मुक्तक

चन्द्रशेखर गोखले's picture
चन्द्रशेखर गोखले in जे न देखे रवी...
21 Apr 2009 - 9:58 am

एक सरप्राइझ
आहे .. ओळख

मी प्रश्नांकित
गप्प..
तू बाबा
अन् मी
आई होणार

ती आरक्त
लाजून
म्हणाली..

मी रोमांचित
तिला
खसकन
जवळ
ओढली..
अरे हळू..
ती जराशी
दूर झाली..
बघता बघता
ती आई झाली..

ती बाळासाठी
वेडीपिशी
मी उसासे
टाकीत होतो
घेउनी ऊशी..

मात्र एकदा
संयम सुटतो
खसकन
तिला
जवळ ओढतो..
स्शू ...हळू
बाळ उठेल ना..

दूर सरकुन
ती वदली..

कधी मोठा
होणारेस
जरा संयम पाळ
तू आता बाबा
झालैस..
लडीवाळ पणे
ती पुन्हा म्हणाली..
मी हिरमुसतो
खट्टू होतो
डोक्यावरती
उशी घुऊन
कूस बदलतो
..........
रागावलास...?
मला बिलगुन
ती म्हणाली
....
दांडगाई नाही हं मात्र
जरा सावकाश..
असे बोलुन
कुशीत शिरली
मी उत्तेजीत
तीही फुलली

अन इतक्यात
बाळ रडते
बघ तरी सांगत होते
ऐकलं नाहेस
ती सावरते
दिवा लावते
अन बाळाला
जवळ घेते..
पुन्हा उसासे..
झोप हिला
जवळ घेउन
उशी फेकुन
अंगावरती
ती सांगते
खुदुखुदु हासते..
मी खजील
मनात म्हणतो
तीला बरे हे
लगेच जमते
..
......
दिवा विझवितो
मीही विझतो
अन तिघेही बिलगुन
गाढ झोपतो...

मुक्तक

प्रतिक्रिया

अवलिया's picture

10 Sep 2010 - 11:40 am | अवलिया

जबरा !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Sep 2010 - 8:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>जबरा !

-दिलीप बिरुटे

पाषाणभेद's picture

27 Sep 2010 - 8:08 pm | पाषाणभेद

एकदम सही मुक्तक आहे. सहमत.

नगरीनिरंजन's picture

28 Sep 2010 - 8:19 am | नगरीनिरंजन

व्वा!

गांधीवादी's picture

28 Sep 2010 - 8:22 am | गांधीवादी

घरोघरी मातीच्या चुली.