माय.........

उमेश__'s picture
उमेश__ in जे न देखे रवी...
10 May 2009 - 10:36 pm

प्रिय मिपाप्रेमी
मात्रुदिना निमित्त ही एक छोटीशी कविता............

माय,
माय आतला पदर
चार पुडदाच्या पोळीतला
भाजलेल्या खोबर्याचा तुकडा
गावाच्या होळीतला...

तव्यावरची भाकर भाजण्यासाठी
माय झाली चुलीतलं सरपण
जळत राहिली सतत
घराला यावं घरपण...

चुलीवर शिजून-शिजून
मऊ झालेल पूरण
आत्मशांतिसाठी पोळीचा तुकडा
आगीत जळावा तसं
माईला आलेलं मरण..................

कविता

प्रतिक्रिया

क्रान्ति's picture

11 May 2009 - 8:39 am | क्रान्ति

तव्यावरची भाकर भाजण्यासाठी
माय झाली चुलीतलं सरपण
जळत राहिली सतत
घराला यावं घरपण...

शब्द न् शब्द काळजाला भिडणारा! कविता नाही, मायच्या आयुष्याचं चित्र आहे!
खूपच खास!

क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
www.mauntujhe.blogspot.com

जागु's picture

11 May 2009 - 11:12 am | जागु

पुर्ण कविता आवडली. खुप छान वर्णन आहे मातेच.

उमेश__'s picture

11 May 2009 - 5:35 pm | उमेश__

.............

पर्नल नेने मराठे's picture

11 May 2009 - 5:39 pm | पर्नल नेने मराठे

चार पुडदाच्या पोळीतला
ह्याचा अर्थ काय?
चुचु

उमेश__'s picture

11 May 2009 - 5:55 pm | उमेश__

पुडदाच्या पोळीतला म्हणजे पोळीतला मधला थर

नाटक्या's picture

11 May 2009 - 10:33 pm | नाटक्या

'अरसिकेषु कवित्व निवेदनम् शिरसि मा लिख, मा लिख, मा लिख' हेच आठवले..

- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

पर्नल नेने मराठे's picture

11 May 2009 - 6:03 pm | पर्नल नेने मराठे

अछा......
चुचु