झबडं - टोपलं

अरुण वडुलेकर's picture
अरुण वडुलेकर in जनातलं, मनातलं
22 May 2009 - 4:02 pm

घरांत महिला वर्गाची लगबग चाललेली.
निमित्त कुणाच्या तरी बारशाला जाण्याची.
"बाबा, बाळंत विडा काय घ्यायचा?"
सूनबाईंची पृच्छा (अर्थात्‌ उगाचच )
"घ्या एक झबडं टोपलं"
सूनबाईंचं चमकून पाहाणं.
"मग वांदीचा चाळा नको कां?"सूनबाई. चेहर्‍यावर एक खट्याळ हसूं.
मी पहिल्या क्षणी भांबावलेला. दुसर्‍या क्षणी ओशाळवाणा.
तिसर्‍या क्षणी एक सार्वजनिक हास्य स्फोट.

वाचकहो, तुम्ही कधी अशा प्रसंगातून गेला आहांत?

विनोदआस्वाद

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

22 May 2009 - 4:07 pm | आनंदयात्री

>>वाचकहो, तुम्ही कधी अशा प्रसंगातून गेला आहांत?

वरुण अडुरलेकर काका, आम्हाला अजुन सुनबाई यायला अवकाश आहे ;)

-
आंद्यातात्या मुळे

परिकथेतील राजकुमार's picture

22 May 2009 - 4:46 pm | परिकथेतील राजकुमार

वरुण अडुरलेकर काका, आम्हाला अजुन सुनबाई यायला अवकाश आहे
चला शेवटी संतती आहे हे तर मान्य केले.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

आनंदयात्री's picture

22 May 2009 - 4:52 pm | आनंदयात्री

अबॉबॉबॉ .. पर्‍या आठवल्या ... हलकटा ... कुठल्या जन्माचा सुड उगवतोस !! चल घेईन मी तुला राज्यसभेवरुन .. ऍटलिस्ट विधानपरिषदेत तरी वर्णी लावेनच .. पण जरा सबुरीने घे बाबा. आधीच तर दोन दोन घरे चालवायची म्हणजे खर्च एवढा .. त्यात तुम्ही अशी तोडपाणी करता !! कसं जगावं कसं माणसानी !!

विजुभाऊ's picture

22 May 2009 - 4:05 pm | विजुभाऊ

आपकी बजी मे कितने घडे है
बस नौणेपौ .....

भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही

वाचक's picture

22 May 2009 - 6:49 pm | वाचक

एका सून बाईंना म्हणायचे होते "भाजी आमटी" - त्या म्हणाल्या "आजी भामटी" :)

अवलिया's picture

22 May 2009 - 6:52 pm | अवलिया

वा! मस्त !!

--अवलिया

नितिन थत्ते's picture

22 May 2009 - 7:52 pm | नितिन थत्ते

थोडं वेगळं.

आम्ही एकदा संध्याकाळी खेळून घरी आल्यावर आमच्या आजीने "आता कपडे धुवा आणि हातपाय बदला" असे सांगितले होते.

खराटा
(रंग माझा वेगळा)

चतुरंग's picture

22 May 2009 - 7:55 pm | चतुरंग

बाकी आम्ही खेळून आल्यावर कपड्यांची आणि हातापायांची जी काही अवस्था होत असे ती बघता हे सार्थच म्हणायचे! ;)

चतुरंग

मिरवणुकीच्या रस्त्याने मागेपुढे हिंडत असताना आमचा एक मित्र दुसर्‍या मित्राबद्दल सांगताना म्हणाला, "अरे, तो आत्ताच 'उतळेरोडवरुन चिलटा' चालत गेला." (चितळेरोडवरुन उलटा चालत गेलाच्या ऐवजी)! :D

चतुरंग

निखिलराव's picture

23 May 2009 - 4:36 pm | निखिलराव

नगरचा चितळेरोड का ?

पक्या's picture

22 May 2009 - 11:11 pm | पक्या

माझ्या ओळखीतला एक मुलगा लहानपणी असेच बोलायचा. मुद्दाम नाही. त्याचा नेहमी गोंधळ व्हायचा बोलताना. त्याचे एक वाक्य कायम लक्षात राहिले आहे...साणे दांडले

रेवती's picture

22 May 2009 - 11:13 pm | रेवती

मी लहान असताना सोनाली व केदार यांच्याकडे खेळायला चालले आहे असे म्हणायच्या ऐवजी
सोनाल व केदारी म्हटले होते.
माझ्या नणंदेच्या मैत्रिणींमधे पिंकी नावाच्या मुलीला पकडापकडी खेळताना एक मैत्रिण म्हणाली,"पिळ पंकी"
खरेतर तीला म्हणायचे होते,"पळ पिंकी"
=)) =))

रेवती

विसोबा खेचर's picture

23 May 2009 - 8:52 am | विसोबा खेचर

काय वार गारा सुटलाय! :)

भाग्यश्री's picture

23 May 2009 - 11:16 am | भाग्यश्री

माझं नेहेमीच होतं! असंख्य उदा असतील..! मज्जय!
www.bhagyashree.co.cc

निखिलराव's picture

23 May 2009 - 5:00 pm | निखिलराव

पुण्यात आमची एक XYZ उत्सव समिति आहे, मंड्ळ आहे.
बर, या मंड्ळाचे आधारस्तंभ माननीय ABC, हे रात्री ९ नंतर हालायला लागायचे, अथात टाकुन / पिउन.
हा आधारस्तंभ मला म्हणाला " आरे मंडळात जरा संभोग करत जा"
च्यामारी म्हंट्ल, हा असा का म्हण्तो आहे ?
मग कळालं त्याला म्हणायचं होत "मंडळात सहभागी होत जा"

प्रमोद देव's picture

24 May 2009 - 9:22 am | प्रमोद देव

मराठीत म्हण आहे की "पाहुण्याच्या काठीने साप मारणे."
आमचा कांबळीमामा म्हणायचा ... पाहुण्याच्या सापाने काठी मारणे. :)

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

मराठमोळा's picture

24 May 2009 - 9:34 am | मराठमोळा

मस्त मजेशीर धागा आहे. मजा येते आहे सर्वांचे अनुभव वाचताना. :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

अरुण वडुलेकर's picture

24 May 2009 - 12:51 pm | अरुण वडुलेकर

शाळेत असतांना क्रमिक पुस्तकात एक मराठी कविता होती.
ती आता मुळीच आठवत नाही. पण तीत पळसाच्या कळी संबधी
कांही तरी वर्णन होते. ती लालचुटुक कळी कवीला पोपटाच्या चोचीसारखी
दिसली असें कांहीसे आठवते. पन लक्षांत राहिलेली गंमत म्हणजे
ही कविता शिकवणार्‍या, एरवी अत्यंत रुक्ष असलेल्या शिक्षकांनी जेंव्हा
चुकून कळसाची पळी म्हणताच त्यांनाच फुटलेले हसूं. तो त्यांचा प्रथमच
पाहिलेला हंसरा चेहरा.

सुनील's picture

24 May 2009 - 7:52 pm | सुनील

अगदी झक्कास उदाहरणे दिली आहेत एकेकांनी!

अशा प्रकारच्या अक्षरांच्या थारेपालटावरून केलेल्या गमतीला इंग्लीशमध्ये स्पूनरीझम म्हणतात. काही वाचलेली उदाहरणे -
If you hiss my mistery lectures. I will send you home by town drain
(If you miss my history lectures, I will send you home by down train)

Our queer old dean
(Our dear old queen)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मीनल's picture

25 May 2009 - 3:11 am | मीनल

माझ्या यजमानांची मामे बहिण कांदी काकडा म्हणायची.अजूनही यावरून चिडवा चिडवी चालते.

मीनल.

धमाल मुलगा's picture

25 May 2009 - 2:45 pm | धमाल मुलगा

हे लय भारी केलंत हो वडुलेकर. मस्त धागा.

मी माझ्या मावशीकडे शिराळ्याला गेलो होतो तेव्हा एका संध्याकाळी अचानक दिवे गेले. माजघरात एकदम खोलीचा मध्य पकडून काहीतरी हादडत बसलो होतो मी. दिवे गेलेले पाहताच सगळेजण दुसरी सोय करायला धडपडत उठले... मी मात्र मुद्दाम गोंधळ घालायला सुरुवात केली.. "पेंढा टेपवा..पेंढा टेपवा" !! ;) सगळे जे काही गंडून गेले, कोणाला काहीच कळेना, पण काहीतरी करायचंच हे समज्त होतं, नुसती पळापळ करायला लागले सगळे.
अचानक आजीच्या लक्षात आलं मी काय म्हणतोय ते.....मला रप्पकन एक धपाटा घातला तीनं! गुमान उठलो आणि पुन्हा दिवे येईपर्यंत बाहेर ओट्यावर जाऊन बसलो :D

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

अरुण वडुलेकर's picture

26 May 2009 - 11:41 am | अरुण वडुलेकर

एका वरून एक आठवतं. माझाच एक लहानपणीचा किस्सा नव्याने आठवला.
सातवीत असतांना शाळेच्या वार्षिक स्नेह सम्मेलनात, विविध गुणदर्शनाच्या
कार्यक्रमात भाग घेतला होता. त्यांत मी 'झाला महार पंढरीनाथ' हे गाणं म्हणत
होतो. गाण्याची दोन कडवी बरी झाली तिसर्‍या श्रोत्यात अचानक हंशा सुरू झाला.
कारण मी 'शहा घाली तोंड बोटात' असें म्हणालो होतो.

कपिल काळे's picture

26 May 2009 - 12:14 pm | कपिल काळे

बारावीत असतानचा एक किस्सा आहे.
केमिस्ट्रीच्या लेक्चरला प्रोफेश्वर्साहेब क्वांटम थेअरी शिकवत होते. आझिमुथल क्वांटम नंबर शिकवताना ते चुकुन(?) म्हणाले की
माझीउठल क्वांटम नंबर !!

पण तेव्हापासून तो क्वांटम नंबर नावानिशी लक्षात राहिला आहे!!