पिंपळपान.....

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जे न देखे रवी...
18 Jun 2009 - 10:16 am

सप्रे नमस्कार !
सकाळी एक छान ईमेल आले , त्यात एक सुंदरसे पिंपळपान होते, ते पाहून सहज काहीतरी(च ?) सुचले ते खरडले आहे.बघा आवडते का .....

पिंपळपान.....

तारुण्याचे पिंपळपान
त्यावर लिहुनी प्रीतीगान
अर्पण करते तुला मुकुंदा,
देशील का रे हृदयी स्थान?

शीतल वारा अन् जलधारा
अशा झोंबती कांतीला,
कवेत घेवून मला सख्या रे
विसावू दे बाहूवर मान !

विरह तुझा मज मुळी खपेना
तुजविण पळभरही करमेना ,
भरकटते मी तुला शोधण्या
मनी मानसी तुझेच ध्यान !

मत्सर वाटे वेणूचा त्या
अधरांवर तव विराजमान
सांग मला तू , मदनमोहना,
कशी सावरू? , मी बेभान !

चित्तचोरटा गवळी रे तू ,
धेनू पण बघ खुळावल्या
मी तर अजुनी यौवनात या,
कसे रहावे मज अवधान?

कोमल नाजुक भाव मनींचे
असे उमटले त्याच्या गाली,
मुक्त विहरणारे ते झाले
लाजून चूर्.....पिंपळपान !

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

क्रान्ति's picture

18 Jun 2009 - 10:35 am | क्रान्ति

खूप खूप आवडली.

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

मदनबाण's picture

18 Jun 2009 - 10:37 am | मदनबाण

हेच म्हणतो...
मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

सागर's picture

18 Jun 2009 - 3:44 pm | सागर

केवळ अप्रतिम.....
खास करुन शेवट सुंदरच....

कोमल नाजुक भाव मनींचे
असे उमटले त्याच्या गाली,
मुक्त विहरणारे ते झाले
लाजून चूर्.....पिंपळपान !

प्राजु's picture

18 Jun 2009 - 11:22 pm | प्राजु

सुंदर!!
खूपच सुंदर!! शेवट अगदी खास!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/