अदभुत २

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
6 Jun 2009 - 12:25 pm

अदभुत १

शामराव, माझ्या काकांचे दोस्त.. अचानक रस्त्यात गाठ पडले. कुठेतरी घाइघाईत निघालेल्या शामरावांना मी हाक मारली.
खरेतर मी तसा माणुसघाणा माणुस, कोणाला हाक वगैरे मारुन गप्पा मारणे अशक्यच. पण काहितरी विचित्र घडत होते. "शामकाका, अती घाई संकटात जाई, वाट बघा.शेवटी कापुसच मदतीला धावणार. विश्वास ठेवा." माझ्या तोंडातुन अचानक शब्द बाहेर पडले. मी काय बोलतोय हे माझे मलाच कळेना, अरे ते शामराव थांबतात काय, मी वेड्यासारखे काही बरळतो काय ? मला कशाचा अर्थच लागेना.

दुसर्‍या दिवशी दुपारी शामराव माझ्या कॅफेत हजर झाले. मी काही बोलायच्या आतच त्यांनी माझ्या पायाला हात लावला, "लेकरा वाचवलेस रे संकटातुन." शामराव म्हणाले.
मला काही अर्थबोधच होईना. नंतर शामरावांच्या तोंडुन कळाले की कर्जाचे तिनही हप्ते थकलेले, ह्यावेळीही कापसाने हात दिला नाही, अशा अवस्थेत शामराव आत्महत्या करायला निघाले होते. मला भेटले तेंव्हा ते टिक-२० खरेदी करुनच निघाले होते. मला भेटले, मी अचानक काहितरी बरळलो आणी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे का कोणास ठाउक माझ्या शब्दांवर त्यांचा इतका विश्वास बसला की त्यांनी खरेदी केलेली बाटली सुद्धा फेकुन दिली, आणी आज सकाळीच गुजरातचा व्यापारी येउन कापसासाठी सौदा करुन गेला होता.

मी सुन्नच झालो.....
---------------------------------------------------------------------------------------------
हे सुन्न होणे येव्हड्यावरच थांबणार नाहिये हे माझ्या लक्षात यायला वेळ लागला. त्याच पंधरवड्यात अजुन दोन विस्मयकारक घटना माझ्या बाबतीत घडल्या. एकदा मला पार्कींग मध्ये असताना राजपाठक काकुंच्या घरच्या उघड्या राहिलेल्या गॅसचा वास आला, काकु राहतात ५ व्या मजल्यावार. बर हा वास कुठुन येतोय काय येतोय असले काहि फालतु विचार डोक्यात नाहीत, गॅसचा वास येतोय आणी तो राजपाठकांच्या घरातुन येतोय येव्हड्या स्वच्छ विचारांनी डोक्यात उगम घेतला आणी त्याक्षणी मी ५ व्या मजल्यावर धावलो.

"अरे मला तर काहिच कळाले नाही, बरे झाले तु आलास बाबा" काकुंच्या ह्या वाक्यावर कसनुसे हसत मी दाराबाहेर पडलो आणी शांतपणे जिन्यात बसुन राहिलो.

या घटनेला आठवडा उलटत नाही तोच एकदा रस्त्यानी जाताना मी अचानक सायकल थांबवली, रस्ता क्रॉस करुन पलिकडे गेलो आणी फुटपाथवर झोपलेल्या एका कुत्र्याच्या पिल्लाला या बाजुला घेउन आलो. मी सायकलपाशी पोचतोय न पोचतोय तोवर पलिकडच्या फुटपाथवर लाईटच्या खांबावारची तार कोसळली.

मी भानावर आलो तेंव्हा रस्त्यावरुन जाणारी लोक थबकुन माझ्याकडे बघत होती, मी पटकन तिथुन काढता पाय घेतला. मला खरच काही सुचत न्हवते, हे सगळे जे घडत होते ते माझ्या बुद्धीच्या आवाक्या बाहेरचे होते. बर सल्ला तरी कोणाचा घेणार ?

शेवटी मीच त्रयस्थपणे ह्या घटनांचा अर्थ लावायला सुरुवात केली. हळुहळु लक्षात न आलेल्या बर्‍याच गोष्टी माझ्या ध्यानात येउ लागल्या. तसा मी देवभोळा वगैरे नाही पण रोज आंघोळ झाली की अंग पुसता पुसता अथर्वशीर्ष म्हणायचे हा माझा रिवाज , पण आजकाल मी अथर्वशिर्षाच्या जोडीने रामरक्षा आणी भिमरुपी सुद्धा म्हणायला लागलो होतो, फावल्या वेळात हळुच सविता भाभीवर वगैरे चक्कर मारणारा मी आजकाल नारदपुराण, स्कंदपुराणाचे दाखले संगणकावर शोधत होतो, आठवड्यातुन एकदा का होईना दोन घोट मारणारा मी आजकाल जवळजवळ निर्व्यसनी या समुहात मोडायला लागलो होतो. परमेश्वरा, हा येव्हडा बदल झालाय माझ्यात ? पुन्हा एकदा सुन्न झालोच झालो.

मी ह्या मनस्थीतीत असतानाच आमच्या गल्लीतल्या ग्रुपनी शनीवार रविवार सज्जन्गडावर जायची कल्पना काढली. हो नाही करत मी सुद्धा तयार झालो. खरतर मलाही थोडासा चेंज हवा होता. या सहलीत काही विचित्र माझ्या हातुन घडु नये येव्हडीच काय ती काळजी मनाला ग्रासुन होती. पण गंमत म्हणजे जस जसे सज्जन्गडाच्या जवळ जवळ पोचत होतो माझे मन एका अनामीक शांतीने भरुन जात होते, हि हि काहितरी एक वेगळीच अनुभुती होती, या आधी कधीही न अनुभवलेली. एखाद्या कल्पवृक्षाकडे आपण निघालो आहोत अशी काहिशी एक भावना मनात राहुन राहुन येत होती.

संध्याकाळच्या सुमारास गडावर पोचलो, हातपाय धुवुन व्यवस्थीत दर्शन घेतले. त्यानंतर प्रसादाच लाभ घेउन आम्ही आमच्या भक्त निवासातील खोलीवर परतलो. सगळ्यांनीच पत्ते खेळायची टुम काढली. मी मात्र आलो जर पाय मोकळे करुन म्हणुन पुन्हा खाली आलो. पुन्हा तोच प्रकार मनात नसताना शब्द बाहेर आले होते. आता खाली आलोच आहोत तर निदान गडाच्या दरवाजा पर्यंत तरी जाउन येउ असा विचार करुन मी निघालो.

"प्रसाद" मागुन एक अनोळखी हाक आली.
मी भांबावुन मागे बघितले, ३५/३६ वर्षाचे भगवी वस्त्रे परिधान केलेले एक स्वामी मला हाताने थांबायची खुण करत माझ्यापाशी पोचले.

"तुम्हाला थोडा वेळ असेल तर नानाजींनी तुम्हाला भेटायला बोलावलय" स्वामी म्हणाले.

"कोण नाना ? आणी तुम्हाला माझे नाव कसे काय कळाले ?" मी अडखळत बोललो.

"तुम्हाला बघुन मला नाना म्हणाने तो बघ तो बावळट प्रसाद कसा हिंडतोय ते, जा त्याला बोलावुन घेउन ये वेळ असेल तर" स्वामींनी उत्तर दिले.

आता मात्र मला खरच आश्चर्य वाटायला लागले, येव्हडे नावानीशी आपल्याला ओळखणारे सज्जनगडावर आहे तरी कोण हे बघायला मी स्वामींबरोबर निघालो.

"बार वगैरे मध्ये ठिक आहे हो, पण माझ्या सारख्याला सज्जन्गडावर नावनीशी ओळखणारे हे नाना कोण बुवा ?" मी प्रश्न केला.

"त्यांनाच का विचारत नाही हे तुम्ही?" स्वामीजी मिस्कीलपणे म्हणाले.
मग मात्र मी शांतपणे चालायला लागलो.

एका दुकानाच्या ओसरीवर पांढराशुभ्र सैलसर कुर्ता पायजमा घालुन एक साठीचे गृहस्थ बसले होते. का कोणास ठाउक पण त्यांच्यात काहितरी खास काहितरी वेगळेपण आहे हे मला राहुन राहुन जाणवत होते.

"नारायणा तु गेलास तरी चालेल हो" नाना म्हणाले. मी अवघडुन तसाच उभा होतो.

"काय प्रसादा झाला का सगळ्यांना प्रसाद वाटुन ? दमला नाहीस ना ?" नानांनी मिस्किलपणे हसत विचारले.

"प्रसाद ? मी नाही वाटला कोणाला" मी पटकन उत्तरलो.

"अरेच्या, बाजारात शामरावांना हाक मार, पाचव्या मजल्यापर्यंत धावत जा, कुत्र्याच्या पिल्लाला वाचव हे सगळे प्रसाद वाटणेच की लेका." नाना उदगारले.

मी त्यांच्याकडे पाहातच बसलो, मला काही सुचेचनात. कोणे हा माणुस ? ह्याला सगळे कसे कळाले ? हा खरच इथे राहतो का हा माझ्या पाळतीवर वगैरे आहे ? हा नक्की माणुसच आहे ना ? एकाच वेळी अनेक प्रश्न माझ्या मनात उमटले.

साहित्यिकविरंगुळा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

6 Jun 2009 - 12:31 pm | अवलिया

भले शाब्बास... !!!
दुपारपर्यत तिसरा भागा टाक :)

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

मिंटी's picture

6 Jun 2009 - 2:18 pm | मिंटी

+१
असेच म्हणते..... आज दुपार पर्यंत तिसरा भाग टाक. अरेच्च्या !!! दुपार झाली की रे परा.... चल आता टाक पटकन तिसरा भाग... जास्त वाट नको पहायला लावुस ........ :)

टारझन's picture

6 Jun 2009 - 2:24 pm | टारझन

वा वा वा वा !! क्या बात है परा !! तेरी तो निकल पडी रे !!
पब्लिकला इमर्जन्सी मधे सुलभगृहाची जेवढी व्याकुळता नसते त्यापेक्षा कैक जास्त तुझ्या लेखाची आहे ... भौसाहेब .. पुर्ण करा मागणी पडकन .. नाय तर काय होईल सांगता येत नाय

स्वप्निल..'s picture

7 Jun 2009 - 4:23 am | स्वप्निल..

अरे मस्त जमलिये..लवकर पुढचा भाग टाक...

स्वप्निल

विनायक प्रभू's picture

6 Jun 2009 - 12:34 pm | विनायक प्रभू

असेच म्हनतो

टारझन's picture

6 Jun 2009 - 2:00 pm | टारझन

दोन्ही भाग एवदम वाचेश ,,,, मजा आला .. णेक्स्ट प्लिज

मस्त कलंदर's picture

6 Jun 2009 - 4:49 pm | मस्त कलंदर

णेक्स्ट प्लिज..

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

निखिल देशपांडे's picture

7 Jun 2009 - 1:36 am | निखिल देशपांडे

णेक्स्ट प्लिज..
==निखिल

अनिल हटेला's picture

7 Jun 2009 - 9:43 pm | अनिल हटेला

सहीच रे हा सुद्धा भाग...
आंदे और भी......:-)

(अदभूत....)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

श्रावण मोडक's picture

6 Jun 2009 - 12:54 pm | श्रावण मोडक

चालू द्या. वाचतोय.
लेखनमांडणीची लांबी रुंदी तुम्हाला शोभणारी नाही बाकी. ;)
आला, आता मापात आला मजकूर.

दिपक's picture

6 Jun 2009 - 12:51 pm | दिपक

हा भाग पण भारीच. आता उत्कंठा शिगेला. लवकर पाहिजे पुढचा भाग. :)

Nile's picture

6 Jun 2009 - 12:39 pm | Nile

वा! लवकर येवुद्या!

दशानन's picture

6 Jun 2009 - 12:43 pm | दशानन

लै भारी !

थोडेसं नवीन !

:)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

6 Jun 2009 - 12:52 pm | घाशीराम कोतवाल १.२

टाक बाबा तिसरा भाग पटकन जरा अजुन मोठि लिहिकि
बाबा बाकि मस्त आहे येउ दे पटापट वेळ नको घेउस

**************************************************************
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"
जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!

बापु देवकर's picture

6 Jun 2009 - 1:47 pm | बापु देवकर

दुसर्या भागाला खुप उशीर केलात्...आता तिसरा भाग लवकर टाका...

विसोबा खेचर's picture

6 Jun 2009 - 2:07 pm | विसोबा खेचर

वाचतो आहे..!

तात्या.

प्रकाश घाटपांडे's picture

6 Jun 2009 - 3:33 pm | प्रकाश घाटपांडे

कुत्र्याच्या पिल्लाला वाचव हे सगळे प्रसाद वाटणेच की लेका

हे छान ! मुक्याप्राण्याचे सदिच्छातरंग भावी आयुष्यात कामाला येतील.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

घाटावरचे भट's picture

6 Jun 2009 - 3:38 pm | घाटावरचे भट

मस्तच रे परा...

चतुरंग's picture

6 Jun 2009 - 4:52 pm | चतुरंग

परा पुढे चालवा कथा!

(अद्भुत)चतुरंग

लिखाळ's picture

6 Jun 2009 - 5:06 pm | लिखाळ

मस्त रे .. पुढे लिही पटकन ...

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

सहज's picture

7 Jun 2009 - 4:55 pm | सहज

मस्त रे! लवकर येउ दे पुढचा भाग.

प्राजु's picture

6 Jun 2009 - 5:38 pm | प्राजु

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
सगळी कथा वाचूनच मग आता प्रतिक्रिया देईन.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनामिक's picture

6 Jun 2009 - 7:22 pm | अनामिक

अरे काय होणार त्याचा काही पत्ताच लागू देत नाहीस... लवकर टाक पुढचा भाग!

-अनामिक

स्वाती दिनेश's picture

6 Jun 2009 - 7:36 pm | स्वाती दिनेश

अरे आत्ताच पहिला आणि दुसरा भाग वाचला, मस्तच ! उत्सुकता ताणली गेली आहे रे, लवकर टंक ३रा भाग..
स्वाती

सुबक ठेंगणी's picture

8 Jun 2009 - 11:44 am | सुबक ठेंगणी

असंच म्हणते...
तुला एकदम खरंच परिकथेत गेल्यासारखं वाटत असेल नां! :)

यन्ना _रास्कला's picture

7 Jun 2009 - 1:47 pm | यन्ना _रास्कला

हा नक्की माणुसच आहे ना ?

त आप्ल जाळिंद्रबाबा जलाळाबादी. मानुस नाय देवमानुस हाय जनु.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?

पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

परिकथेतील राजकुमार's picture

8 Jun 2009 - 11:14 am | परिकथेतील राजकुमार

प्रतिक्रीया देणार्‍या व न देणार्‍या सर्वांचे आभार ___/\___

आभारी
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

आनंदयात्री's picture

8 Jun 2009 - 12:37 pm | आनंदयात्री

मस्त रे परा. हा भाग पण मस्त झालाय. उत्कंठावर्धक !!

धमाल मुलगा's picture

8 Jun 2009 - 2:40 pm | धमाल मुलगा

असेच म्हणतो. आता बेअरिंग सोडू नकोस लेका....

अवांतरः प्रसाद समर्थ एकटेच फिरताहेत की अप्पापण येणार? ;)

अतिअवांतरः
>>प्रतिक्रीया देणार्‍या व न देणार्‍या सर्वांचे आभार ___/\___
घे मेल्या...दिली ना आता प्रतिक्रिया? आता टाक पुढचा भाग.

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

राजू's picture

22 Jul 2009 - 2:55 pm | राजू

दुसर्‍या भागाला खुप उशीर केलात्...आता तिसरा भाग लवकर टाका... :W :W :W

आयुष्य खरंच सोपं असतं,
आपणच त्याला कठीण करून ठेवतो,
स्वत:साठी आणि इतरांसाठी.