
प्रत्येकाला अचंबित करणारा अनुभव आहे तो.

स्वार्थाचा लवलेशही नसावा
गर्वाचा स्पर्शही नसावा
असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा......

विनायक पाचलग

रेवती's picture

21 Jun 2009 - 9:17 pm | रेवती

लेखाच्या दुव्याबद्दल धन्यवाद!
फारच अवघड लढाई आहे.

रेवती

विकास's picture

21 Jun 2009 - 9:32 pm | विकास

हेच म्हणतो.

सुदृढ आणि धडधाकट माणसे पण डिप्रेशनने बेजार होऊ शकतात. या अवस्थेत सोनालीसारखी व्यक्ती लढा देताना पाहून अचंबीत होयला होते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Jun 2009 - 10:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आपल्यासारख्या धडधाकट माणसांनी आदर्श ठेवावा असे व्यक्तीमत्त्व.

शाहरुख's picture

22 Jun 2009 - 3:41 am | शाहरुख

>>आपल्यासारख्या धडधाकट माणसांनी आदर्श ठेवावा असे व्यक्तीमत्त्व.

खरोखरच !!

सकाळवरील लेखात ही प्रतिक्रिया दिसली.
please give me sonalis cell number, i m also paraplegic, i want to talk with her. my cell number is . 9860835503 and mail id is : rahulvinchurkar29@gmail.com

ज्ञानदा, तुम्ही सोनाली यांचा संपर्क क्रमांक राहूलना द्यावा ही विनंती.

सहज's picture

22 Jun 2009 - 7:24 am | सहज

आपल्यासारख्या धडधाकट माणसांनी आदर्श ठेवावा असे व्यक्तीमत्त्व.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jun 2009 - 9:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख सकाळीच वाचला आणि इथे दुवा दिल्याबद्दल आपले आभारी !
सोनालीचे लढा खरेच प्रेरणादायी आहे. तीच म्हणते-

"लढण्यातही गंमत आहे. आयुष्यातल्या संकटांशी लढण्याचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे!'

आपण तिला प्रत्यक्ष ओळखता, भेटता, तेव्हा आम्हा सर्वांना तुझा अभिमान वाटतो, हे नक्की सांगा !

-दिलीप बिरुटे
(भावूक )

सोनालीच्या जिद्दीला प्रणाम....

सकाळच्या लेखात उल्लेख असलेली कोल्हापुरातील हेल्पर्स ऑफ दि हॅण्डीकॅप्ड ह्या संस्थ्येच्या संस्थापक नसिमा हुरजुक स्वतः या देखील अशाच पॅराप्लेजिक होत्या. त्यांच्या विषयी काही वर्षांपुर्वी अनिल अवचटांनी साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकात विस्तृत लेख लिहिला होता.
हेल्पर्स ऑफ दि हॅण्डीकॅप्ड विषयी अधिक माहितीसाठी बघा:
http://www.hohk.org.in/trustees.html

चतुरंग's picture

22 Jun 2009 - 5:23 am | चतुरंग

अपघाताने पाठीमागे लागलेल्या दुर्दैवाला इतक्या जिद्दीने सामोरे जाणे म्हणजे अथक प्रयत्नांची पराकाष्ठा आहे.
नियतीशी दोन हात करणार्‍या सोनालीला आणि तिच्या आई वडीलांच्या धैर्याला आणि जिद्दीला सलाम!
दंतकथा वाटावी अशी ही कहाणी शरीराने धडधाकट आणि मनाने पंगु असलेल्या समाजाला स्फूर्तिदायक आहे.

(नतमस्तक)चतुरंग

मदनबाण's picture

22 Jun 2009 - 5:35 am | मदनबाण

सोनालीच्या जिद्दीला प्रणाम...
ज्ञानदाजी आपण दिलेल्या दुव्याबद्धल धन्यवाद...

मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

क्रान्ति's picture

22 Jun 2009 - 7:19 am | क्रान्ति

सोनालीच्या विलक्षण जिद्दीची कहाणी वाचून तिचा अभिमान आणि कौतुक वाटलं. दुव्याबद्दल धन्यवाद.

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

विसोबा खेचर's picture

22 Jun 2009 - 11:19 am | विसोबा खेचर

-------!

आपला,
(नतमस्तक) तात्या.

दशानन's picture

22 Jun 2009 - 11:26 am | दशानन

नियतीशी दोन हात करणार्‍या सोनालीला आणि तिच्या आई वडीलांच्या धैर्याला आणि जिद्दीला सलाम!

असेच म्हणतो... सलाम !

थोडेसं नवीन !