झाले गेले विसरुनी जाऊन

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
1 Jun 2009 - 8:40 am

झाले गेले विसरुनी जाऊन

झाले गेले विसरुनी जाऊन,
सांग तू माफ करशील का? करशील का? || ध्रु ||

न जुळू शकल्या आपूल्या तारा
न फुलू शकला मनमोर पिसारा
माणूस म्हणूनी ओळखशील का?
सांग तू माफ करशील का? करशील का? || १ ||

उलटे सुलटे पडले फासे
दान दैवाचे हातात न गवसे
रिते हात पकडशील का?
सांग तू माफ करशील का? करशील का? || २ ||

न लागली मेंदी हाती
न लागले कुंकू माथी
अखेरचे तू बघशील का?
सांग तू माफ करशील का? करशील का? || ३ ||

- पाषाणभेद

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

क्रान्ति's picture

1 Jun 2009 - 8:49 am | क्रान्ति

न लागली मेंदी हाती
न लागले कुंकू माथी
अखेरचे तू बघशील का?

"शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात"आठवले!
क्रान्ति
क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो?
गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं|
अग्निसखा

विनायक प्रभू's picture

1 Jun 2009 - 8:51 am | विनायक प्रभू

मस्तच की

प्राजु's picture

1 Jun 2009 - 8:51 am | प्राजु

न लागली मेंदी हाती
न लागले कुंकू माथी
अखेरचे तू बघशील का?

अखेरचे येती माझ्या हेच शब्द ओठी.. लाख चुका असतील केल्या.. केली पण प्रिती..!
या गाण्याची आठवण झाली. कविता छान आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/