ऐसी रत्ने मेळवीन-

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
15 Jun 2009 - 12:08 pm

कालच्या रविवारची सकाळ. सकाळचे सात साडेसात वाजले असावेत. मास्तरांचा फोन आला.
"तुमचं नेट चालू आहे का?"-मास्तर
"घरी दहावीत एक आणि बारावीत एक अशी परीस्थीती असताना गेल्या रविवारी तुम्हीच नेट बंद करायला सांगीतलं होतं ना ?"-मी
क्षणभर शांतता.
"आसपास कुठे आहे का?"-मास्तर
"आहे .पण सकाळी सात वाजता ते बंद असतं ?पण एव्हढी इमर्जन्सी काय आहे "-मी
"#$%^,सीईटी चा रिझल्ट आहे"-मास्तर
"तुम्हाला काय त्याचं ?तुमचे चिरंजीव सीईटी पार करून गेलेत"-मी
मास्तरांना हा भयंकर अपमानास्पद प्रश्न टाकताना मी मनाची तयारी केली होतीच आणि अपेक्षेप्रमाणे पुढची पाच मिनीटं आधी अवयवावरून ,नंतर नातेसंबंधावरून आणि उरलेल्या प्राण्यांवरून शिव्या मला दिल्यानंतर मास्तर शांत झाले.
मग मी हळूच माहीती देऊन टाकली.
"कालच रात्री दोन वाजता सीईटीचा रिझल्ट लागला आहे. "
"काय सांगता मग मला फोन का नाही केला ?"
मी आणखी काही बोलण्याच्या आधी फोन बंद झाला होता.
बायकोनी मला खूणेनीच विचारलं काय झालं ?
मी काही नाही असं म्हणत काहीतरी म्हटलंच ज्याची त्याला ***नाही आणि शेजार्‍याला झोप नाही.
_______________________________________________________
मी बघतो आहे तेव्हापासून मास्तर असाच आहे.पालक विद्यार्थी परीक्षा गुणांकन सीईटी हे शब्द ऐकले की हायपर होणारा.
पदराला खार लावून संघी प्रचारकासारखा गावोगाव व्याख्यानं देत फिरणारा.
सुरवातीला मला वाटायचंच
" स्साला यांचा काहीतरी हिडन अजेंडा असणारे नक्की."
नंतर चारपाच ठिकाणी त्यांच्या सोबत फिरून उपाशीच घरी परत आलो तेव्हा कळलं की हा माणूस विद्यार्थी म्हटलं की म्याड म्याड होतो.
काही दिवसानी मी त्यांना विचारलं "मास्तर हे सगळं कशासाठी ?"
मास्तरानी सरळ सरळ उत्तर काही दिलं नाही .तुकड्या-तुकड्यात कळलं .मास्तर एस आय ई स चे विद्यार्थी.मॅट्रीक पास झाले म्हणून कॉलेजात गेले. घरून पोळ्यांची व्यवस्था व्हायची पण भाजीऐवजी सांबाराची वाटी किंवा चहा.आपला रस्ता आपणच शोधत पुढे गेले.
ध्येय धोरण ठरवायचा तो काळ नव्हता.सर्वायवल हे एकच सूत्र. हे सगळं करताना हवं तसं यश मिळायला पन्नाशी आली.
"मला वेळीच मेंटर मिळता तर कदाचीत..."असं म्हणताना मास्तराचा गळा भरून आला होता.
मग एकच छंद.
"जे जे आपणासी ठावे ते इतरासी शिकवावे शहाणे करून सोडावे सकळ जन"
अंमळ वेडझवा आहे असं म्हणून मी समुपदेशकाला टाळायला लागलो.
------------------------------------------------------------------------------------------------------
काही दिवसापूर्वी संध्याकाळी फोन आला .
"माझा विद्यार्थी देशात पहीला आला ."-मास्तर
" वाचलं मी मिपावर "-मी
"मग आता काय वाटतं ?"-मास्तर
संध्याकाळी मास्तर भेटले मला म्हणाले तुमच्याकडून वेगळ्या प्रश्नाची अपेक्षा नव्हती पण आयुष्यात एखादा मेंटर भेटल्याशिवाय यश मिळणं मुश्किल असतं . वेळीच मिळतो त्यांच नशिब चांगलं.माझ्या समुपदेशनानी चार विद्यार्थी तरी ......
"मास्तर ,दादोजी कोंडदेवांचा उल्लेख पाठ्यपुस्तकातून काढून टाकण्याचे दिवस आहेत ..तुम्ही किस झाडकी पत्ती... मी म्हटलं.
"असे बाबा, असे उल्लेख काढून नातं बदलणार आहे का ?"
"आणि मी तरी जन्मभराची जबाबदारी कुठे घेतोय, हे सगळं फूटबॉलच्या खेळासारखं असतं .बॉल एका गोल पोस्टपासून दुसर्‍या गोलपोस्ट ला जाईतो दहा जणांचे श्रम कारणी लागतात."
------------------------------------------------------------------------------------------------------
गेल्यावर्षी मास्तराचा परत फोन आला .संध्याकाळी भेटा.भेटलो.मास्तर एका विद्यार्थ्याशी बोलत होते.त्या मुलाची पाठ वळल्यावर मला म्हणाले
" हे माझं नविन फाईंड. जॉनी नाडर"
(टीना मुनीम किंवा झीनत सापडल्यावर देव आनंदला जसा आनंद झाला असेल तसा मला मास्तराचा चेहेरा दिसत होता)
"ह्याचं काय ?"
"विक्रोळीच्या एका सेशनमध्ये आला होता.या पोरात आग आहे. बाप गरीब आहे .चार हजाराच्या पगारावर काम करतो आहे. ह्याला जर मार्गदर्शन केलं तर सीईटीत १९०+नक्की."
"त्याला चांगला क्लास लागेल "
"मी व्यवस्था केली आहे.शब्द टाकला आहे. नेहेमी फी घेतात त्यात नव्वद टक्के सूट देतायेत."
"मग आता काय ?"
"उरलेल्या दहा टक्क्याची व्यवस्था नको करायला "
ह्याचे पालक करतील ना ?
"छे .छे. इंजीनीअरीं च्या अ‍ॅडमिशनसाठी बाजूला ठेवायला सांगीतले आहेत."
मी निरुत्तर झालो.
------------------------------------------------------------------------------------------------------
सकाळचे साडे दहा. मास्तरांचा पुन्हा एकदा फोन.
"आमच्या जॉनी नाडरला दोनशे पैकी एकशे पंच्चाण्णव मिळालेत.युडीसीटी नक्की"
"अभिनंदन."-मी
"संध्याकाळी भेटा.बीर पाजतो."
संध्याकाळी भेटलो.मास्तर आनंदानी जॉनी नाडरची स्टोरी सांगत होते.
"आता फक्त त्याच्या अ‍ॅडमीशनची फी जमवायची आहे."
हे सगळं ऐकताना बीर फ्लॅट झाली होती.
तीन पेगात हाय न होणारा मास्तर ग्लासभर बीरमध्ये वरच्या पट्टीत गेलला होता.
मी देवाची प्रार्थना करत होतो. "मला ह्याचं सूत्र सांग रे बाबा.ह्या तुकारामाचं काय करू ?
घरी गेल्यावर गाथा उघडली .डोळे मिटून गाथेचं मधलंच पान उघडलं.उत्तर माझ्यासमोर होतं.
तोची ज्ञानी खरा तारी दुजीयासी
वेळोवेळी त्यासी शरण जावे.
आपण तरेल नव्हे ते नवल
कुळे उध्दरील सर्वांची जो

-----------------------------------------------------------------------------------------------------

समाजसद्भावना

प्रतिक्रिया

अवलिया's picture

15 Jun 2009 - 12:12 pm | अवलिया

वा! मस्त !!

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
चालविसी हाती धरुनिया

चालो वाटे आम्ही तुझाची आधार
चालविसी भार सवे माझा

बोलो जाता बरळ करीसी ते नीट
नेली लाज, धीट केलो देवा

तुका म्हणे आता खेळतो कौतूके
जाले तुझे सुख अंतर्बाही

जय हो !

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Jun 2009 - 1:03 pm | बिपिन कार्यकर्ते

या मास्तराबद्दल काय बोलू? एकच शब्द लागू पडतो, म्याड. हो, म्याडच. सर्वसाधारण जगाच्या नियमांप्रमाणे मास्तर जे काही करतो तो म्याडपणाच असतो. म्हणून मास्तर म्याड. रामदासांच्या लेखातला शब्द न् शब्द खरा आहे.

मास्तर आपल्याच मस्तीत जगतो. त्याची काही एक विचारपध्दती आहे आणि त्याला अनुसरून जगायची मस्ती आहे. 'सांगेन गोष्टी युक्तीच्या चार...' हाच याचा ध्यास. आणि एकदा का एखाद्याला आपले म्हणले की त्याच्यासाठी आख्खी दुनिया फाट्यावर मारून प्रसंगी स्वतःचे पैसे खर्च करून पूर्णपणे साथ देतो मास्तर. पण केलेल्या कामाच्या मानाने खूपच अप्रकाशित राहिलाय मास्तर.

मास्तराचे सगळ्यात जास्त कौतुक हेच वाटते की, अशी म्याड माणसं सहसा आपल्याच संसाराची राखरांगोळी करतात आणि त्याला त्याग वगैरे उदात्त नाव देतात. पण मास्तराने आपल्या कुटुंबाकडे अजिबात दुर्लक्ष न करता हे सगळे साध्य केले आहे हे ग्रेटच.

मास्तर, असा म्याडच राहा. नाहीतर आमच्यासारख्या शहाण्यांना मदतीचा हात कोण देणार?

बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक's picture

15 Jun 2009 - 1:18 pm | श्रावण मोडक

सहमत. लेखन खूप भावणाऱ्या शैलीत आले आहे.

विसोबा खेचर's picture

15 Jun 2009 - 5:20 pm | विसोबा खेचर

पण केलेल्या कामाच्या मानाने खूपच अप्रकाशित राहिलाय मास्तर.

हेच बोल्तो..!

रामदासभौजी, सुंदर लेखन..

तात्या.

टारझन's picture

15 Jun 2009 - 8:23 pm | टारझन

मास्तर एक कमाल आहे १!! रामदासांचं ही झकास स्टाईल मधे लिहील्याबद्दल अभिणंदण !!

- संत टारेश्वर
आधी पोटोबा .. मग विठोबा

नितिन थत्ते's picture

15 Jun 2009 - 3:25 pm | नितिन थत्ते

सरांना लाख प्रणाम.
नुसतं काहीतरी केलं पाहिजे असं वाटणं आणि करणं यात खूप अंतर असतं. मास्तरांनी ते ओलांडलंय.

खराटा
(रंग माझा वेगळा)

दशानन's picture

15 Jun 2009 - 3:56 pm | दशानन

:)

सरांना लाख प्रणाम.
नुसतं काहीतरी केलं पाहिजे असं वाटणं आणि करणं यात खूप अंतर असतं. मास्तरांनी ते ओलांडलंय.

१००% सहमत.

थोडेसं नवीन !

गणा मास्तर's picture

15 Jun 2009 - 7:01 pm | गणा मास्तर

- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

मुक्तसुनीत's picture

15 Jun 2009 - 8:31 pm | मुक्तसुनीत

लिखाण आवडले.
"मास्तुरे" तर काय , सुपरडुपर हिट्ट ! ;-)

परिकथेतील राजकुमार's picture

15 Jun 2009 - 4:05 pm | परिकथेतील राजकुमार

गुर्जी म्हणजे खरतर स्वतःच एक आग आहे.

त्यांच्या सारखे तळमळीने आणी निस्वार्थीपणे कार्य करणारे लोक खरच फार कमी आहेत.

कधीतरी कुठेतरी वाचले होते की जगात फार मोजकी माणसे उरलीयेत आता पुण्यवान, पण प्रलय रोकुन धरला गेलाय तो त्यांच्याच पुण्याईनी.... गुर्जी मला त्या पुण्यवानांपैकी एक वाटतात.

º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

निखिल देशपांडे's picture

15 Jun 2009 - 5:39 pm | निखिल देशपांडे

त्यांच्या सारखे तळमळीने आणी निस्वार्थीपणे कार्य करणारे लोक खरच फार कमी आहेत.

==निखिल

धमाल मुलगा's picture

15 Jun 2009 - 5:45 pm | धमाल मुलगा

आम्ही कर्मदरिद्री काय बोलणार गुर्जींच्या ह्या मोठेपणाविषयी?

आनंद ह्याचाच वाटतो, की अशा माणसाची आणि आमची ओळख आहे :)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

घाटावरचे भट's picture

15 Jun 2009 - 6:42 pm | घाटावरचे भट

अशा मोठ्ठ्या माणसाला मी आंतरजालाकरवी का होईना ओळखतो याचा मला खूप अभिमान आहे...

प्राजु's picture

16 Jun 2009 - 12:50 am | प्राजु

हे मास्तर आंतरजालातून ओळखिचे आहेत याचा खूप अभिमान आहे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

रेवती's picture

15 Jun 2009 - 5:31 pm | रेवती

प्रभूसरांबद्दल असलेला आदर व्यक्त करायला रामदासांना शब्द सापडले हेच ग्रेट झाले. आपण दोघेही एकमेकांचे मित्र शोभता!:)

रेवती

अशी स्थिती कधी येणार माझी हे माहीत नाही पण मास्तरांना भेटायला उतावीळ आहे!
माणसाच्या रुपात देव येतो हे खरं आहे का? अशा शंका मास्तरांसारखी माणसं असताना येऊ शकत नाहीत.
रामदास, तुम्ही त्यांचे श्रम शब्दात मांडण्याचं काम करु शकलात तुम्हालाही नमस्कार!
मास्तरांच्याच भाषेत - एकच सूत्र - बेरीज करत रहा, वाटत रहा, मिळत जाईल!
__/\__
(नतमस्तक)चतुरंग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jun 2009 - 7:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी देवाची प्रार्थना करत होतो. "मला ह्याचं सूत्र सांग रे बाबा.ह्या तुकारामाचं काय करू ?
घरी गेल्यावर गाथा उघडली .डोळे मिटून गाथेचं मधलंच पान उघडलं.उत्तर माझ्यासमोर होतं.
तोची ज्ञानी खरा तारी दुजीयासी
वेळोवेळी त्यासी शरण जावे.
आपण तरेल नव्हे ते नवल
कुळे उध्दरील सर्वांची जो

सुंदर !!!

प्रभुमास्तरांसमोर आपणही नतमस्तक आहोत.

-दिलीप बिरुटे

संदीप चित्रे's picture

15 Jun 2009 - 7:54 pm | संदीप चित्रे

मास्तरांबद्दल जितकं अधिक समजतंय तितकीच उत्सुकता वाढतेय.
लेखाबद्दल धन्यवाद रामदास.

मास्तर,
लहान तोंडी मोठा घास घेतोय पण -- keep up the good work !

धनंजय's picture

15 Jun 2009 - 8:27 pm | धनंजय

ज्यांना भेटतात त्यांचे मोठे भाग्य.

मास्तरांना सादर प्रणाम.

क्रान्ति's picture

15 Jun 2009 - 8:40 pm | क्रान्ति

दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती!
मिपापरिवारातल्या अशा एकेक रत्नांची आणि त्यांच्या कार्याची ओळख झाली, की धन्य जीव होतो. प्रभुसरांनी तर वसाच घेतलाय नि:स्वार्थ सेवेचा! त्यांचं कार्य लेखाद्वारे सगळ्यांपर्यंत पोहोचवलं म्हणून रामदासकाकांना खास धन्यवाद!

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

सर्वसाक्षी's picture

15 Jun 2009 - 9:06 pm | सर्वसाक्षी

मास्तर,

शुक्रवारी आपण भेटलो तेव्हाच सांगत होतात, रविवारी एक महत्वाचा निकाल आहे. अखेर तो आपल्याच बाजुने लागला. अभिनंदन - तुमचे आणि तुमच्या विद्यार्थ्याचे.

रामदासशेठ, आपले मनःपूर्वक आभार.

चतूराक्ष's picture

15 Jun 2009 - 11:55 pm | चतूराक्ष

प्रभू सर,

आपल्या ह्या निस्वार्थी मदतीब्बदल मनःपूर्वक आभार!

नमस्कार

चतूराक्ष

पिवळा डांबिस's picture

16 Jun 2009 - 12:34 am | पिवळा डांबिस

(आणखी काही बोलून डोह डहुळत नाही)
-पिडां

पोलिसकाका_जयहिन्द's picture

16 Jun 2009 - 4:20 am | पोलिसकाका_जयहिन्द

__/\__

"Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples."

My blog .... just to spread smiles...
http://ulta-pulta-jokes.blogspot.com/

डॉ.प्रसाद दाढे's picture

16 Jun 2009 - 9:03 am | डॉ.प्रसाद दाढे

ग्रेट! शब्द नाहीत..