मुक्तक..

चन्द्रशेखर गोखले's picture
चन्द्रशेखर गोखले in जे न देखे रवी...
20 Apr 2009 - 9:53 am

मला नाही वाटत बरं
तूच हातानी
जेवुन घे ना बाळा....
काप-या स्वरात
आई बोलली....
केवळ तिच्या समाधानासाठी
मी कशीबशी खिचडी खाल्ली
बेसिन मध्ये हात धुताना..
डोळ्यातिल आसवं
हातावर ओघळली...!
बरं वाटेल ना तिला..?
मनात शंकेची
पाल चुकचुकली...!!!

कविता

प्रतिक्रिया

क्रान्ति's picture

20 Apr 2009 - 7:04 pm | क्रान्ति

खूप सुरेख आहे मुक्तक.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

प्राजु's picture

20 Apr 2009 - 7:07 pm | प्राजु

का रे बाबा!!
असा काही नको रे विचार करू!!
आवडलं!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सूहास's picture

20 Apr 2009 - 7:50 pm | सूहास (not verified)

सुहास
आज मम्मीची खुप आठवण येत आहे...

बेसनलाडू's picture

21 Apr 2009 - 3:18 am | बेसनलाडू

केवळ तिच्या समाधानासाठी
मी कशीबशी खिचडी खाल्ली

या दोन ओळी कवितेतून वगळल्या असत्या आणि
बेसिन मध्ये हात धुताना.. च्या ऐवजी बेसिनमध्ये नळाच्या पाण्याचा आवाज करताना असा काहीसा बदल केल्यास अधिव रंजक/भावुक कविता झाली असती, असे वाटते. अर्थाचे अनेक पदर लाभले असते; वाचकांच्या कल्पनाशक्तीलाही चांगला वाव मिळाला असता. चू भू द्या घ्या
(मातृभक्त)बेसनलाडू

चन्द्रशेखर गोखले's picture

21 Apr 2009 - 6:31 am | चन्द्रशेखर गोखले

सुचने बद्दल धन्यवाद !