लेख २ - http://misalpav.com/node/7533
निकोलास कोपर्निकस (निक्लास कोपर्निग) १४७३ मधे पोलंड मधे जन्मला. त्याचा पिढीजात धंदा 'तांबे विकणे' हा होता. तांबे -> कॉपर ->कोपर्निकस असे नाव पडले असावे. घरचे वातावरण 'धंदो' असूनही कोपर्निकस ने चर्च आणि विज्ञान याना वाहून घ्यायचे ठरवले. त्याच्या आधी सगळ्या लहान-थोर विचारवंतानी पृथ्वी सपाट आहे असे जाहीर करून टाकले होते. कोपर्निकस ने 'टॉलेमी' चा 'या विश्वाच्या केंद्रस्थानी पृथ्वी आहे आणि सूर्यादि ग्रह - तारे तिच्या भोवती फिरत आहेत' हा विचार अमान्य केला. त्याने पहिले वहिले 'सूर्य' केंद्रस्थानी असलेले मॉडेल जगाला दिले. (भास्कराचार्यानी हे काम खूप आधी करून ठेवले होते पण 'टायमिंग' चुकले म्हणायला हवे कारण त्यावेळी परिस्थिती 'विज्ञानास' योग्य नव्हती जगात! असो)
विज्ञानाच्या दृष्टीने ही फारच मोठी घटना होती. फक्त चर्च वाल्यांचे जरा बिनसले होते कारण 'देवाची करनी न नारलात पानी' न ऐकता कोणीतरी विज्ञानाच्या आधारे त्याना आव्हान दिले होते. कोपर्निकस पासून केपलर, गॅलिलिओ पर्यंत बर्याच शास्त्रज्ञानी चर्च चा रोष ओढवत का होईना पण नव्-नवीन विचार मांडायला सुरुवात केली होती. न्यूटन चे जसे ३ नियम आपण शाळेत शिकलोय तसेच आणि तितकेच महत्वाचे ३ नियम केपलर ने दिले होते. गॅलिलिओ ने तर चक्क 'टेलिस्कोप' बनवून कोपर्निकस कसा बरोबर आणि चर्च कसे चूक हे 'पुराव्यानी शाबीत' करून दिले. अर्थात चर्च ने गॅलिलिओ ला फार छळले इतके की शेवटी त्याने स्वतःहून आपले बरेचसे संशोधन चुकीचे आहे हे मान्य केले.
१६ व्या शतकापासून ईंग्लंड देश बर्यापैकी नावारूपाला आला होता. सामजिक स्थैर्य होते. नव्-नवीन कल्पना उपजत होत्या. गॅलिलिओ १६४२ मधे मरण पावला आणि १६४३ मधे न्यूटन चा जन्म झाला. हा एक विक्षिप्त आणि अत्यंत गुंतागुंतीचे आयुष्य असलेला प्राणी होता. 'अल्केमी ' पासून 'येशू च्या वंशजांचा शोध घेणार्या संस्था चालविण्यापर्यंत' सगळ्या भानगडी केल्या. टांक्साळ चालवली, न्यायाधीशपदे भुषवली आणि रस्ते साफसफाई समित्या सुधा स्थापन केल्या.
सुदैवाने याहीपेक्षा मोठ्या भानगडी त्याने 'गणित' आणि 'विज्ञाना' मधे केल्या. केपलर चे नियम मूळ धरून गणिताच्या सहाय्याने ग्रह आणि त्यांची हालचाल यांबाबत जास्त अचूक भाष्य केले. साध्या गणिताने जमेना तर गणिताची एक नवीनच शाखा बनवली 'कॅल्क्युलस' .. त्यावरून ही पुढे 'लेबनिट्झ' बरोबर भांडण केले ते वेगळेच!
न्यूटनने गुरुत्त्वकर्षणाची संकल्पना दिलीच जगाला पण गणिताच्या आधारे प्रमेय साधून 'हे जग कसे चालतेय' हे दाखवून दिले. त्याने लिहिलेला ग्रंथ 'प्रिंसिपिया मॅथेमॅटिका' अजूनही विज्ञान जगतात सर्वोच्च आणि संपूर्ण मानला जातो. "वेळ आणि अवकाश या गोष्टी कधीही न बदलणार्या मानत न्यूटनने 'हालचालीचे' साधे सोपे पण अत्यंत उपयुक्त ३ नियम दिले. हे नियम वापरून अजूनही आपण आपल्या दिनक्रमात कितीतरी गोष्टी करतो. न्यूटन नंतर आता अजून विज्ञानात काही संशोधन करण्यासारखे शिल्लक नाही असे वाटत असताना आईन्स्टाईन ने १९०५ या जादुई वर्षात एका मागोमाग एक असे ५ पेपर लिहिले आणि जगाचे सगळे नियम उलत्-सुलट करून सोडले...
...'पिक्चर अभी बाकी था मेरे दोस्त!' :)
क्रमशः
-टायबेरीअस
प्रतिक्रिया
6 May 2009 - 10:58 am | अडाणि
बद्दल नुकतेच वाचनात आले कि... त्या काळी चर्च ची एवढी भिती होती कि त्याचे स्वतचे संशोधन बराच काळ प्रसिध केले नव्हते... अगदी मरायच्या आधी त्याच्या एका शिश्याने 'सुर्य केंद्रस्थानी' हे संशोधन प्रसिद्द केले.. (सुमारे १५४३)
-
अफाट जगातील एक अडाणि.
6 May 2009 - 11:00 am | अवलिया
शिश्याने नाही हो शिष्याने !
बरे मधे 'न' नाही टाकला !!!
--अवलिया
6 May 2009 - 11:05 am | अनंता
__/^\__
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;)
7 May 2009 - 12:06 pm | अडाणि
तुम्ही योगी माणुस... बरे झाले सांगितले... बघा इथे पण 'न' नाही टाकला....
-
अफाट जगातील एक अडाणि.
6 May 2009 - 11:11 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
हान्स लिपर्शे या डच ऑप्टिशनने टेलिस्कोप बनवला आणि डच राजाला तो दिला. त्याने त्याचा उपयोग युद्धकाळासाठी केला. गॅलिलेओला या दुर्बिणीची माहिती कळली आणि त्यानेही खटपटी करून एक दुर्बीण बनवली. गॅलिलेओ (हा आपल्याला माहित असलेला) पहिला माणूस ज्याने दुर्बिण आकाशाकडे रोखली.
"त्या" (पहिल्या नव्हे) दुर्बीणीच्या जन्माला ४०० वर्ष झाली म्हणून हे वर्ष आंतरराष्टीय खगोलवर्ष म्हणून जाहीर झालं आहे.
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
6 May 2009 - 1:14 pm | नाटक्या
टायबेरीअस,
माहीती चांगली आहे पण फारच त्रोटक वाटते. अजून जर थोडेफार स्पष्टीकरण दिले तर चांगले होईल असे मला वाटते. बाकी पुढच्या भागाची वाट पहातो आहे...
- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
6 May 2009 - 3:24 pm | श्रावण मोडक
खूप त्रोटक लिहिताहात. वेळ काढा. सविस्तर लिहा.
'बाराला दहा कमी'ची आठवण येतेय.
6 May 2009 - 3:40 pm | सहज
जरा अजुन मोठा भाग चालेल. :-)
वाचतो आहे.
6 May 2009 - 4:09 pm | विसुनाना
कोपर्निकस ते न्यूटन ते आईन्स्टाईन २० ओळीत हे जरा जास्तच झालं. (की फार कमी झालं?)
7 May 2009 - 9:16 pm | प्राजु
थोडं सविस्तर लिहा.
वाचयला आवडते आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
7 May 2009 - 10:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
थोडं सविस्तर लिहा.
वाचायला आवडते आहे.
सापेक्षतावाद आणि व्यापक सापेक्षतावादाच्या प्रतिक्षेत...!
-दिलीप बिरुटे
6 May 2009 - 6:26 pm | मेघना भुस्कुटे
लिहा की राव अजून जरा सविस्तरपणे. मजा येतेय...
7 May 2009 - 2:53 am | धनंजय
छान आहे.
हे अजून प्रास्ताविकच आहे (म्हणून त्रोटक असले तरी ठीक आहे.) पण नमनाला तीन छोटेछोटे क्रमशः भाग घेतले, हे बरे नाही :-)
कदाचित इतके त्रोटक आहे ते बरोबर नाही. कारण ही जी काय शृंखला आहे
टॉलेमी->कोपेर्निकुस->केप्लेर->गॅलिलेओ->न्यूटन
ही श्रेयस्कर प्रगतीची शृंखला आहे का? (आहे असे माझे, आणि लेख लिहिणार्याचेही मत आहे, असे दिसते.) पण ती श्रेयस्कर का, आणि प्रगती का, हे कसे ठरवले? हे जर कळले नाही, तर ही केवळ एक पूजनीय नामावली झाली.
टॉलेमी म्हणे की आकाशातील सर्व ज्योती पृथ्वीभोवती फिरतात, कोपेर्निकुस म्हणे की (पृथ्वीसह) बाकी सर्व ज्योती सूर्याभोवती फिरतात. टॉलेमीचे चूक आणि कोपेर्निकुस याचे बरोबर असे का?
हा विचार नीट जर केला नाही तर दोन्ही "टॉलेमीचे म्हणणे अन् सूर्याला ग्रहणे"च्या ठिकाणी "कोपेर्निकुसचे म्हणणे अन् सूर्याला ग्रहणे" असे उत्तरोत्तर "बाबावाक्यं प्रमाणं" होईल. हा विचार "देवाची/गुरूची करणी आणि नारळात पाणी/खडकात बेडकी" यापेक्षा फार वेगळा नाही.
पुढच्या लेखात आपल्याला आइन्स्टाईन भेटणार आहे. त्याने श्रेयस्कर प्रगती केली, आणखी एक फक्त पाया पडण्यायोग्य गुरू आहे? जर प्रत्येकाने प्रगती केली असेल, तर ती कशी, हे प्रास्ताविकाने समजावले असते, तर मला आवडले असते. मग आइन्स्टाइनने केलेली तीसुद्धा ऐतिहासिक प्रगती आहे, हे पुढच्या लेखात समजेल अशी रास्त अपेक्षा माझ्यात निर्माण झाली असती.
- - -
शैलीबाबत : न्यूटनचे लिएब्नित्सशी भांडण होते, वगैरे "गॉसिप" तपशील मला गमतीदार आणि रंजक वाटले, की थिल्लर आणि लक्ष विचलित करणारे वाटले, याबाबत माझ्या मनाची द्विधा होते आहे. बहुधा "गंमत वाटली, शैली अशीच ठेवा" या बाजूला मी कलतो आहे.
7 May 2009 - 12:38 pm | नितिन थत्ते
सहमत.
गणित आणि आकृत्या टाळून लेख लिहिण्याचा प्रयत्न चालू आहे त्यामुळे असे होत असावे. पण हे टाळून लेख लिहिणे म्हणजे कदाचित ठाकूर आणि गब्बरसिंगला टाळून शोले पिक्चरची गोष्ट सांगण्या सारखे होईल.
लेखाचा आकार थोडा मोठा हवा असे वाटते. तसेच न्यूटन ते आइनस्टाईन यांमधील हायगेन्स, मॅक्सवेल, लोरेन्त्झ, मायकेलसन्-मोर्ले प्रयोग यांचा आवश्यक असलेला उल्लेख टाळला आहे. तो का?
आईन्स्टाईनने नवी दृष्टी देण्यापूर्वी थिअरीशी न जुळणारी निरीक्षणे जुन्या थिअरीत ठोकून ठाकून बसवण्याचे प्रयत्नही महत्त्वाचे आहेत.
कोपनिकस ते न्यूटन हा मोठा प्रवास आहे. तो एका लेखात संपवणे अन्यायकारक (वाचकांवर आणि विषयावर) वाटते.
खराटा
(रंग माझा वेगळा)
7 May 2009 - 6:20 pm | राघव
धनंजय अन् खराटा, दोघांशीही सहमत.
माहिती विस्तृत अन् नेमकी असली म्हणजे बरे असते! :)
(विज्ञानप्रेमी)राघव
7 May 2009 - 8:04 pm | टायबेरीअस
स्गळे बरोबरच सांगत आहेत. लेख थोडे सविस्तर चालले असते. विषय थोडा मोठा असल्याने, प्रास्तविक ३ भागांत विभागले होते. खराटा यांचे निरक्षण अचूक आहे. गणिताविना या विषयावर लिहायचे म्हणजे अमिताभ विना बॉलिवूड कथा लिहिल्यासारखे होणारे. अगदी आवश्यक असेल तर मी गणितात प्रवेश करणार आहे. मूळ हेतू इतिहासातून विज्ञानातला अत्यंत लोकप्रिय पण नीटसा कळलेला नसलेला ( मी ही अजून डायजेस्टतोय ;) ) विचार लोकांसमोर मांडणे आहे.
धनंजय, खराटा तुमचे विशेष आभार. आता मेन लेख मोठे आणि सविस्तरच लिहीन. आणि खराटा तुम्ही सांगितलेले जवळ्जवळ सगळे शास्त्रज्ञ या लेखांमधून प्रकट होतील.
-धन्यवाद!
-टायबेरीअस
मै तो अकेले ही चला था जानिबे मंझील मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया"
7 May 2009 - 8:19 pm | लिखाळ
लेखमाला छान चालू आहे.. वाचनीय आहे.. धनंजय, खराटा यांच्या सूचना योग्य वाटल्या.
पुढले भाग वाचण्यास उत्सुक आहे.
-- लिखाळ.
7 May 2009 - 8:45 pm | आनंद घारे
मलाही हा इतिहास जरा त्रोटक वाटला. हा प्रवास थोड्या विस्ताराने मी खालील स्थळी लिहिला आहे. वाटल्यास वाचून पहावा.
http://anandghan.blogspot.com/2006/03/moon-part-15-copernicus.html
http://anandghan.blogspot.com/2006/03/moon-part16-keplers-laws.html
http://anandghan.blogspot.com/2006/03/moon-part-17-galileo.html
http://anandghan.blogspot.com/2006/03/moon-part-18-gravitation.html
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
7 May 2009 - 9:03 pm | टायबेरीअस
खरडवहीत एक प्रश्न आलाय आणि माझ्याकडे त्याचे नक्की उत्तर नाही.. कोणास ठाउक आहे का?
"जसे न्युटनला सफरचंद खाली पडताना गुरुत्वाकर्षण वगैरे ट्युब पेटली...तसे नक्की काय झाले की कोपर्निकसला वाटले की नाही पृथ्वीभोवती नाही तर सुर्याभोवती सगळे फिरत आहेत?"
मै तो अकेले ही चला था जानिबे मंझील मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया"
7 May 2009 - 10:09 pm | धनंजय
न्यूटनबद्दल ही रम्य कथा मोठी गमतीदार आहे.
कोपेर्निक्सबद्दल अशी कथा मला माहीत नाही. तो कॅथेड्रलच्या तटबंदीच्या बुरुजावर जाऊन आकाशाचे निरीक्षण करत असे, असे म्हणतात - पण हर त्याच्या सवयींचे वर्णन झाले, यात गमतीदार असे काही नाही. कोपेर्निकसने आकाशातील ग्रहस्थितींचे त्या काळातले सर्वोत्तम तक्ते प्रसिद्ध केले होते.
त्याच्या स्वतःच्या पुस्तकात असे वर्णन आहे की "टॉलेमीच्या चर्कात-चक्रे फिरणार्या ग्रहमार्गांचे वर्णन निरीक्षणाशी सुसंगत होण्यासाठी ग्रहांच्या काहीच-अचल नसलेल्या गती मानाव्या लागतात...आणि ही चक्रात-चक्रे गती मनालाही आनंददायक नाही..."
त्याच्या पुस्तकातील प्रस्ताविकातील इंगजी भाषांतरित काही वाक्ये -
http://dbanach.com/copernicus-commentarilous.htm
7 May 2009 - 9:33 pm | अमेरिकन त्रिशंकू
टायबेरिअस,
कोपर्निकसबद्दल तुमच्या लेखासाठी अजुन माहिती हवी असेल तर हा दुवा बघा.
http://www-groups.dcs.st-and.ac.uk/~history/Biographies/Copernicus.html
गणित,गणितज्ञ, गणिताचा इतिहास ह्याबद्दल माहिती हवी असेल तर इथे बघा.
http://www-groups.dcs.st-and.ac.uk/~history/index.html
7 May 2009 - 10:15 pm | आनंद घारे
सारे ग्रह जर पृथ्वीभोवती फिरत असले तर त्यांनी वक्री होण्याचे कारण नव्हते, पण ते मागे पुढे जातांना प्रत्यक्षात दिसायचे. याचे टॉलेमीने दिलेले स्पष्टीकरणही कोपर्निकसला पटले नाही. त्याने सर्व ग्रहांच्या भ्रमणाबद्दल त्या काळी जेवढी माहिती उपलब्ध झाली त्याचा तौलनिक अभ्यास केला. कोपर्निकस गणित विषयात अत्यंत प्रवीण असल्यामुळे सूर्याच्या भ्रमणाशी इतर ग्रहांचे भ्रमण सुसंगत आहे हे त्या विश्लेषणातून त्याच्या लक्षात आले.
जसे न्युटनला सफरचंद खाली पडताना गुरुत्वाकर्षण वगैरे ट्युब पेटली
ही सुद्धा चुकीची समजूत आहे. चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यासंबंधी विचार करता करता न्यूटन गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतापर्यंत पोचला.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/